< योहान 8 >
1 १ येशू जैतूनाच्या डोंगराकडे गेला,
pratyūṣē yīśuḥ panarmandiram āgacchat
2 २ नंतर पहाटेस तो पुन्हा परमेश्वराच्या भवनात आला, तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला.
tataḥ sarvvēṣu lōkēṣu tasya samīpa āgatēṣu sa upaviśya tān upadēṣṭum ārabhata|
3 ३ तेव्हा व्यभिचार करत असतांना धरलेल्या एका स्त्रीला नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्यभागी उभे करून ते त्यास म्हणाले,
tadā adhyāpakāḥ phirūśinañca vyabhicārakarmmaṇi dhr̥taṁ striyamēkām āniya sarvvēṣāṁ madhyē sthāpayitvā vyāharan
4 ४ “गुरूजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली.
hē gurō yōṣitam imāṁ vyabhicārakarmma kurvvāṇāṁ lōkā dhr̥tavantaḥ|
5 ५ मोशेने नियमशास्त्रात आम्हास अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावी, तर आपण हिच्याविषयी काय म्हणता?”
ētādr̥śalōkāḥ pāṣāṇāghātēna hantavyā iti vidhirmūsāvyavasthāgranthē likhitōsti kintu bhavān kimādiśati?
6 ६ त्यास दोष लावायला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. पण येशू खाली आणून आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला.
tē tamapavadituṁ parīkṣābhiprāyēṇa vākyamidam apr̥cchan kintu sa prahvībhūya bhūmāvaṅgalyā lēkhitum ārabhata|
7 ७ आणि ते त्यास एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, “तुमच्यात जो कोणी निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर एक दगड टाकावा.”
tatastaiḥ punaḥ punaḥ pr̥ṣṭa utthāya kathitavān yuṣmākaṁ madhyē yō janō niraparādhī saēva prathamam ēnāṁ pāṣāṇēnāhantu|
8 ८ मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला.
paścāt sa punaśca prahvībhūya bhūmau lēkhitum ārabhata|
9 ९ हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो सरळ शेवटल्या मनुष्यापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले, येशू एकटा राहिला आणि ती स्त्री मध्यभागी उभी होती.
tāṁ kathaṁ śrutvā tē svasvamanasi prabōdhaṁ prāpya jyēṣṭhānukramaṁ ēkaikaśaḥ sarvvē bahiragacchan tatō yīśurēkākī tayakttōbhavat madhyasthānē daṇḍāyamānā sā yōṣā ca sthitā|
10 १० नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणीही नाही असे पाहून तिला म्हणाला, “मुली, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय?”
tatpaścād yīśurutthāya tāṁ vanitāṁ vinā kamapyaparaṁ na vilōkya pr̥ṣṭavān hē vāmē tavāpavādakāḥ kutra? kōpi tvāṁ kiṁ na daṇḍayati?
11 ११ ती म्हणाली, “प्रभूजी, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मी देखील तुला दोषी ठरवीत नाही; जा, यापुढे पाप करू नको.”
sāvadat hē mahēccha kōpi na tadā yīśuravōcat nāhamapi daṇḍayāmi yāhi punaḥ pāpaṁ mākārṣīḥ|
12 १२ पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”
tatō yīśuḥ punarapi lōkēbhya itthaṁ kathayitum ārabhata jagatōhaṁ jyōtiḥsvarūpō yaḥ kaścin matpaścāda gacchati sa timirē na bhramitvā jīvanarūpāṁ dīptiṁ prāpsyati|
13 १३ यावरुन परूशी त्यास म्हणाले, “तुम्ही स्वतःविषयी साक्ष देता, तुमची साक्ष खरी नाही.”
tataḥ phirūśinō'vādiṣustvaṁ svārthē svayaṁ sākṣyaṁ dadāsi tasmāt tava sākṣyaṁ grāhyaṁ na bhavati|
14 १४ येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “मी स्वतःविषयी साक्ष दिली तरी माझी साक्ष खरी आहे, कारण मी कोठून आलो आणि कोठे जाणार हे मला माहीत आहे; पण मी कोठून आलो आणि कोठे जाणार हे तुम्हास माहीत नाही.
tadā yīśuḥ pratyuditavān yadyapi svārthē'haṁ svayaṁ sākṣyaṁ dadāmi tathāpi mat sākṣyaṁ grāhyaṁ yasmād ahaṁ kuta āgatōsmi kva yāmi ca tadahaṁ jānāmi kintu kuta āgatōsmi kutra gacchāmi ca tad yūyaṁ na jānītha|
15 १५ तुम्ही देहानुसार न्याय करता; मी कुणाचा न्याय करीत नाही.
yūyaṁ laukikaṁ vicārayatha nāhaṁ kimapi vicārayāmi|
16 १६ आणि जरी मी कोणाचा न्याय करतो, तरी माझा न्याय खरा आहे कारण मी एकटा नाही तर मी आहे व ज्याने मला पाठवले तोसुध्दा आहे.
kintu yadi vicārayāmi tarhi mama vicārō grahītavyō yatōham ēkākī nāsmi prērayitā pitā mayā saha vidyatē|
17 १७ तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, दोघा मनुष्यांची साक्ष खरी आहे.
dvayō rjanayōḥ sākṣyaṁ grahaṇīyaṁ bhavatīti yuṣmākaṁ vyavasthāgranthē likhitamasti|
18 १८ मी स्वतःविषयी साक्ष देणारा आहे आणि ज्या पित्याने मला पाठवले आहे तोसुध्दा माझ्याविषयी साक्ष देतो.”
ahaṁ svārthē svayaṁ sākṣitvaṁ dadāmi yaśca mama tātō māṁ prēritavān sōpi madarthē sākṣyaṁ dadāti|
19 १९ यावरुन ते त्यास म्हणाले, “तुमचा पिता कोठे आहे?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखत नाही. तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.”
tadā tē'pr̥cchan tava tātaḥ kutra? tatō yīśuḥ pratyavādīd yūyaṁ māṁ na jānītha matpitarañca na jānītha yadi mām akṣāsyata tarhi mama tātamapyakṣāsyata|
20 २० तो परमेश्वराच्या भवनात शिकवीत असताही वचने जामदारखान्यात बोलला; पण कोणीही त्याच्यावर हात टाकले नाहीत, कारण त्याची वेळ अजून आलेली नव्हती.
yīśu rmandira upadiśya bhaṇḍāgārē kathā ētā akathayat tathāpi taṁ prati kōpi karaṁ nōdatōlayat|
21 २१ पुन्हा तो त्यांना म्हणाला, “मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापात मराल, मी जेथे जातो तिकडे तुम्ही येऊ शकत नाही.”
tataḥ paraṁ yīśuḥ punaruditavān adhunāhaṁ gacchāmi yūyaṁ māṁ gavēṣayiṣyatha kintu nijaiḥ pāpai rmariṣyatha yat sthānam ahaṁ yāsyāmi tat sthānam yūyaṁ yātuṁ na śakṣyatha|
22 २२ यावर यहूदी म्हणाले, “हा आत्महत्या करणार काय? कारण हा म्हणतो की, मी जाईन तिथे तुम्हास येता येणार नाही.”
tadā yihūdīyāḥ prāvōcan kimayam ātmaghātaṁ kariṣyati? yatō yat sthānam ahaṁ yāsyāmi tat sthānam yūyaṁ yātuṁ na śakṣyatha iti vākyaṁ bravīti|
23 २३ तो त्यांना म्हणाला, “तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे; तुम्ही या जगाचे आहा, मी या जगाचा नाही.
tatō yīśustēbhyaḥ kathitavān yūyam adhaḥsthānīyā lōkā aham ūrdvvasthānīyaḥ yūyam ētajjagatsambandhīyā aham ētajjagatsambandhīyō na|
24 २४ म्हणून मी तुम्हास सांगितले की, तुम्ही तुमच्या पापात मराल; कारण, मी तो आहे असा तुम्ही विश्वास न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल.”
tasmāt kathitavān yūyaṁ nijaiḥ pāpai rmariṣyatha yatōhaṁ sa pumān iti yadi na viśvasitha tarhi nijaiḥ pāpai rmariṣyatha|
25 २५ यावरुन ते त्यास म्हणाले, “तू कोण आहेस?” येशू त्यांना म्हणाला, “पहिल्यापासून तुम्हास जे सांगत आलो तेच नाही का?
tadā tē 'pr̥cchan kastvaṁ? tatō yīśuḥ kathitavān yuṣmākaṁ sannidhau yasya prastāvam ā prathamāt karōmi saēva puruṣōhaṁ|
26 २६ मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे, पण ज्याने मला पाठवले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्याकडून ऐकल्या त्या मी जगाला सांगतो.”
yuṣmāsu mayā bahuvākyaṁ vakttavyaṁ vicārayitavyañca kintu matprērayitā satyavādī tasya samīpē yadahaṁ śrutavān tadēva jagatē kathayāmi|
27 २७ तो त्यांच्याशी पित्याविषयी बोलत होता हे त्यांना कळले नाही.
kintu sa janakē vākyamidaṁ prōkttavān iti tē nābudhyanta|
28 २८ तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही जेव्हा मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हास हे कळेल की तो मी आहे आणि मी स्वतः काही करीत नाही तर पित्याने मला सांगितल्याप्रमाणे मी हे करतो.
tatō yīśurakathayad yadā manuṣyaputram ūrdvva utthāpayiṣyatha tadāhaṁ sa pumān kēvalaḥ svayaṁ kimapi karmma na karōmi kintu tātō yathā śikṣayati tadanusārēṇa vākyamidaṁ vadāmīti ca yūyaṁ jñātuṁ śakṣyatha|
29 २९ ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे; त्याने मला एकटे सोडले नाही; कारण मी नेहमी त्यास आवडणार्या गोष्टी करतो.”
matprērayitā pitā mām ēkākinaṁ na tyajati sa mayā sārddhaṁ tiṣṭhati yatōhaṁ tadabhimataṁ karmma sadā karōmi|
30 ३० येशू हे बोलत असता पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
tadā tasyaitāni vākyāni śrutvā bahuvastāsmin vyaśvasan|
31 ३१ ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात.
yē yihūdīyā vyaśvasan yīśustēbhyō'kathayat
32 ३२ तुम्हास सत्य समजेल आणि सत्य तुम्हास बंधनमुक्त करील.”
mama vākyē yadi yūyam āsthāṁ kurutha tarhi mama śiṣyā bhūtvā satyatvaṁ jñāsyatha tataḥ satyatayā yuṣmākaṁ mōkṣō bhaviṣyati|
33 ३३ त्यांनी त्यास उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत आणि कधीही कोणाचे दास झालो नाही. तुम्ही आम्हास कसे म्हणता की, तुम्ही स्वतंत्र केले जाल?”
tadā tē pratyavādiṣuḥ vayam ibrāhīmō vaṁśaḥ kadāpi kasyāpi dāsā na jātāstarhi yuṣmākaṁ muktti rbhaviṣyatīti vākyaṁ kathaṁ bravīṣi?
34 ३४ येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे.
tadā yīśuḥ pratyavadad yuṣmānahaṁ yathārthataraṁ vadāmi yaḥ pāpaṁ karōti sa pāpasya dāsaḥ|
35 ३५ दास सर्वकाळ घरात राहत नाही; पुत्र सर्वकाळ घरात राहत. (aiōn )
dāsaśca nirantaraṁ nivēśanē na tiṣṭhati kintu putrō nirantaraṁ tiṣṭhati| (aiōn )
36 ३६ म्हणून जर पुत्राने तुम्हास बंधनमुक्त केले तर तुम्ही, खरोखर, बंधनमुक्त व्हाल.
ataḥ putrō yadi yuṣmān mōcayati tarhi nitāntamēva mukttā bhaviṣyatha|
37 ३७ मी जाणतो की, तुम्ही अब्राहामाचे वंशज आहात, तरी तुमच्यामध्ये माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही मला जीवे मारायला पाहता.
yuyam ibrāhīmō vaṁśa ityahaṁ jānāmi kintu mama kathā yuṣmākam antaḥkaraṇēṣu sthānaṁ na prāpnuvanti tasmāddhētō rmāṁ hantum īhadhvē|
38 ३८ मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसेच तुम्ही आपल्या पित्याकडून जे ऐकले ते करता.”
ahaṁ svapituḥ samīpē yadapaśyaṁ tadēva kathayāmi tathā yūyamapi svapituḥ samīpē yadapaśyata tadēva kurudhvē|
39 ३९ त्यांनी त्यास उत्तर दिले, “अब्राहाम आमचा पिता आहे.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही अब्राहामाची मुले आहात तर अब्राहामाची कृत्ये कराल.
tadā tē pratyavōcan ibrāhīm asmākaṁ pitā tatō yīśurakathayad yadi yūyam ibrāhīmaḥ santānā abhaviṣyata tarhi ibrāhīma ācāraṇavad ācariṣyata|
40 ४० परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हास सांगितले त्या मनुष्यास म्हणजे मला तुम्ही आता ठार मारायला पाहता. अब्राहामाने असे केले नाही.
īśvarasya mukhāt satyaṁ vākyaṁ śrutvā yuṣmān jñāpayāmi yōhaṁ taṁ māṁ hantuṁ cēṣṭadhvē ibrāhīm ētādr̥śaṁ karmma na cakāra|
41 ४१ तुम्ही आपल्या पित्याच्या कृत्ये करता.” ते त्यास म्हणाले, “आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही. आम्हास एकच पिता म्हणजे देव आहे.”
yūyaṁ svasvapituḥ karmmāṇi kurutha tadā tairukttaṁ na vayaṁ jārajātā asmākam ēkaēva pitāsti sa ēvēśvaraḥ
42 ४२ येशूने त्यांना म्हटले, “देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती; कारण मी देवापासून निघालो व आलो, मी स्वतः होऊन आलो नाही, पण त्याने मला पाठवले.
tatō yīśunā kathitam īśvarō yadi yuṣmākaṁ tātōbhaviṣyat tarhi yūyaṁ mayi prēmākariṣyata yatōham īśvarānnirgatyāgatōsmi svatō nāgatōhaṁ sa māṁ prāhiṇōt|
43 ४३ तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? याचे कारण हेच की, तुमच्याकडून माझे वचन ऐकवत नाही.
yūyaṁ mama vākyamidaṁ na budhyadhvē kutaḥ? yatō yūyaṁ mamōpadēśaṁ sōḍhuṁ na śaknutha|
44 ४४ तुम्ही आपला पिता सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या पित्याच्या वासनांप्रमाणे करू पाहता. तो प्रारंभापासून मनुष्य घात करणारा होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा पिता आहे.
yūyaṁ śaitān pituḥ santānā ētasmād yuṣmākaṁ piturabhilāṣaṁ pūrayatha sa ā prathamāt naraghātī tadantaḥ satyatvasya lēśōpi nāsti kāraṇādataḥ sa satyatāyāṁ nātiṣṭhat sa yadā mr̥ṣā kathayati tadā nijasvabhāvānusārēṇaiva kathayati yatō sa mr̥ṣābhāṣī mr̥ṣōtpādakaśca|
45 ४५ पण मी तुम्हास खरे सांगतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही.
ahaṁ tathyavākyaṁ vadāmi kāraṇādasmād yūyaṁ māṁ na pratītha|
46 ४६ तुमच्यातला कोण मला पापी ठरवतो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर का विश्वास ठेवत नाही?
mayi pāpamastīti pramāṇaṁ yuṣmākaṁ kō dātuṁ śaknōti? yadyahaṁ tathyavākyaṁ vadāmi tarhi kutō māṁ na pratitha?
47 ४७ देवापासून असणारा देवाची वचने ऐकतो. तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही.”
yaḥ kaścana īśvarīyō lōkaḥ sa īśvarīyakathāyāṁ manō nidhattē yūyam īśvarīyalōkā na bhavatha tannidānāt tatra na manāṁsi nidhadvē|
48 ४८ यहूद्यांनी त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हास भूत लागले आहे, हे जे आम्ही म्हणतो ते बरोबर आहे की नाही?”
tadā yihūdīyāḥ pratyavādiṣuḥ tvamēkaḥ śōmirōṇīyō bhūtagrastaśca vayaṁ kimidaṁ bhadraṁ nāvādiṣma?
49 ४९ येशूने त्यांना उत्तर दिले, “मला भूत लागले नाही; तर मी आपल्या पित्याचा सन्मान करतो आणि तुम्ही माझा अपमान करता.
tatō yīśuḥ pratyavādīt nāhaṁ bhūtagrastaḥ kintu nijatātaṁ sammanyē tasmād yūyaṁ mām apamanyadhvē|
50 ५० मी स्वतःचे गौरव करू पाहत नाही; ते पाहणारा व न्यायनिवाडा करणारा आहेच.
ahaṁ svasukhyātiṁ na cēṣṭē kintu cēṣṭitā vicārayitā cāpara ēka āstē|
51 ५१ मी तुम्हास खरे खरे सांगतो, जर कोणी माझे वचने पाळील तर त्यास मरणाचा अनुभव कधीही येणार नाही.” (aiōn )
ahaṁ yuṣmabhyam atīva yathārthaṁ kathayāmi yō narō madīyaṁ vācaṁ manyatē sa kadācana nidhanaṁ na drakṣyati| (aiōn )
52 ५२ यहूदी लोक त्यास म्हणाले, “आता आम्हास कळले की, तुम्हास भूत लागले आहे. अब्राहाम मरण पावला आणि संदेष्टेही मरण पावले; आणि तुम्ही म्हणता की, कोणी माझे वचन पाळील तर तो कधी मरण अनुभवणार नाही. (aiōn )
yihūdīyāstamavadan tvaṁ bhūtagrasta itīdānīm avaiṣma| ibrāhīm bhaviṣyadvādinañca sarvvē mr̥tāḥ kintu tvaṁ bhāṣasē yō narō mama bhāratīṁ gr̥hlāti sa jātu nidhānāsvādaṁ na lapsyatē| (aiōn )
53 ५३ आमचा पिता अब्राहाम मरण पावला; त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात काय? आणि संदेष्टेही मरण पावले; तुम्ही स्वतःला काय समजता?”
tarhi tvaṁ kim asmākaṁ pūrvvapuruṣād ibrāhīmōpi mahān? yasmāt sōpi mr̥taḥ bhaviṣyadvādinōpi mr̥tāḥ tvaṁ svaṁ kaṁ pumāṁsaṁ manuṣē?
54 ५४ येशूने उत्तर दिले, “मी स्वतःचे गौरव केले तर माझे गौरव काहीच नाही, माझे गौरव करणारा माझा स्वर्गीय पिता आहे, तो आमचा देव आहे असे तुम्ही त्याच्याविषयी म्हणता.
yīśuḥ pratyavōcad yadyahaṁ svaṁ svayaṁ sammanyē tarhi mama tat sammananaṁ kimapi na kintu mama tātō yaṁ yūyaṁ svīyam īśvaraṁ bhāṣadhvē saēva māṁ sammanutē|
55 ५५ तरी तुम्ही त्यास ओळखले नाही, मी त्यास ओळखतो आणि मी त्यास ओळखत नाही असे जर मी म्हणेन, तर मी तुमच्यासारखा लबाड ठरेन. पण, मी त्यास ओळखतो आणि त्याचे वचन पाळतो.
yūyaṁ taṁ nāvagacchatha kintvahaṁ tamavagacchāmi taṁ nāvagacchāmīti vākyaṁ yadi vadāmi tarhi yūyamiva mr̥ṣābhāṣī bhavāmi kintvahaṁ tamavagacchāmi tadākṣāmapi gr̥hlāmi|
56 ५६ माझा दिवस बघायला तुमचा पिता अब्राहाम उल्लसीत झाला; तो त्याने पाहिला व त्यास आनंद झाला.”
yuṣmākaṁ pūrvvapuruṣa ibrāhīm mama samayaṁ draṣṭum atīvāvāñchat tannirīkṣyānandacca|
57 ५७ यहूदी त्यास म्हणाले, “तुम्हास अजून पन्नास वर्षे झाली नाहीत आणि तुम्ही अब्राहामाला पाहिले आहे काय?”
tadā yihūdīyā apr̥cchan tava vayaḥ pañcāśadvatsarā na tvaṁ kim ibrāhīmam adrākṣīḥ?
58 ५८ येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, अब्राहामाचा जन्म झाला त्यापुर्वी मी आहे.”
yīśuḥ pratyavādīd yuṣmānahaṁ yathārthataraṁ vadāmi ibrāhīmō janmanaḥ pūrvvakālamārabhyāhaṁ vidyē|
59 ५९ यावरुन त्यांनी त्यास मारायला दगड उचलले, पण येशू परमेश्वराच्या भवनामधून गुप्तपणे निघून गेला.
tadā tē pāṣāṇān uttōlya tamāhantum udayacchan kintu yīśu rguptō mantirād bahirgatya tēṣāṁ madhyēna prasthitavān|