< योहान 8 >

1 येशू जैतूनाच्या डोंगराकडे गेला,
A Jezus poszedł na Górę Oliwną.
2 नंतर पहाटेस तो पुन्हा परमेश्वराच्या भवनात आला, तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला.
Potem znowu wcześnie rano przyszedł do świątyni, a cały lud zszedł się do niego. I siadłszy, nauczał ich.
3 तेव्हा व्यभिचार करत असतांना धरलेल्या एका स्त्रीला नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्यभागी उभे करून ते त्यास म्हणाले,
I przyprowadzili do niego uczeni w Piśmie i faryzeusze kobietę przyłapaną na cudzołóstwie, a postawiwszy ją pośrodku;
4 “गुरूजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली.
Powiedzieli do niego: Nauczycielu, tę kobietę przyłapano na uczynku cudzołóstwa.
5 मोशेने नियमशास्त्रात आम्हास अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावी, तर आपण हिच्याविषयी काय म्हणता?”
W prawie Mojżesz nakazał nam takie kamienować. A ty co mówisz?
6 त्यास दोष लावायला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. पण येशू खाली आणून आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला.
A mówili to, wystawiając go na próbę, aby mogli go oskarżyć. Jezus zaś, schyliwszy się, pisał palcem po ziemi.
7 आणि ते त्यास एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, “तुमच्यात जो कोणी निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर एक दगड टाकावा.”
A gdy nie przestawali go pytać, podniósł się i powiedział do nich: Kto z was jest bez grzechu, niech pierwszy rzuci w nią kamieniem.
8 मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला.
I znowu schyliwszy się, pisał po ziemi.
9 हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो सरळ शेवटल्या मनुष्यापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले, येशू एकटा राहिला आणि ती स्त्री मध्यभागी उभी होती.
A gdy oni to usłyszeli, będąc przekonani przez sumienie, odchodzili jeden po drugim, począwszy od starszych aż do ostatnich. Pozostał tylko sam Jezus i ta kobieta stojąca pośrodku.
10 १० नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणीही नाही असे पाहून तिला म्हणाला, “मुली, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय?”
A Jezus podniósł się i nie widząc nikogo oprócz tej kobiety, powiedział do niej: Kobieto, gdzież są ci, którzy cię oskarżali? Nikt cię nie potępił?
11 ११ ती म्हणाली, “प्रभूजी, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मी देखील तुला दोषी ठरवीत नाही; जा, यापुढे पाप करू नको.”
Ona odpowiedziała: Nikt, Panie. A Jezus powiedział do niej: I ja ciebie nie potępiam. Idź i już więcej nie grzesz.
12 १२ पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”
Jezus znowu powiedział do nich: Ja jestem światłością świata. Kto idzie za mną, nie będzie chodził w ciemności, ale będzie miał światłość życia.
13 १३ यावरुन परूशी त्यास म्हणाले, “तुम्ही स्वतःविषयी साक्ष देता, तुमची साक्ष खरी नाही.”
Powiedzieli więc do niego faryzeusze: Ty świadczysz sam o sobie, a twoje świadectwo nie jest prawdziwe.
14 १४ येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “मी स्वतःविषयी साक्ष दिली तरी माझी साक्ष खरी आहे, कारण मी कोठून आलो आणि कोठे जाणार हे मला माहीत आहे; पण मी कोठून आलो आणि कोठे जाणार हे तुम्हास माहीत नाही.
Odpowiedział im Jezus: Chociaż ja świadczę sam o sobie, [jednak] moje świadectwo jest prawdziwe, bo wiem, skąd przyszedłem i dokąd idę. Lecz wy nie wiecie, skąd przyszedłem i dokąd idę.
15 १५ तुम्ही देहानुसार न्याय करता; मी कुणाचा न्याय करीत नाही.
Wy sądzicie według ciała, ale ja nie sądzę nikogo.
16 १६ आणि जरी मी कोणाचा न्याय करतो, तरी माझा न्याय खरा आहे कारण मी एकटा नाही तर मी आहे व ज्याने मला पाठवले तोसुध्दा आहे.
A choćbym i sądził, mój sąd jest prawdziwy, bo nie jestem sam, ale [jestem] ja i Ojciec, który mnie posłał.
17 १७ तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, दोघा मनुष्यांची साक्ष खरी आहे.
A w waszym Prawie jest napisane, że świadectwo dwóch ludzi jest prawdziwe.
18 १८ मी स्वतःविषयी साक्ष देणारा आहे आणि ज्या पित्याने मला पाठवले आहे तोसुध्दा माझ्याविषयी साक्ष देतो.”
Ja jestem tym, który świadczy sam o sobie i świadczy o mnie Ojciec, który mnie posłał.
19 १९ यावरुन ते त्यास म्हणाले, “तुमचा पिता कोठे आहे?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखत नाही. तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.”
Wtedy zapytali go: Gdzie jest twój Ojciec? Jezus odpowiedział: Nie znacie ani mnie, ani mego Ojca. Gdybyście mnie znali, znalibyście i mego Ojca.
20 २० तो परमेश्वराच्या भवनात शिकवीत असताही वचने जामदारखान्यात बोलला; पण कोणीही त्याच्यावर हात टाकले नाहीत, कारण त्याची वेळ अजून आलेली नव्हती.
Te słowa mówił Jezus w skarbcu, nauczając w świątyni, a nikt go nie schwytał, bo jeszcze nie nadeszła jego godzina.
21 २१ पुन्हा तो त्यांना म्हणाला, “मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापात मराल, मी जेथे जातो तिकडे तुम्ही येऊ शकत नाही.”
Wówczas Jezus znowu powiedział do nich: Ja odchodzę, a wy będziecie mnie szukać i umrzecie w swoim grzechu. Gdzie ja idę, wy przyjść nie możecie.
22 २२ यावर यहूदी म्हणाले, “हा आत्महत्या करणार काय? कारण हा म्हणतो की, मी जाईन तिथे तुम्हास येता येणार नाही.”
Wtedy Żydzi mówili: Czyż sam się zabije, skoro mówi: Gdzie ja idę, wy przyjść nie możecie?
23 २३ तो त्यांना म्हणाला, “तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे; तुम्ही या जगाचे आहा, मी या जगाचा नाही.
I powiedział do nich: Wy jesteście z niskości, a ja jestem z wysoka. Wy jesteście z tego świata, ja zaś nie jestem z tego świata.
24 २४ म्हणून मी तुम्हास सांगितले की, तुम्ही तुमच्या पापात मराल; कारण, मी तो आहे असा तुम्ही विश्वास न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल.”
Dlatego wam powiedziałem, że umrzecie w swoich grzechach. Bo jeśli nie uwierzycie, że ja jestem, umrzecie w swoich grzechach.
25 २५ यावरुन ते त्यास म्हणाले, “तू कोण आहेस?” येशू त्यांना म्हणाला, “पहिल्यापासून तुम्हास जे सांगत आलो तेच नाही का?
Wtedy zapytali go: Kim ty jesteś? I odpowiedział im Jezus: Tym, kim wam od początku mówię.
26 २६ मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे, पण ज्याने मला पाठवले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्याकडून ऐकल्या त्या मी जगाला सांगतो.”
Wiele mam o was do powiedzenia i do sądzenia. Ale ten, który mnie posłał, jest prawdziwy, a ja mówię na świecie to, co od niego słyszałem.
27 २७ तो त्यांच्याशी पित्याविषयी बोलत होता हे त्यांना कळले नाही.
Nie zrozumieli jednak, że mówił im o Ojcu.
28 २८ तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही जेव्हा मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हास हे कळेल की तो मी आहे आणि मी स्वतः काही करीत नाही तर पित्याने मला सांगितल्याप्रमाणे मी हे करतो.
Dlatego Jezus powiedział do nich: Gdy wywyższycie Syna Człowieczego, wtedy poznacie, że ja jestem, a nie czynię nic sam od siebie, ale mówię to, czego mnie nauczył mój Ojciec.
29 २९ ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे; त्याने मला एकटे सोडले नाही; कारण मी नेहमी त्यास आवडणार्‍या गोष्टी करतो.”
A ten, który mnie posłał, jest ze mną. Ojciec nie zostawił mnie samego, bo ja zawsze czynię [to], co mu się podoba.
30 ३० येशू हे बोलत असता पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
Gdy to mówił, wielu uwierzyło w niego.
31 ३१ ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात.
Wtedy Jezus mówił do tych Żydów, którzy mu uwierzyli: Jeśli będziecie trwać w moim słowie, będziecie prawdziwie moimi uczniami.
32 ३२ तुम्हास सत्य समजेल आणि सत्य तुम्हास बंधनमुक्त करील.”
I poznacie prawdę, a prawda was wyzwoli.
33 ३३ त्यांनी त्यास उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत आणि कधीही कोणाचे दास झालो नाही. तुम्ही आम्हास कसे म्हणता की, तुम्ही स्वतंत्र केले जाल?”
Odpowiedzieli mu: My jesteśmy potomstwem Abrahama i nigdy nie służyliśmy nikomu. Jakże [możesz] mówić: Będziecie wolni?
34 ३४ येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे.
Jezus im odpowiedział: Zaprawdę, zaprawdę powiadam wam, że każdy, kto popełnia grzech, jest sługą grzechu.
35 ३५ दास सर्वकाळ घरात राहत नाही; पुत्र सर्वकाळ घरात राहत. (aiōn g165)
A sługa nie mieszka w domu na wieki, [lecz] Syn mieszka na wieki. (aiōn g165)
36 ३६ म्हणून जर पुत्राने तुम्हास बंधनमुक्त केले तर तुम्ही, खरोखर, बंधनमुक्त व्हाल.
Jeśli więc Syn was wyzwoli, będziecie prawdziwie wolni.
37 ३७ मी जाणतो की, तुम्ही अब्राहामाचे वंशज आहात, तरी तुमच्यामध्ये माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही मला जीवे मारायला पाहता.
Wiem, że jesteście potomstwem Abrahama, lecz usiłujecie mnie zabić, bo moje słowo nie znajduje w was miejsca.
38 ३८ मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसेच तुम्ही आपल्या पित्याकडून जे ऐकले ते करता.”
Ja mówię to, co widziałem u mego Ojca, a wy też robicie to, co widzieliście u waszego ojca.
39 ३९ त्यांनी त्यास उत्तर दिले, “अब्राहाम आमचा पिता आहे.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही अब्राहामाची मुले आहात तर अब्राहामाची कृत्ये कराल.
Odpowiedzieli mu: Naszym ojcem jest Abraham. Jezus im powiedział: Gdybyście byli synami Abrahama, spełnialibyście uczynki Abrahama.
40 ४० परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हास सांगितले त्या मनुष्यास म्हणजे मला तुम्ही आता ठार मारायला पाहता. अब्राहामाने असे केले नाही.
Lecz teraz usiłujecie mnie zabić, człowieka, który wam mówił prawdę, którą słyszał od Boga. Tego Abraham nie robił.
41 ४१ तुम्ही आपल्या पित्याच्या कृत्ये करता.” ते त्यास म्हणाले, “आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही. आम्हास एकच पिता म्हणजे देव आहे.”
Wy spełniacie uczynki waszego ojca. Wtedy powiedzieli mu: My nie jesteśmy spłodzeni z nierządu. Mamy jednego Ojca – Boga.
42 ४२ येशूने त्यांना म्हटले, “देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती; कारण मी देवापासून निघालो व आलो, मी स्वतः होऊन आलो नाही, पण त्याने मला पाठवले.
Jezus im powiedział: Gdyby Bóg był waszym Ojcem, miłowalibyście mnie, gdyż ja od Boga wyszedłem i przyszedłem, a nie przyszedłem sam od siebie, ale on mnie posłał.
43 ४३ तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? याचे कारण हेच की, तुमच्याकडून माझे वचन ऐकवत नाही.
Dlaczego nie pojmujecie tego, co mówię? Dlatego że nie możecie słuchać mojego słowa.
44 ४४ तुम्ही आपला पिता सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या पित्याच्या वासनांप्रमाणे करू पाहता. तो प्रारंभापासून मनुष्य घात करणारा होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा पिता आहे.
Wy jesteście z [waszego] ojca – diabła i chcecie spełniać pożądliwości waszego ojca. On był mordercą od początku i nie został w prawdzie, bo nie ma w nim prawdy. Gdy mówi kłamstwo, mówi od siebie, bo jest kłamcą i ojcem kłamstwa.
45 ४५ पण मी तुम्हास खरे सांगतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही.
A ponieważ ja mówię prawdę, nie wierzycie mi.
46 ४६ तुमच्यातला कोण मला पापी ठरवतो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर का विश्वास ठेवत नाही?
Któż z was obwini mnie o grzech? Jeśli mówię prawdę, dlaczego mi nie wierzycie?
47 ४७ देवापासून असणारा देवाची वचने ऐकतो. तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही.”
Kto jest z Boga, słucha słów Bożych. Wy dlatego nie słuchacie, że nie jesteście z Boga.
48 ४८ यहूद्यांनी त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हास भूत लागले आहे, हे जे आम्ही म्हणतो ते बरोबर आहे की नाही?”
Wtedy Żydzi mu odpowiedzieli: Czy nie dobrze mówimy, że jesteś Samarytaninem i masz demona?
49 ४९ येशूने त्यांना उत्तर दिले, “मला भूत लागले नाही; तर मी आपल्या पित्याचा सन्मान करतो आणि तुम्ही माझा अपमान करता.
Jezus odpowiedział: Ja nie mam demona, ale czczę mego Ojca, a wy mnie znieważacie.
50 ५० मी स्वतःचे गौरव करू पाहत नाही; ते पाहणारा व न्यायनिवाडा करणारा आहेच.
Ja nie szukam swojej chwały. Jest ktoś, kto szuka i sądzi.
51 ५१ मी तुम्हास खरे खरे सांगतो, जर कोणी माझे वचने पाळील तर त्यास मरणाचा अनुभव कधीही येणार नाही.” (aiōn g165)
Zaprawdę, zaprawdę powiadam wam: Jeśli ktoś będzie zachowywał moje słowa, nigdy nie ujrzy śmierci. (aiōn g165)
52 ५२ यहूदी लोक त्यास म्हणाले, “आता आम्हास कळले की, तुम्हास भूत लागले आहे. अब्राहाम मरण पावला आणि संदेष्टेही मरण पावले; आणि तुम्ही म्हणता की, कोणी माझे वचन पाळील तर तो कधी मरण अनुभवणार नाही. (aiōn g165)
Wtedy Żydzi powiedzieli do niego: Teraz wiemy, że masz demona. Abraham umarł i prorocy, a ty mówisz: Jeśli ktoś będzie zachowywał moje słowa, nigdy nie skosztuje śmierci. (aiōn g165)
53 ५३ आमचा पिता अब्राहाम मरण पावला; त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात काय? आणि संदेष्टेही मरण पावले; तुम्ही स्वतःला काय समजता?”
Czy ty jesteś większy od naszego ojca Abrahama, który umarł? I prorocy poumierali. Kim ty się czynisz?
54 ५४ येशूने उत्तर दिले, “मी स्वतःचे गौरव केले तर माझे गौरव काहीच नाही, माझे गौरव करणारा माझा स्वर्गीय पिता आहे, तो आमचा देव आहे असे तुम्ही त्याच्याविषयी म्हणता.
Jezus odpowiedział: Jeśli ja sam siebie chwalę, moja chwała jest niczym. Mój Ojciec jest [tym], który mnie chwali, o którym wy mówicie, że jest waszym Bogiem.
55 ५५ तरी तुम्ही त्यास ओळखले नाही, मी त्यास ओळखतो आणि मी त्यास ओळखत नाही असे जर मी म्हणेन, तर मी तुमच्यासारखा लबाड ठरेन. पण, मी त्यास ओळखतो आणि त्याचे वचन पाळतो.
Lecz nie znacie go, a ja go znam. I jeślibym powiedział, że go nie znam, byłbym podobnym do was kłamcą. Ale znam go i zachowuję jego słowa.
56 ५६ माझा दिवस बघायला तुमचा पिता अब्राहाम उल्लसीत झाला; तो त्याने पाहिला व त्यास आनंद झाला.”
Abraham, wasz ojciec, z radością pragnął ujrzeć mój dzień. I ujrzał, i radował się.
57 ५७ यहूदी त्यास म्हणाले, “तुम्हास अजून पन्नास वर्षे झाली नाहीत आणि तुम्ही अब्राहामाला पाहिले आहे काय?”
Wówczas Żydzi powiedzieli do niego: Pięćdziesięciu lat jeszcze nie masz, a Abrahama widziałeś?
58 ५८ येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, अब्राहामाचा जन्म झाला त्यापुर्वी मी आहे.”
Jezus im odpowiedział: Zaprawdę, zaprawdę powiadam wam: Zanim Abraham był, ja jestem.
59 ५९ यावरुन त्यांनी त्यास मारायला दगड उचलले, पण येशू परमेश्वराच्या भवनामधून गुप्तपणे निघून गेला.
Wtedy porwali kamienie, aby w niego rzucać. Jezus jednak ukrył się i wyszedł ze świątyni, przechodząc między nimi, i tak odszedł.

< योहान 8 >