< योहान 3 >

1 परूश्यांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता, तो यहूद्यांचा एक अधिकारी होता.
निकदिमनामा यिहूदीयानाम् अधिपतिः फिरूशी क्षणदायां
2 तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन म्हणाला, “रब्बी, आपण देवाकडून आलेले शिक्षक आहात हे आम्ही जाणतो; कारण आपण जी चिन्हे करीत आहात ती कोणीही मनुष्य, त्याच्याबरोबर देव असल्याशिवाय करू शकणार नाही.”
यीशौरभ्यर्णम् आव्रज्य व्याहार्षीत्, हे गुरो भवान् ईश्वराद् आगत् एक उपदेष्टा, एतद् अस्माभिर्ज्ञायते; यतो भवता यान्याश्चर्य्यकर्म्माणि क्रियन्ते परमेश्वरस्य साहाय्यं विना केनापि तत्तत्कर्म्माणि कर्त्तुं न शक्यन्ते।
3 येशू त्यास म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, पुन्हा जन्मल्यावांचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.”
तदा यीशुरुत्तरं दत्तवान् तवाहं यथार्थतरं व्याहरामि पुनर्जन्मनि न सति कोपि मानव ईश्वरस्य राज्यं द्रष्टुं न शक्नोति।
4 निकदेम त्यास म्हणाला, “म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्यास आपल्या आईच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय?”
ततो निकदीमः प्रत्यवोचत् मनुजो वृद्धो भूत्वा कथं जनिष्यते? स किं पुन र्मातृर्जठरं प्रविश्य जनितुं शक्नोति?
5 येशूने त्यास उत्तर दिले, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावांचून कोणीही देवाच्या राज्यांत प्रवेश करू शकत नाही.
यीशुरवादीद् यथार्थतरम् अहं कथयामि मनुजे तोयात्मभ्यां पुन र्न जाते स ईश्वरस्य राज्यं प्रवेष्टुं न शक्नोति।
6 देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे.
मांसाद् यत् जायते तन् मांसमेव तथात्मनो यो जायते स आत्मैव।
7 तुम्ही पुन्हा जन्मले पाहिजे, असे मी तुम्हास सांगितले याचे आश्चर्य मानू नका.
युष्माभिः पुन र्जनितव्यं ममैतस्यां कथायाम् आश्चर्यं मा मंस्थाः।
8 वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, पण तो कोठून येतो आणि कोठे जातो हे तुम्हास कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे.”
सदागतिर्यां दिशमिच्छति तस्यामेव दिशि वाति, त्वं तस्य स्वनं शुणोषि किन्तु स कुत आयाति कुत्र याति वा किमपि न जानासि तद्वाद् आत्मनः सकाशात् सर्व्वेषां मनुजानां जन्म भवति।
9 निकदेमाने त्यास उत्तर देऊन म्हटले, “या गोष्टी कशा होऊ शकतील?”
तदा निकदीमः पृष्टवान् एतत् कथं भवितुं शक्नोति?
10 १० येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, “तू इस्राएलाचे गुरू असूनही तुम्हास या गोष्टी समजत नाही काय?
यीशुः प्रत्यक्तवान् त्वमिस्रायेलो गुरुर्भूत्वापि किमेतां कथां न वेत्सि?
11 ११ मी तुम्हास खरे खरे सांगतो, जे आम्हास ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि आम्ही जे पाहिले आहे त्याची साक्ष देतो; पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही.
तुभ्यं यथार्थं कथयामि, वयं यद् विद्मस्तद् वच्मः यंच्च पश्यामस्तस्यैव साक्ष्यं दद्मः किन्तु युष्माभिरस्माकं साक्षित्वं न गृह्यते।
12 १२ मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हास सांगितल्या असता तुम्ही विश्वास ठेवत नाही; मग, मी स्वर्गातील गोष्टी जर तुम्हास सांगितल्या तर तुम्ही कसा विश्वास ठेवाल?
एतस्य संसारस्य कथायां कथितायां यदि यूयं न विश्वसिथ तर्हि स्वर्गीयायां कथायां कथं विश्वसिष्यथ?
13 १३ स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही.
यः स्वर्गेऽस्ति यं च स्वर्गाद् अवारोहत् तं मानवतनयं विना कोपि स्वर्गं नारोहत्।
14 १४ जसा मोशेने अरण्यात पितळेचा सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे,
अपरञ्च मूसा यथा प्रान्तरे सर्पं प्रोत्थापितवान् मनुष्यपुत्रोऽपि तथैवोत्थापितव्यः;
15 १५ यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्यास त्याच्याठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. (aiōnios g166)
तस्माद् यः कश्चित् तस्मिन् विश्वसिष्यति सोऽविनाश्यः सन् अनन्तायुः प्राप्स्यति। (aiōnios g166)
16 १६ कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन मिळावे. (aiōnios g166)
ईश्वर इत्थं जगददयत यत् स्वमद्वितीयं तनयं प्राददात् ततो यः कश्चित् तस्मिन् विश्वसिष्यति सोऽविनाश्यः सन् अनन्तायुः प्राप्स्यति। (aiōnios g166)
17 १७ कारण देवाने पुत्राला जगात पाठवले ते जगाचा न्याय करायला नाही, पण त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले.
ईश्वरो जगतो लोकान् दण्डयितुं स्वपुत्रं न प्रेष्य तान् परित्रातुं प्रेषितवान्।
18 १८ जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय होणार नाही, पण जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय झालेलाच आहे; कारण, त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही.
अतएव यः कश्चित् तस्मिन् विश्वसिति स दण्डार्हो न भवति किन्तु यः कश्चित् तस्मिन् न विश्वसिति स इदानीमेव दण्डार्हो भवति, यतः स ईश्वरस्याद्वितीयपुत्रस्य नामनि प्रत्ययं न करोति।
19 १९ आणि न्याय हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे; पण मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये वाईट होती;
जगतो मध्ये ज्योतिः प्राकाशत किन्तु मनुष्याणां कर्म्मणां दृष्टत्वात् ते ज्योतिषोपि तिमिरे प्रीयन्ते एतदेव दण्डस्य कारणां भवति।
20 २० कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही.
यः कुकर्म्म करोति तस्याचारस्य दृष्टत्वात् स ज्योतिर्ॠतीयित्वा तन्निकटं नायाति;
21 २१ पण जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.”
किन्तु यः सत्कर्म्म करोति तस्य सर्व्वाणि कर्म्माणीश्वरेण कृतानीति सथा प्रकाशते तदभिप्रायेण स ज्योतिषः सन्निधिम् आयाति।
22 २२ यानंतर येशू व त्याचे शिष्य यहूदियाच्या प्रांतात आले आणि तेथे त्यांच्याबरोबर राहून तो बाप्तिस्मा करत होता.
ततः परम् यीशुः शिष्यैः सार्द्धं यिहूदीयदेशं गत्वा तत्र स्थित्वा मज्जयितुम् आरभत।
23 २३ आणि योहानदेखील शालिमाजवळ, एनोन येथे बाप्तिस्मा करीत होता; कारण तेथे पाणी पुष्कळ होते आणि लोक तेथे येऊन बाप्तिस्मा घेत असत.
तदा शालम् नगरस्य समीपस्थायिनि ऐनन् ग्रामे बहुतरतोयस्थितेस्तत्र योहन् अमज्जयत् तथा च लोका आगत्य तेन मज्जिता अभवन्।
24 २४ तोपर्यंत योहान तुरुंगात टाकला गेला नव्हता.
तदा योहन् कारायां न बद्धः।
25 २५ मग योहानाच्या शिष्यांचा एका यहूद्याबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला.
अपरञ्च शाचकर्म्मणि योहानः शिष्यैः सह यिहूदीयलोकानां विवादे जाते, ते योहनः संन्निधिं गत्वाकथयन्,
26 २६ ते योहानाकडे येऊन त्यास म्हणाले, “रब्बी, यार्देनेच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता आणि आपण ज्याच्याविषयी साक्ष दिली तो बाप्तिस्मा करीत आहे आणि त्याच्याकडे सगळे जात आहेत.”
हे गुरो यर्द्दननद्याः पारे भवता सार्द्धं य आसीत् यस्मिंश्च भवान् साक्ष्यं प्रददात् पश्यतु सोपि मज्जयति सर्व्वे तस्य समीपं यान्ति च।
27 २७ योहानाने उत्तर दिले, “मनुष्यास स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही.
तदा योहन् प्रत्यवोचद् ईश्वरेण न दत्ते कोपि मनुजः किमपि प्राप्तुं न शक्नोति।
28 २८ मी ख्रिस्त नाही, तर मी त्याच्यापुढे पाठविलेला आहे, याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात.
अहं अभिषिक्तो न भवामि किन्तु तदग्रे प्रेषितोस्मि यामिमां कथां कथितवानाहं तत्र यूयं सर्व्वे साक्षिणः स्थ।
29 २९ ज्याला वधू आहे तो वर आणि जो वराचा मित्र उभा राहून त्याचे बोलणे ऐकतो, त्यास वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.
यो जनः कन्यां लभते स एव वरः किन्तु वरस्य सन्निधौ दण्डायमानं तस्य यन्मित्रं तेन वरस्य शब्दे श्रुतेऽतीवाह्लाद्यते ममापि तद्वद् आनन्दसिद्धिर्जाता।
30 ३० त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे.
तेन क्रमशो वर्द्धितव्यं किन्तु मया ह्सितव्यं।
31 ३१ जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीवरचा आहे तो पृथ्वीचा आहे आणि पृथ्वीवरचे बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे.
य ऊर्ध्वादागच्छत् स सर्व्वेषां मुख्यो यश्च संसाराद् उदपद्यत स सांसारिकः संसारीयां कथाञ्च कथयति यस्तु स्वर्गादागच्छत् स सर्व्वेषां मुख्यः।
32 ३२ जे त्याने पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो आणि त्याची साक्ष कोणी मानत नाही.
स यदपश्यदशृणोच्च तस्मिन्नेव साक्ष्यं ददाति तथापि प्रायशः कश्चित् तस्य साक्ष्यं न गृह्लाति;
33 ३३ ज्याने त्याची साक्ष स्वीकारली आहे त्याने ‘देव खरा आहे’ यावर आपला शिक्का लावला आहे.
किन्तु यो गृह्लाति स ईश्वरस्य सत्यवादित्वं मुद्राङ्गितं करोति।
34 ३४ कारण ज्याला देवाने पाठवले आहे तो देवाची वचने बोलतो कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही.
ईश्वरेण यः प्रेरितः सएव ईश्वरीयकथां कथयति यत ईश्वर आत्मानं तस्मै अपरिमितम् अददात्।
35 ३५ पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्वकाही त्याच्या हाती दिले आहे.
पिता पुत्रे स्नेहं कृत्वा तस्य हस्ते सर्व्वाणि समर्पितवान्।
36 ३६ जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.” (aiōnios g166)
यः कश्चित् पुत्रे विश्वसिति स एवानन्तम् परमायुः प्राप्नोति किन्तु यः कश्चित् पुत्रे न विश्वसिति स परमायुषो दर्शनं न प्राप्नोति किन्त्वीश्वरस्य कोपभाजनं भूत्वा तिष्ठति। (aiōnios g166)

< योहान 3 >