< योहान 21 >

1 आणि या यानंतर पुन्हा तिबिर्याच्या सरोवराजवळ येशूने शिष्यांना स्वतःस प्रकट झाला; आणि अशाप्रकारे स्वतःस प्रकट केले.
Derefter uppenbarade åter Jesus sig för Lärjungarna, vid Tiberias haf; och uppenbarade han sig I så måtto:
2 शिमोन पेत्र व ज्याला दिदुम म्हणत तो थोमा, गालील प्रांतातील काना नगरातील नथनेल व जब्दीचे पुत्र आणि त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे जण हे बरोबर होते.
Simon Petrus, och Thomas, som kallas Tvilling, voro tillsamman, och Nathanael, som var af Cana i Galileen, och Zebedei söner, och två andre af hans Lärjungar.
3 शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरावयला जातो.” ते त्यास म्हणतात, “आम्ही पण तुझ्याबरोबर येतो.” तेव्हा ते निघून तारवात चढले आणि त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही.
Sade Simon Petrus till dem: Jag vill gå och fiska. De sade till honom: Vi gå in ock med dig. De gingo ut, och stego straxt i båten; och i den natten fingo de intet.
4 पण आता पहाट होते वेळी येशू समुद्र किनार्‍याजवळ उभा होता, पण तो येशू होता हे शिष्यांना समजले नाही.
Då nu morgon var, stod Jesus på strandene; dock visste Lärjungarna icke, att det var Jesus.
5 तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय?” ते त्यास म्हणाले, “नाही.”
Sade Jesus till dem: Barn, hafven I något till mats? De svarade honom: Nej.
6 आणि तो त्यांना म्हणाला, “तारवाच्या उजवीकडे जाळे टाका आणि तुम्हास मिळेल.” म्हणून त्यांनी टाकले आणि माशांच्या घोळक्यामुळे ते त्यांना आता ओढवेना.
Då sade han till dem: Kaster ut nätet på högra sidona om båten, så varden I finnande. Då kastade de ut: och kom så mycken fisk, att de förmådde det icke draga.
7 तेव्हा ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभू आहे.” शिमोन पेत्राने ऐकले की, तो “प्रभू आहे, प्रभू आहे” तेव्हा तो उघडा असल्यामुळे (त्याने बाहेरील वस्त्र, झगा, न घातल्यामुळे) त्याने कमरेला झगा गुंडाळला आणि सरोवरात उडी घेतली.
Då sade den Lärjungen, som Jesus älskade, till Petrum: Herren äret. När Simon Petrus hörde, att det var Herren, band han om sig kjortelen, ty han var naken, och gaf sig i sjön.
8 आणि दुसरे शिष्य त्या लहान मचव्याने ते माशांचे जाळे ओढीत ओढीत आले कारण ते किनार्‍यापासून फार दूर नव्हते, पण सुमारे दोनशे हातावर होते.
Men de andre Lärjungarna kommo med båten; ty de voro icke långt ifrå landet, utan vid pass tuhundrade alnar; och drogo fiskanätet.
9 तेव्हा ते किनार्‍यावर बाहेर आल्यावर तेथे कोळशांचा विस्तव आणि त्यावर ठेवलेली मासळी आणि भाकरी पाहिली.
Och när de voro stigne på landet, sågo de der vara lagda glöd, och en fisk derpå, och bröd.
10 १० येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या मासळीमधून काही आणा.”
Jesus sade till dem: Tager hit af de fiskar, som I nu fingen.
11 ११ तेव्हा शिमोन पेत्राने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनार्‍यावर ओढून आणले. ते तितके असतानाही जाळे फाटले नाही.
Simon Petrus steg in och drog nätet upp på landet, fullt med stora fiskar, hundrade femtio och tre; och ändock de voro så månge, gick likväl nätet icke sönder.
12 १२ येशू त्यांना म्हणाला, “या, न्याहरी करा.” कारण तो प्रभू आहे हे त्यांना समजले म्हणून आपण कोण आहात हे त्यास विचारावास शिष्यांतील कोणी धजला नाही.
Sade Jesus till dem: Kommer, och äter. Och ingen af Lärjungarna djerfdes till att spörja honom: Ho äst du? efter de visste, att det var Herren.
13 १३ तेव्हा येशूने भाकर घेतली आणि त्यांना दिली; तशीच मासळी दिली.
Då kom Jesus, och tog brödet och gaf dem; och fisken sammaledes.
14 १४ येशू मरण पावलेल्यातून उठल्यानंतर त्याची शिष्यांना प्रकट व्हायची ही तिसरी वेळ.
Detta var nu tredje reson att Jesus uppenbarades sinom Lärjungom, sedan han var uppstånden ifrå de döda.
15 १५ मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणतो, “माझी कोकरे चार.”
Då de nu hade ätit, sade Jesus till Simon Petrum: Simon Jona, älskar du mig mer än desse? Han sade till honom: Ja, Herre, du vetst, att jag älskar dig. Sade han till honom: Föd min lamb.
16 १६ तो पुन्हा दुसऱ्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणाला, “माझी मेंढरे राख.”
Åter sade han till honom: Simon Jona, älskar du mig? Han sade till honom: Ja, Herre, du vetst, att jag älskar dig. Sade han till honom: Föd min får.
17 १७ तो तिसर्‍यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” पेत्र दुःखी होऊन त्यास म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्यास म्हणतो, “माझी मेंढरे चार.”
Sade han till honom tredje reson: Simon Jona, älskar du mig? Petrus vardt bedröfvad, att han sade tredje reson till honom: Älskar du mig? och sade till honom: Herre, du vetst all ting; du vetst, att jag älskar dig. Sade Jesus till honom: Föd min får.
18 १८ “मी तुला खरे खरे सांगतो, तू जेव्हा तरुण होतास तेव्हा आपली कंबर बांधून तुझी इच्छा असेल तिकडे जात होतास; पण तू म्हातारा होशील तेव्हा हात पुढे करशील, दुसरा तुझी कंबर बांधील आणि तुझी इच्छा नसेल तिकडे तुला नेईल.”
Sannerliga, sannerliga säger jag dig: När du vast ung, omgjordade du dig sjelf, och gick hvart du ville; men då du varder gammal, skall du uträcka dina händer, och en annar skall omgjorda dig, och leda dig dit du icke vill.
19 १९ तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रकट करायला तो हे बोलला आणि हे बोलल्यावर तो त्यास म्हणतो, “माझ्यामागे ये.”
Men det sade han, gifvandes tillkänna med hvad död han skulle prisa Gud. Och då han hade detta sagt, sade han till honom: Följ mig.
20 २० तेव्हा पेत्र मागे वळला आणि पाहतो की, ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती जो भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी टेकला असता मागे लवून ‘प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे?’ असे म्हणाला होता, त्यास त्याने मागे चालतांना पाहिले.
Petrus vände sig om, och såg den Lärjungan följa, som Jesus älskade; hvilken ock i Nattvarden låg intill hans bröst, och sade: Herre, hvilken är den dig förråder?
21 २१ म्हणून, त्यास बघून, पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, ह्याचे काय?”
Då Petrus såg honom, sade han till Jesum: Herre, hvad skall då denne?
22 २२ येशूने त्यास म्हटले, “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय? तू माझ्यामागे ये.”
Sade Jesus till honom: Om jag ville att han skulle blifva, tilldess jag kommer, hvad kommer det dig vid? Följ du mig.
23 २३ तेव्हा बांधवांत हे बोलणे पसरले की, तो शिष्य मरणार नाही. पण येशू त्यास म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, पण “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय?”
Då gick ett tal ut ibland bröderna: Denne Lärjungen dör icke. Och Jesus sade icke till honom: Han dör icke; utan, om jag ville, att han skulle blifva tilldess jag kommer, hvad kommer det dig vid?
24 २४ जो या गोष्टींची साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या आहेत तोच हा शिष्य आहे; आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे.
Denne är den Lärjungen, som vittnar härom, och den detta skrifvit hafver; och vi vete, att hans vittnesbörd är sant.
25 २५ आणि ह्याशिवाय येशूने केलेली पुष्कळ कृत्ये आहेत; ती एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात देखील मावणार नाहीत असे मला वाटते.
Äro ock mång annor ting, som Jesus gjorde, hvilka, om de det ena med det andra skrefvos, tror jag att verlden skulle icke kunna begripa de böcker, som skrifvas skulle. Amen.

< योहान 21 >