< योहान 2 >

1 नंतर तिसर्‍या दिवशी गालील प्रांतातील काना नगरात एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती.
तीजे दिने गलील प्रदेशो रे काना नगरो रे केसी रा ब्या था और यीशुए री आम्मा बी तेती थी।
2 येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमत्रंण होते.
यीशु और तिना रे चेले बी तेती ब्याओ खे बुलाई राखे थे।
3 मग द्राक्षरस संपला तेव्हा, येशूची आई त्यास म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही.”
जेबे अँगूरा रा रस कम ऊईगा, तेबे यीशुए री आम्मे तिना खे बोलेया, “तिना गे अँगूरा रा रस नि रया।”
4 येशू तिला म्हणाला, “मुली, याच्याशी तुझा माझा काय संबंध आहे? माझी वेळ अजून आली नाही.”
यीशुए तेसा खे बोलेया, “ओ जवाणसे! ताखे मांते क्या काम ए? एबु मेरा आपणे आपू खे प्रकट करने रा बखत नि आयी रा।”
5 त्याची आई नोकरांना म्हणाली, “हा तुम्हास जे काही सांगेल ते करा.”
पर तिना री आम्मे दासा खे बोलेया, “जो कुछ ये तुसा खे बोलोगा, सेई करना।”
6 तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते, त्यामध्ये दोन दोन, तीन तीन मण पाणी मावेल असे ते होते.
तेती यहूदिया री शुद्ध करने री रवाजा रे मुताबिक, पात्थरा रे छे बड़े कअड़े राखे रे थे, जिना रे दो-दो और तीन-तीन मण आओ था।
7 येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा.” आणि त्यांनी ते काठोकाठ भरले.
यीशुए दासा खे बोलेया, “कअड़ेया रे पाणी परी देओ।” तिने परी-परी करी ते।
8 मग त्याने नोकरांना सांगितले, “आता आता त्यातले काढून भोजनकारभार्‍याकडे घेऊन जा,” तेव्हा त्यांनी ते नेले.
यीशुए तेस दासो खे बोलेया, “एबे इजी बीचा ते थोड़ा पाणी निकयाल़ी की पाट्टिया (भोज) रे प्रदानो गे लयी जाओ और तिने दासे एड़ा ई कित्तेया।”
9 द्राक्षरस बनलेले पाणी? भोजनकारभार्‍याने जेव्हा चाखले आणि तो कुठला होता हे त्यास माहीत नव्हते, पण ज्या नोकरांनी पाणी काढले त्यांना माहीत होते, तेव्हा भोजनकारभारी वराला बोलावून,
जेबे पाट्टिया रे प्रदाने से पाणी चाखेया, जो अँगूरा रा रस बणीगा था, पर ये नि जाणो था कि केथा ते आया (पर जिने दासे पाणी निकयाल़ेया था, सेयो जाणो थे) तेबे पाट्टिया रे प्रदाने लाड़े खे बुलाई की तेसखे बोलेया,
10 १० त्यास म्हटले, “प्रत्येक मनुष्य अगोदर चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग बेचव वाढतो, पण तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहेस.”
“हर एक मांणू पईले बढ़िया अँगूरा रा रस देओआ और जेबे लोक पी की थकी जाओए, तेबे आदा देओआ, पर तैं बढ़िया अँगूरा रा रस एबुए तक राखी राखेया।”
11 ११ येशूने गालील प्रांतातील काना नगरात आपल्या अद्भुत चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
यीशुए गलील प्रदेशो रे काना नगरो रे आपणा ये पईला चिह्न् दखाई की आपणी महिमा प्रगट कित्ती और तिना रे चेलेया तिना पाँदे विश्वास कित्तेया कि सच्ची येई ई मसीह ए।
12 १२ त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कफर्णहूमास गेले; पण ते तेथे फार दिवस राहिले नाहीत.
इजी ते बाद यीशु, तिना री आम्मा, तिना रे पाई और तिना रे चेले कफरनहूम नगरो खे गये और तेती कुछ दिन तक रये।
13 १३ मग यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला व येशू यरूशलेम शहरास वर गेला.
यहूदिया रा फसह रा त्योआर नेड़े था और यीशु यरूशलेम नगरो खे गये।
14 १४ आणि त्यास परमेश्वराच्या भवनात गुरे, मेंढरे आणि कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले आढळले.
तेबे तिने मन्दरो रे बल़द, पेड, और कबूतरा खे बेचणे वाल़े और सर्राफे बैठे रे देखेया।
15 १५ तेव्हा त्याने दोर्‍यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांना परमेश्वराच्या भवनातून घालवून दिले. सराफांचा पैसाही ओतून टाकला आणि चौरंग पालथे केले.
तेबे तिने रस्सिया रा कोड़ा बणाई की सब पेडा और बल़द मन्दरो ते बारे निकयाल़ी ते और सर्राफे रे पैसे बखेरी ते और चौकिया मूँदिया करी तिया
16 १६ व त्याने कबुतरे विकणार्‍यांना म्हटले, “ह्यांना येथून काढा, माझ्या स्वर्गीय पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.”
और कबूतरा खे बेचणे वाल़ेया खे बोलेया, “इना खे एथा ते लयी जाओ, मेरे पिते रे कअरो खे बपारो रा कअर नि बणाओ।”
17 १७ तेव्हा ‘तुझ्या भवनाविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील,’ असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले.
तेबे तिना रे चेलेया खे याद आया कि पवित्र शास्त्रो रे लिखी राखेया, “तेरे कअरो री चिन्ता आऊँ पितरे-पितरे ई खाई जाणा”
18 १८ त्यावरून यहूदी त्यास म्हणाले, “तुम्ही हे करता तर आम्हास तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता?”
तेबे यहूदिये तिना खे बोलेया, “तूँ जो ये करेया, तो आसा खे क्या चिह्न् दखाएया?”
19 १९ येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही हे परमेश्वराचे भवन मोडून टाका आणि मी तीन ते दिवसात उभारीन.”
यीशुए तिना खे जवाब दित्तेया, “एस मन्दरो खे टाल़ी देओ और मां ये तीन दिना रे फेर खड़ा करी देणा।”
20 २० यावरुन यहूदी अधिकारी म्हणाले, “परमेश्वराचे हे भवन बांधण्यास शेहचाळीस वर्षे लागली आणि आणि तुम्ही हे तीन दिवसात उभारणार काय?”
यहूदिये बोलेया, “एस मन्दरो खे बनाणे खे छयाल़ी साल लगी रे और क्या तां ये तीन दिना रे फेर खड़ा करी देणा?”
21 २१ तो तर आपल्या शरीररूपी भवनाविषयी बोलला होता.
पर तिने आपणे शरीरो रे मन्दरो रे बारे रे बोलेया था।
22 २२ म्हणून तो असे म्हणत असे हे तो मरण पावलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रलेखावर व येशूने उच्चारलेल्या वचनावर विश्वास ठेवला.
तो जेबे सेयो मुड़देया बीचा ते जिऊँदे ऊईगे थे, तेबे तिना रे चेलेया खे याद आया कि तिने ये बोलेया था और तिने पवित्र शास्त्रो पाँदे और जो वचन यीशुए बोलेया था, विश्वास कित्तेया।
23 २३ आता वल्हांडण सणाच्या वेळी, तो यरूशलेम शहरात असता, त्याने केलेली चिन्हे पाहून पुष्कळ जणांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला.
जेबे सेयो फसह रे त्योआरो रे बखते यरूशलेमो रे थे, तेबे बऊत जणेया, सेयो चिह्न्, जो सेयो दखाओ थे, देखी की तिना पाँदे विश्वास कित्तेया।
24 २४ असे असले तरी येशू त्यांना ओळखून असल्यामुळे त्यास स्वतःला त्यांच्यावर विश्वास नव्हता.
पर यीशुए आपणे आपू खे तिना रे परोसे नि छाडेया, कऊँकि सेयो सबी खे जाणो थे
25 २५ शिवाय, मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी याची त्यास गरज नव्हती; कारण मनुष्यात काय आहे हे तो ओळखीत होता.
और तिना खे जरूरत नि थी कि मांणूए रे बारे रे कोई गवाई देओ, कऊँकि सेयो आपू जाणो थे कि मांणूए रे मनो रे क्या ए?

< योहान 2 >