< योहान 18 >
1 १ हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांबरोबर किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. तेथे एक बाग होती; तेथे तो व त्याचे शिष्य गेले.
Haec cum dixisset Iesus, egressus est cum discipulis suis trans Torrentem Cedron, ubi erat hortus, in quem introivit ipse, et discipuli eius.
2 २ ही जागा त्यास धरून देणाऱ्या यहूदालाही माहीत होती कारण येशू पुष्कळ वेळा आपल्या शिष्यांबरोबर तेथे जात असे.
Sciebat autem et Iudas, qui tradebat eum, locum: quia frequenter Iesus convenerat illuc cum discipulis suis.
3 ३ तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक लोक व परूशी यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर, दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन यहूदा तेथे आला.
Iudas ergo cum accepisset cohortem, et a Pontificibus, et Pharisaeis ministros, venit illuc cum laternis, et facibus, et armis.
4 ४ येशू आपणावर जे काही येणार हे सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही कोणाला शोधत आहात?”
Iesus itaque sciens omnia, quae ventura erant super eum, processit, et dixit eis: Quem quaeritis?
5 ५ त्यांनी त्यास उत्तर दिले, “नासरेथकर येशूला.” तो त्यांना म्हणाला, “तो मी आहे.” आणि ज्या यहूदाने त्यास धरून दिले देखील त्यांच्याबरोबर उभा होता,
Responderunt ei: Iesum Nazarenum. Dicit eis Iesus: Ego sum. Stabat autem et Iudas, qui tradebat eum, cum ipsis.
6 ६ “तो मीच आहे,” असे म्हणताच ते मागे सरकून जाऊन जमिनीवर पडले.
Ut ergo dixit eis: Ego sum: abierunt retrorsum, et ceciderunt in terram.
7 ७ मग त्याने त्यांना पुन्हा विचारले, “तुम्ही कोणाला शोधता?” आणि ते म्हणाले, “नासरेथकर येशूला.”
Iterum ergo interrogavit eos: Quem quaeritis? Illi autem dixerunt: Iesum Nazarenum.
8 ८ येशूने उत्तर दिले, “मीच तो आहे; असे मी तुम्हास सांगितले, तुम्ही मला शोधीत असला तर यांना जाऊ द्या.”
Respondit Iesus: Dixi vobis, quia ego sum: si ergo me quaeritis, sinite hos abire.
9 ९ “जे तू मला दिले आहेत त्यांतून मी एकही हरविला नाही,” असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले.
Ut impleretur sermo, quem dixit: Quia quos dedisti mihi, non perdidi ex eis quemquam.
10 १० तेव्हा शिमोन पेत्राजवळ तलवार असल्याने त्याने ती उपसली व महायाजकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते.
Simon ergo Petrus habens gladium eduxit eum: et percussit pontificis servum: et abscidit auriculam eius dexteram. Erat autem nomen servo Malchus.
11 ११ तेव्हा येशू पेत्राला म्हणाला, “तरवार म्यानात घाल. पित्याने मला जो प्याला दिला आहे तो मी पिऊ नये काय?”
Dixit ergo Iesus Petro: Mitte gladium tuum in vaginam. Calicem, quem dedit mihi Pater, non vis ut bibam illum?
12 १२ मग सैनिकांची तुकडी व हजारांचा सरदार आणि यहूद्यांचे अधिकारी हे येशूला धरून बांधले.
Cohors ergo, et tribunus, et ministri Iudaeorum comprehenderunt Iesum, et ligaverunt eum:
13 १३ आणि त्यास प्रथम हन्नाकडे नेले कारण, त्या वर्षी महायाजक असलेल्या कयफाचा हा सासरा होता,
Et adduxerunt eum ad Annam primum, erat enim socer Caiphae, qui erat pontifex anni illius.
14 १४ एका मनुष्याने लोकांसाठी मरावे हे फायद्याचे आहे. अशी मसलत यहूद्यास याच कयफाने दिली होती.
Erat autem Caiphas, qui consilium dederat Iudaeis: Quia expedit, unum hominem mori pro populo.
15 १५ शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे मागे चालले; तो शिष्य महायाजकाच्या ओळखीचा होता आणि येशूबरोबर महायाजकाच्या वाड्यात गेला.
Sequebatur autem Iesum Simon Petrus, et alius discipulus. Discipulus autem ille erat notus pontifici, et introivit cum Iesu in atrium pontificis.
16 १६ पण पेत्र बाहेर, दाराशी उभा राहिला होता, म्हणून जो दुसरा शिष्य महायाजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले.
Petrus autem stabat ad ostium foris. Exivit ergo discipulus alius, qui erat notus pontifici, et dixit ostiariae: et introduxit Petrum.
17 १७ यावरुन ती तरूण द्वारपालिका होती ती पेत्राला म्हणाली, “तूही या मनुष्याच्या शिष्यांपैकी आहेस काय?” तो म्हणाला, “मी नाही.”
Dicit ergo Petro ancilla ostiaria: Numquid et tu ex discipulis es hominis istius? Dicit ille: Non sum.
18 १८ थंडी असल्यामुळे दास व कामदार कोळशाचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते आणि पेत्र पण त्यांच्याबरोबर शेकत उभा होता.
Stabant autem servi, et ministri ad prunas: quia frigus erat, et calefaciebant se: erat autem cum eis et Petrus stans, et calefaciens se.
19 १९ तेव्हा महायाजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिक्षणाविषयी प्रश्न केले.
Pontifex ergo interrogavit Iesum de discipulis suis, et de doctrina eius.
20 २० येशूने त्यास उत्तर दिले, “मी जगासमोर उघडपणे बोललो आहे, सभास्थानात आणि परमेश्वराच्या भवनात, सर्व यहूदी जमतात, तेथे मी नेहमी शिक्षण दिले आणि गुप्तपणे मी काही बोललो नाही.
Respondit ei Iesus: Ego palam locutus sum mundo: ego semper docui in synagoga, et in templo, quo omnes Iudaei conveniunt: et in occulto locutus sum nihil.
21 २१ मला का विचारता? मी काय बोलतो ते. ज्यांनी ऐकले आहे त्यांना विचारा. पाहा, मी जे बोललो ते त्यांना माहीत आहे.”
Quid me interrogas? interroga eos, qui audierunt quid locutus sim ipsis: ecce hi sciunt quae dixerim ego.
22 २२ त्याने असे म्हटल्याबरोबर जवळ उभा राहणारा एक कामदार येशूला चापट मारून म्हणाला, “तू महायाजकाला असे उत्तर देतोस काय?”
Haec autem cum dixisset, unus assistens ministrorum dedit alapam Iesu, dicens: Sic respondes pontifici?
23 २३ येशूने त्यास उत्तर दिले, “मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर; योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस?”
Respondit ei Iesus: Si male locutus sum, testimonium perhibe de malo: si autem bene, quid me caedis?
24 २४ तेव्हा हन्नाने त्यास महायाजक कयफा याच्याकडे बांधलेलेच पाठवले.
Et misit eum Annas ligatum ad Caipham pontificem.
25 २५ शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता; त्यास इतर म्हणाले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?” त्याने नाकारले व म्हटले, “मी नाही.”
Erat autem Simon Petrus stans, et calefaciens se. Dixerunt ergo ei: Numquid et tu ex discipulis eius es? Negavit ille, et dixit: Non sum.
26 २६ पेत्राने ज्याचा कान कापला होता त्याचा नातलग असलेला, महायाजकाच्या दासांपैकी एक होता, तो त्यास म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले?”
Dicit ei unus ex servis pontificis, cognatus eius, cuius abscidit Petrus auriculam: Nonne ego te vidi in horto cum illo?
27 २७ पेत्राने पुन्हा नाकारले आणि, लागलाच, कोंबडा आरवला.
Iterum ergo negavit Petrus: et statim gallus cantavit.
28 २८ तेव्हा त्यांनी येशूला कयफाकडून सरकारवाड्यांत नेले; तेव्हा सकाळ होती आणि आपण अशुद्ध होऊ नये, पण वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः सरकारवाड्यांत गेले नाहीत.
Adducunt ergo Iesum a Caipha in praetorium. Erat autem mane: et ipsi non introierunt in praetorium, ut non contaminarentur, sed ut manducarent Pascha.
29 २९ यास्तव पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, “तुम्ही या मनुष्यावर काय आरोप ठेवता?”
Exivit ergo Pilatus ad eos foras, et dixit: Quam accusationem affertis adversus hominem hunc?
30 ३० त्यांनी त्यास उत्तर दिले, “तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्यास आपल्या हाती दिले नसते.”
Responderunt, et dixerunt ei: Si non esset hic malefactor, non tibi tradidissemus eum.
31 ३१ पिलाताने त्यांना म्हटले, “त्याला तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.” यहूदी अधिकारी त्यास म्हणाले, “आम्हास कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.”
Dixit ergo eis Pilatus: Accipite eum vos, et secundum legem vestram iudicate eum. Dixerunt ergo ei Iudaei: Nobis non licet interficere quemquam.
32 ३२ आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवितांना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
Ut sermo Iesu impleretur, quem dixit, significans qua morte esset moriturus.
33 ३३ म्हणून पिलात पुन्हा सरकारवाड्यांत गेला; आणि त्याने येशूला बोलावून म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”
Introivit ergo iterum in praetorium Pilatus, et vocavit Iesum, et dixit ei: Tu es rex Iudaeorum?
34 ३४ येशूने उत्तर दिले, “आपण स्वतः हे म्हणता किंवा दुसर्यांनी आपणाला माझ्याविषयी हे सांगितले?”
Respondit Iesus: A temetipso hoc dicis, an alii dixerunt tibi de me?
35 ३५ पिलाताने उत्तर दिले, “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी आणि मुख्य याजकांनी तुला माझ्या हाती दिले; तू काय केले.”
Respondit Pilatus: Numquid ego Iudaeus sum? Gens tua, et pontifices tui tradiderunt te mihi: quid fecisti?
36 ३६ येशूने उत्तर दिले, “माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर यहूद्यांच्या हाती मी दिला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; पण माझे राज्य येथले नाही.”
Respondit Iesus: Regnum meum non est de hoc mundo. si ex hoc mundo esset regnum meum, ministri mei utique decertarent ut non traderer Iudaeis: nunc autem regnum meum non est hinc.
37 ३७ म्हणून पिलात त्यास म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे आणि यासाठी मी जगात आलो आहे. मी सत्याची साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.”
Dixit itaque ei Pilatus: Ergo rex es tu? Respondit Iesus: Tu dicis quia rex sum ego. Ego in hoc natus sum, et ad hoc veni in mundum, ut testimonium perhibeam veritati: omnis, qui est ex veritate, audit vocem meam.
38 ३८ पिलात त्यास म्हणाला, “सत्य काय आहे?” आणि हे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर गेला आणि त्यांना म्हणाला, “मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही.
Dicit ei Pilatus: Quid est veritas? Et cum hoc dixisset, iterum exivit ad Iudaeos, et dicit eis: Ego nullam invenio in eo causam.
39 ३९ पण तुमच्यासाठी वल्हांडण सणांत मी एकाला सोडावे अशी तुमच्यात रीत आहे; तर तुमच्यासाठी मी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?”
Est autem consuetudo vobis ut unum dimittam vobis in Pascha: vultis ergo dimittam vobis regem Iudaeorum?
40 ४० तेव्हा पुन्हा ते ओरडून म्हणाले, “ह्याला सोडू नका, तर बरब्बाला सोडा” आता बरब्बा हा एक लुटारू होता.
Clamaverunt rursum omnes, dicentes: Non hunc, sed Barabbam. Erat autem Barabbas latro.