< योहान 17 >

1 “या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे पित्या, वेळ आली आहे; पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर.
ਤਤਃ ਪਰੰ ਯੀਸ਼ੁਰੇਤਾਃ ਕਥਾਃ ਕਥਯਿਤ੍ਵਾ ਸ੍ਵਰ੍ਗੰ ਵਿਲੋਕ੍ਯੈਤਤ੍ ਪ੍ਰਾਰ੍ਥਯਤ੍, ਹੇ ਪਿਤਃ ਸਮਯ ਉਪਸ੍ਥਿਤਵਾਨ੍; ਯਥਾ ਤਵ ਪੁਤ੍ਰਸ੍ਤਵ ਮਹਿਮਾਨੰ ਪ੍ਰਕਾਸ਼ਯਤਿ ਤਦਰ੍ਥੰ ਤ੍ਵੰ ਨਿਜਪੁਤ੍ਰਸ੍ਯ ਮਹਿਮਾਨੰ ਪ੍ਰਕਾਸ਼ਯ|
2 जे तू त्यास दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू त्यास सर्व मनुष्यांमात्रावर अधिकार दिला आहेस. (aiōnios g166)
ਤ੍ਵੰ ਯੋੱਲੋਕਾਨ੍ ਤਸ੍ਯ ਹਸ੍ਤੇ ਸਮਰ੍ਪਿਤਵਾਨ੍ ਸ ਯਥਾ ਤੇਭ੍ਯੋ(ਅ)ਨਨ੍ਤਾਯੁ ਰ੍ਦਦਾਤਿ ਤਦਰ੍ਥੰ ਤ੍ਵੰ ਪ੍ਰਾਣਿਮਾਤ੍ਰਾਣਾਮ੍ ਅਧਿਪਤਿਤ੍ਵਭਾਰੰ ਤਸ੍ਮੈ ਦੱਤਵਾਨ੍| (aiōnios g166)
3 सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. (aiōnios g166)
ਯਸ੍ਤ੍ਵਮ੍ ਅਦ੍ਵਿਤੀਯਃ ਸਤ੍ਯ ਈਸ਼੍ਵਰਸ੍ਤ੍ਵਯਾ ਪ੍ਰੇਰਿਤਸ਼੍ਚ ਯੀਸ਼ੁਃ ਖ੍ਰੀਸ਼਼੍ਟ ਏਤਯੋਰੁਭਯੋਃ ਪਰਿਚਯੇ ਪ੍ਰਾਪ੍ਤੇ(ਅ)ਨਨ੍ਤਾਯੁ ਰ੍ਭਵਤਿ| (aiōnios g166)
4 जे तू काम मला करावयाला दिलेस ते पूर्ण करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे.
ਤ੍ਵੰ ਯਸ੍ਯ ਕਰ੍ੰਮਣੋ ਭਾਰੰ ਮਹ੍ਯੰ ਦੱਤਵਾਨ੍, ਤਤ੍ ਸਮ੍ਪੰਨੰ ਕ੍ਰੁʼਤ੍ਵਾ ਜਗਤ੍ਯਸ੍ਮਿਨ੍ ਤਵ ਮਹਿਮਾਨੰ ਪ੍ਰਾਕਾਸ਼ਯੰ|
5 तर आता, हे माझ्या पित्या, हे जग होण्याआधी तुझ्याबरोबर मला जे गौरव होते त्याच्यायोगे तू आपणा स्वतःबरोबर माझे गौरव कर.
ਅਤਏਵ ਹੇ ਪਿਤ ਰ੍ਜਗਤ੍ਯਵਿਦ੍ਯਮਾਨੇ ਤ੍ਵਯਾ ਸਹ ਤਿਸ਼਼੍ਠਤੋ ਮਮ ਯੋ ਮਹਿਮਾਸੀਤ੍ ਸਮ੍ਪ੍ਰਤਿ ਤਵ ਸਮੀਪੇ ਮਾਂ ਤੰ ਮਹਿਮਾਨੰ ਪ੍ਰਾਪਯ|
6 जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रकट केले. ते तुझे होते आणि ते तू मला दिलेस आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे.
ਅਨ੍ਯੱਚ ਤ੍ਵਮ੍ ਏਤੱਜਗਤੋ ਯਾੱਲੋਕਾਨ੍ ਮਹ੍ਯਮ੍ ਅਦਦਾ ਅਹੰ ਤੇਭ੍ਯਸ੍ਤਵ ਨਾਮ੍ਨਸ੍ਤੱਤ੍ਵਜ੍ਞਾਨਮ੍ ਅਦਦਾਂ, ਤੇ ਤਵੈਵਾਸਨ੍, ਤ੍ਵੰ ਤਾਨ੍ ਮਹ੍ਯਮਦਦਾਃ, ਤਸ੍ਮਾੱਤੇ ਤਵੋਪਦੇਸ਼ਮ੍ ਅਗ੍ਰੁʼਹ੍ਲਨ੍|
7 आता त्यांना समजले आहे की, तू ज्या गोष्टी मला दिल्यास त्या सर्व तुझ्यापासून आहेत.
ਤ੍ਵੰ ਮਹ੍ਯੰ ਯਤ੍ ਕਿਞ੍ਚਿਦ੍ ਅਦਦਾਸ੍ਤਤ੍ਸਰ੍ੱਵੰ ਤ੍ਵੱਤੋ ਜਾਯਤੇ ਇਤ੍ਯਧੁਨਾਜਾਨਨ੍|
8 कारण तू मला जी वचने दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली, मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवले. असा त्यांनी विश्वास ठेवला.
ਮਹ੍ਯੰ ਯਮੁਪਦੇਸ਼ਮ੍ ਅਦਦਾ ਅਹਮਪਿ ਤੇਭ੍ਯਸ੍ਤਮੁਪਦੇਸ਼ਮ੍ ਅਦਦਾਂ ਤੇਪਿ ਤਮਗ੍ਰੁʼਹ੍ਲਨ੍ ਤ੍ਵੱਤੋਹੰ ਨਿਰ੍ਗਤ੍ਯ ਤ੍ਵਯਾ ਪ੍ਰੇਰਿਤੋਭਵਮ੍ ਅਤ੍ਰ ਚ ਵ੍ਯਸ਼੍ਵਸਨ੍|
9 त्यांच्यासाठी मी विनंती करतो, मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी मी विनंती करतो, कारण ते तुझे आहेत.
ਤੇਸ਼਼ਾਮੇਵ ਨਿਮਿੱਤੰ ਪ੍ਰਾਰ੍ਥਯੇ(ਅ)ਹੰ ਜਗਤੋ ਲੋਕਨਿਮਿੱਤੰ ਨ ਪ੍ਰਾਰ੍ਥਯੇ ਕਿਨ੍ਤੁ ਯਾੱਲੋਕਾਨ੍ ਮਹ੍ਯਮ੍ ਅਦਦਾਸ੍ਤੇਸ਼਼ਾਮੇਵ ਨਿਮਿੱਤੰ ਪ੍ਰਾਰ੍ਥਯੇ(ਅ)ਹੰ ਯਤਸ੍ਤੇ ਤਵੈਵਾਸਤੇ|
10 १० जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते सर्व माझे आहे आणि त्यांच्याठायी माझे गौरव झाले आहे.
ਯੇ ਮਮ ਤੇ ਤਵ ਯੇ ਚ ਤਵ ਤੇ ਮਮ ਤਥਾ ਤੈ ਰ੍ਮਮ ਮਹਿਮਾ ਪ੍ਰਕਾਸ਼੍ਯਤੇ|
11 ११ आणि आता, यापुढे मी जगात नाही; पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे.
ਸਾਮ੍ਪ੍ਰਤਮ੍ ਅਸ੍ਮਿਨ੍ ਜਗਤਿ ਮਮਾਵਸ੍ਥਿਤੇਃ ਸ਼ੇਸ਼਼ਮ੍ ਅਭਵਤ੍ ਅਹੰ ਤਵ ਸਮੀਪੰ ਗੱਛਾਮਿ ਕਿਨ੍ਤੁ ਤੇ ਜਗਤਿ ਸ੍ਥਾਸ੍ਯਨ੍ਤਿ; ਹੇ ਪਵਿਤ੍ਰ ਪਿਤਰਾਵਯੋ ਰ੍ਯਥੈਕਤ੍ਵਮਾਸ੍ਤੇ ਤਥਾ ਤੇਸ਼਼ਾਮਪ੍ਯੇਕਤ੍ਵੰ ਭਵਤਿ ਤਦਰ੍ਥੰ ਯਾੱਲੋਕਾਨ੍ ਮਹ੍ਯਮ੍ ਅਦਦਾਸ੍ਤਾਨ੍ ਸ੍ਵਨਾਮ੍ਨਾ ਰਕ੍ਸ਼਼|
12 १२ जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले; मी त्यांचा सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही. हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले.
ਯਾਵਨ੍ਤਿ ਦਿਨਾਨਿ ਜਗਤ੍ਯਸ੍ਮਿਨ੍ ਤੈਃ ਸਹਾਹਮਾਸੰ ਤਾਵਨ੍ਤਿ ਦਿਨਾਨਿ ਤਾਨ੍ ਤਵ ਨਾਮ੍ਨਾਹੰ ਰਕ੍ਸ਼਼ਿਤਵਾਨ੍; ਯਾੱਲੋਕਾਨ੍ ਮਹ੍ਯਮ੍ ਅਦਦਾਸ੍ਤਾਨ੍ ਸਰ੍ੱਵਾਨ੍ ਅਹਮਰਕ੍ਸ਼਼ੰ, ਤੇਸ਼਼ਾਂ ਮਧ੍ਯੇ ਕੇਵਲੰ ਵਿਨਾਸ਼ਪਾਤ੍ਰੰ ਹਾਰਿਤੰ ਤੇਨ ਧਰ੍ੰਮਪੁਸ੍ਤਕਸ੍ਯ ਵਚਨੰ ਪ੍ਰਤ੍ਯਕ੍ਸ਼਼ੰ ਭਵਤਿ|
13 १३ पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्याठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी बोलतो.
ਕਿਨ੍ਤ੍ਵਧੁਨਾ ਤਵ ਸੰਨਿਧਿੰ ਗੱਛਾਮਿ ਮਯਾ ਯਥਾ ਤੇਸ਼਼ਾਂ ਸਮ੍ਪੂਰ੍ਣਾਨਨ੍ਦੋ ਭਵਤਿ ਤਦਰ੍ਥਮਹੰ ਜਗਤਿ ਤਿਸ਼਼੍ਠਨ੍ ਏਤਾਃ ਕਥਾ ਅਕਥਯਮ੍|
14 १४ मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा द्वेष केला आहे; कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.
ਤਵੋਪਦੇਸ਼ੰ ਤੇਭ੍ਯੋ(ਅ)ਦਦਾਂ ਜਗਤਾ ਸਹ ਯਥਾ ਮਮ ਸਮ੍ਬਨ੍ਧੋ ਨਾਸ੍ਤਿ ਤਥਾ ਜਜਤਾ ਸਹ ਤੇਸ਼਼ਾਮਪਿ ਸਮ੍ਬਨ੍ਧਾਭਾਵਾਜ੍ ਜਗਤੋ ਲੋਕਾਸ੍ਤਾਨ੍ ਰੁʼਤੀਯਨ੍ਤੇ|
15 १५ तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना दुष्टापासून राखावे अशी मी विनंती करतो.
ਤ੍ਵੰ ਜਗਤਸ੍ਤਾਨ੍ ਗ੍ਰੁʼਹਾਣੇਤਿ ਨ ਪ੍ਰਾਰ੍ਥਯੇ ਕਿਨ੍ਤ੍ਵਸ਼ੁਭਾਦ੍ ਰਕ੍ਸ਼਼ੇਤਿ ਪ੍ਰਾਰ੍ਥਯੇਹਮ੍|
16 १६ जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत.
ਅਹੰ ਯਥਾ ਜਗਤ੍ਸਮ੍ਬਨ੍ਧੀਯੋ ਨ ਭਵਾਮਿ ਤਥਾ ਤੇਪਿ ਜਗਤ੍ਸਮ੍ਬਨ੍ਧੀਯਾ ਨ ਭਵਨ੍ਤਿ|
17 १७ तू त्यांना सत्यात पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे.
ਤਵ ਸਤ੍ਯਕਥਯਾ ਤਾਨ੍ ਪਵਿਤ੍ਰੀਕੁਰੁ ਤਵ ਵਾਕ੍ਯਮੇਵ ਸਤ੍ਯੰ|
18 १८ जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले आहे.
ਤ੍ਵੰ ਯਥਾ ਮਾਂ ਜਗਤਿ ਪ੍ਰੈਰਯਸ੍ਤਥਾਹਮਪਿ ਤਾਨ੍ ਜਗਤਿ ਪ੍ਰੈਰਯੰ|
19 १९ आणि त्यांनीही सत्यांत पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला पवित्र करतो.
ਤੇਸ਼਼ਾਂ ਹਿਤਾਰ੍ਥੰ ਯਥਾਹੰ ਸ੍ਵੰ ਪਵਿਤ੍ਰੀਕਰੋਮਿ ਤਥਾ ਸਤ੍ਯਕਥਯਾ ਤੇਪਿ ਪਵਿਤ੍ਰੀਭਵਨ੍ਤੁ|
20 २० मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या शब्दावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो
ਕੇਵਲੰ ਏਤੇਸ਼਼ਾਮਰ੍ਥੇ ਪ੍ਰਾਰ੍ਥਯੇ(ਅ)ਹਮ੍ ਇਤਿ ਨ ਕਿਨ੍ਤ੍ਵੇਤੇਸ਼਼ਾਮੁਪਦੇਸ਼ੇਨ ਯੇ ਜਨਾ ਮਯਿ ਵਿਸ਼੍ਵਸਿਸ਼਼੍ਯਨ੍ਤਿ ਤੇਸ਼਼ਾਮਪ੍ਯਰ੍ਥੇ ਪ੍ਰਾਰ੍ਥੇਯੇ(ਅ)ਹਮ੍|
21 २१ की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये आहेस व मी तुझ्यामध्ये आहे तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवले असा जगाने विश्वास धरावा.
ਹੇ ਪਿਤਸ੍ਤੇਸ਼਼ਾਂ ਸਰ੍ੱਵੇਸ਼਼ਾਮ੍ ਏਕਤ੍ਵੰ ਭਵਤੁ ਤਵ ਯਥਾ ਮਯਿ ਮਮ ਚ ਯਥਾ ਤ੍ਵੱਯੇਕਤ੍ਵੰ ਤਥਾ ਤੇਸ਼਼ਾਮਪ੍ਯਾਵਯੋਰੇਕਤ੍ਵੰ ਭਵਤੁ ਤੇਨ ਤ੍ਵੰ ਮਾਂ ਪ੍ਰੇਰਿਤਵਾਨ੍ ਇਤਿ ਜਗਤੋ ਲੋਕਾਃ ਪ੍ਰਤਿਯਨ੍ਤੁ|
22 २२ तू जे गौरव मला दिले आहे, ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे;
ਯਥਾਵਯੋਰੇਕਤ੍ਵੰ ਤਥਾ ਤੇਸ਼਼ਾਮਪ੍ਯੇਕਤ੍ਵੰ ਭਵਤੁ ਤੇਸ਼਼੍ਵਹੰ ਮਯਿ ਚ ਤ੍ਵਮ੍ ਇੱਥੰ ਤੇਸ਼਼ਾਂ ਸਮ੍ਪੂਰ੍ਣਮੇਕਤ੍ਵੰ ਭਵਤੁ, ਤ੍ਵੰ ਪ੍ਰੇਰਿਤਵਾਨ੍ ਤ੍ਵੰ ਮਯਿ ਯਥਾ ਪ੍ਰੀਯਸੇ ਚ ਤਥਾ ਤੇਸ਼਼੍ਵਪਿ ਪ੍ਰੀਤਵਾਨ੍ ਏਤਦ੍ਯਥਾ ਜਗਤੋ ਲੋਕਾ ਜਾਨਨ੍ਤਿ
23 २३ म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये; यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि, त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली.
ਤਦਰ੍ਥੰ ਤ੍ਵੰ ਯੰ ਮਹਿਮਾਨੰ ਮਹ੍ਯਮ੍ ਅਦਦਾਸ੍ਤੰ ਮਹਿਮਾਨਮ੍ ਅਹਮਪਿ ਤੇਭ੍ਯੋ ਦੱਤਵਾਨ੍|
24 २४ हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी असेन तेथे माझ्याजवळ असावे, यासाठी की, जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे; कारण जगाचा पाया घातला त्यापुर्वी तू माझ्यावर प्रीती केली.
ਹੇ ਪਿਤ ਰ੍ਜਗਤੋ ਨਿਰ੍ੰਮਾਣਾਤ੍ ਪੂਰ੍ੱਵੰ ਮਯਿ ਸ੍ਨੇਹੰ ਕ੍ਰੁʼਤ੍ਵਾ ਯੰ ਮਹਿਮਾਨੰ ਦੱਤਵਾਨ੍ ਮਮ ਤੰ ਮਹਿਮਾਨੰ ਯਥਾ ਤੇ ਪਸ਼੍ਯਨ੍ਤਿ ਤਦਰ੍ਥੰ ਯਾੱਲੋਕਾਨ੍ ਮਹ੍ਯੰ ਦੱਤਵਾਨ੍ ਅਹੰ ਯਤ੍ਰ ਤਿਸ਼਼੍ਠਾਮਿ ਤੇਪਿ ਯਥਾ ਤਤ੍ਰ ਤਿਸ਼਼੍ਠਨ੍ਤਿ ਮਮੈਸ਼਼ਾ ਵਾਞ੍ਛਾ|
25 २५ हे न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे.
ਹੇ ਯਥਾਰ੍ਥਿਕ ਪਿਤ ਰ੍ਜਗਤੋ ਲੋਕੈਸ੍ਤ੍ਵੱਯਜ੍ਞਾਤੇਪਿ ਤ੍ਵਾਮਹੰ ਜਾਨੇ ਤ੍ਵੰ ਮਾਂ ਪ੍ਰੇਰਿਤਵਾਨ੍ ਇਤੀਮੇ ਸ਼ਿਸ਼਼੍ਯਾ ਜਾਨਨ੍ਤਿ|
26 २६ मी तुझे नाव त्यास कळवले आहे आणि मी कळवीन, यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”
ਯਥਾਹੰ ਤੇਸ਼਼ੁ ਤਿਸ਼਼੍ਠਾਮਿ ਤਥਾ ਮਯਿ ਯੇਨ ਪ੍ਰੇਮ੍ਨਾ ਪ੍ਰੇਮਾਕਰੋਸ੍ਤਤ੍ ਤੇਸ਼਼ੁ ਤਿਸ਼਼੍ਠਤਿ ਤਦਰ੍ਥੰ ਤਵ ਨਾਮਾਹੰ ਤਾਨ੍ ਜ੍ਞਾਪਿਤਵਾਨ੍ ਪੁਨਰਪਿ ਜ੍ਞਾਪਯਿਸ਼਼੍ਯਾਮਿ|

< योहान 17 >