< योहान 16 >
1 १ “तुम्ही अडखळवले जाऊ नये म्हणून मी तुम्हास या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत.
yuṣmākaṁ yathā vādhā na jāyate tadarthaṁ yuṣmān etāni sarvvavākyāni vyāharaṁ|
2 २ ते तुम्हास सभास्थानाच्या बाहेर घालवतील; इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहोत असे वाटेल, अशी वेळ येत आहे.
lokā yuṣmān bhajanagṛhebhyo dūrīkariṣyanti tathā yasmin samaye yuṣmān hatvā īśvarasya tuṣṭi janakaṁ karmmākurmma iti maṁsyante sa samaya āgacchanti|
3 ३ त्यांनी पित्याला आणि मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील.
te pitaraṁ māñca na jānanti, tasmād yuṣmān pratīdṛśam ācariṣyanti|
4 ४ मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की, ती घडण्याची वेळ आली म्हणजे त्या मी तुम्हास सांगितल्या होत्या याची आठवण व्हावी. या गोष्टी मी तुम्हास, प्रारंभापासून, सांगितल्या नाहीत, कारण मी तुमच्याबरोबर होतो.
ato hetāḥ samaye samupasthite yathā mama kathā yuṣmākaṁ manaḥsuḥ samupatiṣṭhati tadarthaṁ yuṣmābhyam etāṁ kathāṁ kathayāmi yuṣmābhiḥ sārddham ahaṁ tiṣṭhan prathamaṁ tāṁ yuṣmabhyaṁ nākathayaṁ|
5 ५ पण ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी आता जातो आणि आपण कोठे जाता असे तुमच्यापैकी कोणीही मला विचारीत नाही.
sāmprataṁ svasya prerayituḥ samīpaṁ gacchāmi tathāpi tvaṁ kka gacchasi kathāmetāṁ yuṣmākaṁ kopi māṁ na pṛcchati|
6 ६ पण मी या गोष्टी तुमच्याशी बोलल्यामुळे तुमचे अंतःकरण दुःखाने भरले आहे.
kintu mayoktābhirābhiḥ kathābhi ryūṣmākam antaḥkaraṇāni duḥkhena pūrṇānyabhavan|
7 ७ तरीही मी तुम्हास खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या फायद्याचे आहे, कारण मी गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही; मी गेलो तर मी त्यास तुमच्याकडे पाठवीन;
tathāpyahaṁ yathārthaṁ kathayāmi mama gamanaṁ yuṣmākaṁ hitārthameva, yato heto rgamane na kṛte sahāyo yuṣmākaṁ samīpaṁ nāgamiṣyati kintu yadi gacchāmi tarhi yuṣmākaṁ samīpe taṁ preṣayiṣyāmi|
8 ८ आणि तो आल्यावर तो जगाची पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी आणि न्यायाविषयी खात्री करील.
tataḥ sa āgatya pāpapuṇyadaṇḍeṣu jagato lokānāṁ prabodhaṁ janayiṣyati|
9 ९ पापाविषयी; कारण ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत.
te mayi na viśvasanti tasmāddhetoḥ pāpaprabodhaṁ janayiṣyati|
10 १० नीतिमत्त्वाविषयी; कारण मी माझ्या पित्याकडे जातो आणि पुढे तुम्हास मी दिसणार नाही.
yuṣmākam adṛśyaḥ sannahaṁ pituḥ samīpaṁ gacchāmi tasmād puṇye prabodhaṁ janayiṣyati|
11 ११ आणि न्यायाविषयी; कारण या जगाच्या शासकाचा न्याय झाला आहे.
etajjagato'dhipati rdaṇḍājñāṁ prāpnoti tasmād daṇḍe prabodhaṁ janayiṣyati|
12 १२ मला तुम्हास अजून पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत पण तुम्ही आताच त्या सहन करू शकणार नाही.
yuṣmabhyaṁ kathayituṁ mamānekāḥ kathā āsate, tāḥ kathā idānīṁ yūyaṁ soḍhuṁ na śaknutha;
13 १३ पण तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे ऐकेल तेच सांगेल आणि होणार्या गोष्टी तुम्हास कळवील.
kintu satyamaya ātmā yadā samāgamiṣyati tadā sarvvaṁ satyaṁ yuṣmān neṣyati, sa svataḥ kimapi na vadiṣyati kintu yacchroṣyati tadeva kathayitvā bhāvikāryyaṁ yuṣmān jñāpayiṣyati|
14 १४ तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तो तुम्हास कळवील.
mama mahimānaṁ prakāśayiṣyati yato madīyāṁ kathāṁ gṛhītvā yuṣmān bodhayiṣyati|
15 १५ जे काही स्वर्गीय पित्याचे आहे ते सर्व माझे आहे; म्हणून मी म्हणालो की, जे माझे आहे त्यांतून घेऊन ते तुम्हास कळवील.
pitu ryadyad āste tat sarvvaṁ mama tasmād kāraṇād avādiṣaṁ sa madīyāṁ kathāṁ gṛhītvā yuṣmān bodhayiṣyati|
16 १६ थोड्या वेळाने, मी तुम्हास दिसणार नाही; आणि पुन्हा, थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.”
kiyatkālāt paraṁ yūyaṁ māṁ draṣṭuṁ na lapsyadhve kintu kiyatkālāt paraṁ puna rdraṣṭuṁ lapsyadhve yatohaṁ pituḥ samīpaṁ gacchāmi|
17 १७ तेव्हा त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकांस म्हणाले, “हा आम्हास, ‘थोड्या वेळाने मी तुम्हास दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल,’ शिवाय, ‘कारण मी पित्याकडे जातो.’ असे जे म्हणतो त्याचा अर्थ काय?”
tataḥ śiṣyāṇāṁ kiyanto janāḥ parasparaṁ vaditum ārabhanta, kiyatkālāt paraṁ māṁ draṣṭuṁ na lapsyadhve kintu kiyatkālāt paraṁ puna rdraṣṭuṁ lapsyadhve yatohaṁ pituḥ samīpaṁ gacchāmi, iti yad vākyam ayaṁ vadati tat kiṁ?
18 १८ ते म्हणत होते, हा ‘थोड्या वेळाने’ असे जे म्हणतो याचा अर्थ काय? हा काय बोलतो ते आम्हास समजत नाही.
tataḥ kiyatkālāt param iti tasya vākyaṁ kiṁ? tasya vākyasyābhiprāyaṁ vayaṁ boddhuṁ na śaknumastairiti
19 १९ आपणाला विचारावे असे त्यांच्या मनात आहे, हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “मी म्हणले की, थोड्या वेळाने, तुम्हास मी दिसणार नाही आणि पुन्हा, थोड्या वेळाने, तुम्ही मला पहाल, याविषयी एकमेकांना विचारीत आहात काय?
nigadite yīśusteṣāṁ praśnecchāṁ jñātvā tebhyo'kathayat kiyatkālāt paraṁ māṁ draṣṭuṁ na lapsyadhve, kintu kiyatkālāt paraṁ pūna rdraṣṭuṁ lapsyadhve, yāmimāṁ kathāmakathayaṁ tasyā abhiprāyaṁ kiṁ yūyaṁ parasparaṁ mṛgayadhve?
20 २० मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल, तरी जग आनंद करील. तुम्हास दुःख होईल, पण तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल.
yuṣmānaham atiyathārthaṁ vadāmi yūyaṁ krandiṣyatha vilapiṣyatha ca, kintu jagato lokā ānandiṣyanti; yūyaṁ śokākulā bhaviṣyatha kintu śokāt paraṁ ānandayuktā bhaviṣyatha|
21 २१ स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते; पण बालक जन्मल्यावर जगात एक मनुष्य जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही.
prasavakāla upasthite nārī yathā prasavavedanayā vyākulā bhavati kintu putre bhūmiṣṭhe sati manuṣyaiko janmanā naraloke praviṣṭa ityānandāt tasyāstatsarvvaṁ duḥkhaṁ manasi na tiṣṭhati,
22 २२ आणि म्हणून, आता तुम्हास दुःख झाले आहे; तरी मी तुम्हास पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल आणि तुमच्यापासून तुमचा आनंद कोणीही हिरावून घेणार नाही.
tathā yūyamapi sāmprataṁ śokākulā bhavatha kintu punarapi yuṣmabhyaṁ darśanaṁ dāsyāmi tena yuṣmākam antaḥkaraṇāni sānandāni bhaviṣyanti, yuṣmākaṁ tam ānandañca kopi harttuṁ na śakṣyati|
23 २३ आणि त्यादिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हास माझ्या नावाने देईल.
tasmin divase kāmapi kathāṁ māṁ na prakṣyatha| yuṣmānaham atiyathārthaṁ vadāmi, mama nāmnā yat kiñcid pitaraṁ yāciṣyadhve tadeva sa dāsyati|
24 २४ तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही; मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की, तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.
pūrvve mama nāmnā kimapi nāyācadhvaṁ, yācadhvaṁ tataḥ prāpsyatha tasmād yuṣmākaṁ sampūrṇānando janiṣyate|
25 २५ या गोष्टी मी तुमच्याशी दाखल्यात बोललो आहे; पण जेव्हा मी तुमच्याशी दाखल्यात बोलणार नाही पण मी तुम्हास उघडपणे पित्याविषयी सांगेन अशी वेळ येत आहे.
upamākathābhiḥ sarvvāṇyetāni yuṣmān jñāpitavān kintu yasmin samaye upamayā noktvā pituḥ kathāṁ spaṣṭaṁ jñāpayiṣyāmi samaya etādṛśa āgacchati|
26 २६ त्यादिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल; आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन असे मी तुम्हास म्हणत नाही.
tadā mama nāmnā prārthayiṣyadhve 'haṁ yuṣmannimittaṁ pitaraṁ vineṣye kathāmimāṁ na vadāmi;
27 २७ कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे.
yato yūyaṁ mayi prema kurutha, tathāham īśvarasya samīpād āgatavān ityapi pratītha, tasmād kāraṇāt kāraṇāt pitā svayaṁ yuṣmāsu prīyate|
28 २८ मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा, जग सोडून पित्याकडे जातो.”
pituḥ samīpājjajad āgatosmi jagat parityajya ca punarapi pituḥ samīpaṁ gacchāmi|
29 २९ त्याचे शिष्य त्यास म्हणाले, “पाहा, आता आपण उघडपणे बोलत आहा, दाखला सांगत नाही.
tadā śiṣyā avadan, he prabho bhavān upamayā noktvādhunā spaṣṭaṁ vadati|
30 ३० आता आम्हास कळले आहे की, आपल्याला सर्वकाही कळते आणि कोणी आपल्याला विचारावे याची आपणाला गरज नाही. यावरुन आपण देवापासून आला आहात असा आम्ही विश्वास धरतो.”
bhavān sarvvajñaḥ kenacit pṛṣṭo bhavitumapi bhavataḥ prayojanaṁ nāstītyadhunāsmākaṁ sthirajñānaṁ jātaṁ tasmād bhavān īśvarasya samīpād āgatavān ityatra vayaṁ viśvasimaḥ|
31 ३१ येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आता विश्वास ठेवता काय?
tato yīśuḥ pratyavādīd idānīṁ kiṁ yūyaṁ viśvasitha?
32 ३२ पाहा, अशी वेळ येत आहे किंबहुना आली आहे की, तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपआपल्या घरी जाल व मला एकटे सोडाल; पण मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे.
paśyata sarvve yūyaṁ vikīrṇāḥ santo mām ekākinaṁ pīratyajya svaṁ svaṁ sthānaṁ gamiṣyatha, etādṛśaḥ samaya āgacchati varaṁ prāyeṇopasthitavān; tathāpyahaṁ naikākī bhavāmi yataḥ pitā mayā sārddham āste|
33 ३३ माझ्याठायी तुम्हास शांती मिळावी म्हणून मी या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हास क्लेश होतील; तरी धीर धरा, मी जगाच्या शक्तीला जिकले आहे.”
yathā mayā yuṣmākaṁ śānti rjāyate tadartham etāḥ kathā yuṣmabhyam acakathaṁ; asmin jagati yuṣmākaṁ kleśo ghaṭiṣyate kintvakṣobhā bhavata yato mayā jagajjitaṁ|