< योहान 15 >
1 १ “मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे.
わたしはまことのぶどうの木、わたしの父は農夫である。
2 २ माझ्यातील, फळ न देणारा, प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणार्या प्रत्येक फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्यास साफसूफ करतो.
わたしにつながっている枝で実を結ばないものは、父がすべてこれをとりのぞき、実を結ぶものは、もっと豊かに実らせるために、手入れしてこれをきれいになさるのである。
3 ३ जे वचन मी तुम्हास सांगितले त्यामुळे, तुम्ही आता शुद्ध झालाच आहात.
あなたがたは、わたしが語った言葉によって既にきよくされている。
4 ४ तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्यावाचून त्यास आपल्याआपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हासही देता येणार नाही.
わたしにつながっていなさい。そうすれば、わたしはあなたがたとつながっていよう。枝がぶどうの木につながっていなければ、自分だけでは実を結ぶことができないように、あなたがたもわたしにつながっていなければ実を結ぶことができない。
5 ५ मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहा; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हास काही करीता येत नाही.
わたしはぶどうの木、あなたがたはその枝である。もし人がわたしにつながっており、またわたしがその人とつながっておれば、その人は実を豊かに結ぶようになる。わたしから離れては、あなたがたは何一つできないからである。
6 ६ कोणी माझ्यामध्ये राहिला नाही, तर त्यास फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात.
人がわたしにつながっていないならば、枝のように外に投げすてられて枯れる。人々はそれをかき集め、火に投げ入れて、焼いてしまうのである。
7 ७ तुम्ही माझ्यामध्ये राहीला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हास मिळेल.
あなたがたがわたしにつながっており、わたしの言葉があなたがたにとどまっているならば、なんでも望むものを求めるがよい。そうすれば、与えられるであろう。
8 ८ तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.
あなたがたが実を豊かに結び、そしてわたしの弟子となるならば、それによって、わたしの父は栄光をお受けになるであろう。
9 ९ जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशीच मीही तुम्हावर प्रीती केली आहे; तसेच तुम्हीही माझ्या प्रीतीत रहा.
父がわたしを愛されたように、わたしもあなたがたを愛したのである。わたしの愛のうちにいなさい。
10 १० जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझ्या प्रीतीत रहाल.
もしわたしのいましめを守るならば、あなたがたはわたしの愛のうちにおるのである。それはわたしがわたしの父のいましめを守ったので、その愛のうちにおるのと同じである。
11 ११ माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी हे तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत.
わたしがこれらのことを話したのは、わたしの喜びがあなたがたのうちにも宿るため、また、あなたがたの喜びが満ちあふれるためである。
12 १२ जशी मी तुम्हावर प्रीती केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे.
わたしのいましめは、これである。わたしがあなたがたを愛したように、あなたがたも互に愛し合いなさい。
13 १३ आपल्या मित्रांसाठी आपला जीव द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही.
人がその友のために自分の命を捨てること、これよりも大きな愛はない。
14 १४ मी तुम्हास जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात.
あなたがたにわたしが命じることを行うならば、あなたがたはわたしの友である。
15 १५ मी तुम्हास आतापासून दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासास कळत नाही; पण मी तुम्हास मित्र म्हणले आहे, कारण मी ज्या गोष्टी पित्याकडून ऐकून घेतल्या त्या सर्व मी तुम्हास कळवल्या आहेत.
わたしはもう、あなたがたを僕とは呼ばない。僕は主人のしていることを知らないからである。わたしはあなたがたを友と呼んだ。わたしの父から聞いたことを皆、あなたがたに知らせたからである。
16 १६ तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हास निवडले आणि नेमले आहे; यामध्ये हेतू हा आहे की, तुम्ही जाऊन, फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे.
あなたがたがわたしを選んだのではない。わたしがあなたがたを選んだのである。そして、あなたがたを立てた。それは、あなたがたが行って実をむすび、その実がいつまでも残るためであり、また、あなたがたがわたしの名によって父に求めるものはなんでも、父が与えて下さるためである。
17 १७ तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हास या आज्ञा करतो.
これらのことを命じるのは、あなたがたが互に愛し合うためである。
18 १८ जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्याच्यापूर्वी त्याने माझाही केला आहे.
もしこの世があなたがたを憎むならば、あなたがたよりも先にわたしを憎んだことを、知っておくがよい。
19 १९ जर तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रीती केली असती. पण तुम्ही जगाचे नाही, मी तुम्हास जगांतून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते,
もしあなたがたがこの世から出たものであったなら、この世は、あなたがたを自分のものとして愛したであろう。しかし、あなたがたはこの世のものではない。かえって、わたしがあなたがたをこの世から選び出したのである。だから、この世はあなたがたを憎むのである。
20 २० ‘दास धन्यापेक्षा मोठा नाही’ हे जे वचन मी तुम्हास सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर ते तुमच्याही पाठीस लागतील; त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील.
わたしがあなたがたに『僕はその主人にまさるものではない』と言ったことを、おぼえていなさい。もし人々がわたしを迫害したなら、あなたがたをも迫害するであろう。また、もし彼らがわたしの言葉を守っていたなら、あなたがたの言葉をも守るであろう。
21 २१ पण ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हास करतील; कारण ज्याने मला पाठवले त्यास ते ओळखीत नाहीत.
彼らはわたしの名のゆえに、あなたがたに対してすべてそれらのことをするであろう。それは、わたしをつかわされたかたを彼らが知らないからである。
22 २२ मी जर आलो नसतो आणि त्यांच्याशी बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसते, पण आता त्यांना आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही.
もしわたしがきて彼らに語らなかったならば、彼らは罪を犯さないですんだであろう。しかし今となっては、彼らには、その罪について言いのがれる道がない。
23 २३ जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो.
わたしを憎む者は、わたしの父をも憎む。
24 २४ जी कामे दुसर्या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते. पण आता त्यांनी मला आणि माझ्या पित्यालाही पाहिले आहे व आमचा द्वेष केला आहे.
もし、ほかのだれもがしなかったようなわざを、わたしが彼らの間でしなかったならば、彼らは罪を犯さないですんだであろう。しかし事実、彼らはわたしとわたしの父とを見て、憎んだのである。
25 २५ तथापि ‘त्यांनी विनाकारण माझा द्वेष केला’ हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते.
それは、『彼らは理由なしにわたしを憎んだ』と書いてある彼らの律法の言葉が成就するためである。
26 २६ पण जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल.
わたしが父のみもとからあなたがたにつかわそうとしている助け主、すなわち、父のみもとから来る真理の御霊が下る時、それはわたしについてあかしをするであろう。
27 २७ आणि तुम्ही पहिल्यापासून माझ्याबरोबर आहात म्हणून तुम्हीही साक्ष द्याल.”
あなたがたも、初めからわたしと一緒にいたのであるから、あかしをするのである。