< योहान 14 >

1 “तुमचे अंतःकरण घाबरू देऊ नका; देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरही विश्वास ठेवा.
Нехай не трівожить ся серце ваше. Віруйте в Бога і в мене віруйте.
2 माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हास तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो
В дому Отця мого осель багато. Коли б ні, сказав би вам: Ійду наготовити місце вам.
3 आणि, मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन; यासाठी जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.
І, як пійду та наготовлю вам місце, знов прийду й прийму вас до себе, щоб де я, і ви були.
4 मी जातो तिकडचा मार्ग तुम्हास माहीत आहे.”
А куди я йду, знаєте, й дорогу знаєте.
5 थोमा त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हास माहीत नाही; मग मार्ग आम्हास कसा माहीत असणार?”
Каже Йому Тома: Господи, не знаємо, куди йдеш; і як можемо дорогу знати?
6 येशूने त्यास म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.
Рече йому Ісус: Я дорога й правда, й життє: нїхто не приходить до Отця, як тільки мною.
7 मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्यास ओळखता आणि तुम्ही त्यास पाहिलेही आहे.”
Коли б зняли мене, й Отця мого знали б; і від нинї знаєте Його, й виділи Його.
8 फिलिप्प, त्यास म्हणाला, “प्रभूजी, आम्हास पिता दाखवा, म्हणजे आम्हास तेवढे पुरे आहे.”
Каже Йому Филип: Господи, покажи нам Отця, то й буде з нас.
9 येशूने त्यास म्हटलेः “फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हास पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस?
Рече йому Ісус: Стілький час я з вами, й не пізнав єси мене, Филипе? Хто видів мене, видів Отця; як же ти кажеш: Покажи нам Отця?
10 १० मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे, असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हास सांगतो, त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही; माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कामे करतो.
Хиба не ймеш віри, що я в Отцї і Отець у менї? Слова, що я промовляю вам, від себе не промовляю; Отець же, що в менї пробуває, Той робить дїла.
11 ११ मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे यावर तुम्ही विश्वास ठेवा; नाही तर माझ्या कृत्यांमुळे तरी माझ्यावर विश्वास ठेवा.
Віруйте менї, що я в Отцї і Отець у менї; коли ж ні, задля діл самих віруйте менї.
12 १२ मी तुम्हास खरे खरे सांगतो, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा अधिक मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो.
Істино, істино глаголю вам: Хто вірує в мене, дїла, що я роблю, і він робити ме: й більше сього робити ме; бо я до Отця мого йду.
13 १३ पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन.
І чого просити мете в імя моє, те зроблю, щоб прославивсь Отець у Сині.
14 १४ तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.
Коли чого просити мете в імя моє, я зроблю.
15 १५ माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल.
Коли любите мене, хороніть заповідї мої.
16 १६ मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हास दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सर्वकाळ रहावे. (aiōn g165)
І я вблагаю Отця, і дасть вам иншого утїшителя, щоб пробував з вами по вік, (aiōn g165)
17 १७ तो सत्याचा आत्मा आहे, जग त्यास ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्यास पाहत नाही अथवा त्यास ओळखीत नाही; तुम्ही त्यास ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तो तुम्हामध्ये वस्ती करील.
Духа правди, котрого сьвіт не може прийняти; бо не видить Його, анї знає Його; ви ж знаєте Його, бо з вами пробуває і в вас буде.
18 १८ मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही; मी तुम्हाकडे येईन.
Не зоставлю вас сиротами: прийду до вас.
19 १९ आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही. पण तुम्ही मला पाहाल; मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत रहाल.
Ще трохи, й сьвіт мене більш не видїти ме; ви ж будете видїти мене, бо я живу, й ви жити мете.
20 २० त्यादिवशी तुम्हास समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे.
Того дня знати мете, що я в Отцї моїм, і ви в мені, а я в вас.
21 २१ ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्यास प्रकट होईन.”
Хто має заповіді мої і хоронить їх, той любить мене; хто ж любить мене, буде люблений від Отця мого, і я любити му його, і обявлюсь йому.
22 २२ यहूदा (इस्कार्योत नव्हे) त्यास म्हणाला, “प्रभूजी, असे काय झाले की, आपण स्वतः आम्हास प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही?”
Каже Йому Юда, не Іскариоцький: Господи, що воно єсть, що маєш нам обявитись, а не сьвітові?
23 २३ येशूने त्यास उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील; माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन, त्याच्याबरोबर वस्ती करून राहू.
Відказав Ісус і рече йому: Коли хто любить мене, слово моє хоронити ме, і Отець мій любити ме його, і до него прийдемо, і оселю в него зробимо.
24 २४ जो माझ्यावर प्रीती करीत नाही तो माझी वचने पाळीत नाही आणि तुम्ही जे वचन ऐकता ते माझे नाही तर ज्याने मला पाठवले त्या पित्याचे आहे.
Хто не любить мене, словес моїх не хоронить; а слово, що ви чуєте, не моє, а пославшого мене Отця.
25 २५ मी तुमच्याबरोबर राहत असतांना या गोष्टी तुम्हास सांगितल्या आहेत.
Се я глаголав вам, у вас пробуваючи.
26 २६ तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हास सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हास सांगितल्या त्या सर्वाची तुम्हास आठवण करून देईल.
Утїшитель же, Дух сьвятий, котрого пішле Отець в імя моє, Той научить вас усього, й пригадав вам усе, що я глаголав вам.
27 २७ मी तुम्हास शांती देऊन ठेवितो; मी आपली शांती तुम्हास देतो जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही; तुमचे अंतःकरण अस्वस्थ किंवा भयभीत होऊ नये,
Упокій оставляю вам, мій упокій даю вам; не, яко ж сьвіт дає, я даю вам. Нехай не трівожить ся серце ваше, анї лякаєть ся.
28 २८ ‘मी जातो आणि तुम्हाकडे परत येईन.’ असे जे मी तुम्हास सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हास आनंद वाटला असता; कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे.
Ви чули, що я глаголав вам: Ійду, й прийду до вас. Коли б любили мене, зрадїли б, що я сказав: Ійду до Отця; бо Отець мій більший мене.
29 २९ ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून ते होण्याअगोदर, आता मी तुम्हास सांगितले आहे,
І оце глаголав вам, перш нїж тому стати ся, щоб, як станеть ся, увірували.
30 ३० यापुढे, मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा शासक येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही.
Вже більш не говорити му багато з вами, йде бо князь сьвіта сього, й у менї не має нїчого.
31 ३१ परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे मी करतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. उठा, आपण येथून जाऊ.”
Та, щоб знав сьвіт, що я люблю Отця, і, яко ж заповідав менї Отець, так чиню. Уставайте, ходімо з відсїля.

< योहान 14 >