< योहान 13 >
1 १ आता, वल्हांडण सणाअगोदर असे झाले की, येशूने आता या जगांतून पित्याकडे निघून जाण्याची वेळ आली आहे, हे जाणून, या जगातील स्वकीयांवर त्याची जी प्रीती होती, ती त्याने शेवटपर्यंत केली.
逾越節慶日前,耶穌知道他離此世歸父的時辰已到,他既然愛了世上屬於自己的人,就愛他們到底。
2 २ शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याच्या मनात येशूला विश्वासघाताने शत्रूच्या हाती द्यावे असे सैतानाने आधीच घातले होते.
正吃晚餐的時候──魔鬼已使依斯加略人西滿的兒子猶達斯決意出賣耶穌─
3 ३ येशू जाणत होता की, पित्याने त्याच्या हातात सर्व दिले होते आणि तो देवाकडून आला होता व देवाकडे जात होता;
耶穌因知道父把一切已交在他手中,也知道自己是從天主來的,又要往天主那裡去,
4 ४ येशू भोजनावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे एकीकडे ठेवली आणि एक कापड घेऊन आपल्या कमरेला बांधला.
就從席日間起來,脫上外衣,拿起一條手巾束在腰間,
5 ५ त्यानंतर येशू एका गंगाळात पाणी ओतून आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला व कमरेला बांधलेल्या कापडाने पुसू लागला.
然後把水倒在盆裏,開始洗門徒的腳,用束著的手巾擦乾。
6 ६ मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय?”
及至來到西滿伯多祿跟前,伯多祿對他說: 「主! 你給我腳嗎?」
7 ७ येशूने त्यास उत्तर दिले, “मी काय करतो ते तुला आता कळत नाही, पण ते तुला पुढे कळेल.”
耶穌回答說: 「我所做的你現在不明白,以後你會明白。」
8 ८ पेत्र त्यास म्हणाला, “तुम्हास माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत.” येशूने त्यास उत्तर दिले, “मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.” (aiōn )
伯多祿對他說:「不,你永遠不可給我洗腳!」耶穌回答說: 「我若不洗你,你就與我無分。」 (aiōn )
9 ९ शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, माझे केवळ पायच धुऊ नका, तर हात आणि डोकेही धुवा.”
西滿伯多祿遂說:「主! 不但我的腳,而且連手帶頭,都給我洗罷! 」
10 १० येशूने त्यास म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे त्यास पायांशिवाय दुसरे काही धुवायची गरज नाही, तर तो सर्वांगी शुद्ध आहे; तुम्ही शुद्ध आहा, पण सगळे जण नाही.”
耶穌向他說:「沐浴過的人,已全身清潔,只需洗腳就夠了。你們原是潔淨的,但不都是。」
11 ११ कारण आपणाला विश्वासघाताने शत्रूच्या हाती कोण धरून देणार आहे हे त्यास ठाऊक होते, म्हणून तो म्हणाला, “तुम्ही सगळे जण शुद्ध नाही.”
原來,耶穌知道誰要出賣他,為此說: 你們不都是潔淨的。
12 १२ मग त्याने त्यांचे पाय धुतल्यावर आपली बाह्यवस्त्रे घालून व तो पुन्हा खाली बसल्यावर त्यांना म्हणाला, “मी तुम्हास काय केले ते तुम्हास समजले काय?
及至耶穌洗完了他們的腳,穿上外衣,又去坐下,對他們說: 「你們明白我給你們所做的嗎?
13 १३ तुम्ही मला ‘गुरू’ आणि ‘प्रभू’ म्हणता आणि ते ठीक म्हणता, कारण मी तसाच आहे.
你們稱我「師傅」、「主子」,說得正對:我原來是。
14 १४ मग मी जर तुमचा प्रभू आणि गुरू असता तुमचे पाय धुतले तर तुम्हीपण एकमेकांचे पाय धुवावेत.
若我為主子,為師傅的話,給你們洗腳,你們也該彼此洗腳;
15 १५ कारण मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हास उदाहरण दिले आहे.
我給你們立了榜樣,叫你們也照我給你們所做的去做。
16 १६ मी तुम्हास खरे खरे सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा मोठा नाही; आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा मोठा नाही.
我實實在在告訴你們: 沒有僕人大過主人的,也沒有奉使的大過派遣他的。
17 १७ या गोष्टी तुम्हास समजतात तर त्याप्रमाणे वागल्याने तर तुम्ही धन्य आहात.
你們既知道了這些事,如果實行,便是有福的。
18 १८ मी तुमच्यातील सर्वांविषयी बोलत नाही. मी ज्यांना निवडले आहे त्यांना मी ओळखतो. तरी, ‘ज्याने माझी भाकर खाल्ली त्यानेच माझ्याविरुद्ध आपली टाच उचलली,’ हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे.
我不是說你們全體,我認識我所揀選的;但經上所記載的必須應驗:『吃過我飯的人,也舉腳踢我。』
19 १९ आतापासून हे होण्याच्या आधीच मी हे तुम्हास सांगून ठेवतो, यासाठी की जेव्हा हे होईल, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की, मी तो आहे.
就在現在,事未發生以前,我告訴你們,好叫事發生以後,你們相信我就是那一位。
20 २० मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्यास स्वीकारतो.”
我實實在在告訴你們:凡接待我所派遣的,就是接待我;接待我的,就是接待那派遣我來的。」
21 २१ असे बोलल्यावर येशू आत्म्यात अस्वस्थ झाला आणि साक्ष देऊन म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुमच्यांतला एकजण मला विश्वासघात करून शत्रूच्या हाती धरून देईल.”
耶穌說了這些話,心神煩亂,就明明地說: 「我實實在在告訴你們: 你們中有一個要出賣我。」
22 २२ तो कोणाविषयी बोलतो या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले.
門徒便互相觀望,猜疑他說的是誰。
23 २३ तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एकजण येशूच्या उराशी टेकलेला होता.
他門徒中有一個是耶穌所愛的,他那時斜倚在耶穌的懷裏,
24 २४ म्हणून ज्याच्याविषयी तो बोलतो तो कोण आहे हे आम्हास सांग, असे शिमोन पेत्राने त्यास खुणावून म्हटले.
西滿伯多祿就向他示意說: 「你問他說的是誰?」
25 २५ तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता त्यास म्हणाला, “प्रभूजी, तो कोण आहे?”
那位就緊靠在耶穌的胸膛上,問他說: 「主!是誰?」
26 २६ येशूने उत्तर दिले, “मी ज्याला हा घास ताटात बुचकळून देईन, तोच तो आहे.” आणि त्याने तो घास ताटात बुचकळून, तो शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याला दिला.
耶穌答覆說: 「我蘸這片餅遞給誰,誰就是。」耶穌就蘸了一片餅,遞給依斯加略人西滿的兒子猶達斯。
27 २७ आणि घास दिल्याबरोबर सैतान त्यांच्यामध्ये शिरला. मग येशूने त्यास म्हटले, “तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक.”
隨著那片餅,撒殫進入了他的心,於是耶穌對他說: 「你所要做的,你快去做罷!」
28 २८ पण त्याने त्यास असे कशासाठी सांगितले हे भोजनास बसलेल्यातील कोणालाही समजले नाही.
同席的人誰也沒有明白耶穌為什麼向他說了這話。
29 २९ कारण यहूदाजवळ डबी होती म्हणून सणासाठी आपणांस गरज आहे ते विकत घ्यावे किंवा गरिबांस काहीतरी द्यावे असे येशू सांगतो आहे, असे कित्येकांस वाटले.
不過,有人因為猶達斯掌管錢囊,以為耶穌是給他說: 「你去買我們過節所需要的」,或者,要他給窮人施捨一些東西。
30 ३० मग घास घेतल्यावर तो लगेच बाहेर गेला; त्यावेळी रात्र होती.
猶達斯一吃了那一片餅,就立時出去了;那時,正是黑夜。
31 ३१ तो बाहेर गेल्यावर येशू म्हणाला, “आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्याठायी देवाचे गौरव झाले आहे;
猶達斯出去以後,耶穌就說:「現在人子受到了光榮,天主也在人子身上受到了光榮。
32 ३२ देव आपल्याठायी त्याचे गौरव करील. तो त्याचे लवकर गौरव करील.
天主既然在人子身上得到了光榮,天主也要在自己內使人子得到光榮,並且立時就要光榮他。
33 ३३ मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे; तुम्ही माझा शोध कराल; आणि मी यहूदी अधिकाऱ्यांना सांगितले की, ‘मी जाईन तिकडे तुम्हास येता येणार नाही.’ तसे तुम्हासही आता सांगतो.
孩子們!我同你們在一起的時候不多了;以後你們要尋找我,就如我曾向猶太人說過:我所去的地方,你們不能去;現在我也給你們說。
34 ३४ मी एक नवी आज्ञा तुम्हास देतो; तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.
我給你們一條新命令: 你們該彼此相愛如同我愛了你們,你們也該照樣彼此相愛。
35 ३५ तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे यावरुन सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात.”
如果你們之間彼此相親相愛,世人因此就可認出你們是我的門徒。」
36 ३६ शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता?” येशूने त्यास उत्तर दिले, “मी जाईन तिकडे, आता, तुला माझ्यामागे येता येणार नाही; पण नंतर तू येशील.”
西滿伯多祿問耶穌說: 「主! 你往那裡去?」耶穌回答說: 「我所去的地方,你如今不能跟我去,但後來卻要跟我去。」
37 ३७ पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, मला आपल्यामागे आताच का येता येणार नाही? मी आपल्यासाठी माझा जीव देईन.”
伯多祿向他說: 「主! 為什麼現在我不能跟你去?我要為你捨掉我的性命! 」
38 ३८ येशूने त्यास उत्तर दिले, “माझ्यासाठी तू आपला जीव देशील काय? मी तुला खरे खरे सांगतों, तू मला तीनदा नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”
耶穌答覆說: 「你要為我捨掉你的性命嗎?我實實在在告訴你: 雞未叫以前,你要三次不認我。」