< योहान 12 >
1 १ मग येशू वल्हांडणाच्या सहा दिवस आधी बेथानीस आला आणि ज्या लाजराला येशूने मरण पावलेल्यातून उठवले होते तो तेथे होता.
Foi pois Jesus seis dias antes da pascoa a Bethania, onde estava Lázaro, o que falecera, e a quem resuscitara dos mortos.
2 २ म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी रात्रीचे भोजन केले आणि मार्था वाढीत होती. पण त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यात लाजर हा एक होता.
Fizeram-lhe pois ali uma ceia, e Martha servia, e Lázaro era um dos que estavam à mesa com ele.
3 ३ तेव्हा मरीयेने अर्धा शेर, शुद्ध जटामांसीचे, अतिमोलवान सुवासिक तेल घेऊन येशूच्या पायांना लावून आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले; आणि तेलाच्या सुवासाने घर भरून गेले.
Então Maria, tomando um arratel de unguênto de nardo puro, de muito preço, ungiu os pés de Jesus, e enxugou-lhe os pés com os seus cabelos; e encheu-se a casa do cheiro do unguênto.
4 ४ तेव्हा, त्याच्या शिष्यांतला एक, त्यास धरून देणार होता तो यहूदा इस्कार्योत म्हणाला,
Então um dos seus discípulos, Judas Iscariotes, filho de Simão, o que havia de trahi-lo, disse:
5 ५ “हे सुवासिक तेल तीनशे चांदीच्या नाण्यांस विकून ते गरीबास का दिले नाही?”
Porque não se vendeu este unguênto por trezentos dinheiros e não se deu aos pobres?
6 ६ त्यास गरिबांची काळजी होती म्हणून तो हे बोलला असे नाही, तर तो चोर होता म्हणून हे बोलला. त्याच्याजवळ डबी होती आणि तिच्यात जे टाकण्यांत येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे बोलला.
Ora ele disse isto, não pelo cuidado que tivesse dos pobres, mas porque era ladrão, e tinha a bolsa, e trazia o que nela se lançava.
7 ७ यावरुन येशूने म्हटले, “तिच्या वाटेस जाऊ नका. मला पुरण्याच्या दिवसासाठी तिने हे राखून ठेवले आहे.
Disse pois Jesus: deixai-a; para o dia da minha sepultura guardou isto;
8 ८ कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत, पण मी नेहमी तुमच्याजवळ आहे असे नाही.”
Porque os pobres sempre os tendes convosco; porém a mim nem sempre me tendes.
9 ९ तो तेथे आहे असे यहूद्यातील पुष्कळ लोकांस कळले आणि केवळ येशूकरता नाही, तर ज्याला त्याने मरण पावलेल्यातून उठवले होते त्या लाजरालाही आपण पाहावे म्हणून ते आले.
E muita gente dos judeus soube que ele estava ali; e foram, não só por causa de Jesus, mas também para ver a Lázaro, a quem resuscitara dos mortos.
10 १० पण मुख्य याजकांनी आपण लाजरालाही ठार मारावे असा विचार केला.
E os principais dos sacerdotes consultaram matar também a Lázaro;
11 ११ कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहूदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते.
Porque muitos dos judeus, por causa dele, iam, e criam em Jesus.
12 १२ दुसर्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरूशलेम शहरास येत आहे असे ऐकून,
No dia seguinte, ouvindo uma grande multidão, que viera à festa, que Jesus ia de Jerusalém,
13 १३ खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस घ्यायला बाहेर निघाले आणि गजर करीत म्हणाले, “होसान्ना! प्रभूच्या नावाने येणारा इस्राएलाचा राजा!” धन्यवादित असो.
Tomaram ramos de palmeiras, e sairam-lhe ao encontro, e clamavam: hosana: bendito o rei de Israel que vem em nome do Senhor.
14 १४ आणि येशूला एक शिंगरु मिळाल्यावर तो त्यावर बसला.
E achou Jesus um jumentinho, e assentou-se sobre ele, como está escrito:
15 १५ ‘हे सियोनेच्या कन्ये, भिऊ नको, पाहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.’ या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले.
Não temas, ó filha de Sião; eis que o teu Rei vem assentado sobre o filho de uma jumenta.
16 १६ या गोष्टी तर त्याच्या शिष्यांना पहिल्याने समजल्या नव्हत्या, पण येशूचे गौरव झाल्यावर, त्यांना आठवण झाली की, त्याच्याविषयी या गोष्टी लिहिल्या होत्या आणि लोकांनी त्याच्यासाठी असे केले होते.
Os seus discípulos, porém, não entenderam isto no princípio; mas, quando Jesus foi glorificado, então se lembraram de que isto estava escrito dele, e que isto lhe fizeram.
17 १७ त्याने लाजराला कबरेतून बोलावून मरण पावलेल्यातून उठवले, त्यावेळेस जो लोकसमुदाय त्याच्याबरोबर होता त्यांने त्याच्याविषयी साक्ष दिली.
A multidão, pois, que estava com ele quando Lázaro foi chamado da sepultura, testificava que ele o resuscitara dos mortos.
18 १८ त्याने हे चिन्ह केले होते असे त्यांनी ऐकले म्हणूनही लोक त्यास भेटावयास गेले.
Pelo que a multidão lhe saiu ao encontro, porque tinham ouvido que ele fizera este sinal.
19 १९ मग परूशी एकमेकांस म्हणाले, “तुमचे काहीच चालत नाही, हे तुम्ही पाहता; पाहा, जग त्याच्यामागे चालले आहे.”
Disseram pois os fariseus entre si: Vêdes que nada aproveitais? eis que o mundo vai após ele.
20 २० सणांत उपासना करावयास आलेल्या लोकांपैकी काही लोक ग्रीक होते.
E havia alguns gregos, entre os que tinham subido a adorar no dia da festa.
21 २१ त्यांनी गालील प्रांतातील बेथसैदाकर फिलिप्प याच्याजवळ येऊन विनंती केली की, “साहेब, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे.”
Estes, pois, dirigiram-se a Felipe, que era de Betsaida na Galiléia, e rogaram-lhe, dizendo: Senhor, queriamos ver a Jesus.
22 २२ फिलिप्पाने येऊन अंद्रियाला सांगितले; अंद्रिया व फिलिप्प यांनी येऊन येशूला सांगितले.
Felipe foi dize-lo a André, e então André e Felipe o disseram a Jesus.
23 २३ येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे.
E Jesus lhes respondeu, dizendo: É chegada a hora em que o Filho do homem há de ser glorificado.
24 २४ मी तुम्हास खरे खरे सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरण पावला नाही, तर तो एकटाच राहतो; आणि मरण पावला तर तो पुष्कळ पीक देतो.
Na verdade, na verdade vos digo que, se o grão de trigo, caindo na terra, não morrer, fica ele só; porém, se morrer, dá muito fruto.
25 २५ जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्यास मुकेल आणि जो या जगांत आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. (aiōnios )
Quem ama a sua vida perde-la-á, e quem neste mundo aborrece a sua vida guarda-la-a para a vida eterna. (aiōnios )
26 २६ जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्यास मान करील.
Se alguém me serve, siga-me, e, onde eu estiver, ali estará também o meu servo. E, se alguém me servir, meu Pai o honrará.
27 २७ आता माझा जीव अस्वस्थ होत आहे आणि मी काय बोलू? हे पित्या, तू या घटकेपासून माझे रक्षण कर. पण मी या कारणासाठीच या घटकेत आलो आहे.
Agora a minha alma está turbada; e que direi eu? Pai, salva-me desta hora, mas para isto vim a esta hora.
28 २८ हे पित्या, तू आपल्या नावाचे गौरव कर” तेव्हा आकाशवाणी झाली, “मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन.”
Pai, glorifica o teu nome. Então veio uma voz do céu, que dizia: Já o tenho glorificado, e outra vez o glorificarei.
29 २९ तेव्हा जे लोक सभोवती उभे होते आणि ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, “मेघगर्जना झाली.” दुसरे म्हणाले, “त्याच्याशी देवदूत बोलला.”
Ora a multidão que ali estava, e que a tinha ouvido, dizia que havia sido um trovão. Outros diziam: Um anjo lhe falou.
30 ३० येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “ही वाणी माझ्यासाठी झाली नाही तर तुमच्यासाठी झाली आहे.
Respondeu Jesus, e disse: Não veio esta voz por amor de mim, mas por amor de vós.
31 ३१ आता या जगाचा न्याय होतो, आता या जगाचा शासक बाहेर टाकला जाईल.
Agora é o juízo deste mundo: agora será expulso o príncipe deste mundo.
32 ३२ आणि मला जर पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन.”
E eu, quando for levantado da terra, todos atrairei a mim.
33 ३३ तो तर आपण कोणत्या मरणाने मरणार पाहिजे हे सुचविण्याकरिता हे बोलला.
E dizia isto, significando de que morte havia de morrer.
34 ३४ लोकांनी त्यास विचारले, ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रांतून ऐकले आहे, तर “मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे” असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण? (aiōn )
Respondeu-lhe a multidão: Nós temos ouvido da lei, que o Cristo permanece para sempre; e como dizes tu que convém que o Filho do homem seja levantado? Quem é esse Filho do homem? (aiōn )
35 ३५ यावरुन येशू त्यांना म्हणाला, “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हास प्रकाश आहे तोपर्यंत चाला; यासाठी कि अंधकाराने तुम्हास गाठू नये; कारण जो अंधकारात चालतो त्यास आपण कोठे जातो हे कळत नाही.
Disse-lhes pois Jesus: A luz ainda está convosco por um pouco de tempo; andai enquanto tendes luz, para que as trevas vos não apanhem. E quem anda nas trevas não sabe para onde vai.
36 ३६ तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्हाजवळ प्रकाश आहे तोपर्यंत प्रकाशावर विश्वास ठेवा.” येशू या गोष्टी बोलला आणि तेथून निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला.
Enquanto tendes luz, crede na luz, para que sejais filhos da luz. Estas coisas disse Jesus; e, retirando-se, escondeu-se deles.
37 ३७ त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असतांही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही;
E, ainda que tinha feito tantos sinais diante deles, não criam nele;
38 ३८ हे यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते असेः “प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भूज कोणास प्रकट झाला आहे?”
Para que se cumprisse a palavra do profeta Isaias, que diz: Senhor, quem creu na nossa pregação? e a quem foi revelado o braço do Senhor?
39 ३९ म्हणून त्यांना विश्वास ठेवता आला नाही; या कारणाने यशया पुन्हा म्हणाला,
Por isso não podiam crer, porquanto Isaias disse outra vez:
40 ४० “त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व अंतःकरण कठीण केले आहे.”
Cegou-lhes os olhos, e endureceu-lhes o coração, afim de que não vejam com os olhos, e não compreendam com o coração, e se convertam, e eu os cure.
41 ४१ यशयाने त्याचे गौरव पाहिले म्हणून त्याने या गोष्टी सांगितल्या आणि तो त्याच्याविषयी बोलला.
Isaias disse isto quando viu a sua glória e falou dele.
42 ४२ तरी यहूदी अधिकार्यांतूनही पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपणांस सभास्थानाच्या बाहेर घालवू नये म्हणून परूश्यांमुळे ते तसे कबूल करीत नव्हते.
Contudo, até muitos dos principais creram nele; mas não o confessavam por causa dos fariseus, para não serem expulsos da sinagoga.
43 ४३ कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मनुष्याकडील गौरव अधिक प्रिय वाटले.
Porque amavam mais a glória dos homens do que a glória de Deus.
44 ४४ आणि येशू मोठ्याने म्हणाला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर नाही, तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो.
E Jesus clamou, e disse: Quem crê em mim, crê, não em mim, mas naquele que me enviou.
45 ४५ आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्यास पाहतो.
E quem me vê a mim, vê aquele que me enviou.
46 ४६ जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे.
Eu sou a luz que vim ao mundo, para que todo aquele que crê em mim não permaneça nas trevas.
47 ४७ कोणी जर माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही, त्याचा न्याय मी करीत नाही; कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर मी जगाचे तारण करायला आलो आहे.
E, se alguém ouvir as minhas palavras, e não crer, eu não o julgo: porque eu vim, não para julgar o mundo, mas para salvar o mundo.
48 ४८ जो माझा अवमान करतो आणि माझी वचने स्वीकारीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे. जे वचन मी सांगितले, तेच शेवटल्या दिवशी, त्याचा न्याय करील.
Quem me rejeitar a mim, e não receber as minhas palavras, já tem quem o julgue; a palavra que tenho falado, essa o há de julgar no último dia.
49 ४९ कारण मी आपल्या मनाचे बोललो नाही, तर मी काय सांगावे आणि काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे.
Porque eu não tenho falado de mim mesmo; porém o Pai, que me enviou, ele me deu mandamento sobre o que hei de dizer e sobre o que hei de falar:
50 ५० त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे. हे मला ठाऊक आहे. म्हणून जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.” (aiōnios )
E sei que o seu mandamento é a vida eterna. Assim que, o que eu falo, falo-o como o Pai mo tem dito. (aiōnios )