< योहान 11 >

1 आता बेथानीतील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. हे मरीया व तिची बहीण मार्था या त्याच गावच्या होत्या.
Now a certain man, Lazarus of Bethany, the village of Mary and her sister Martha, was sick.
2 तिने सुवासिक तेल घेऊन प्रभूला लावले व आपल्या केसांनी त्याचे पाय धुतले ती हीच मरीया होती आणि तिचा भाऊ लाजर आजारी होता.
(It was the Mary who [later] anointed the Lord with myrrh and wiped His feet with her hair whose brother Lazarus was sick.)
3 म्हणून त्याच्या बहिणींनी येशूला निरोप पाठवून कळवले, “प्रभूजी, बघा, आपण ज्याच्यावर प्रीती करता तो आजारी आहे.”
So the sisters sent to Him saying, “Lord, please, the one you love is sick!”
4 पण ते ऐकून येशू म्हणाला, “हा आजार मरणासाठी नाही पण देवाच्या गौरवासाठी आहे; म्हणजे देवाच्या पुत्राचे त्याच्यायोगे गौरव व्हावे.”
Upon hearing it Jesus said, “This sickness is not unto death but for the glory of God, so that the Son of God may be glorified through it.”
5 आता मरीया व तिची बहीण मार्था आणि लाजर यांच्यावर येशू प्रीती करीत होता.
(Now Jesus loved Martha and her sister and Lazarus.)
6 म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी दोन दिवस राहिला.
So, when He heard that he was sick He stayed where He was two more days!
7 मग त्यानंतर, त्याने शिष्यांना म्हटले, “आपण पुन्हा यहूदीया प्रांतात जाऊ या.”
Then after this He says to the disciples, “Let us go into Judea again.”
8 शिष्य त्यास म्हणाले, “रब्बी, यहूदी लोक आपल्याला आताच दगडमार करू पाहत होते आणि आपण पुन्हा तिकडे जाता काय?”
The disciples say to Him, “Rabbi, the Jews were just now trying to stone you, and you are going back there?”
9 येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास आहेत की नाहीत? दिवसा जर कोणी चालतो तर त्यास ठेच लागत नाही, कारण तो या जगाचा उजेड पाहतो;
Jesus answered: “Are there not twelve hours in the day? If anyone walks during the day he doesn't stumble, because he sees the light of this world.
10 १० पण जर कोणी रात्री चालतो तर त्यास ठेच लागते कारण त्याच्याठायी उजेड नाही.”
But if anyone walks in the night he does stumble, because the light is not in him.”
11 ११ येशू या गोष्टी बोलल्यावर, तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्यास झोपेतून उठवावयास जातो.”
Having said these things He says to them, “Our friend Lazarus has fallen asleep, but I am going in order to awaken him.”
12 १२ म्हणून त्याचे शिष्य त्यास म्हणाले, “प्रभूजी, त्यास झोप लागली असेल तर तो बरा होईल.”
His disciples said to Him, “Lord, if he is sleeping he will get well.”
13 १३ आता येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता. झोपेतून मिळण्याऱ्या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले.
But Jesus had spoken of his death, while they thought He was talking about natural sleep.
14 १४ मग येशूने उघडपणे सांगितले, “लाजर मरण पावला आहे.
So then Jesus said to them plainly: “Lazarus died.
15 १५ आणि मी तिथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही विश्वास ठेवावा. तरी आपण त्याच्याकडे जाऊ या.”
And I am glad for your sakes that I was not there, so that you may believe. But let us go to him.”
16 १६ मग ज्याला दिदुम म्हणत तो थोमा आपल्या सोबतीच्या शिष्यांना म्हणाला, “आपणही याच्याबरोबर मरावयास जाऊ या.”
Then Thomas (called Twin) said to his fellow disciples, “Let's us go too, so that we may die with Him.”
17 १७ मग येशू आला तेव्हा त्यास कळले की, त्यास कबरेत ठेऊन चार दिवस झाले आहेत.
So when Jesus had come, He found that he had already been in the tomb four days.
18 १८ आता बेथानी नगर यरूशलेम शहरापासून सुमारे तीन किलोमीटर होते.
(Now Bethany was near Jerusalem, about two miles away,
19 १९ आणि यहूदी लोकांपैकी पुष्कळजण मार्था व मरीया यांच्याकडे त्यांच्या भावाबद्दल त्यांचे सांत्वन करण्यास आले होते.
and many of the Jews had joined the women around Martha and Mary, to comfort them concerning their brother.)
20 २० म्हणून येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्यास जाऊन भेटली, पण मरीया घरांतच बसून राहिली.
Then Martha, when she heard that Jesus was coming, went to meet Him; but Mary remained sitting at home.
21 २१ तेव्हा मार्था येशूला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मरण पावला नसता.
Then Martha said to Jesus: “Lord, if You had been here my brother would not have died.
22 २२ तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.”
But even now I know that whatever You ask of God, God will give You.”
23 २३ येशूने तिला म्हटले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”
Jesus says to her, “Your brother will rise again.”
24 २४ मार्था त्यास म्हणाली, “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.”
Martha says to Him, “I know that he will rise again in the resurrection at the last day.”
25 २५ येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला असला तरी जगेल.
Jesus said to her: “I am the resurrection and the life. The one who believes into me, though he may die, will live;
26 २६ आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, यावर तू विश्वास ठेवतेस काय?” (aiōn g165)
and everyone who both lives and believes into me will never ever die. Do you believe this?” (aiōn g165)
27 २७ ती त्यास म्हणाली, “होय, प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा विश्वास मी धरला आहे.”
She says to Him, “Yes, Lord, I have come to believe that You are the Messiah, the Son of God, the One coming into the world.”
28 २८ आणि एवढे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरीया हिला एकीकडे बोलवून म्हटले, “गुरूजी आले आहेत आणि ते तुला बोलावत आहे.”
Having said these things she went and called her sister Mary, saying privately, “The Teacher is here and is calling you!”
29 २९ मरियेने हे ऐकताच, ती लवकर उठून त्याच्याकडे गेली.
Upon hearing it she gets up quickly and goes to Him.
30 ३० आता, येशू अजून गावात आला नव्हता, पण मार्था त्यास जेथे भेटली त्याच ठिकाणी होता.
(Now Jesus had not yet entered the village, but was in the place where Martha met Him.
31 ३१ तेव्हा जे यहूदी मरियेबरोबर घरात होते व तिचे सांत्वन करीत होते, मरीया घाईघाईने उठून बाहेर जातांना पाहिल्यावर, ती कबरेकडे रडावयास जात आहे असे समजून ते तिच्यामागे गेले.
Then the Jews who were with her in the house, consoling her, when they saw Mary get up quickly and go out, they followed her saying, “She is going to the tomb to weep there.”)
32 ३२ मग येशू होता तेथे मरीया आल्यावर त्यास पाहून ती त्याच्या पाया पडली व त्यास म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मरण पावला नसता.”
Then, when Mary came where Jesus was, upon seeing Him she fell at His feet, saying to Him, “Lord, if You had been here my brother would not have died!”
33 ३३ जेव्हा, येशू तिला व तिच्याबरोबर आलेल्या यहूदी लोकांस रडतांना पाहून तो आत्म्यात कळवळला व अस्वस्थ झाला;
So when Jesus saw her crying, and the Jews who had come with her crying, He groaned in the spirit and was troubled.
34 ३४ आणि म्हणाला, “तुम्ही त्यास कोठे ठेवले आहे?” ते त्यास म्हणाले, “प्रभूजी, येऊन पाहा.”
And He said, “Where have you put him?” They say to Him, “Lord, come and see.”
35 ३५ येशू रडला.
Jesus wept.
36 ३६ यावरुन यहूदी लोक म्हणाले, “पाहा, याची त्याच्यावर कितीतरी प्रीती होती!”
So the Jews said, “See how he loved him!”
37 ३७ परंतु त्यांच्यांतील कित्येक म्हणाले, “ज्याने त्या आंधळ्याचे डोळे उघडले त्या या मनुष्यास, हा मरू नये असे सुद्धा करता आले नसते काय?”
But some of them said, “Couldn't this man, who opened the eyes of the blind, have also kept this one from dying?”
38 ३८ येशू पुन्हा अंतःकरणात खवळून कबरेकडे आला. ती एक गुहा होती व तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती.
Then, groaning within Himself again, Jesus arrived at the tomb. It was a cave, and a stone was lying against it.
39 ३९ येशूने म्हटले, “धोंड काढा.” मृताची बहीण मार्था त्यास म्हणाली, “प्रभूजी, आता त्यास दुर्गंधी येत असेल; कारण त्यास मरून चार दिवस झाले आहेत.”
Jesus says, “Remove the stone!” Martha, the sister of the deceased, says to Him, “Lord, he already stinks; it's been four days!”
40 ४० येशूने तिला म्हटले, “तू विश्वास ठेवशील तर तू देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
Jesus says to her, “Did I not say to you that if you believe you will see the glory of God?”
41 ४१ तेव्हा त्यांनी धोंड काढली; आणि येशूने डोळे वर करून म्हणाला, “हे पित्या, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो.
Then they took away the stone from where the deceased was lying. Jesus raised His eyes and said: “Father, I thank You that You heard me.
42 ४२ मला माहीत आहे की, तू माझे नेहमी ऐकतोस, तरी जे लोक सभोवती उभे आहेत त्यांच्याकरिता मी बोललो, यासाठी की, तू मला पाठवले आहे असा त्यांनी विश्वास धरावा.”
I know that You always hear me, but I spoke for the sake of the crowd standing around, so that they may believe that You sent me.”
43 ४३ असे म्हटल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, “लाजरा, बाहेर ये.”
Upon saying these things He shouted with a loud voice, “Lazarus, come out!”
44 ४४ तेव्हा जो मरण पावलेला होता तो बाहेर आला; त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने गुंडाळलेले होते. येशूने त्यांना म्हटले, “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.”
And out the deceased came! Bound hand and foot with bandages, and his face wrapped in a cloth. Jesus says to them, “Loose him and let him go.”
45 ४५ तेव्हा मरियेकडे आलेल्या यहूदी लोकांनी त्याने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यातल्या पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला;
So many of the Jews who had come to Mary, and had seen what Jesus did, believed into Him.
46 ४६ पण कित्येकांनी परूश्यांकडे जाऊन येशूने केले ते त्यांना सांगितले.
But some of them went off to the Pharisees and told them what Jesus had done.
47 ४७ मग मुख्य याजकांनी व परूश्यांनी सभा भरवून म्हटले, “आपण काय करीत आहो? कारण तो मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे.
Then the chief priests and the Pharisees convened a council and said: “What can we do? Because this man performs many miraculous signs;
48 ४८ आपण त्यास असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील; आणि रोमी लोक येऊन आपले स्थान आणि राष्ट्रही हिरावून घेतील.”
if we let him go on like this everybody will believe into him; and the Romans will come and take away both our place and our nation!”
49 ४९ तेव्हा त्यांच्यापैकी कयफा नावाचा कोणीएक मनुष्य जो त्या वर्षी महायाजक होता, तो त्यांना म्हणाला, “तुम्हास काहीच कळत नाही.
But one of them, Caiaphas, being high priest that year, said to them: “You know nothing at all!
50 ५० प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सर्व राष्ट्राचा नाश होऊ नये तुम्हास फायदेशीर आहे, हेही तुम्ही लक्षात आणत नाही.”
Nor do you consider that it is advantageous for us that one man should die on behalf of the people, rather than the whole nation perish!”
51 ५१ आणि हे तर तो आपल्या मनाचे बोलला नाही; तर त्या वर्षी तो मुख्य याजक असल्यामुळे त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्रासाठी मरणार आहे.
(Now he did not say this on his own, but being high priest that year he prophesied that Jesus was about to die on behalf of the nation;
52 ५२ आणि केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही, तर यासाठी की त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांसही एकत्र जमवून एक करावे.
and not only on behalf of the nation, but also to gather into one all the scattered children of God.)
53 ५३ यावरुन त्या दिवसापासून, त्यांनी त्यास जीवे मारण्याचा आपसात निश्चय केला.
So from that day on they really plotted to kill Him.
54 ५४ म्हणून त्यानंतर येशू यहूदी लोकात उघडपणे फिरला नाही; तर तेथून रानाजवळच्या प्रांतांतील एफ्राईम नावाच्या नगरास गेला व तेथे आपल्या शिष्यांबरोबर राहिला.
Therefore Jesus no longer moved about openly among the Jews, but went away from there into the country near the wilderness, to a town called Ephraim; and He stayed there with His disciples.
55 ५५ तेव्हा यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता; आणि पुष्कळ लोक वल्हांडणाच्या अगोदर, आपणास शुद्ध करून घ्यावयास बाहेर गावाहून वर यरूशलेम शहरास गेले.
Now the Jewish Passover was near, and many from the country went up to Jerusalem before the Passover in order to purify themselves.
56 ५६ आणि ते येशूला शोधित होते व ते परमेश्वराच्या भवनात उभे राहून त्यांनी एकमेकांना म्हणत होते, “तुम्हास काय वाटते? सणास तो मुळीच येणार नाही का?”
So they were looking for Jesus, and as they stood in the temple they were saying to each other, “What do you think—that he won't come to the feast at all?”
57 ५७ आता मुख्य याजकांनी व परूश्यांनी तर त्यास धरण्याच्या हेतूने अशी आज्ञा केली होती की, तो कोठे आहे असे जर कोणाला समजले तर त्याने कळवावे.
Now the chief priests and the Pharisees had together issued an edict that if anyone knew where He was he should report it, so they could arrest Him.

< योहान 11 >