< योहान 10 >
1 १ “मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो मेंढवाड्यांत दरवाजातून न जातां दुसरीकडून चढून जातो, तो चोर आणि लुटारू आहे.
„Bizony, bizony mondom néktek: Aki nem az ajtón megy be a juhok aklába, hanem máshonnan hatol be, tolvaj az és rabló.
2 २ जो दरवाजाने आत जातो तो मेंढपाळ आहे.
Aki pedig az ajtón megy be, az a juhok pásztora.
3 ३ त्याच्यासाठी द्वारपाल दरवाजा उघडतो आणि मेंढरे त्याची वाणी ऐकतात. तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो;
Ennek az őr ajtót nyit, és a juhok hallgatnak szavára, és a maga juhait nevükön szólítja, és kivezeti őket.
4 ४ आणि आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्यापुढे चालतो आणि मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याचा वाणी ओळखतात.
És mikor kiereszti a juhait, előttük megy, és a juhok követik őt, mert ismerik az ő hangját.
5 ५ ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील; कारण ती परक्यांची वाणी ओळखीत नाहीत.”
Idegent pedig nem követnek, hanem elfutnak attól: mert nem ismerik az idegenek hangját.“
6 ६ येशूने त्यांना हा दाखला सांगितला. तरी ज्या गोष्टी तो त्यांच्याबरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही.
Ezt a példázatot mondta nekik Jézus, de ők nem értették, mi az, amit mondott nekik.
7 ७ म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मी मेंढरांचे द्वार आहे.
Újra mondta azért nekik Jézus: „Bizony, bizony mondom néktek, hogy én vagyok a juhoknak ajtaja.
8 ८ जे माझ्या पूर्वी आले ते सर्व चोर आणि लुटारू आहेत, त्याचे मेंढरांनी ऐकले नाही.
Mindazok, akik előttem jöttek, tolvajok és rablók: de nem hallgattak rájuk a juhok.
9 ९ मी द्वार आहे; माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याचे तारण होईल; तो आत येईल आणि बाहेर जाईल आणि त्यास खावयास मिळेल.
Én vagyok az ajtó: ha valaki énrajtam megy be, megtartatik, bejár és kijár majd, és legelőt talál.
10 १० चोर तर, तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.
A tolvaj nem egyébért jön, hanem hogy lopjon, öljön és pusztítson, én azért jöttem, hogy életük legyen, és bővölködjenek.
11 ११ मी उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला जीव देतो.
Én vagyok a jó pásztor: a jó pásztor életét adja a juhokért.
12 १२ जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे आणि ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत, तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो; आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून धरतो त्यांची दाणादाण करतो.
A béres pedig nem igazi pásztor, neki a juhok nem tulajdonai. Amikor látja a farkast jönni, elhagyja a juhokat, és elfut: a farkas elragadja azokat, és elszéleszti a juhokat.
13 १३ मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्यास मेंढरांची काळजी नाही.
A béres pedig azért fut el, mert béres, és nincs gondja a juhokra.
14 १४ मी उत्तम मेंढपाळ आहे; आणि, जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात;
Én vagyok a jó pásztor, ismerem az enyéimet, és engem is ismernek az enyéim.
15 १५ आणि मी मेंढरांसाठी आपला जीव देतो.
Ahogyan ismer engem az Atya, én is ismerem az Atyát, és életemet adom a juhokért.
16 १६ या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत; तीही मला आणली पाहिजेत आणि ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.
Más juhaim is vannak nekem, amelyek nem ebből az akolból valók: azokat is elő kell vezetnem, hallgatnak majd az én szavamra, és lesz egy akol és egy pásztor.
17 १७ मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो.
Azért szeret engem az Atya, mert én leteszem az én életemet, hogy újra felvegyem azt.
18 १८ कोणी तो माझ्यापासून घेत नाही. तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे आणि मला तो परत घेण्याचा अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून मिळाली आहे.”
Senki sem veszi azt el éntőlem, hanem én adom oda azt magamtól. Van hatalmam odaadni, és van hatalmam ismét visszavenni azt. Ezt a parancsolatot kaptam az én Atyámtól.“
19 १९ म्हणून या शब्दांवरून यहूदी लोकात पुन्हा फूट पडली.
Újra meghasonlás támadt a zsidók között e beszédek miatt.
20 २० त्यांच्यातील पुष्कळजण म्हणाले, “त्याला भूत लागले आहे आणि तो वेडा आहे. तुम्ही त्याचे का ऐकता?”
Sokan mondták közülük: „Ördög van benne, és bolondozik, mit hallgattok reá?“
21 २१ दुसरे म्हणाले, “ही वचने भूत लागलेल्या मनुष्याची नाहीत. भूताला आंधळ्याचे डोळे उघडता येतात काय?”
Mások azt mondták: „Ezek nem megszállott ember beszédei. Vajon az ördög megnyithatja-e a vakok szemeit?“
22 २२ तेव्हा यरूशलेम शहरात पुनःस्थापनेचा सण असून हिवाळा होता.
Jeruzsálemben pedig a templomszentelés ünnepe és tél volt.
23 २३ आणि येशू परमेश्वराच्या भवनात शलमोनाच्या देवडीत फिरत होता.
Jézus a templomban, Salamon tornácában járt.
24 २४ म्हणून यहूदी लोक त्याच्याभोवती जमले आणि त्यास म्हणाले, “आपण कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असाल तर आम्हास उघडपणे सांगा.”
Körülvették azért a zsidók, és mondták neki: „Meddig tartasz még bizonytalanságban bennünket? Ha te vagy a Krisztus, mondd meg nékünk nyíltan!“
25 २५ येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हास सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. मी माझ्या पित्याच्या नावाने जी कामे करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात.
Jézus így felelt: „Megmondtam néktek, és nem hiszitek: a cselekedetek, amelyeket én cselekszem az én Atyám nevében, azok tesznek bizonyságot rólam.
26 २६ तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही.
De ti nem hisztek, mert ti nem az én juhaim közül vagytok, amint megmondtam néktek.
27 २७ माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
Az én juhaim hallják az én szavamat, én ismerem őket, és követnek engem.
28 २८ मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही. (aiōn , aiōnios )
Örök életet adok nekik, soha el nem vesznek, és senki ki nem ragadja őket az én kezemből. (aiōn , aiōnios )
29 २९ पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही.
Az én Atyám, aki őket adta nekem, nagyobb mindennél, senki sem ragadhatja ki őket az Atyámnak kezéből.
30 ३० मी आणि पिता एक आहोत.”
Én és az Atya egy vagyunk.“
31 ३१ तेव्हा यहूदी लोकांनी त्यास दगडमार करायला पुन्हा दगड उचलले.
Ekkor ismét köveket ragadtak a zsidók, hogy megkövezzék őt.
32 ३२ येशू त्यांना म्हणाला, “मी माझ्या स्वर्गीय पित्याकडची पुष्कळ चांगली कामे तुम्हास दाखवली आहेत. त्या कामांतील कोणत्या कामाकरता तुम्ही मला दगडमार करता?”
Jézus így felelt nekik: „Sok jó dolgot mutattam nektek az én Atyámtól, azok közül melyikért köveztek meg engem?“
33 ३३ यहूदी लोकांनी त्यास उत्तर दिले, “आम्ही चांगल्या कामासाठी तुला दगडमार करीत नाही, पण दुर्भाषणासाठी करतो; कारण तू मनुष्य असून स्वतःला देव म्हणवतोस.”
A zsidók így feleltek neki: „Jó dologért nem kövezünk meg téged, hanem káromlásért, tudniillik, hogy te ember létedre Istenné teszed magadat.“
34 ३४ येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही देव आहा, असे मी म्हणालो हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय?
Jézus így felelt nekik: „Nincs-e megírva a ti törvényetekben: »én mondtam: istenek vagytok«?
35 ३५ ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हणले आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही,
Ha azokat isteneknek mondta, akikhez az Isten beszéde szólt, márpedig az Írást nem lehet érvénytelenné tenni,
36 ३६ तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले, त्या मला, मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तुम्ही ‘दुर्भाषण करता’ असे तुम्ही मला म्हणता काय?
akkor arról ti azt mondjátok, akit az Atya megszentelt és elküldött e világra: Káromlást szólsz, mivelhogy azt mondtam: az Isten Fia vagyok?!
37 ३७ मी जर माझ्या पित्याची कामे करीत नसेन तर माझ्यावर विश्वास ठेवू नका.
Ha az én Atyám dolgait nem cselekszem, ne higgyetek nekem,
38 ३८ पण जर मी ती करीतो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कामांवर विश्वास ठेवा. अशासाठी की, माझ्यामध्ये पिता आहे आणि पित्यामध्ये मी आहे. हे तुम्ही ओळखून घ्यावे.”
ha pedig azokat cselekszem, ha nekem nem hisztek is, higgyetek a cselekedeteknek: hogy megtudjátok és elhiggyétek, hogy az Atya énbennem van, és én őbenne vagyok.“
39 ३९ ते त्यास पुन्हा धरावयास पाहू लागले, परंतु तो त्यांच्या हाती न लागता निघून गेला.
Ismét meg akarták azért őt fogni, de kiment a kezük közül.
40 ४० मग तो पुन्हा यार्देनेच्या पलीकडे जेथे योहान पहिल्याने बाप्तिस्मा करीत असे त्याठिकाणी जाऊन राहिला.
Jézus újra elment, túl a Jordánon, arra a helyre, ahol János először keresztelt, és ott maradt.
41 ४१ तेव्हा पुष्कळ लोक आले; ते म्हणाले, “योहानाने काही चिन्ह केले नाही हे खरे आहे, तरी योहानाने याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे.”
És sokan mentek oda hozzá, és mondták, hogy János nem tett ugyan semmi csodát, de mindaz, amit János felőle mondott, igaz volt.
42 ४२ तेथे पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
És sokan hittek ott ő benne.