< योहान 10 >

1 “मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो मेंढवाड्यांत दरवाजातून न जातां दुसरीकडून चढून जातो, तो चोर आणि लुटारू आहे.
”אני אומר לכם באמת, “המשיך ישוע,”מי שמסרב להיכנס למכלאת הצאן דרך השער, ובוחר להיכנס בדרך הצדדית, הוא גנב או שודד.
2 जो दरवाजाने आत जातो तो मेंढपाळ आहे.
האדם שנכנס דרך השער הוא רועה הצאן.
3 त्याच्यासाठी द्वारपाल दरवाजा उघडतो आणि मेंढरे त्याची वाणी ऐकतात. तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो;
השומר יפתח לו את השער, עדר הצאן ישמע ויכיר את קולו, והרועה יוביל את הצאן החוצה כשהוא נוקב בשם כל כבשה.
4 आणि आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्यापुढे चालतो आणि मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याचा वाणी ओळखतात.
הרועה הולך בראש והעדר נוהר אחריו, כי הוא מזהה את הרועה ומכיר את קולו.
5 ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील; कारण ती परक्यांची वाणी ओळखीत नाहीत.”
הצאן לא תלכנה אחרי אדם זר, אלא תברחנה מפניו, כי קולו אינו מוכר להן.“
6 येशूने त्यांना हा दाखला सांगितला. तरी ज्या गोष्टी तो त्यांच्याबरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही.
אלה ששמעו משל זה מפי ישוע לא הבינו למה התכוון,
7 म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मी मेंढरांचे द्वार आहे.
ולכן ישוע הסביר להם:”אמן אני אומר לכם: אני השער של מכלאת הצאן.
8 जे माझ्या पूर्वी आले ते सर्व चोर आणि लुटारू आहेत, त्याचे मेंढरांनी ऐकले नाही.
כל אלה שבאו לפני היו גנבים ושודדים, אולם הצאן לא שמעו בקולם.
9 मी द्वार आहे; माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याचे तारण होईल; तो आत येईल आणि बाहेर जाईल आणि त्यास खावयास मिळेल.
כן, אנוכי השער. הנכנסים דרכי יוושעו וימצאו מרעה עשיר בבואם ובצאתם.
10 १० चोर तर, तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे.
הגנב בא לגנוב, להרוג ולהשמיד, ואילו אני באתי להעניק חיים בשפע.
11 ११ मी उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला जीव देतो.
”אני הרועה הטוב, ורועה טוב מקריב את חייו למען צאנו.
12 १२ जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे आणि ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत, तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो; आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून धरतो त्यांची दाणादाण करतो.
כאשר רועה שכיר יראה זאב מתקרב, הוא יברח ויעזוב את הצאן לאנחות, כי העדר אינו שייך לו, והזאב יחטוף ויפזר את הצאן.
13 १३ मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्यास मेंढरांची काळजी नाही.
הרועה השכיר יברח, משום שאינו אלא שכיר ואין הוא דואג לצאן באמת.
14 १४ मी उत्तम मेंढपाळ आहे; आणि, जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात;
”אני הרועה הטוב; אני מכיר את צאני והן מכירות אותי,
15 १५ आणि मी मेंढरांसाठी आपला जीव देतो.
כשם שאבי מכיר אותי ואני מכיר את אבי; ואני מקריב את חיי למען הצאן.
16 १६ या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत; तीही मला आणली पाहिजेत आणि ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.
יש לי עדר נוסף שאינו מהמכלאה הזאת. עלי להנהיג גם אותו, והצאן שומעות בקולי; כך יהיה עדר אחד ורועה אחד.
17 १७ मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो.
”אבי אוהב אותי משום שאני מקריב את חיי כדי שאקבל אותם חזרה.
18 १८ कोणी तो माझ्यापासून घेत नाही. तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे आणि मला तो परत घेण्याचा अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून मिळाली आहे.”
איש אינו יכול להרוג אותי ללא הסכמתי. אני מקריב את חיי מרצוני, מפני שיש לי זכות וכוח להקריב את חיי כשאני רוצה בכך, ואף זכות וכוח להשיבם לעצמי. אלוהים הוא המעניק לי זכות זאת.“
19 १९ म्हणून या शब्दांवरून यहूदी लोकात पुन्हा फूट पडली.
דבריו אלה שוב גרמו למחלוקת בין מנהיגי היהודים.
20 २० त्यांच्यातील पुष्कळजण म्हणाले, “त्याला भूत लागले आहे आणि तो वेडा आहे. तुम्ही त्याचे का ऐकता?”
חלקם אמר:”או שהוא יצא מדעתו, או שנכנס בו שד! מדוע אתם מקשיבים לו?“
21 २१ दुसरे म्हणाले, “ही वचने भूत लागलेल्या मनुष्याची नाहीत. भूताला आंधळ्याचे डोळे उघडता येतात काय?”
אחרים אמרו:”הוא אינו נשמע כמי שנכנס בו שד. האם שד יכול לפקוח עיני עיוורים?“
22 २२ तेव्हा यरूशलेम शहरात पुनःस्थापनेचा सण असून हिवाळा होता.
בחג החנוכה, בחורף,
23 २३ आणि येशू परमेश्वराच्या भवनात शलमोनाच्या देवडीत फिरत होता.
התהלך ישוע בבית־המקדש באגף הנקרא”אולם שלמה“.
24 २४ म्हणून यहूदी लोक त्याच्याभोवती जमले आणि त्यास म्हणाले, “आपण कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असाल तर आम्हास उघडपणे सांगा.”
היהודים הקיפוהו מכל עבר ושאלו:”עד מתי בכוונתך לסקרן אותנו? אם אתה הוא המשיח, מדוע אינך אומר זאת בפירוש?“
25 २५ येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हास सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. मी माझ्या पित्याच्या नावाने जी कामे करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात.
”כבר אמרתי לכם, אבל לא האמנתם לי“, השיב ישוע.”המעשים שאני עושה בשם אבי מאשרים זאת.
26 २६ तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही.
אולם אינכם מאמינים לי, כי אינכם שייכים לצאני.
27 २७ माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
אני מכיר את צאני, צאני מכירות את קולי והן הולכות אחרי.
28 २८ मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही. (aiōn g165, aiōnios g166)
אני מעניק להן חיי נצח והן לא תאבדנה. איש לא יחטוף אותן ממני, (aiōn g165, aiōnios g166)
29 २९ पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही.
כי אבי נתן לי אותן, והוא חזק וגיבור מכולם. משום כך לא יוכל איש לחטוף אותן ממני.
30 ३० मी आणि पिता एक आहोत.”
אבי ואני אחד אנחנו!“
31 ३१ तेव्हा यहूदी लोकांनी त्यास दगडमार करायला पुन्हा दगड उचलले.
שוב החלו מנהיגי היהודים להשליך עליו אבנים.
32 ३२ येशू त्यांना म्हणाला, “मी माझ्या स्वर्गीय पित्याकडची पुष्कळ चांगली कामे तुम्हास दाखवली आहेत. त्या कामांतील कोणत्या कामाकरता तुम्ही मला दगडमार करता?”
”הראיתי לכם הרבה מעשים טובים בשם אבי, איזה מהם גרם לכך שתשליכו עלי אבנים?“שאל ישוע.
33 ३३ यहूदी लोकांनी त्यास उत्तर दिले, “आम्ही चांगल्या कामासाठी तुला दगडमार करीत नाही, पण दुर्भाषणासाठी करतो; कारण तू मनुष्य असून स्वतःला देव म्हणवतोस.”
”איננו משליכים עליך אבנים בגלל המעשים הטובים שעשית, אלא בגלל שאתה מגדף את האלוהים; למרות שאתה אדם, אתה עושה את עצמך לאלוהים!“
34 ३४ येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही देव आहा, असे मी म्हणालो हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय?
”אך הכתובים שלכם אומרים:’אלוהים אתם‘, והכוונה היא לבני־האדם“, השיב ישוע.
35 ३५ ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हणले आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही,
”אם האנשים שאליהם מדברים הכתובים מכונים’אלוהים‘, והכתוב הוא דבר אמת,
36 ३६ तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले, त्या मला, मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तुम्ही ‘दुर्भाषण करता’ असे तुम्ही मला म्हणता काय?
מדוע קוראים אתם’מגדף‘למי שקדשו האב ונשלח לעולם הזה על־ידו, ושטוען כי הוא בן האלוהים?
37 ३७ मी जर माझ्या पित्याची कामे करीत नसेन तर माझ्यावर विश्वास ठेवू नका.
אם איני עושה מעשים כפי שעושה אבי, אל תאמינו לי.
38 ३८ पण जर मी ती करीतो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कामांवर विश्वास ठेवा. अशासाठी की, माझ्यामध्ये पिता आहे आणि पित्यामध्ये मी आहे. हे तुम्ही ओळखून घ्यावे.”
אולם אם אני אכן עושה את מעשי אבי, האמינו לפחות למעשים גם אם אינכם מאמינים לי, ואז תשוכנעו שאבי שוכן בי ואני בו.“
39 ३९ ते त्यास पुन्हा धरावयास पाहू लागले, परंतु तो त्यांच्या हाती न लागता निघून गेला.
הם שוב רצו לתפוס את ישוע, אולם הוא התחמק מידיהם.
40 ४० मग तो पुन्हा यार्देनेच्या पलीकडे जेथे योहान पहिल्याने बाप्तिस्मा करीत असे त्याठिकाणी जाऊन राहिला.
ישוע חזר לעבר הירדן, למקום שבו הטביל יוחנן לראשונה. הוא נשאר שם זמן־מה,
41 ४१ तेव्हा पुष्कळ लोक आले; ते म्हणाले, “योहानाने काही चिन्ह केले नाही हे खरे आहे, तरी योहानाने याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे.”
ואנשים רבים הלכו אחריו.”יוחנן לא חולל נסים, “אמרו זה לזה,”אולם כל מה שאמר על האיש הזה היה אמת.“
42 ४२ तेथे पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
אנשים רבים במקום ההוא האמינו כי ישוע באמת המשיח.

< योहान 10 >