< योएल 3 >
1 १ पाहा, त्यादिवसामध्ये आणि त्यावेळी, जेव्हा मी यहूदाचे व यरूशलेमेचे बंदीवान परत आणीन,
見よ、わたしがユダとエルサレムとの幸福をもとに返すその日、その時、
2 २ मी, सर्व राष्ट्रांना गोळा करून, खाली यहोशाफाटाच्या दरीत आणीन. कारण माझ्या लोकांकरता आणि माझे वतन इस्राएल ज्यांना त्यांनी इतर राष्ट्रात पांगविले. आणि त्या राष्ट्रांनी माझा देश वाटून घेतला. तेथे मी त्यांचा न्यायनिवाडा करीन.
わたしは万国の民を集めて、これをヨシャパテの谷に携えくだり、その所でわが民、わが嗣業であるイスラエルのために彼らをさばく。彼らがわが民を諸国民のうちに散らして、わたしの地を分かち取ったからである。
3 ३ त्यांनी माझ्या लोकांकरता चिठ्ठ्या टाकल्या. त्यांनी मुलगा देऊन वेश्या घेतली आणि मद्यासाठी म्हणून मुलगी विकली.
彼らはわが民をくじ引きにし、遊女のために少年をわたし、酒のために少女を売って飲んだ。
4 ४ सोर, सीदोन व पलिष्टीच्या सर्व प्रांतानो, आता तुम्ही माझ्यावर का रागावता? तुम्ही माझी परत फेड कराल का? जरी तुम्ही माझी परत फेड केली तरी, मी त्वरेने तुमचा सूड तुमच्याच मस्तकावर फिरवीन.
ツロとシドンよ、ペリシテのすべての地方よ、おまえたちは、わたしとなんのかかわりがあるか。おまえたちはわたしに報復をしようとするのか。もしおまえたちがわたしに報復しようとするなら、わたしは時をうつさず、すみやかに、おまえたちのおこないの報復をおまえたちの頭上にこさせる。
5 ५ तुम्ही माझे चांदी आणि सोने घेतले आहे, आणि तुम्ही माझा अमूल्य खजिना आपल्या मंदिरात नेला आहे.
これはおまえたちがわたしの銀と金とをとり、わたしの貴重な宝をおまえたちの宮に携え行き、
6 ६ तुम्ही यहूदाच्या व यरूशलेमेच्या लोकांस त्यांच्या देशातून सीमेपासून दूर न्यावे म्हणून यावान लोकांस विकले.
またユダの人々とエルサレムの人々とをギリシヤびとに売って、その本国から遠く離れさせたからである。
7 ७ पाहा, तुम्ही त्यांना ज्या जागी विकले त्यातून मी त्यांना सोडून आणीन, आणि तुमच्या मस्तकावर त्याचे प्रतिफळ फिरवीन.
見よ、わたしはおまえたちが売ったその所から彼らを起して、おまえたちのおこないの報復をおまえたちの頭上にこさせる。
8 ८ मी तुमच्या मुलांना आणि मुलींना यहूदी लोकांच्या हाती विकीन. मग ते त्यांना शबाच्या लोकांस दूरच्या राष्ट्रांस विकतील. कारण परमेश्वर हे बोलला आहे.
わたしはおまえたちのむすこ娘たちをユダの人々の手に売る。彼らはこれを遠い国びとであるシバびとに売ると、主は言われる」。
9 ९ राष्ट्रांमध्ये ही घोषणा कराः युध्दाला सज्ज व्हा, बलवान मनुष्यांना उठवा, त्यांना जवळ येऊ द्या, सर्व लढवय्ये मनुष्ये पुढे येवोत.
もろもろの国民の中に宣べ伝えよ。戦いの備えをなし、勇士をふるい立たせ、兵士をことごとく近づかせ、のぼらせよ。
10 १० तुमचे फाळ मोडून त्यांच्या तलवारी करा. आणि कोयत्यांपासून भाले करा. दुर्बल म्हणो की, मी बलवान आहे.
あなたがたのすきを、つるぎに、あなたがたのかまを、やりに打ちかえよ。弱い者に「わたしは勇士である」と言わせよ。
11 ११ तुमच्या जवळच्या सर्व राष्ट्रांनो, त्वरा करा व या! तुम्ही स्वतः एकत्र या. हे परमेश्वरा, तुझे बलवान योध्दे उतरून येतील असे कर.
周囲のすべての国民よ、急ぎ来て、集まれ。主よ、あなたの勇士をかしこにお下しください。
12 १२ राष्ट्रे स्वतःउठून जागी होवोत, आणि यहोशाफाटाच्या दरीत येवोत. तेथे मी सभोवतालच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करायला बसेन.
もろもろの国民をふるい立たせ、ヨシャパテの谷にのぼらせよ。わたしはそこに座して、周囲のすべての国民をさばく。
13 १३ विळा आणा, कारण पीक तयार झाले आहे. म्हणून तुम्ही विळा घाला, या, द्राक्षे तुडवा, कारण त्यांचे द्राक्षकुंड भरून गेले आहे. पिंप भरून वाहत आहेत. कारण त्यांची दुष्टाई मोठी आहे.
かまを入れよ、作物は熟した。来て踏め、酒ぶねは満ち、石がめはあふれている。彼らの悪が大きいからだ。
14 १४ तेथे गलबला आहे, न्यायाच्या दरीत गलबला आहे. कारण न्यायाच्या दरीत परमेश्वराचा दिवस जवळ आला आहे.
群衆また群衆は、さばきの谷におる。主の日がさばきの谷に近いからである。
15 १५ चंद्र आणि सूर्य काळवंडतील, तारे त्यांचा प्रकाश देण्याचे थांबतील.
日も月も暗くなり、星もその光を失う。
16 १६ परमेश्वर देव सियोनेतून गर्जना करील, आणि आपला आवाज यरूशलेमेतून उंचावील. आकाश व पृथ्वी कापतील पण परमेश्वर आपल्या लोकांस सुरक्षित स्थान, आणि इस्राएलाच्या लोकांस तो दुर्ग होईल.
主はシオンから大声で叫び、エルサレムから声を出される。天も地もふるい動く。しかし主はその民の避け所、イスラエルの人々のとりでである。
17 १७ मग तुम्हास कळेल की मीच तुमचा देव परमेश्वर आहे. माझ्या पवित्र पर्वतावर, म्हणजे सियोनात मी राहतो. तेव्हा यरूशलेम पवित्र होईल. आणि त्या नगरीतून पुन्हा कधीही परके येणार जाणार नाहीत.
「そこであなたがたは知るであろう、わたしはあなたがたの神、主であって、わが聖なる山シオンに住むことを。エルサレムは聖所となり、他国人は重ねてその中を通ることがない。
18 १८ त्यादिवशी, असे होईल की, पर्वतावरून गोड द्राक्षरस पाझरेल, टेकड्यांवरून दूध वाहील, यहूदाच्या सर्व कोरडे पडलेल्या ओढ्यामधून पाणी वाहील, आणि परमेश्वराच्या मंदिरातून कारंजे उडतील आणि शिट्टीमाच्या दरीला पाणी पुरवतील.
その日もろもろの山にうまい酒がしたたり、もろもろの丘は乳を流し、ユダのすべての川は水を流す。泉は主の家から出て、シッテムの谷を潤す。
19 १९ मिसराची नासाडी होऊन तो उजाड होईल, कारण त्यांनी यहूदी लोकांवर जुलूम केला अदोम ओसाड रान होईल, कारण त्यांनी त्यांच्या देशातील निष्पाप लोकांचे रक्त पाडले.
エジプトは荒れ地となり、エドムは荒野となる。彼らはその国でユダの人々をしえたげ、罪なき者の血を流したからである。
20 २० परंतु, यहूदा सर्वकाळ वसेल, आणि यरूशलेम पिढ्यानपिढ्या राहील.
しかしユダは永遠に人の住む所となり、エルサレムは世々に保つ。
21 २१ मी त्यांच्या रक्ताचा सूड अजून घेतला नाही तो सूड मी घेईन. कारण परमेश्वर सियोनात वस्ती करतो.
わたしは彼らに血の報復をなし、とがある者をゆるさない。主はシオンに住まわれる」。