< योएल 1 >
1 १ पथूएलाचा मुलगा योएल, ह्याच्याकडे परमेश्वराचे वचन आले ते हे.
耶和华的话临到毗土珥的儿子约珥。
2 २ अहो वडिलांनो, हे ऐका, आणि देशात राहणाऱ्या तुम्ही सर्वांनी कान द्या. तुमच्या पूर्वजांच्या दिवसात किंवा तुमच्या दिवसात पूर्वी कधी असे हे घडले काय?
老年人哪,当听我的话; 国中的居民哪,都要侧耳而听。 在你们的日子, 或你们列祖的日子, 曾有这样的事吗?
3 ३ ह्याविषयी आपल्या मुलाबाळांना सांगा, आणि तुमच्या मुलांनी आपल्या मुलाबाळांना सांगावे, व त्यांच्या मुलांनी आपल्या पुढच्या पिढीस सांगावे.
你们要将这事传与子, 子传与孙, 孙传与后代。
4 ४ कुरतडणाऱ्या टोळापासून जे राहिले ते झुंडीने येणाऱ्या टोळांनी खाल्ले; झुंडीने येणाऱ्या टोळापासून जे राहिले ते चाटून खाणाऱ्या टोळांनी खाल्ले; आणि चाटून खाणाऱ्या टोळापासून, जे राहिले ते अधाशी टोळांनी खाल्ले.
剪虫剩下的,蝗虫来吃; 蝗虫剩下的,蝻子来吃; 蝻子剩下的,蚂蚱来吃。
5 ५ दारू पिणाऱ्यांनो, तुम्ही जागे व्हा व रडा! तुम्ही सर्व दारू पिणाऱ्यांनो, आक्रोश करा, कारण गोड दारू तुमच्यापासून काढून घेतली आहे.
酒醉的人哪,要清醒哭泣; 好酒的人哪,都要为甜酒哀号, 因为从你们的口中断绝了。
6 ६ कारण एक राष्ट्र माझ्या देशावर आले आहे, ते बळकट व अगणित आहेत. त्यांचे दात सिंहाचे आहेत, आणि त्यांना सिंहिणीचे दात आहेत.
有一队蝗虫又强盛又无数, 侵犯我的地; 它的牙齿如狮子的牙齿, 大牙如母狮的大牙。
7 ७ त्यांनी माझा द्राक्षमळा घाबरून सोडवण्याची जागा केली आहे आणि माझ्या अंजिराचे झाड सोलून उघडे केले आहे. त्यांने साल सोलून दूर फेकली आहे. फांद्या उघड्या करून पांढऱ्या केल्या आहेत.
它毁坏我的葡萄树, 剥了我无花果树的皮, 剥尽而丢弃,使枝条露白。
8 ८ जशी कुमारी गोणताट नेसून आपल्या तरुणपणाच्या पतीकरता शोक करते, तसा शोक करा.
我的民哪,你当哀号,像处女腰束麻布, 为幼年的丈夫哀号。
9 ९ परमेश्वराच्या मंदिरातून अन्नार्पणे व पेयार्पणे नाहीसे झाले आहेत. परमेश्वराची सेवा करणारे याजक शोक करत आहेत.
素祭和奠祭从耶和华的殿中断绝; 事奉耶和华的祭司都悲哀。
10 १० शेतांचा नाश झाला आहे. आणि भूमी रडते. कारण धान्याचा नाश झाला आहे, नवा द्राक्षरस सुकून गेला आहे आणि तेल नासले आहे.
田荒凉,地悲哀; 因为五谷毁坏, 新酒干竭,油也缺乏。
11 ११ तुम्ही शेतकऱ्यांनो, गहू व जवाबद्दल लज्जित व्हा, आणि द्राक्षमळेवाल्यांनो, गहू व जवसासाठी आक्रोश करा, कारण शेतातील पीक नष्ट झाले आहे.
农夫啊,你们要惭愧; 修理葡萄园的啊,你们要哀号; 因为大麦小麦与田间的庄稼都灭绝了。
12 १२ द्राक्षवेली शुष्क झाल्या आहेत, आणि अंजिराचे झाड सुकून गेले आहे, डाळिंबाचे झाड, खजुराचे झाड आणि सफरचंदाचे झाड अशी शेतातील सर्व झाडेसुद्धा शुष्क झाली आहेत. मानवजातीच्या वंशातून आनंद नष्ट झाला आहे.
葡萄树枯干; 无花果树衰残。 石榴树、棕树、苹果树, 连田野一切的树木也都枯干; 众人的喜乐尽都消灭。
13 १३ याजकांनो, गोणताट घाला आणि शोक करा! वेदीची सेवा करणाऱ्यांनो, आक्रोश करा. माझ्या परमेश्वराच्या सेवकांनो, या, तुम्ही पूर्ण रात्र गोणताट घालून राहा. कारण तुमच्या देवाच्या मंदिरात यापुढे अन्नार्पणे व पेयार्पणे अडकवून ठेवलेली आहेत.
祭司啊,你们当腰束麻布痛哭; 伺候祭坛的啊,你们要哀号; 事奉我 神的啊,你们要来披上麻布过夜, 因为素祭和奠祭从你们 神的殿中断绝了。
14 १४ पवित्र उपास नेमा, आणि पवित्र सभेसाठी लोकांस एकत्र बोलवा. तुमचा देव परमेश्वर याच्या मंदिरात वडिलांस व देशात राहणाऱ्या लोकांस एकत्र गोळा करा. आणि परमेश्वरास आरोळी मारा.
你们要分定禁食的日子, 宣告严肃会, 招聚长老和国中的一切居民 到耶和华—你们 神的殿, 向耶和华哀求。
15 १५ त्या भयानक दिवसाकरता हायहाय! कारण परमेश्वराचा दिवस जवळ आला आहे. सर्वसमर्थ देवापासून जसा नाश तसा तो येईल.
哀哉!耶和华的日子临近了。 这日来到,好像毁灭从全能者来到。
16 १६ आमच्या डोळ्यादेखत आमचे अन्न काढून घेतले, आणि देवाच्या मंदिरातील आनंद व उल्लास नष्ट झाले नाहीत काय?
粮食不是在我们眼前断绝了吗? 欢喜快乐不是从我们 神的殿中止息了吗?
17 १७ बियाणे त्यांच्या ढेकळाखाली कुजून गेले आहे, धान्याची कोठारे ओसाड झाली आहेत, कोठ्या खाली पाडल्या गेल्या आहेत, कारण धान्य सुकून गेले आहे.
谷种在土块下朽烂; 仓也荒凉,廪也破坏; 因为五谷枯干了。
18 १८ प्राणी कसे कण्हत आहेत! गुरांचे कळप घाबरले आहेत. त्यांना खाण्यास कुरणे नाहीत. मेंढ्यांचे कळपसुद्धा पीडले आहेत.
牲畜哀鸣; 牛群混乱,因为无草; 羊群也受了困苦。
19 १९ हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. कारण आग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत. आणि शेतातील सर्व झाडे ज्वालांनी भस्म केली आहेत.
耶和华啊,我向你求告, 因为火烧灭旷野的草场; 火焰烧尽田野的树木。
20 २० रानातील वनपशूंनासुध्दा तुझी उत्कंठा लागली आहे, कारण पाण्याचे ओहोळ कोरडे झाले आहेत आणि आग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत.
田野的走兽向你发喘; 因为溪水干涸, 火也烧灭旷野的草场。