< ईयोब 9 >
1 १ मग ईयोब उत्तर देऊन म्हणाला,
And Job answered, and said:
2 २ “तू जे काही म्हणत आहेस ते खरे असल्याची जाणीव मला आहे, परंतु देवापुढे मनुष्य कसा बरोबर ठरेल?
Indeed I know it is so, and that man cannot be justified compared with God.
3 ३ मनुष्य देवाशी वाद घालू शकत नाही. देव हजार प्रश्न विचारु शकतो आणि मनुष्यास त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर देता येत नाही.
If he will contend with him, he cannot answer him one for a thousand.
4 ४ देव खूप विद्वान आहे आणि त्याची शक्ती अमर्याद आहे. देवाचे मन कठीण करून कोण निभावेल?
He is wise in heart, and mighty in strength: who hath resisted him, and hath had peace?
5 ५ तो क्रोधित झाला की पर्वत हलवतो आणि लोकांस ते कळत देखील नाही.
Who hath removed mountains, and they whom he overthrew in his wrath, knew it not.
6 ६ तो पृथ्वीचा थरकाप करण्यासाठी भूकंप पाठवतो. आणि पृथ्वीचा पायाच हलवून टाकतो.
Who shaketh the earth out of her place, and the pillars thereof tremble.
7 ७ तोच तो देव आहे, जो सूर्याला उगवू नये म्हणून सांगतो आणि तो उगवत नाही, आणि ताऱ्यांनी चमकू नये म्हणून तो लपवून ठेवतो.
Who commandeth tile sun and it riseth not: and shutteth up the stars as it were under a seal:
8 ८ त्याने एकट्याने आकाश निर्माण केले. तो सागराच्या लाटांवर चालतो.
Who alone spreadeth out the heavens, and walketh upon the waves of the sea.
9 ९ देवाने सप्तर्षि, मृगश्रीष व कृत्तिका यांना निर्माण केले. दक्षिणेकडचे आकाश ओलांडणारे ग्रहही त्यानेच निर्माण केले.
Who maketh Arcturus, and Orion, and Hyades, and the inner parts of the south.
10 १० तोच देव आहे ज्याने आश्यर्यकारक अनाकलनीय गोष्टीही निर्मिल्या. खरोखरच देवाच्या अद्भुत कृत्यांची सीमा नाही.
Who doth things great and incomprehensible, and wonderful, of which there is no number.
11 ११ पाहा, देव जेव्हा माझ्या जवळून जातो तेव्हा मी त्यास बघू शकत नाही. तो जातो तरी त्याची महानता मला समजत नाही.
If he come to me, I shall not see him: if he depart I shall not understand.
12 १२ देवाने जरी काही घेतले तरी त्यास कोणीही अडवू शकत नाही. तू काय करीत आहेस? असे त्यास कोणी विचारु शकत नाही.
If he examine on a sudden, who shall answer him? or who can say: Why dost thou so?
13 १३ देव त्याचा क्रोध काबूत ठेवणार नाही. राहाबाचे मदतनीससुध्दा त्यास घाबरतात.
God, whose wrath no mall can resist, and under whom they stoop that bear up the world.
14 १४ म्हणून मी देवाशी वाद घालू शकत नाही. त्याच्याशी काय बोलावे ते मला सुचणार नाही.
What am I then, that I should answer him, and have words with him?
15 १५ मी निष्पाप आहे, पण मी त्यास उत्तर देऊ शकणार नाही. मी केवळ माझ्या देवाची कृपादृष्टी मिळावी म्हणून याचना करु शकतो.
I, who although I should have any just thing, would not answer, but would make supplication to my judge.
16 १६ मी हाक मारल्यानंतर त्याने उत्तर दिले असते. तरी त्याने माझे ऐकलेच अशी माझी खात्री झाली नसती.
And if he should hear me when I call, I should not believe that he had heard my voice.
17 १७ तो मला चिरडण्यासाठी वादळे पाठवील. आणि काहीही कारण नसता तो मला जखमा देईल.
For he shall crush me in a whirlwind, and multiply my wounds even without cause.
18 १८ तो मला माझा श्वास परत घेऊ देणार नाही. म्हणून तो मला अधिक कष्ट देईल.
He alloweth not my spirit to rest, and he filleth me with bitterness.
19 १९ कोण शक्तीमान आहे जर आपण बोलतो तर देव सर्वशक्तिमान आहे, आणि जर आपण न्याया विषयी बोलतो, तर त्यास न्यायालयात कोणी आणू शकेल काय?
If strength be demanded, he is most strong: if equity of judgment, no man dare bear witness for me.
20 २० मी धर्मी जरी असलो, माझेच मुख मला अपराधी बनवते. मी परिपूर्ण जरी असलो, तरी पण माझे बोलणेच माझी अपूर्णता प्रमाणीत करते.
If I would justify myself, my own mouth shall condemn me: if I would shew myself innocent, he shall prove me wicked.
21 २१ मी निष्पाप आहे, पण काय विचार करावा ते मला कळत नाही. मी माझ्याच आयुष्याचा धिक्कार करतो.
Although I should be simple, even this my soul shall be ignorant of, and I shall be weary of my life.
22 २२ मी स्वत: शीच म्हणतो: सगळ्याच्याच बाबतीत हे घडते. पापी लोकांसारखेच निष्पाप लोकही मरतात. देवच सगळ्यांचे जीवन संपवतो.
One thing there is that I have spoken, both the innocent and the wicked he consumeth.
23 २३ काहीतरी भयानक घडते आणि निष्पाप मनुष्य मरतो तेव्हा देव त्यास फक्त हसतो का?
If he scourge, let him kill at once, and not laugh at the pains of the innocent.
24 २४ जेव्हा एखादा वाईट मनुष्य सत्ता बळकावतो तेव्हा जे घडते आहे ते बघण्यापासून देव पुढाऱ्यांना दूर ठेवतो जर नाही, तर तो कोण आहे जो असे करतो?
The earth is given into the hand of the wicked, he covereth the face of the judges thereof: and if it be not he, who is it then?
25 २५ माझे दिवस एखाद्या धावपटू पेक्षाही वेगाने धावतात. माझे दिवस उडून जातात, त्यामध्ये कुठेही सुख दिसत नाही.
My days have been swifter than a post: they have fled away and have not seen good.
26 २६ लव्हाळाची बनवलेली बोट जशी वेगात जाते तसे माझे दिवस वेगात सरतात. गरुडाने आपल्या भक्ष्यावर झडप घालावी त्याप्रमाणे माझे दिवस अतिशय वेगात जातात.
They have passed by as ships carrying fruits, as an eagle flying to the prey.
27 २७ मी जरी म्हणालो, की माझे दु: ख विसरेन, मी चेहऱ्यावर हास्य आणेन, मी तक्रार करणार नाही. आणि आनंदी होईल.
If I say: I will not speak so: I change my face, and am tormented with sorrow.
28 २८ मला माझा दु: खाचे भय वाटायला हवे. कारण मला माहित आहे, निर्दोष गनणार नाहीस.
I feared all my works, knowing that thou didst not spare the offender.
29 २९ मी आधीच अपराधी ठरवला गेलो आहे. मग प्रयत्न तरी कशाला करायचे?
But if so also I am wicked, why have I laboured in vain?
30 ३० मी माझे अंग बर्फाने धुतले आणि हात साबणाने स्वच्छ केले.
If I be washed as it were with snow waters, and my hands shall shine ever so clean:
31 ३१ तरीही देव मला घाणीच्या खड्ड्यात ढकलेल. नंतर माझे स्वत: चे कपडे देखील माझा तिरस्कार करतील.
Yet thou shalt plunge me in filth, and my garments shall abhor me,
32 ३२ देव माझ्यासारखा मनुष्य नाही. म्हणूनच मी त्यास उत्तर देऊ शकत नाही. आम्ही न्यायालयात एकमेकांना भेटू शकणार नाही.
For I shall not answer a man that is like myself: nor one that may be heard with me equally in judgment.
33 ३३ आमच्यात कोणी असा न्यायाधीश नाही. जो आम्हा दोघांना सारख्याच न्यायाने तोलेल.
There is none that may be able to reprove both, and to put his hand between both.
34 ३४ देवाच्या शिक्षेची छडी माझ्यापासून दूर करणारा कोणी न्यायाधीश नाही त्याच्या धाकामुळे मला भयभीत होण्यापासून वाचवणारा कोणी नाही.
Let him take his rod away from me, and let not his fear terrify me.
35 ३५ असे जर झाले तर देवाला न घाबरता मला जे काही म्हणायचे आहे ते मी म्हणू शकेन. परंतु आता मात्र मी तसे करु शकत नाही.”
I will speak, and will not fear him: for I cannot answer while I am in fear.