< ईयोब 8 >
1 १ नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले आणि म्हणाला,
Então respondeu Bildad o suhita, e disse:
2 २ “तू किती वेळपर्यंत असा बोलत राहणार आहेस? तुझे शब्द सोसाट्याच्या वाऱ्यासारखे किती वेळेपर्यंत उडत राहतील.
Até quando fallarás taes coisas, e as razões da tua bocca serão como um vento impetuoso?
3 ३ देव नेहमीच न्यायी असतो का? सर्वशक्तिमान देव बरोबर असलेल्या धार्मिक गोष्टी कधीच बदलत नाही काय?
Porventura perverteria Deus o direito? e perverteria o Todo-poderoso a justiça?
4 ४ तुझ्या मुलांनी देवाविरुध्द काही पाप केले असेल म्हणून देवाने त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा केली.
Se teus filhos peccaram contra elle, tambem elle os lançou na mão da sua transgressão.
5 ५ परंतु आता तू त्याच्याकडे लक्ष दे आणि त्या सर्वशक्तिमान देवाची दयेसाठी आवर्जून प्रार्थना कर.
Mas, se tu de madrugada buscares a Deus, e ao Todo-poderoso pedires misericordia,
6 ६ तू जर चांगला आणि सरळ असलास तर तुला मदत करण्यासाठी तो त्वरीत येईल. तुझे कुटुंब तुला परत देईल.
Se fôres puro e recto, certamente logo despertará por ti, e restaurará a morada da tua justiça.
7 ७ जरी तुझी सुरुवात लहान असली, तरी तुझी अंतिम स्थिती अधिक मोठी असेल.
O teu principio, na verdade, terá sido pequeno, porém o teu ultimo estado crescerá em extremo.
8 ८ मी तुला विनंती करतो वडिलांच्या वेळेची माहिती विचार, त्यांनी जो शोध लावला तो तुझ्यासाठी लागू करून घे.
Porque, pergunta agora ás gerações passadas: e prepara-te para a inquirição de seus paes
9 ९ आपण अगदी कालच जन्माला आलो आहोत आणि काहीच माहित नाही, कारण छायेप्रमाणे आपले पृथ्वीतलावरचे दिवस आहेत.
Porque nós somos de hontem, e nada sabemos; porquanto nossos dias sobre a terra são como a sombra.
10 १० ते काय तुला शिकविणार आणि सांगणार नाहीत काय? काय ते त्याच्या अंतकरणातून बोलणार नाही का?
Porventura não te ensinarão elles, e não te fallarão, e do seu coração não tirarão razões?
11 ११ लव्हाळी चिखलाशिवाय उंच वाढू शकतात का? गवत (बोरु) पाण्याशीवाय उगवू शकेल का?
Porventura sobe o junco sem lodo? ou cresce a espadana sem agua?
12 १२ ते अजूनही हिरवे आहेत आणि कापले नाही, ते दुसऱ्या झाडापेक्षा लवकर सुकून जातात.
Estando ainda na sua verdura, ainda que a não cortem, todavia antes de qualquer outra herva se secca.
13 १३ म्हणून नास्तिक मनुष्याची आशा, जे सर्व देवाला विसरतात त्याचा मार्ग सुद्धा नष्ट होईल.
Assim são as veredas de todos quantos se esquecem de Deus: e a esperança do hypocrita perecerá.
14 १४ ज्याचा भरवसा नष्ट होतो. आणि ज्याचा विश्वास कोळ्याच्या जाळ्यासारखा तकलादु आहे.
Cuja esperança fica frustrada: e a sua confiança será como a teia d'aranha.
15 १५ तो आपल्या घरावर टेकला असता परंतू ते त्यास आधार देऊ शकणार नाही, त्याने ते पकडून धरले असता ते स्थिर राहायचे नाही.
Encostar-se-ha á sua casa, mas não se terá firme: apegar-se-ha a ella, mas não ficará em pé.
16 १६ तो सूर्यप्रकाश मिळालेल्या वनस्पतीसारखा हिरवागार आहे, तिच्या फांद्या सर्व बागेत पसरतात.
Está sumarento antes que venha o sol, e os seus renovos saem sobre o seu jardim;
17 १७ तिची मुळे खडकाभोवती आवळली जातात आणि खडकावरही उगवण्याचा प्रयत्न करतात.
As suas raizes se entrelaçam junto á fonte, para o pedregal attenta.
18 १८ परंतु जर हा व्यक्ती त्या जागेवरून हलवला गेला तर तो नष्ट होतो, मग ती जागा त्यास नाकारुन म्हणेल ‘मी तुला कधी पाहिले नाही.’
Absorvendo-o elle do seu logar, negal-o-ha este, dizendo: Nunca te vi?
19 १९ पाहा अशा रीतीने वागणाऱ्या वक्तीबद्दल हाच आनंद आहे की तिच्याच जागी धुळीतून दुसरे उगवतील.
Eis que este é alegria do seu caminho, e outros brotarão do pó.
20 २० पाहा, देव निरागस लोकांस सोडून देत नाही. तसेच तो वाईट मनुष्यांना मदतही करत नाही.
Eis que Deus não rejeitará ao recto; nem toma pela mão aos malfeitores:
21 २१ देव तुझे तोंड हास्याने भरुन टाकेल आणि तुझे ओठ आनंदाने ओरडतील!
Até que de riso te encha a bocca, e os teus labios de jubilação.
22 २२ जे तुझा द्वेष करतात ते लज्जेची वस्त्रे घालतील, दुष्ट मनुष्यांची राहूटी नष्ट होइल.”
Teus aborrecedores se vestirão de confusão, e a tenda dos impios não existirá mais.