< ईयोब 8 >

1 नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले आणि म्हणाला,
書亞人比勒達回答說:
2 “तू किती वेळपर्यंत असा बोलत राहणार आहेस? तुझे शब्द सोसाट्याच्या वाऱ्यासारखे किती वेळेपर्यंत उडत राहतील.
這些話你要說到幾時? 口中的言語如狂風要到幾時呢?
3 देव नेहमीच न्यायी असतो का? सर्वशक्तिमान देव बरोबर असलेल्या धार्मिक गोष्टी कधीच बदलत नाही काय?
上帝豈能偏離公平? 全能者豈能偏離公義?
4 तुझ्या मुलांनी देवाविरुध्द काही पाप केले असेल म्हणून देवाने त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा केली.
或者你的兒女得罪了他; 他使他們受報應。
5 परंतु आता तू त्याच्याकडे लक्ष दे आणि त्या सर्वशक्तिमान देवाची दयेसाठी आवर्जून प्रार्थना कर.
你若殷勤地尋求上帝, 向全能者懇求;
6 तू जर चांगला आणि सरळ असलास तर तुला मदत करण्यासाठी तो त्वरीत येईल. तुझे कुटुंब तुला परत देईल.
你若清潔正直, 他必定為你起來, 使你公義的居所興旺。
7 जरी तुझी सुरुवात लहान असली, तरी तुझी अंतिम स्थिती अधिक मोठी असेल.
你起初雖然微小, 終久必甚發達。
8 मी तुला विनंती करतो वडिलांच्या वेळेची माहिती विचार, त्यांनी जो शोध लावला तो तुझ्यासाठी लागू करून घे.
請你考問前代, 追念他們的列祖所查究的。
9 आपण अगदी कालच जन्माला आलो आहोत आणि काहीच माहित नाही, कारण छायेप्रमाणे आपले पृथ्वीतलावरचे दिवस आहेत.
我們不過從昨日才有,一無所知; 我們在世的日子好像影兒。
10 १० ते काय तुला शिकविणार आणि सांगणार नाहीत काय? काय ते त्याच्या अंतकरणातून बोलणार नाही का?
他們豈不指教你,告訴你, 從心裏發出言語來呢?
11 ११ लव्हाळी चिखलाशिवाय उंच वाढू शकतात का? गवत (बोरु) पाण्याशीवाय उगवू शकेल का?
蒲草沒有泥豈能發長? 蘆荻沒有水豈能生發?
12 १२ ते अजूनही हिरवे आहेत आणि कापले नाही, ते दुसऱ्या झाडापेक्षा लवकर सुकून जातात.
尚青的時候,還沒有割下, 比百樣的草先枯槁。
13 १३ म्हणून नास्तिक मनुष्याची आशा, जे सर्व देवाला विसरतात त्याचा मार्ग सुद्धा नष्ट होईल.
凡忘記上帝的人,景況也是這樣; 不虔敬人的指望要滅沒。
14 १४ ज्याचा भरवसा नष्ट होतो. आणि ज्याचा विश्वास कोळ्याच्या जाळ्यासारखा तकलादु आहे.
他所仰賴的必折斷; 他所倚靠的是蜘蛛網。
15 १५ तो आपल्या घरावर टेकला असता परंतू ते त्यास आधार देऊ शकणार नाही, त्याने ते पकडून धरले असता ते स्थिर राहायचे नाही.
他要倚靠房屋,房屋卻站立不住; 他要抓住房屋,房屋卻不能存留。
16 १६ तो सूर्यप्रकाश मिळालेल्या वनस्पतीसारखा हिरवागार आहे, तिच्या फांद्या सर्व बागेत पसरतात.
他在日光之下發青, 蔓子爬滿了園子;
17 १७ तिची मुळे खडकाभोवती आवळली जातात आणि खडकावरही उगवण्याचा प्रयत्न करतात.
他的根盤繞石堆, 扎入石地。
18 १८ परंतु जर हा व्यक्ती त्या जागेवरून हलवला गेला तर तो नष्ट होतो, मग ती जागा त्यास नाकारुन म्हणेल ‘मी तुला कधी पाहिले नाही.’
他若從本地被拔出, 那地就不認識他,說: 我沒有見過你。
19 १९ पाहा अशा रीतीने वागणाऱ्या वक्तीबद्दल हाच आनंद आहे की तिच्याच जागी धुळीतून दुसरे उगवतील.
看哪,這就是他道中之樂; 以後必另有人從地而生。
20 २० पाहा, देव निरागस लोकांस सोडून देत नाही. तसेच तो वाईट मनुष्यांना मदतही करत नाही.
上帝必不丟棄完全人, 也不扶助邪惡人。
21 २१ देव तुझे तोंड हास्याने भरुन टाकेल आणि तुझे ओठ आनंदाने ओरडतील!
他還要以喜笑充滿你的口, 以歡呼充滿你的嘴。
22 २२ जे तुझा द्वेष करतात ते लज्जेची वस्त्रे घालतील, दुष्ट मनुष्यांची राहूटी नष्ट होइल.”
恨惡你的要披戴慚愧; 惡人的帳棚必歸於無有。

< ईयोब 8 >