< ईयोब 6 >
1 १ नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला,
Então Job respondeu,
2 २ “अहो, जर तुम्ही फक्त माझ्या यातना तोलल्या, जर माझ्या शोकाला तराजूत मोजले.
“Oh, que minha angústia tenha sido pesada, e toda a minha calamidade está na balança!
3 ३ तर ते आता समुद्रातल्या वाळूपेक्षा जड आहे. यामुळेच काय माझे शब्द व्यर्थ आहे.
Por enquanto, seria mais pesado que a areia dos mares, portanto minhas palavras têm sido precipitadas.
4 ४ त्या सर्वशक्तिमानाचे बाण माझ्यात आहेत. माझ्या प्राण विषाला पिऊन घेत आहे, देवाने स्वतः त्याची दहशत माझ्या विरुध्द सज्ज केली आहे
Pois as setas do Todo-Poderoso estão dentro de mim. Meu espírito bebe o veneno deles. Os terrores de Deus se puseram em ordem contra mim.
5 ५ वनातील गाढवाला गवत मिळाल्यावर ते ओरडते काय? किंवा गव्हाणीत चारा असता बैल भुकेने हबंरतो काय?
O burro selvagem se suja quando tem capim? Ou será que o boi está em baixo sobre sua forragem?
6 ६ ज्याला चव नाही असे मिठाशिवाय खातात काय? किंवा अंड्यातल्या पांढऱ्या भागाला काही चव असते काय?
O que não tem sabor pode ser comido sem sal? Ou existe algum gosto na clara de um ovo?
7 ७ ज्याला मी स्पर्श करण्यास नाकारले, ते माझ्यासाठी तिरस्करणीय अन्न झाले.
Minha alma se recusa a tocá-los. Eles são para mim um alimento tão repugnante.
8 ८ अहो, माझ्या विनंती प्रमाणे मला मिळाले आणि माझी आशा देव पूर्ण करील तर किती बरे! ज्या गोष्टी हव्यात त्या देवाने मला दिल्या असत्या.
“Oh, que eu possa ter meu pedido, que Deus concederia a coisa que eu anseio,
9 ९ जर देवाच्या ईच्छेत आले तर त्याने मला चिरडून टाकावे, त्याने आपला हात मजवरून काढून घ्यावा आणि या जीवनातून मला मुक्त करावे.
even que agradaria a Deus esmagar-me; que ele soltaria sua mão, e me cortaria!
10 १० तशाने माझ्या दुःखाचा परीहार होईल, जरी मी त्रासात असतो तरी मी दुःखात आनंद करीन, कारण जो पवित्र आहे त्याचे शब्द मी कधीही नाकारले नाही.
Que ainda seja meu consolo, sim, deixe-me exultar em dor que não poupa, que eu não neguei as palavras do Santo.
11 ११ माझी काय शक्ती आहे की मी वाट पाहण्याचा प्रयत्न करू? माझा अंत काय, कि मी स्वतःला आवरून धरू?
Qual é a minha força, que eu deveria esperar? Qual é o meu fim, que eu deva ser paciente?
12 १२ माझी शक्ती पाषाणासारखी आहे काय? किंवा माझे शरीर पितळेचे बनलेले आहे काय?
Minha força é a força das pedras? Ou minha carne é de bronze?
13 १३ माझ्यापासुन मला कोणतेही साहाय्य होत नाही हे सत्य नाही काय, आणि ज्ञान माझ्यापासून हिरावून घेण्यात आले नाही काय?
Isn não é que eu não tenha nenhuma ajuda em mim, que a sabedoria é afastada de mim?
14 १४ कमजोर व्यक्तीवर संकट आले, त्याने सर्वशक्तिमान देवाचे भय धरणे सोडून दिले, तरी सुद्धा त्याच्या मित्राने विश्वासूपण दाखवावा.
“Para aquele que está pronto para desmaiar, a gentileza deve ser mostrada por seu amigo; mesmo para aquele que abandona o medo do Todo-Poderoso.
15 १५ बंधूनो, तुम्ही माझ्यासाठी वाळवंटी प्रदेशासमान व कधी न वाहणाऱ्या ओढ्याप्रमाणे आहात.
My os irmãos têm lidado enganosamente como um riacho, como o canal dos riachos que passam;
16 १६ त्याच्यावर बर्फ असल्या कारणाने ते गढूळ झाले आणि जे बर्फामध्ये स्वतःला लपवितात असे तुम्ही आहात.
which são pretas por causa do gelo, na qual a neve se esconde sozinha.
17 १७ जेव्हा ते बाहेर फेकले जातात ते नष्ट होतात, जेव्हा उष्णता वाढते ते जागेवरच वितळून जातात.
Na estação seca, elas desaparecem. Quando está quente, eles são consumidos fora de seu lugar.
18 १८ त्यांचा गट त्यांच्या मार्गाने प्रवास करीत असता ते पाण्यासाठी बाजूला वळतात ते सुकलेल्या प्रदेशात भटकतात आणि नंतर नाश पावतात.
As caravanas que viajam ao seu lado se afastam. Eles vão para o lixo, e perecem.
19 १९ तेमाच्या गटाने तेथे तपास केला. शबाच्या काफिल्याने आशेने त्याचा शोध घेतला.
As caravanas de Tema pareciam. As empresas de Sheba esperaram por eles.
20 २० त्याची अपेक्षाभंग झाली कारण त्यांना पाणी सापडण्याची खात्री होती, ते तेथे गेले परंतु ते तेथे फसले.
Eles estavam angustiados porque estavam confiantes. Eles chegaram lá, e ficaram confusos.
21 २१ आता तुम्ही मित्र माझ्यासाठी काहीच नाही, तुम्ही माझी भयानक परिस्थिती पाहीली आणि घाबरून गेला आहात.
Por enquanto, você não é nada. Você vê um terror, e tem medo.
22 २२ मला काही द्या असे मी म्हणालो का? किंवा आपल्या संपत्तीतून मला काही बक्षीस द्या?
Did Eu já disse: “Dê para mim”? ou, “Ofereça-me um presente de sua substância”...
23 २३ किंवा ‘माझ्याविरोधकाच्या हातून माझे रक्षण करा? किंवा, क्रूर लोकांपासून खंडणी देऊन वाचवा!’ असे मी तुम्हास म्हटले का?
ou, 'Deliver me from the adversary's hand? ou, “Me redimir da mão dos opressores?
24 २४ आता तुम्ही मला समज द्या आणि मी शांत होईन. माझी काय चूक झाली ते मला दाखवा.
“Ensine-me, e eu me calarei. Faz com que eu entenda meu erro.
25 २५ प्रामाणिक शब्द किती दु: ख देणारे असतात! परंतु तुमचे वादविवाद, मला कसे धमकावतील?
Quão forçosas são as palavras de retidão! Mas sua reprovação, o que ela reprova?
26 २६ तुम्ही माझे शब्द नाकारण्याची योजना केली आहे का? निराश करणाऱ्या मनुष्याचे शब्द वाऱ्यासारखे आहेत का?
Do você pretende reprovar as palavras, já que os discursos de alguém que está desesperado são como vento?
27 २७ खरोखर, पोरक्या मुलांवर जुगार खेळता, आणि तुम्ही व्यापाऱ्यासारखे मित्रांबरोबर घासाघीस करता.
Sim, você até jogaria à sorte para os órfãos de pai, e faça mercadoria de seu amigo.
28 २८ पण आता माझ्याकडे लक्षपूर्वक पाहा. खात्रीने मी तुमच्या तोंडासमोर खोटे बोलणार नाही.
Agora, portanto, tenha o prazer de olhar para mim, pois com certeza não vou mentir na sua cara.
29 २९ मी तुम्हास विनंती करतो तुम्ही आता कडक धोरण सोडून द्या तुमच्याबरोबर अन्याय होणार नाही. खरोखर, कडक धोरण सोडून द्या, कारण माझे ध्येय नितीचे आहे.
Favor retornar. Que não haja injustiça. Sim, voltar novamente. Minha causa é justa.
30 ३० माझा जीभेवर काही वाईट आहे काय? माझ्या तोंडाला अर्धमाचा फरक समजत नाही काय?”
Existe injustiça em minha língua? Meu gosto não pode discernir coisas maliciosas?