< ईयोब 5 >
1 १ “आता आरोळी मार, तुला उत्तर देईल असा कोण आहे? असा कोण एक धार्मिक आहे का ज्याच्याकडे तू जावे?
2 २ मूर्ख मनुष्याचा राग त्यास मारुन टाकतो, जळफळाट मुर्खाला ठार मारतो.
3 ३ मी मूर्ख व्यक्तीस मुळावलेले पाहीले, परंतु अचानक मी त्याच्या घराचा तिरस्कार केला.
4 ४ त्याची मुले सुरक्षिततेपासून फार दूर आहेत, ते शहराच्या वेशीत चिरडले जातील. त्यांना तारणारा कोणीही राहणार नाही
5 ५ भुकेल्या मनुष्यांनी त्याची उभी पिके खाऊन टाकली, काट्याकुटयात वाढलेले धान्यही लोकांनी सोडले नाही, लोभी मनुष्यांनी सर्वकाही नेले.
6 ६ अडचणी मातीतून येत नाहीत, किंवा संकटे रानातून उगवत नाहीत.
7 ७ परंतू जशा ठिणग्या वर उडतात, तसा मनुष्य स्वतःहा विघ्न निर्माण करतो.
8 ८ परंतू माझ्यासाठी, मी स्वतःह देवाकडेच वळलो असतो, त्याच्याकडे मी माझे गाऱ्हाने कबूल केले असते.
9 ९ तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो, त्याच्या अद्भुत गोष्टींची सीमा नाही.
10 १० तो पृथ्वीवर पाऊस देतो. आणि शेतांवर पाणी पाठवतो.
11 ११ तो नम्र लोकांस उच्चस्थानी बसवतो आणि जे राखेत बसून शोक करतात त्यांना तो सुरक्षीत उठवतो.
12 १२ तो धूर्तांचे कार्य निष्फळ करतो, म्हणजे त्यांच्या हांताचे कट सिध्दीस जाणार नाहीत.
13 १३ तो शहाण्यास त्याच्याच धुर्ततेच्या जाळ्यात अडकवितो, तो हूशार लोंकाच्या मसलती लवकर संपुष्टात आणतो.
14 १४ त्यांचा भर दिवसाच अंधराशी सामना होतो, दिवसा मध्यान्ह्यात ते रात्र असल्यासारखे चाचपडतात.
15 १५ त्यांच्या मुखांतील तलवारीपासून तो दरीद्री मनुष्यास, आणि बलंवताच्या हातातून गरजवंत मनुष्यास सोडवतो
16 १६ म्हणून दरिद्री मनुष्यास आशा आहे, आणि अन्याय आपले तोंड बंद करते.
17 १७ पाहा, ज्या मनुष्याला देव दुरूस्त करतो तो सुखी आहे, म्हणून सर्वशक्तिमानाच्या शिक्षेचा अवमान करु नकोस.
18 १८ तोच जखम करतो आणि नंतर तोच पट्टी बांधतो. तो जखमा करतो आणि नंतर त्याच्याच हाताने बरे करतो.
19 १९ सहा संकटामधून तो तुझा बचाव करील, खरोखर, सातही संकटात, दुष्ट तुला स्पर्श करणार नाही.
20 २० दुष्काळात (अवर्षण) तो तुला मृत्यूपासून आणि लढाईत तलवारीपासून वाचवेल.
21 २१ जिभेच्या दुःखदायी वाऱ्यापासून तू झाकला जाशील, आणि विनाश तूझ्यावर येईल तेव्हा तू त्यास भिणार नाहीस.
22 २२ तू विनाशात व दुष्काळात (अवर्षण) हसशील. आणि तुला रानपशूंची भीती वाटणार नाही.
23 २३ तुझ्या भूमीतील पाषाणाशीही तुझा करार होईल, जंगली पशूशीही तू शांतीने राहशील
24 २४ तुला समजेल तुझा तंबू त्याच्यामध्ये सुरक्षित आहे, तू तुझ्या कळपाची पाहणी करशील आणि तुला काही कमतरता आढळणार नाही.
25 २५ तुझे घराणे समृध्द होईल. वनातील कुरणासारखी तुझी संतती वाढेल असे तू पाहाशील.
26 २६ जशी कापणीच्या वेळी वाळलेली गव्हाची पेंढी मळणीसाठी आणतात तसा तू वयोवृध्द होऊन कबरेत येशील.
27 २७ पाहा, आम्ही या साऱ्यांचा अभ्यास केला आहे आणि ते सर्व खरे आहे. म्हणून तू आमचे ऐक. आणि त्यातून स्वत: साठी काही शिक.”