< ईयोब 5 >

1 “आता आरोळी मार, तुला उत्तर देईल असा कोण आहे? असा कोण एक धार्मिक आहे का ज्याच्याकडे तू जावे?
קְֽרָא־נָ֭א הֲיֵ֣שׁ עוֹנֶ֑ךָּ וְאֶל־מִ֖י מִקְּדֹשִׁ֣ים תִּפְנֶֽה׃
2 मूर्ख मनुष्याचा राग त्यास मारुन टाकतो, जळफळाट मुर्खाला ठार मारतो.
כִּֽי־לֶֽ֭אֱוִיל יַהֲרָג־כָּ֑עַשׂ וּ֝פֹתֶ֗ה תָּמִ֥ית קִנְאָֽה׃
3 मी मूर्ख व्यक्तीस मुळावलेले पाहीले, परंतु अचानक मी त्याच्या घराचा तिरस्कार केला.
אֲֽנִי־רָ֭אִיתִי אֱוִ֣יל מַשְׁרִ֑ישׁ וָאֶקּ֖וֹב נָוֵ֣הוּ פִתְאֹֽם׃
4 त्याची मुले सुरक्षिततेपासून फार दूर आहेत, ते शहराच्या वेशीत चिरडले जातील. त्यांना तारणारा कोणीही राहणार नाही
יִרְחֲק֣וּ בָנָ֣יו מִיֶּ֑שַׁע וְיִֽדַּכְּא֥וּ בַ֝שַּׁ֗עַר וְאֵ֣ין מַצִּֽיל׃
5 भुकेल्या मनुष्यांनी त्याची उभी पिके खाऊन टाकली, काट्याकुटयात वाढलेले धान्यही लोकांनी सोडले नाही, लोभी मनुष्यांनी सर्वकाही नेले.
אֲשֶׁ֤ר קְצִיר֨וֹ ׀ רָ֘עֵ֤ב יֹאכֵ֗ל וְאֶֽל־מִצִּנִּ֥ים יִקָּחֵ֑הוּ וְשָׁאַ֖ף צַמִּ֣ים חֵילָֽם׃
6 अडचणी मातीतून येत नाहीत, किंवा संकटे रानातून उगवत नाहीत.
כִּ֤י ׀ לֹא־יֵצֵ֣א מֵעָפָ֣ר אָ֑וֶן וּ֝מֵאֲדָמָ֗ה לֹא־יִצְמַ֥ח עָמָֽל׃
7 परंतू जशा ठिणग्या वर उडतात, तसा मनुष्य स्वतःहा विघ्न निर्माण करतो.
כִּֽי־אָ֭דָם לְעָמָ֣ל יוּלָּ֑ד וּבְנֵי־רֶ֝֗שֶׁף יַגְבִּ֥יהוּ עֽוּף׃
8 परंतू माझ्यासाठी, मी स्वतःह देवाकडेच वळलो असतो, त्याच्याकडे मी माझे गाऱ्हाने कबूल केले असते.
אוּלָ֗ם אֲ֭נִי אֶדְרֹ֣שׁ אֶל־אֵ֑ל וְאֶל־אֱ֝לֹהִ֗ים אָשִׂ֥ים דִּבְרָתִֽי׃
9 तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो, त्याच्या अद्भुत गोष्टींची सीमा नाही.
עֹשֶׂ֣ה גְ֭דֹלוֹת וְאֵ֣ין חֵ֑קֶר נִ֝פְלָא֗וֹת עַד־אֵ֥ין מִסְפָּֽר׃
10 १० तो पृथ्वीवर पाऊस देतो. आणि शेतांवर पाणी पाठवतो.
הַנֹּתֵ֣ן מָ֭טָר עַל־פְּנֵי־אָ֑רֶץ וְשֹׁ֥לֵֽחַ מַ֝יִם עַל־פְּנֵ֥י חוּצֽוֹת׃
11 ११ तो नम्र लोकांस उच्चस्थानी बसवतो आणि जे राखेत बसून शोक करतात त्यांना तो सुरक्षीत उठवतो.
לָשׂ֣וּם שְׁפָלִ֣ים לְמָר֑וֹם וְ֝קֹדְרִ֗ים שָׂ֣גְבוּ יֶֽשַׁע׃
12 १२ तो धूर्तांचे कार्य निष्फळ करतो, म्हणजे त्यांच्या हांताचे कट सिध्दीस जाणार नाहीत.
מֵ֭פֵר מַחְשְׁב֣וֹת עֲרוּמִ֑ים וְֽלֹא־תַעֲשֶׂ֥ינָה יְ֝דֵיהֶ֗ם תּוּשִׁיָּֽה׃
13 १३ तो शहाण्यास त्याच्याच धुर्ततेच्या जाळ्यात अडकवितो, तो हूशार लोंकाच्या मसलती लवकर संपुष्टात आणतो.
לֹכֵ֣ד חֲכָמִ֣ים בְּעָרְמָ֑ם וַעֲצַ֖ת נִפְתָּלִ֣ים נִמְהָֽרָה׃
14 १४ त्यांचा भर दिवसाच अंधराशी सामना होतो, दिवसा मध्यान्ह्यात ते रात्र असल्यासारखे चाचपडतात.
יוֹמָ֥ם יְפַגְּשׁוּ־חֹ֑שֶׁךְ וְ֝כַלַּ֗יְלָה יְֽמַשְׁשׁ֥וּ בַֽצָּהֳרָֽיִם׃
15 १५ त्यांच्या मुखांतील तलवारीपासून तो दरीद्री मनुष्यास, आणि बलंवताच्या हातातून गरजवंत मनुष्यास सोडवतो
וַיֹּ֣שַׁע מֵ֭חֶרֶב מִפִּיהֶ֑ם וּמִיַּ֖ד חָזָ֣ק אֶבְיֽוֹן׃
16 १६ म्हणून दरिद्री मनुष्यास आशा आहे, आणि अन्याय आपले तोंड बंद करते.
וַתְּהִ֣י לַדַּ֣ל תִּקְוָ֑ה וְ֝עֹלָ֗תָה קָ֣פְצָה פִּֽיהָ׃
17 १७ पाहा, ज्या मनुष्याला देव दुरूस्त करतो तो सुखी आहे, म्हणून सर्वशक्तिमानाच्या शिक्षेचा अवमान करु नकोस.
הִנֵּ֤ה אַשְׁרֵ֣י אֱ֭נוֹשׁ יוֹכִחֶ֣נּֽוּ אֱל֑וֹהַּ וּמוּסַ֥ר שַׁ֝דַּ֗י אַל־תִּמְאָֽס׃
18 १८ तोच जखम करतो आणि नंतर तोच पट्टी बांधतो. तो जखमा करतो आणि नंतर त्याच्याच हाताने बरे करतो.
כִּ֤י ה֣וּא יַכְאִ֣יב וְיֶחְבָּ֑שׁ יִ֝מְחַ֗ץ וְיָדָ֥יו תִּרְפֶּֽינָה׃
19 १९ सहा संकटामधून तो तुझा बचाव करील, खरोखर, सातही संकटात, दुष्ट तुला स्पर्श करणार नाही.
בְּשֵׁ֣שׁ צָ֭רוֹת יַצִּילֶ֑ךָּ וּבְשֶׁ֓בַע ׀ לֹא־יִגַּ֖ע בְּךָ֣ רָֽע׃
20 २० दुष्काळात (अवर्षण) तो तुला मृत्यूपासून आणि लढाईत तलवारीपासून वाचवेल.
בְּ֭רָעָב פָּֽדְךָ֣ מִמָּ֑וֶת וּ֝בְמִלְחָמָ֗ה מִ֣ידֵי חָֽרֶב׃
21 २१ जिभेच्या दुःखदायी वाऱ्यापासून तू झाकला जाशील, आणि विनाश तूझ्यावर येईल तेव्हा तू त्यास भिणार नाहीस.
בְּשׁ֣וֹט לָ֭שׁוֹן תֵּחָבֵ֑א וְֽלֹא־תִירָ֥א מִ֝שֹּׁ֗ד כִּ֣י יָבֽוֹא׃
22 २२ तू विनाशात व दुष्काळात (अवर्षण) हसशील. आणि तुला रानपशूंची भीती वाटणार नाही.
לְשֹׁ֣ד וּלְכָפָ֣ן תִּשְׂחָ֑ק וּֽמֵחַיַּ֥ת הָ֝אָ֗רֶץ אַל־תִּירָֽא׃
23 २३ तुझ्या भूमीतील पाषाणाशीही तुझा करार होईल, जंगली पशूशीही तू शांतीने राहशील
כִּ֤י עִם־אַבְנֵ֣י הַשָּׂדֶ֣ה בְרִיתֶ֑ךָ וְחַיַּ֥ת הַ֝שָּׂדֶ֗ה הָשְׁלְמָה־לָֽךְ׃
24 २४ तुला समजेल तुझा तंबू त्याच्यामध्ये सुरक्षित आहे, तू तुझ्या कळपाची पाहणी करशील आणि तुला काही कमतरता आढळणार नाही.
וְֽ֭יָדַעְתָּ כִּי־שָׁל֣וֹם אָהֳלֶ֑ךָ וּֽפָקַדְתָּ֥ נָ֝וְךָ וְלֹ֣א תֶחֱטָֽא׃
25 २५ तुझे घराणे समृध्द होईल. वनातील कुरणासारखी तुझी संतती वाढेल असे तू पाहाशील.
וְֽ֭יָדַעְתָּ כִּי־רַ֣ב זַרְעֶ֑ךָ וְ֝צֶאֱצָאֶ֗יךָ כְּעֵ֣שֶׂב הָאָֽרֶץ׃
26 २६ जशी कापणीच्या वेळी वाळलेली गव्हाची पेंढी मळणीसाठी आणतात तसा तू वयोवृध्द होऊन कबरेत येशील.
תָּב֣וֹא בְכֶ֣לַח אֱלֵי־קָ֑בֶר כַּעֲל֖וֹת גָּדִ֣ישׁ בְּעִתּֽוֹ׃
27 २७ पाहा, आम्ही या साऱ्यांचा अभ्यास केला आहे आणि ते सर्व खरे आहे. म्हणून तू आमचे ऐक. आणि त्यातून स्वत: साठी काही शिक.”
הִנֵּה־זֹ֭את חֲקַרְנ֥וּהָ כֶּֽן־הִ֑יא שְׁ֝מָעֶ֗נָּה וְאַתָּ֥ה דַֽע־לָֽךְ׃ פ

< ईयोब 5 >