< ईयोब 42 >

1 नंतर ईयोबने परमेश्वरास उत्तर दिले, तो म्हणाला:
És felelt Jób az Örökkévalónak és mondta:
2 “परमेश्वरा सर्वकाही तूच करु शकतोस ते मला माहीत आहे, तू योजना आखतोस त्या प्रत्यक्षात कोणीही थांबवू शकत नाही.
Tudom, hogy mindent tehetsz, s nem vonható meg tőled semmi szándék.
3 तू मला विचारलेस, हा अज्ञानी मनुष्य कोण आहे जो असे मूर्खासारखे बोलतो आहे? तरीही मला ज्या गोष्टी कळत नव्हत्या त्या गोष्टी मी बोललो, त्यांच्याविषयीच मी बोलत होतो. ज्या गोष्टी समजणे माझ्या आवाक्याबाहेरचे होते त्यांच्याविषयी मी बोलत होतो.
Ki az, ki elburkolja a tanácsot tudás nélkül? – Azért hát olyat hirdettem, mit nem értek, olyakat, a mik csodásak nekem s nem tudom. -
4 परमेश्वरा, तू मला म्हणालास, ईयोब, तू ऐक, मी बोलेन, मी तुला प्रश्न विचारेन, आणि तू मला उत्तर दे.
Halljad csak, majd beszélek én, hadd kérdelek, s te tudasd velem. –
5 परमेश्वरा, मी तुझ्याबद्दल पूर्वी ऐकले होते, परंतु आता मी माझ्या डोळ्यांनी तुला बघतो आहे.
Fülhallás szerint hallottam rólad, de most szemem látott téged.
6 आता मलाच माझी लाज वाटते. मला पश्चाताप होत आहे. मी आता धुळीत आणि राखेतबसून पश्चाताप करील.
Azért elvetem és megbánom, porban és hamuban.
7 परमेश्वराचे ईयोबाशी बोलणे झाल्यावर तो तेमानीच्या अलीफजला म्हणाला, मला तुझा आणि तुझ्या दोन मित्रांचा राग आला आहे. का? कारण तुम्ही माझ्याबद्दल योग्य बोलला नाही. परंतु ईयोब माझा सेवक आहे. तो माझ्याविषयी बरोबर बोलला.
És volt, miután elmondta az Örökkévaló e szavakat Jóbnak, szólt az Örökkévaló a Témánbeli Élífáhzhoz: Föllobbant haragom ellened és két barátod ellen, mert nem beszéltetek rólam helyeset, úgy mint szolgám Jób.
8 म्हणून अलीफज, आता सात बैल आणि सात एडके घे. ते घेऊन माझ्या सेवकाकडे, ईयोबाकडे जा. त्यांना मार आणि त्यांचा स्वत: साठी होमबली अर्पण कर. माझा सेवक ईयोब तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि मी त्याच्या प्रार्थनेला उत्तर देईन. मग मी तुम्हास योग्य असलेली शिक्षा देणार नाही. तुम्ही अतिशय मूर्ख होता म्हणून तुम्हास शिक्षा करायला हवी. तुम्ही माझ्याविषयी नीट बोलला नाही. परंतु माझा सेवक ईयोब मात्र माझ्याबद्दल अगदी योग्य बोलला.
Most tehát vegyetek magatoknak hét tulkot és hét kost s menjetek szolgámhoz, Jóbhoz és hozzatok magatokért égőáldozatot; Jób szolgám pedig imádkozni fog értetek, mert csak az ő személyét tekintem, hogy valami csúfságot nem teszek veletek, mert nem beszéltetek rólam helyeset, úgy mint szolgám, Jób.
9 तेव्हा अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि सोफर नामाथीचा यांनी देवाचे ऐकले. नंतर परमेश्वराने ईयोबाच्या प्रार्थनेला उत्तर दिले.
És mentek a Témánbeli Élífáz, a Súachbeli Bildád és a Náamabeli Czófar és cselekedtek, a mint szólott hozzájok az Örökkévaló; és tekintettel volt az Örökkévaló Jób személyére.
10 १० ईयोबाने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली याप्रकारे परमेश्वराने ईयोबाला पुन्हा यशस्वी केले. देवाने त्यास पूर्वी त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट दिले.
Az Örökkévaló pedig helyrehozta Jób veszteségét, midőn barátjaiért imádkozott; s megtoldotta az Örökkévaló mind azt, a mi Jóbé volt, kétszeresére.
11 ११ ईयोबाचे सगळे भाऊ आणि बहिणी त्याच्या घरी आले. ईयोबाला जो कोणी ओळखत होता तो ही त्याच्याकडे आला. त्यांनी ईयोबासह भोजन घेतले. त्यांनी ईयोबाचे सांत्वन केले. परमेश्वराने ईयोबावर इतकी संकटे आणली त्याचे त्यांना वाईट वाटले. प्रत्येकाने ईयोबाला चांदीचा तुकडा आणि सोन्याची अंगठी दिली.
Eljöttek hozzá mind a fivérei és mind a nővérei és mind az előbbi ismerősei s ettek kenyeret vele az ő házában, szánakoztak rajta és megvigasztalták őt mind azon veszedelem miatt, a melyet reá hozott az Örökkévaló, és adtak neki ki-ki egy keszítát és ki-ki egy arany gyűrűt.
12 १२ परमेश्वराने ईयोबाच्या आयुष्याच्या उत्तरार्धावर त्याच्या पूर्वार्धापेक्षा अधिक कृपा केली. ईयोबाकडे आता चौदा हजार मेंढ्या, सहा हजार उंट, दोन हजार गायी आणि एक हजार गाढवी आहेत.
S az Örökkévaló megáldotta Jób végét, inkább mint a kezdetét; és volt neki tizennégyezer juha, hatezer tevéje, ezer iga marhája és ezer nőstény szamara.
13 १३ ईयोबाला सात मुले आणि तीन मुली झाल्या.
S volt neki hét fia és három leánya.
14 १४ ईयोबाने त्याच्या पहिल्या मुलीचे नाव यमीमा, दुसऱ्या मुलींचे नाव कसीया ठेवले. तिसऱ्या मुलीचे नाव केरेन हप्पूक ठेवले.
És elnevezte az egyiket Jemímának, a másodiknak neve pedig Keczía és a harmadiknak neve Kéren-Happúkh.
15 १५ त्याच्या मुली त्या देशातील सर्वात सुंदर मुली होत्या, ईयोबाने त्याच्या मुलींना त्याच्या मालमत्तेतला वाटा दिला. त्यांच्या भावांप्रमाणे ईयोबाच्या मालमत्तेतला वाटा त्यांना मिळाला.
S nem találtattak oly szép nők, mint Jób leányai, az egész országban; s adott nekik atyjok birtokot fivéreik között.
16 १६ अशा तऱ्हेने ईयोब एकशे चाळीस वर्षे जगला. तो त्याची मुले, नातवंडे, पतवंडे पाहीपर्यंत जगला.
És élt Jób ezután száznegyven esztendőt, és látta gyermekeit és gyermekeinek gyermekeit: négy nemzedéket.
17 १७ नंतर ईयोब मरण पावला. ईयोब चांगले आयुष्य जगला. तो अगदी वयोवृध्द होऊन मेला.”
És meghalt Jób öregen és napokkal telten.

< ईयोब 42 >