< ईयोब 41 >
1 १ तुला लिव्याथानाला गळ टाकून पकडता येईल का? तुला त्याची जीभ दोरीने बांधता येईल का?
Ungamhudula yini uLeviyathani ngengwegwe, kumbe ulimi lwakhe ngentambo oyenza itshone?
2 २ तुला लिव्याथानाच्या नाकातून दोरी घालून त्यास वेसण घालता येईल का? किंवा त्याच्या जबड्यात गळ घालता येईल का?
Ungafaka yini umhlanga ekhaleni lakhe, kumbe ubhoboze umhlathi wakhe ngameva?
3 ३ लिव्याथान तुझ्याकडे सोडून देण्यासाठी याचना करील का? तो तुझ्याशी मृदू शब्दात बोलेल का?
Uzakuncenga kanengi yini? Uzakhuluma lawe ngathambileyo yini?
4 ४ लिव्याथान तुझ्याशी करार करून जन्मभर तुझा दास होऊन राहील का?
Uzakwenza isivumelwano lawe yini? Uzamthatha abe yinceku kokuphela yini?
5 ५ तू पक्ष्याशी जसा खेळशील तसा लिव्याथानाशी खेळशील का? तू त्यास दोरीने बांधशील का? तुझ्या मुली त्याच्याशी खेळू शकतील काय?
Uzadlala laye yini njengenyoni? Kumbe uzambophela amantombazana akho yini?
6 ६ मच्छीमार तुझ्याकडून लिव्याथानाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील का? ते त्याचे तुकडे करून ते व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न करतील का?
Abathengi bazathengiselana ngaye yini? Bazakwehlukaniselana ngaye yini phakathi kwabathengisayo?
7 ७ तू लिव्याथानाच्या कातडीत किंवा डोक्यात बरच्या फेकशील का?
Uzagcwalisa yini isikhumba sakhe ngezinhlendla, lekhanda lakhe ngemikhonto yenhlanzi?
8 ८ तू एकदा का लिव्याथानावर हात टाकलास तर पुन्हा तसे कधी करु शकणार नाहीस. ती कशा प्रकारची लढाई असेल याचा एकदा विचार कर.
Beka isandla sakho phezu kwakhe, khumbula impi, ungakwenzi futhi.
9 ९ तू लिव्याथानाचा पराभव करु शकशील असे तुला वाटत असेल तर ते विसरून जा. तशा आशेला जागाच नाही. त्याच्याकडे नजर टाकताच तुझी भीतीने गाळण उडेल.
Khangela, ithemba lakhe lizakuba ngamanga. Laye uzaphoselwa phansi yini ngokumbona?
10 १० एकही मनुष्य त्यास जागे करून त्याचा राग ओढवून घेण्याइतका शूर नाही. “माझ्याविरुध्द उभा राहणाराही कोणी नाही.
Kakho olesihluku sokuthi amvuse. Ngubani-ke yena ongazimisa phambi kwami?
11 ११ मला कोणी काही प्रथम दिले नाही म्हणून मी त्यांची परत फेड करू? या नभोमंडळाखाली जे जे आहे ते सर्व माझे आहे.
Ngubani onganduleleyo ukuthi ngimbhadale? Okungaphansi kwamazulu wonke ngokwami.
12 १२ मी तुला लिव्याथानाच्या पायांविषयी, त्याच्या शक्तीविषयी आणि त्याच्या ऐटदार बांध्याविषयी सांगेन.
Kangiyikuthula mayelana lezitho zakhe, lendaba yamandla akhe, lobuhle besimo sakhe.
13 १३ कोणीही त्याची कातडी छेदू शकत नाही. त्याची जबड्यांत कोणाला शिरता येईल?
Ngubani ongabonakalisa ubuso besembatho sakhe? Ngubani ongeza lamatomu akhe aphindwe kabili?
14 १४ लिव्याथानाला त्याचा जबडा उघडायला कोणीही भाग पाडू शकत नाही. त्याच्या तोंडातल्या दातांची लोकांस भीती वाटते.
Ngubani ongavula iminyango yobuso bakhe? Amazinyo akhe ayesabeka inhlangothi zonke.
15 १५ लिव्याथानाच्या पाठीवर ढालीसारख्या खवल्यांच्या रांगा एकमेकांना चिकटून आहेत.
Imizila yamahawu akhe ilokuziqhenya, ivalelwe ngophawu oluqinisiweyo.
16 १६ ते खवले एकमेकांना इतके चिकटले आहेत की त्यातून हवासुध्दा जाऊ शकत नाही.
Elinye lisondele kwelinye, ukuze kungangeni umoya phakathi kwawo.
17 १७ त्याचे खवले एकमेकांशी घटृ बांधलेले आहेत. ते एकमेकांशी इतके घटृ बांधलेले आहेत की कोणी ते ओढून वेगळे करु शकत नाही.
Ahlangene, abambana, ukuze angehlukaniswa.
18 १८ लिव्याथान जेव्हा शिंकतो तेव्हा वीज चमकल्यासारखी वाटते. त्याचे डोळे पहाटेच्या प्रकाशासारखे चमकतात.
Ukuthimula kwakhe kuphazima ukukhanya, lamehlo akhe anjengenkophe zemadabukakusa.
19 १९ त्याच्या तोंडातून आगीचे लोळ बाहेर पडतात. आगीच्या ठिणग्या निघतात.
Emlonyeni wakhe kuphuma izihlanti, ziqhatshe ziphume inhlansi zomlilo.
20 २० उकळत्या भांड्याखाली ठेवलेल्या जळत्या लव्हाळ्यातून निघतो तसा धूर त्याच्या नाकातून येतो.
Emakhaleni akhe kuphuma intuthu, njengembiza ebilayo lemihlanga.
21 २१ लिव्याथानाच्या श्वासांनी कोळसे पेटतात आणि त्याच्या तोंडातून ज्वाला बाहेर पडतात.
Umoya wakhe uvuthela amalahle, lelangabi liphume emlonyeni wakhe.
22 २२ लिव्याथानाची मान मजबूत आहे. लोक त्यास घाबरतात आणि त्याच्यापासून दूर पळत सुटतात.
Entanyeni yakhe kuhlala amandla, laphambi kwakhe kugiya usizi.
23 २३ त्याच्या कातडीवर एकही मऊ भाग नाही ती लोखंडासाखी कठीण आहे.
Amavinqo enyama yakhe anamathelene, aqinile kuye, kawanyikinyeki.
24 २४ लिव्याथानाचे हृदय पाषाणासारखे आहे. त्यास भीती वाटत नाही ते पाट्यासारखे आहे. जात्याच्या खालच्या तळीसारखे ते आहे.
Inhliziyo yakhe iqinile njengelitshe, yebo, ilukhuni njengelitshe lokuchola elingaphansi.
25 २५ लिव्याथान उठून उभा राहिला की शूर वीरही घाबरतात लिव्याथानाने त्यांची शेपटी हलवली की ते पळून जातात.
Ekuvukeni kwakhe amaqhawe ayesaba, ngenxa yokwephulwa bayazihlambulula.
26 २६ तलवारी, भाले आणि तीर त्याच्यावर फेकले तरी ते त्यास न लागता परत येतात. त्या शस्त्रांनी त्यास काहीही इजा होत नाही.
Ofinyelela kuye ngenkemba angeme, umkhonto, umtshoko, lomdikadika.
27 २७ तो लोखाडास गवताच्या काडीसारखे मोडू शकतो कुजलेले लाकूड जसे पटकन मोडते तसे तो पितळ मोडतो.
Uthatha insimbi njengotshani, ithusi njengogodo olubolileyo.
28 २८ तो बाणांना घाबरुन पळून जात नाही वाळलेल्या गवताप्रमाणे दगड त्याच्यावर आपटून परत येतात.
Umtshoko kawumenzi abaleke; amatshe esavutha aphendulwa nguye abe yizibi.
29 २९ जेव्हा लाकडी गदा त्याच्यावर आपटली जाते तेव्हा त्यास ते गवत आपटल्याप्रमाणे वाटते. लोक त्याच्यावर भाले फेकतात तेव्हा तो हसतो.
Isagila sitshaywa njengezibi; uhleka ukugenqeza komdikadika.
30 ३० लिव्याथानाच्या शरीरावरची कातडी तीक्ष्ण, टणक खापरासाखी आहे. तो चिखलात कुळक फिरवल्याप्रमाणे तास पाडतो.
Ngaphansi kwakhe kulendengezi ezibukhali; wendlala izinto ezibukhali odakeni.
31 ३१ लिव्याथान पाण्याला उकळी आल्याप्रमाणे हलवतो. तो त्यास उकळत्या तेलाच्या भांड्याप्रमाणे तो त्यावर बुडबुडे आणतो.
Wenza inziki zibile njengembiza, enze ulwandle lube njengembiza yamafutha.
32 ३२ लिव्याथान पोहतो तेव्हा तो आपल्यामागे मार्ग तयार करतो. तो पाणी ढवळून टाकतो आणि आपल्यामागे पांढरा फेस ठेवतो.
Ngemva kwakhe wenza indlela ikhanye; inziki zingathiwa ziyimpunga.
33 ३३ पृथ्वीवरचा एकही पशू लिव्याथानासारखा नाही. तो एक भीतिविरहित प्राणी आहे.
Kakukho emhlabeni okufanana laye, owenziwa angabi lokwesaba.
34 ३४ लिव्याथान गर्विष्ठ प्राण्याला कमी (तुच्छ) लेखतो तो सगळ्या रानटी श्वापदांचा राजा आहे. आणि मी, परमेश्वराने त्यास निर्माण केले आहे.”
Ukhangela konke okuphakemeyo; uyinkosi phezu kwabo bonke abantwana bokuzigqaja.