< ईयोब 41 >

1 तुला लिव्याथानाला गळ टाकून पकडता येईल का? तुला त्याची जीभ दोरीने बांधता येईल का?
なんぢ鈎をもて鱷を釣いだすことを得んや その舌を糸にひきかくることを得んや
2 तुला लिव्याथानाच्या नाकातून दोरी घालून त्यास वेसण घालता येईल का? किंवा त्याच्या जबड्यात गळ घालता येईल का?
なんぢ葦の繩をその鼻に通し また鈎をその齶に衝とほし得んや
3 लिव्याथान तुझ्याकडे सोडून देण्यासाठी याचना करील का? तो तुझ्याशी मृदू शब्दात बोलेल का?
是あに頻になんぢに願ふことをせんや 柔かになんぢに言談んや
4 लिव्याथान तुझ्याशी करार करून जन्मभर तुझा दास होऊन राहील का?
あに汝と契約を爲んや なんぢこれを執て永く僕と爲しおくを得んや
5 तू पक्ष्याशी जसा खेळशील तसा लिव्याथानाशी खेळशील का? तू त्यास दोरीने बांधशील का? तुझ्या मुली त्याच्याशी खेळू शकतील काय?
なんぢ鳥と戲むるる如くこれとたはむれ また汝の婦人等のために之を繋ぎおくを得んや
6 मच्छीमार तुझ्याकडून लिव्याथानाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील का? ते त्याचे तुकडे करून ते व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न करतील का?
また漁夫の社會これを商貨と爲して商賣人の中間に分たんや
7 तू लिव्याथानाच्या कातडीत किंवा डोक्यात बरच्या फेकशील का?
なんぢ漁叉をもてその皮に滿し 魚矛をもてその頭を衝とほし得んや
8 तू एकदा का लिव्याथानावर हात टाकलास तर पुन्हा तसे कधी करु शकणार नाहीस. ती कशा प्रकारची लढाई असेल याचा एकदा विचार कर.
手をこれに下し見よ 然ばその戰鬪をおぼえて再びこれを爲ざるべし
9 तू लिव्याथानाचा पराभव करु शकशील असे तुला वाटत असेल तर ते विसरून जा. तशा आशेला जागाच नाही. त्याच्याकडे नजर टाकताच तुझी भीतीने गाळण उडेल.
視よその望は虚し 之を見てすら倒るるに非ずや
10 १० एकही मनुष्य त्यास जागे करून त्याचा राग ओढवून घेण्याइतका शूर नाही. “माझ्याविरुध्द उभा राहणाराही कोणी नाही.
何人も之に激する勇氣あるなし 然ば誰かわが前に立うる者あらんや
11 ११ मला कोणी काही प्रथम दिले नाही म्हणून मी त्यांची परत फेड करू? या नभोमंडळाखाली जे जे आहे ते सर्व माझे आहे.
誰か先に我に與へしところありて我をして之に酬いしめんとする者あらん 普天の下にある者はことごとく我有なり
12 १२ मी तुला लिव्याथानाच्या पायांविषयी, त्याच्या शक्तीविषयी आणि त्याच्या ऐटदार बांध्याविषयी सांगेन.
我また彼者の肢體とその著るしき力とその美はしき身の構造とを言では措じ
13 १३ कोणीही त्याची कातडी छेदू शकत नाही. त्याची जबड्यांत कोणाला शिरता येईल?
誰かその外甲を剥ん 誰かその雙齶の間に入ん
14 १४ लिव्याथानाला त्याचा जबडा उघडायला कोणीही भाग पाडू शकत नाही. त्याच्या तोंडातल्या दातांची लोकांस भीती वाटते.
誰かその面の戸を開きえんや その周圍の齒は畏るべし
15 १५ लिव्याथानाच्या पाठीवर ढालीसारख्या खवल्यांच्या रांगा एकमेकांना चिकटून आहेत.
その並列る鱗甲は之が誇るところ その相闔たる樣は堅く封じたるがごとく
16 १६ ते खवले एकमेकांना इतके चिकटले आहेत की त्यातून हवासुध्दा जाऊ शकत नाही.
此と彼とあひ接きて風もその中間にいるべからず
17 १७ त्याचे खवले एकमेकांशी घटृ बांधलेले आहेत. ते एकमेकांशी इतके घटृ बांधलेले आहेत की कोणी ते ओढून वेगळे करु शकत नाही.
一々あひ連なり堅く膠て離すことを得ず
18 १८ लिव्याथान जेव्हा शिंकतो तेव्हा वीज चमकल्यासारखी वाटते. त्याचे डोळे पहाटेच्या प्रकाशासारखे चमकतात.
嚔すれば即はち光發す その目は曙光の眼瞼(を開く)に似たり
19 १९ त्याच्या तोंडातून आगीचे लोळ बाहेर पडतात. आगीच्या ठिणग्या निघतात.
その口よりは炬火いで火花發し
20 २० उकळत्या भांड्याखाली ठेवलेल्या जळत्या लव्हाळ्यातून निघतो तसा धूर त्याच्या नाकातून येतो.
その鼻の孔よりは煙いできたりて宛然葦を焚く釜のごとし
21 २१ लिव्याथानाच्या श्वासांनी कोळसे पेटतात आणि त्याच्या तोंडातून ज्वाला बाहेर पडतात.
その氣息は炭火を爇し 火燄その口より出づ
22 २२ लिव्याथानाची मान मजबूत आहे. लोक त्यास घाबरतात आणि त्याच्यापासून दूर पळत सुटतात.
力氣その頸に宿る 懼るる者その前に彷徨まよふ
23 २३ त्याच्या कातडीवर एकही मऊ भाग नाही ती लोखंडासाखी कठीण आहे.
その肉の片は密に相連なり 堅く身に着て動かす可らず
24 २४ लिव्याथानाचे हृदय पाषाणासारखे आहे. त्यास भीती वाटत नाही ते पाट्यासारखे आहे. जात्याच्या खालच्या तळीसारखे ते आहे.
その心の堅硬こと石のごとく その堅硬こと下磨のごとし
25 २५ लिव्याथान उठून उभा राहिला की शूर वीरही घाबरतात लिव्याथानाने त्यांची शेपटी हलवली की ते पळून जातात.
その身を興す時は勇士も戰慄き 恐怖によりて狼狽まどふ
26 २६ तलवारी, भाले आणि तीर त्याच्यावर फेकले तरी ते त्यास न लागता परत येतात. त्या शस्त्रांनी त्यास काहीही इजा होत नाही.
劍をもて之を撃とも利ず 鎗も矢も漁叉も用ふるところ無し
27 २७ तो लोखाडास गवताच्या काडीसारखे मोडू शकतो कुजलेले लाकूड जसे पटकन मोडते तसे तो पितळ मोडतो.
是は鐡を見ること稿のごとくし銅を見ること朽木のごとくす
28 २८ तो बाणांना घाबरुन पळून जात नाही वाळलेल्या गवताप्रमाणे दगड त्याच्यावर आपटून परत येतात.
弓箭もこれを逃しむること能はず 投石機の石も稿屑と見做る
29 २९ जेव्हा लाकडी गदा त्याच्यावर आपटली जाते तेव्हा त्यास ते गवत आपटल्याप्रमाणे वाटते. लोक त्याच्यावर भाले फेकतात तेव्हा तो हसतो.
棒も是には稿屑と見ゆ 鎗の閃めくを是は笑ふ
30 ३० लिव्याथानाच्या शरीरावरची कातडी तीक्ष्ण, टणक खापरासाखी आहे. तो चिखलात कुळक फिरवल्याप्रमाणे तास पाडतो.
その下腹には瓦礫の碎片を連ね 泥の上に麥打車を引く
31 ३१ लिव्याथान पाण्याला उकळी आल्याप्रमाणे हलवतो. तो त्यास उकळत्या तेलाच्या भांड्याप्रमाणे तो त्यावर बुडबुडे आणतो.
淵をして鼎のごとく沸かへらしめ 海をして香油の釜のごとくならしめ
32 ३२ लिव्याथान पोहतो तेव्हा तो आपल्यामागे मार्ग तयार करतो. तो पाणी ढवळून टाकतो आणि आपल्यामागे पांढरा फेस ठेवतो.
己が後に光る道を遺せば淵は白髮をいただけるかと疑がはる
33 ३३ पृथ्वीवरचा एकही पशू लिव्याथानासारखा नाही. तो एक भीतिविरहित प्राणी आहे.
地の上には是と並ぶ者なし 是は恐怖なき身に造られたり
34 ३४ लिव्याथान गर्विष्ठ प्राण्याला कमी (तुच्छ) लेखतो तो सगळ्या रानटी श्वापदांचा राजा आहे. आणि मी, परमेश्वराने त्यास निर्माण केले आहे.”
是は一切の高大なる者を輕視ず 誠に諸の誇り高ぶる者の王たるなり

< ईयोब 41 >