< ईयोब 40 >
1 १ परमेश्वर ईयोबाला नियमीत बोलत राहीला, तो म्हणाला,
PAN mówił dalej do Hioba:
2 २ “तू सर्वशक्तिमान देवाशी वाद घातलास. तू मला चूक केल्याबद्दल दोषी ठरवलेस. आता तू चुकलास हे तू कबूल करशील का? तू मला उत्तर देशील का?
Czy ten, co wiedzie spór z Wszechmogącym, będzie go pouczał? Niech na to odpowie ten, który strofuje Boga.
3 ३ मग ईयोबने परमेश्वरास उत्तर देऊन म्हटले,
Wtedy Hiob odpowiedział PANU:
4 ४ मी अगदी नगण्यआहे. मी काय बोलू? मी तुला उत्तर देऊ शकत नाही. मी माझा हात माझ्या तोंडावर ठेवतो.
Oto jestem nędzny, cóż ci odpowiem? Przyłożę swoją rękę do ust.
5 ५ पाहा, मी एकदा बोललो होतो पण आता अधिक बोलणार नाही. मी दोनदा बोललो पण मी आता अधिक बोलणार नाही.
Raz mówiłem i drugi, ale [więcej] nie odpowiem, niczego więcej nie dodam.
6 ६ नंतर परमेश्वर वादळातून पुन्हा ईयोबशी बोलला तो म्हणाला:
Nadto PAN odpowiedział Hiobowi spośród wichru:
7 ७ तू आता कंबर कसून उभा राहा आणि मी जे प्रश्र विचारतो त्याची उत्तरे द्यायला सिध्द हो.
Przepasz teraz swe biodra jak mężczyzna: będę cię pytał, a ty mnie pouczysz.
8 ८ मी न्यायी नाही असे तुला वाटते का? मी काही चूक केल्याचा आरोप करून तू स्वत: चे निरपराधित्व सिध्द करु पाहत आहेस.
Czy chcesz wniwecz obrócić mój sąd? Czy potępisz mnie, aby usprawiedliwić samego siebie?
9 ९ तुझे बाहू देवाच्या बाहूइतके शक्तीशाली आहेत का? देवाच्या आवाजासारखा तुझा आवाज गडगडाटी आहे का?
Czy masz ramię jak Bóg? Czy zagrzmisz głosem jak on?
10 १० तू स्वत: ला महीमा व प्रताप यांचे भुषण कर, तेज व वैभव हे धारण कर.
Ozdób się teraz w majestat i dostojeństwo, przyoblecz się w chwałę i piękno.
11 ११ तुझ्या रागाला भरती येवू दे, आणि प्रत्येक गर्वीष्ठास तू खाली आण आणि गर्विष्ठ लोकांस शिक्षा करु शकतोस. गर्विष्ठांना मान खाली घालायला लावू शकतोस.
Rozlej swój gwałtowny gniew, spójrz na każdego pysznego i poniż go.
12 १२ होय त्या गर्विष्ठांकडे बघ आणि त्यांना नम्र कर वाईट लोकांस जागच्या जागी चिरडून टाक.
Spójrz na każdego pysznego i upokórz go, zdepcz niegodziwych na ich miejscu.
13 १३ त्यांना चिखलात पुरुन टाक त्यांचे तोंडे काळोखात राहतील असे त्यांना बांधून टाक.
Zakryj ich razem w prochu, zamknij w ukryciu ich oblicza.
14 १४ मग मी तुझी सत्यता जाणेल, मग तुझाच उजवा हात तुझा बचाव करील.
Wtedy i ja ci wyznam, że twoja prawica może cię wybawić.
15 १५ तू बेहेमोथ कडे बघ. मी तुला आणि बेहेमोथला एकाच वेळी निर्माण केले. तो बैलासारखे गवत खातो.
Oto behemot, którego stworzyłem wraz z tobą; je trawę jak wół.
16 १६ त्याच्या अंगात बरीच शक्ती आहे. त्याच्या पोटातले स्नायू खूप बळकट आहेत.
Oto jego siła jest w jego biodrach, a jego moc w pępku jego brzucha.
17 १७ त्याची शेपटी गंधसरूच्या झाडासारखी उभी राहते. त्याच्या पायातले स्नायूही बळकट आहेत.
Rusza swoim ogonem jak cedrem, ścięgna jego bioder są splecione.
18 १८ त्याची हाडे पितळेसारखी बळकट आहेत. त्यांचे पाय म्हणजे जणू लोखंडाच्या कांबी.
Jego kości jak rury spiżowe; jego kości jak drągi żelazne.
19 १९ बेहेमोथ हा अतिशय आश्चर्यकारक प्राणी मी निर्माण केला आहे. परंतु मी त्याचा पराभव करु शकतो.
On jest przednim dziełem Boga. Ten, który go uczynił, sam może na niego natrzeć swoim mieczem.
20 २० डोंगरावर जिथे जंगली श्वापदे खेळतात तिथले गवत खातो.
Żywność dostarczają mu góry, gdzie wszystkie polne zwierzęta hasają.
21 २१ तो कमळाच्या झाडाखाली झोपतो. दलदलीतल्या लव्हाळ्यात लपतो.
Leży pod cienistymi drzewami, w ukryciu trzcin i bagien.
22 २२ कमळाचे झाड त्यास आपल्या सावलीत लपवते तो नदीजवळ उगवणाऱ्या एका वृक्षाखाली (विलोवृक्ष) राहतो.
Drzewa cieniste osłaniają go cieniem, wierzby potoku otaczają go.
23 २३ नदीला पूर आला तर बेहेमोथ पळून जात नाही यार्देन नदीचा प्रवाह त्याच्या तोंडावर आदळला तरी तो घाबरत नाही विश्वासात स्थिर राहतो.
Oto wypija rzekę i nie spieszy się, będąc pewny, że może wchłonąć Jordan do swojej paszczy.
24 २४ त्यास कोणी गळ टाकून धरू शकेल. किंवा त्यास सापळ्यात अडकवू शकेल.”
Czy można go złapać za oczy albo powrozy przeciągnąć mu przez nozdrza?