< ईयोब 4 >
1 १ अलीफज तेमानीने उत्तर दिले आणि तो म्हणाला,
時にテマン人エリパズ答へて曰く
2 २ “जर कोणी तुझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, तर तू दु: खी होशील का? परंतू बोलण्यापासून स्वत: ला कोण आवरेल?
人もし汝にむかひて言詞を出さば汝これを厭ふや 然ながら誰か言で忍ぶことを得んや
3 ३ पाहा, तू पुष्कळांना शिकवले आहेस. तू अशक्त हातांना शक्ती दिली आहेस.
さきに汝は衆多の人を誨へ諭せり 手の埀たる者をばこれを強くし
4 ४ तू तुझ्या शब्दांनी खाली पडणाऱ्यांना सावरले आहेस. तू अशक्त गुडघे बळकट केले आहेस.
つまづく者をば言をもて扶けおこし 膝の弱りたる者を強くせり
5 ५ पण आता संकटे तुझ्यावर आली आहेत, आणि तू खचला आहेस, ते तुला स्पर्श करतात. आणि तू त्रासात पडतोस.
然るに今この事汝に臨めば汝悶え この事なんぢに加はれば汝おぢまどふ
6 ६ तुझ्या देवभिरूपणाची तुला खात्री नाही काय, तुझी सात्वीकत्ता तुझ्या आशेचे मार्ग नाही काय?
汝は神を畏こめり 是なんぢの依賴む所ならずや 汝はその道を全うせり 是なんぢの望ならずや
7 ७ मी तुला विंनती करतो, कोणी निष्पाप कधी नाश पावला का? किंवा चांगल्या लोकांचा कधी नि: पात झाला का? याच्या विषयी तू विचार कर.
請ふ想ひ見よ 誰か罪なくして亡びし者あらん 義者の絶れし事いづくに在や
8 ८ मी असे पाहीले आहे की जे घोर अन्यायाची नांगरणी करीतात, आणि कष्ट पेरतात ते तशीच कापणी करतात.
我の觀る所によれば不義を耕へし惡を播く者はその穫る所も亦是のごとし
9 ९ देवाच्या श्वासाने ते नाश पावतात. त्याच्या रागाने ते भस्म होतात.
みな神の氣吹によりて滅びその鼻の息によりて消うす
10 १० सिंहाची गर्जना, सिंहाचा विक्राळ ध्वनी नष्ट होतो, तरूण सिंहाचे दात उपटले जातात.
獅子の吼 猛き獅子の聲ともに息み 少き獅子の牙折れ
11 ११ म्हातारा सिंह शिकार न मिळाल्यामुळे मरण पावतो, सिंहिणीचे छावे सगळीकडे पांगतात
大獅子獲物なくして亡び小獅子散失す
12 १२ आता माझ्याकडे एक गुप्त निरोप आला, आणि माझ्या कानी त्याची कुजबुज पडली.
前に言の密に我に臨めるありて我その細聲を耳に聞得たり
13 १३ जेव्हा लोक गाढ झोपेत असतात, मी रात्रीच्या दृष्टांताच्या विचारात असतो,
即ち人の熟睡する頃我夜の異象によりて想ひ煩ひをりける時
14 १४ मी घाबरलो आणि माझा थरकाप झाला. माझी सगळी हाडे थरथरा कापू लागली.
身に恐懼をもよほして戰慄き 骨節ことごとく振ふ
15 १५ एक आत्मा अगदी माझ्या चेहऱ्याजवळून गेला आणि माझ्या शरीरावरचे केस उभे राहिले.
時に靈ありて我面の前を過ければ我は身の毛よだちたり
16 १६ तो आत्मा निश्चल उभा राहिला, पण त्याचा आकार मला दिसू शकला नाही, माझ्या डोळ्यांसमोर एक आकार होता, तेथे शांतता होती आणि वाणी असे बोलताना मी ऐकली.
その物立とまりしが我はその状を見わかつことえざりき 唯一の物の象わが目の前にあり 時に我しづかなる聲を聞けり云く
17 १७ मर्त्य मनुष्य देवापेक्षा नितीमान असू शकतो काय? मनुष्य त्याच्या निर्मात्यापेक्षा अधिक शुद्ध असू शकतो काय?
人いかで神より正義からんや 人いかでその造主より潔からんや
18 १८ पाहा, जर देव त्याच्या सेवकावर विश्वास ठेवत नाही. जर त्यास त्याच्या दूतांमध्ये काही दोष आढळतो,
彼はその僕をさへに恃みたまはず 其使者をも足ぬ者と見做たまふ
19 १९ तर जे मातीच्या घरात राहतात त्यांच्याविषयी हे किती सत्य आहे, ज्यांच्या घरांचा पाया धुळीत आहे, ते पंतगासारखे तितक्या लवकर चिरडले जातात?
况んや土の家に住をりて塵を基とし蜉蝣のごとく亡ぶる者をや
20 २० आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते नाश पावतात, ते कायमचे नष्ट होतात व कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही.
是は朝より夕までの間に亡びかへりみる者もなくして永く失逝る
21 २१ त्यांच्या तंबूच्या दोऱ्या वर खेचल्या जात नाही काय? ते मरतात, शहाणपणा न मिळवताच मरतात.”
その魂の緒あに絶ざらんや皆悟ること無して死うす