< ईयोब 39 >
1 १ रानशेळी कधी व्यायतात ते तुला माहीत आहे का? हरीणी आपल्या बछड्याला जन्म देताना तू पाहिले आहेस का?
Steingeiti, veit du når ho kidar? Vaktar du riderne åt hindi?
2 २ पहाडी बकरी आणि हरीणी किती महिने आपल्या पिलांना पोटात वाढवतात ते तुला माहीत आहे का? त्यांची जन्माला यायची वेळ कोणती ते तुला माहीत आहे का?
Tel måna’rne dei gjeng med unge, og kjenner du deira fødetid?
3 ३ ते प्राणी लोळतात प्रसूतिवेदना सहन करतात आणि त्यांची पिल्ले जन्माला येतात.
Dei bøygjer seg, fø’r sine ungar, so er det slutt med deira rider.
4 ४ ती बछडी शेतात मोठी होतात. नंतर ती सोडून जातात आणि पुन्हा कधीही परतून येत नाहीत.
På marki kidi veks seg store, spring burt og kjem’kje att til deim.
5 ५ रानटी गाढवांना कोणी सोडून दिले? त्यांची दोरी सोडून त्यांना कोणी मोकळे केले?
Kven let villasnet renna fritt, tok bandet av det skjerre dyr,
6 ६ ज्याला मी वाळवंटात घर दिले, मी त्यांना राहण्यासाठी क्षारभूमी दिली.
som eg gav øydemark til heim, den salte steppa til ein bustad?
7 ७ गजबजलेल्या शहरांना हसतात (त्याला शहरातला गजबजाट आवडत नाही) आणि त्यांना कुठलाही मनुष्य आव घालू शकत नाही.
Det lær åt byen med sitt ståk, slepp høyra skjenn frå drivaren.
8 ८ ते डोंगरात राहतात तेच त्यांचे कुरण आहे. ते आपले अन्न तिथेच शोधतात.
Det finn seg beite millom fjell, og leitar upp kvart grøne strå.
9 ९ रानटी बैल तुझी सेवा करायला तयार होईल का? तो रात्री तुझ्या खळ्यावर राहील का?
Skal tru villuksen vil deg tena, og natta yver ved di krubba?
10 १० दोरीने तुला रानटी बैलाला ताब्यात करता येईल काय? आणि तू त्यास तुझे शेत नांगरायला लावू शकशील का?
Kann du til fori honom tøyma, horvar han dalar etter deg?
11 ११ तो खूप बलवान असतो त्याच्यावर तू भरवसा ठेवशील काय, तू तुझे काम त्यांच्यानवर सोपवशील का?
Lit du på honom for hans styrke? Og yverlet du han ditt arbeid?
12 १२ तो तुझे धान्य शेतातून गोळा करेल आणि खळ्यात नेईल असा भरवसा तुला वाटतो का?
Trur du han til å føra grøda heim og draga henne inn i løda?
13 १३ “शहामृगी आपले पंख आनंदाने फडफडवते परंतु तिला उडता येत नाही तिचे पंख आणि पिसे माया करायच्या कामी पडतात काय?
Struss-hoa flaksar kåt med vengen, men viser fjør og veng morskjærleik?
14 १४ ती आपली अंडी जमिनीत घालते आणि ती वाळूत उबदार होतात.
Nei, ho legg sine egg på jordi, og let so sanden verma deim;
15 १५ आपल्या अंड्यांवरुन कोणी चालत जाईल किंवा रानटी प्राणी ती फोडतील हे ती विसरते.
ho gløymer at ein fot kann treda og villdyr trakka deim i kras.
16 १६ ती आपल्या पिलांना सोडून जाते ती जणू स्वत: ची नाहीतच असे ती वागते. तिची पिल्ले मरण पावली तरी तिला त्याची पर्वा नसते काम निष्कळ झाल्याचे सुखदु: ख तिला नसते.
Hardt fer ho åt med sine ungar, som var dei ikkje hennar eigne; for fåfengt stræv ho ikkje ræddast.
17 १७ कारण मी देवाने तिला शहाणे केले नाही. आणि मीच तिला समज दिली नाही.
For Gud let henne gløyma visdom, han ei tiletla henne vit.
18 १८ परंतु ती जेव्हा पळण्यासाठी उठते तेव्हा ती घोड्याला आणि घोडेस्वाराला हसते,
Men når ho baskar seg i veg, ho lær åt både hest og mann.
19 १९ तू घोड्याला त्याची शक्ती दिलीस का? तू त्याच्या मानेवर त्याची आयाळ ठेवलीस का?
Skal tru um du gjev hesten kraft og klæder halsen hans med mån?
20 २० तू त्यास टोळाप्रमाणे लांब उडी मारायला सांगितलेस का? तो जोरात फुरफुरतो आणि लोक त्यास घाबरतात.
Let du han som grashoppen springa alt med han frøser skræmeleg.
21 २१ तो बलवान आहे म्हणून आनंदात असतो. तो आपल्या खुराने जमीन उकरतो आणि धावत युध्दभूमीवर जातो.
Glad i si kraft han marki skrapar og fer so fram mot væpna flokk.
22 २२ तो भीतीला हसतो, तो कशालाही भीत नाही तो युध्दातून कधीही पळ काढीत नाही.
Han urædd er og lær åt rædsla, for sverdet ei han vender um,
23 २३ सैनिकाचा भाता त्याच्या बाजूला हलत असतो त्याचा स्वार जे भाले आणि इतर शस्त्रे बाळगतो ते उन्हात चमकतात.
det skranglar pilhus yver honom, det blenkjer spjot til styng og skot.
24 २४ तो फार अनावर होतो. तो जमिनीवर जोरात धावतो तो जेव्हा रणशिंग फुंकलेले ऐकतो तेव्हा तो एका स्थळी स्थिर राहू शकत नाही.
Med ståk og bråk han slukar jordi, ustyrleg når stridsluren gjeng.
25 २५ रणशिंग ऐकू येते तेव्हा घोडा घाई करतो. त्यास दुरुनही लढाईचा वास येतो. सेनापतींनी दिलेल्या आज्ञा आणि युध्दातले इतर अनेक आवाज त्यास ऐकू येतात.
Han kneggjar: «Hui!» når luren læt, han verar striden langan leid, med skrik frå hovdingar og herrop!
26 २६ तू ज्ञानाने तू ससाण्याला पंख पसरुन दक्षिणेकडे उडायला शिकवलेस का?
Flyg hauken upp ved ditt forstand og spilar vengjerne mot sud?
27 २७ आकाशात गरुडाला उंच उडायला शिकवणारा तूच का? तूच त्यास त्याचे घरटे उंच पहाडावर बांधायला सांगितलेस का?
Stig ørnen høgt av di du byd, og byggjer reiret sitt i høgdi?
28 २८ तो उंच सुळक्यावर राहतो तीच त्याची तटबंदी आहे
Han bur på berg og held seg der, på kvasse tind og høge nut.
29 २९ त्याच्या तटबंदीवरुन आपले भक्ष्य शोधतो. गरुडाला एवढ्या उंचीवरुन आपले भक्ष्य दिसू शकते.
Derfrå han spæjar etter mat, hans augo yver viddi skodar.
30 ३० जेथे लोक मरण पावलेले असतात तेथे त्यांची पिल्ले रक्त पितात.”
Hans ungar gløypar i seg blod; der det finst lik, der er han og.»