< ईयोब 37 >

1 “खरोखर हे ऐकूण माझे हृदय थरथरते, ते त्याच्या जागेवरून सरकले आहे.
אַף־לְ֭זֹאת יֶחֱרַ֣ד לִבִּ֑י וְ֝יִתַּ֗ר מִמְּקוֹמֽוֹ׃
2 ऐका! हो ऐका! देवाच्या आवाजाची गर्जना ऐका, देवाच्या मुखातून येणारा ध्वनी ऐका.
שִׁמְע֤וּ שָׁמ֣וֹעַ בְּרֹ֣גֶז קֹל֑וֹ וְ֝הֶ֗גֶה מִפִּ֥יו יֵצֵֽא׃
3 देव त्याच्या विजेला सर्व आकाशात चमकण्यासाठी पाठवतो. ती सर्व पृथ्वीभर चमकते.
תַּֽחַת־כָּל־הַשָּׁמַ֥יִם יִשְׁרֵ֑הוּ וְ֝אוֹר֗וֹ עַל־כַּנְפ֥וֹת הָאָֽרֶץ׃
4 त्यानंतर आवाजाची गर्जना होते, देव त्याच्या वैभवी आवाजात गर्जतो. वीज चमकल्यानंतर देवाची गर्जना ऐकू येते.
אַחֲרָ֤יו ׀ יִשְׁאַג־ק֗וֹל יַ֭רְעֵם בְּק֣וֹל גְּאוֹנ֑וֹ וְלֹ֥א יְ֝עַקְּבֵ֗ם כִּֽי־יִשָּׁמַ֥ע קוֹלֽוֹ׃
5 देवाचा गडगडाटी आवाज अद्भुत आहे. देव आपल्याला न कळणाऱ्या महान गोष्टी करत असतो.
יַרְעֵ֤ם אֵ֣ל בְּ֭קוֹלוֹ נִפְלָא֑וֹת עֹשֶׂ֥ה גְ֝דֹל֗וֹת וְלֹ֣א נֵדָֽע׃
6 तो हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतो. ‘पावसास पृथ्वीवर जोरात पड असे सांगतो.’
כִּ֤י לַשֶּׁ֨לַג ׀ יֹאמַ֗ר הֱוֵ֫א אָ֥רֶץ וְגֶ֥שֶׁם מָטָ֑ר וְ֝גֶ֗שֶׁם מִטְר֥וֹת עֻזּֽוֹ׃
7 देवाने निर्माण केलेल्या सर्व लोकांस तो काय करु शकतो हे कळावे म्हणून देव या गोष्टी करतो हा त्याचा पुरावा आहे.
בְּיַד־כָּל־אָדָ֥ם יַחְתּ֑וֹם לָ֝דַ֗עַת כָּל־אַנְשֵׁ֥י מַעֲשֵֽׂהוּ׃
8 म्हणून पशू लपण्यास जातात, आणि त्यांच्या गूहेत राहतात.
וַתָּבֹ֣א חַיָּ֣ה בְמוֹ־אָ֑רֶב וּבִמְע֖וֹנֹתֶ֣יהָ תִשְׁכֹּֽן׃
9 दक्षिणेकडून चक्रीवादळ येते उत्तरेकडून थंड वारे येतात.
מִן־הַ֭חֶדֶר תָּב֣וֹא סוּפָ֑ה וּֽמִמְּזָרִ֥ים קָרָֽה׃
10 १० देवाच्या नि: श्वासाने बर्फ दिल्या जाते आणि पाण्याच्या विस्तार धातूसारखा गोठून जातो.
מִנִּשְׁמַת־אֵ֥ל יִתֶּן־קָ֑רַח וְרֹ֖חַב מַ֣יִם בְּמוּצָֽק׃
11 ११ खरोखर, देव गडद ढगांना पाण्याने भरतो तो आपल्या विजेचा ढग चोहोकडे पसरवतो.
אַף־בְּ֭רִי יַטְרִ֣יחַ עָ֑ב יָ֝פִ֗יץ עֲנַ֣ן אוֹרֽוֹ׃
12 १२ तो ढगांना सर्व पृथ्वीभर त्याच्या मार्गदर्शनाने पसरण्याची आज्ञा करतो देव जी आज्ञा देतो ती त्यांनी सर्व पृथ्वीच्या पाठीवर पाळावी.
וְה֤וּא מְסִבּ֨וֹת ׀ מִתְהַפֵּ֣ךְ בְּתַחְבּוּלֹתָ֣יו לְפָעֳלָ֑ם כֹּ֖ל אֲשֶׁ֥ר יְצַוֵּ֓ם ׀ עַל־פְּנֵ֖י תֵבֵ֣ל אָֽרְצָה׃
13 १३ काही वेळा हे सुधारणुक करण्यासाठी असते, काहीवेळा त्यांच्या भूमीसाठी, हे सर्व तो घडवून आणतो, आणि काहीवेळा विश्वासाच्या कराराची कृती असते
אִם־לְשֵׁ֥בֶט אִם־לְאַרְצ֑וֹ אִם־לְ֝חֶ֗סֶד יַמְצִאֵֽהוּ׃
14 १४ ईयोबा, याकडे लक्ष दे, थांब आणि देव ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्यांचा विचार कर.
הַאֲזִ֣ינָה זֹּ֣את אִיּ֑וֹב עֲ֝מֹ֗ד וְהִתְבּוֹנֵ֤ן ׀ נִפְלְא֬וֹת אֵֽל׃
15 १५ देव ढगांवर आपला अधिकार कसा गाजवतो ते तुला माहीत आहे का? तो विजेला कसे चमकावितो ते तुला माहीत आहे का?
הֲ֭תֵדַע בְּשׂוּם־אֱל֣וֹהַּ עֲלֵיהֶ֑ם וְ֝הוֹפִ֗יעַ א֣וֹר עֲנָנֽוֹ׃
16 १६ ढग आकाशात कसे तरंगतात ते तुला कळते का? देव जो ज्ञानाने परिपूर्ण त्याचे आश्चर्यकर्म तू जाणतोस काय?
הֲ֭תֵדַע עַל־מִפְלְשֵׂי־עָ֑ב מִ֝פְלְא֗וֹת תְּמִ֣ים דֵּעִֽים׃
17 १७ तुझे कपडे गरम कसे होतात हे तुला समजते काय, दक्षिणेकडून वारे वाहते तेव्हा सगळे काही स्तब्ध असते.
אֲשֶׁר־בְּגָדֶ֥יךָ חַמִּ֑ים בְּהַשְׁקִ֥ט אֶ֝֗רֶץ מִדָּרֽוֹם׃
18 १८ तो जसे आकाश पसरवतो तसे तू करू शकतो काय? जे आकाश ओतीव आरशाप्रमाणे अढळ आहे?
תַּרְקִ֣יעַ עִ֭מּוֹ לִשְׁחָקִ֑ים חֲ֝זָקִ֗ים כִּרְאִ֥י מוּצָֽק׃
19 १९ देवाला आम्ही काय सांगायचे ते तू आम्हांला सांग. अंधारामुळे आम्हास आमचे भाषण रचता येत नाही.
ה֭וֹדִיעֵנוּ מַה־נֹּ֣אמַר ל֑וֹ לֹ֥א־נַ֝עֲרֹ֗ךְ מִפְּנֵי־חֹֽשֶׁךְ׃
20 २० मला त्याच्याशी बोलायचे आहे असे तो म्हणाला काय? तसे म्हणणे म्हणजे स्वत: चा नाश करून घेणे आहे.
הַֽיְסֻפַּר־ל֭וֹ כִּ֣י אֲדַבֵּ֑ר אִֽם־אָ֥מַר אִ֝֗ישׁ כִּ֣י יְבֻלָּֽע׃
21 २१ आता, लोक सुर्य जेव्हा तापत असतो त्यावेळी लोक त्याकडे आकाशात बघू शकत नाही वाऱ्याने ढग पळवून लावले की तो स्वच्छ आणि चकचकीत दिसतो.
וְעַתָּ֤ה ׀ לֹ֘א רָ֤אוּ א֗וֹר בָּהִ֣יר ה֭וּא בַּשְּׁחָקִ֑ים וְר֥וּחַ עָ֝בְרָ֗ה וַֽתְּטַהֲרֵֽם׃
22 २२ उत्तरेकडून सोनेरी वैभव येते, देवाच्या भोवती भितीदायक तेजोवलय असते.
מִ֭צָּפוֹן זָהָ֣ב יֶֽאֱתֶ֑ה עַל־אֱ֝ל֗וֹהַּ נ֣וֹרָא הֽוֹד׃
23 २३ जो सर्वशक्तिमान तो महान आहे आपणाला त्याचा शोध लागत नाही, तो सामर्थ्यवान आहे न्यायाने वागतो. तो लोकांस त्रास देत नाही.
שַׁדַּ֣י לֹֽא־מְ֭צָאנֻהוּ שַׂגִּיא־כֹ֑חַ וּמִשְׁפָּ֥ט וְרֹב־צְ֝דָקָ֗ה לֹ֣א יְעַנֶּֽה׃
24 २४ म्हणूनच लोक त्याचे भय धरतात. परंतु देव आपल्या शहाणपणाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांस मान देत नाही.”
לָ֭כֵן יְרֵא֣וּהוּ אֲנָשִׁ֑ים לֹֽא־יִ֝רְאֶ֗ה כָּל־חַכְמֵי־לֵֽב׃ פ

< ईयोब 37 >