< ईयोब 36 >
1 १ अलीहू बोलणे चालू ठेवून म्हणाला,
Elihu akaendelea kusema:
2 २ “तू मला आणखी थोडे बोलण्याची परवानगी दे कारण मला देवाच्या बाजूने आणखी बोलायचे आहे.
“Nivumilie kidogo zaidi nami nitakuonyesha kwamba yako mengi zaidi ya kusemwa kwa ajili ya Mungu.
3 ३ मी माझे ज्ञान सगळ्यांना वाटतो देवाने मला निर्माण केले आणि देव न्यायी आहे हे मी सिध्द करेन.
Ninayapata maarifa yangu kutoka mbali, nami nitamhesabia haki Muumba wangu.
4 ४ खरोखर, माझे शब्द खोटे असणार नाहीत, कोणीतरी ज्ञानाने समजूतदार असा तुम्हाबरोबर आहे.
Uwe na hakika kwamba maneno yangu si ya uongo; mmoja aliye mkamilifu katika maarifa yuko pamoja na wewe.
5 ५ देव अतिशय सामर्थ्यवान आहे, पण तो लोकांचा तिरस्कार करीत नाही तो सामर्थ्यवान असून फार सूज्ञ आहे.
“Mungu ni mwenye nguvu, lakini hamdharau mwanadamu; ni mwenye nguvu, naye ni thabiti katika shauri lake.
6 ६ तो दुष्टांना वाचवीत नाही, तर तो त्याऐवजी जे दुःखात आहेत त्यांच्यासाठी चांगले ते करतो.
Hawaachi waovu waendelee kuishi, bali huwapa walioteswa haki yao.
7 ७ जे लोक योग्य रीतीने वागतात त्यांच्यावर देव नजर ठेवतो. तो चांगल्या लोकांस राज्य करु देतो. तो चांगल्यांना सदैव उंच करतो.
Yeye haondoi macho yake kwa wenye haki; huwaketisha penye viti vya enzi pamoja na wafalme na kuwatukuza milele.
8 ८ जर, साखळदंडानी ठेवले, जर त्यांना त्रासाच्या दोऱ्यांनी बांधून ठेवले
Lakini ikiwa watu wamefungwa kwenye minyororo, wakiwa wameshikiliwa na kamba za mateso,
9 ९ आणि त्यांनी काय चूक केली ते देव त्यांना सांगेल. देव त्यांना सांगेल की त्यांनी पाप केले आहे. देव त्यांना ते गर्विष्ठ होते असे सांगेल.
huwaonyesha yale waliyoyatenda, kwamba wametenda dhambi kwa majivuno.
10 १० तो त्यांचे कान त्याच्या सूचना ऐकण्यास उघडतो, तो त्यांना अन्यायापासून मागे वळवतो.
Huwafanya wao kusikia maonyo, na huwaagiza kutubu uovu wao.
11 ११ जर त्या लोकांनी देवाचे ऐकले, त्याची उपासना करतील, तर ते त्यांचे दिवस सुखाने घालतील.
Kama wakitii na kumtumikia, wataishi siku zao zilizobaki katika mafanikio, na miaka yao katika utoshelevu.
12 १२ परंतु जर त्यांनी ऐकले नाही तर ते तलवारीने नाश पावतील, त्यांना ज्ञान न होता मरण येईल.
Lakini wasiposikiliza, wataangamia kwa upanga, nao watakufa pasipo maarifa.
13 १३ जे लोक देवाची पर्वा करीत नाहीत ते सदा कटू (रागावलेले) असतात. देवाने जरी त्यांना बांधले तरी ते देवाकडे मदत मागायला तयार नसतात.
“Wasiomcha Mungu moyoni mwao huficha chuki; hata anapowafunga, hawamwombi msaada.
14 १४ ते अगदी तरुणपणी मरतील, त्यांचे जीवन कंलकीत होऊन संपेल.
Wanakufa wangali vijana, miongoni mwa wanaume hanithi wa mahali pa kuabudia miungu.
15 १५ परंतु देव दु: खी लोकांस त्यांच्या दु: खातून सोडवील विपत्तीच्या द्वारे कानउघडणी करतो.
Bali wao wanaoteseka huwaokoa katika mateso yao, na kuzungumza nao katika dhiki zao.
16 १६ खरोखर, त्यास तुला दुःखातून काढायला आवडते व अडचण नसलेल्या मोकळ्या जागी नेतो, आणि तुझ्या जेवणाच्या टेबलावर भरपूर पौष्टीक अन्न ठेवले असते.
“Yeye anakubembeleza utoke katika mataya ya dhiki, ili kukuweka mahali palipo na nafasi mbali na kizuizi, hadi kwenye meza yako ya faraja iliyojaa vyakula vizuri.
17 १७ परंतु आता तुला अपराधी ठरवण्यात आले आहे, दोषारोप व न्याय तुलाच धरतात.
Lakini sasa umelemewa na hukumu kwa ajili ya uovu; hukumu na haki vimekukamata.
18 १८ तू श्रीमंतीमुळे मूर्ख बनू नकोस. लाच तुला न पकडो आणि न्यायापासून दूर घेवून जावो.
Uwe mwangalifu ili yeyote asikushawishi kwa utajiri; usipotoshwe kwa fungu kubwa la rushwa.
19 १९ आता तुझ्या सपंत्तीचा तुला काही नफा होईल काय, म्हणजे तू दुःखी होणार नाहीस किंवा तुझ्या सर्व सामर्थ्याचा तुला काही उपयोग होईल काय?
Je, utajiri wako hata nguvu zako nyingi vinaweza kukusaidia usiingie kwenye dhiki?
20 २० दुसऱ्या विरूद्ध पाप करण्यास तू रात्र होण्याची इच्छा मनी बाळगू नकोस, लोक रात्री पसार होण्याची वेळ प्रयत्न करतात.
Usiutamani usiku uje, ili uwaburute watu mbali na nyumba zao.
21 २१ काळजीपूर्वक रहा पापाकडे वळू नकोस. कारण तुझी त्रासातून परीक्षा झाली आहे, म्हणून तू पापापासुन दूर रहा.
Jihadhari usigeukie uovu, ambao unaupenda zaidi kuliko mateso.
22 २२ पाहा, देव त्याच्या सामर्थ्याने सर्वोच्च आहे. त्याच्या समान कोण शिक्षक आहे?
“Mungu ametukuzwa katika nguvu zake. Ni nani aliye mwalimu kama yeye?
23 २३ त्याच्या मार्गाबद्दल त्यास कोण सुचीत करील? ‘देवा तू अयोग्य केलेस’ असे कोणी त्यास म्हणू शकत नाही.
Ni nani aliyemwelekeza katika njia zake, au kumwambia, ‘Wewe umetenda yasiyo sawa’?
24 २४ त्याने जे काही केले त्याबद्दल लोकांनी त्याच्या स्तुतीवर अनेक गाणी रचली आहेत.
Kumbuka kuzitukuza kazi zake, ambazo watu wamezisifu katika wimbo.
25 २५ त्याने कार्य केले ते प्रत्येक मनुष्याला दिसते. दूरदूरच्या देशांतील लोकांसही देवाचे महान कार्य दिसतात.
Wanadamu wote wameiona; watu wanaikazia macho kwa mbali.
26 २६ होय, देव महान आहे परंतु त्याची महानता आपल्याला कळत नाही. आम्ही त्याच्या वर्षाची संख्या पाहाणे अशक्य आहे.
Tazama jinsi Mungu alivyo mkuu, kupita ufahamu wetu! Hesabu ya miaka yake haitafutiki.
27 २७ तो पृथ्वीवरुन पाणी घेऊन त्याचे धुके आणि पाऊस यामध्ये रुपांतर करतो.
“Yeye huvuta juu matone ya maji, ayachujayo kama mvua kutoka kwenye vijito;
28 २८ अशा रीतीने ढग पाऊस पाडतात आणि तो खूप लोकांवर पडतो.
mawingu huangusha chini maji yake, nayo mvua nyingi huwanyeshea wanadamu.
29 २९ खरोखर, तू समजो शकतो का तो ढगांची पाखरण कशी करतो आकाशात ढगांचा गडगडाट कसा होतो?
Ni nani ajuaye jinsi ayatandazavyo mawingu, jinsi angurumavyo kutoka hemani mwake.
30 ३० बघ, तो विजेला पृथ्वीवर सर्वदूर पाठवतो आणि समुद्राचा खोल भागही त्यामध्ये येतो.
Tazama jinsi anavyotandaza umeme wa radi kumzunguka, naye huvifunika vilindi vya bahari.
31 ३१ तो त्याचा उपयोग राष्ट्रांना काबूत ठेवण्यासाठी करतो आणि त्यांना भरपूर अन्न देतो.
Hivi ndivyo atawalavyo mataifa, na kuwapa chakula kwa wingi.
32 ३२ तो आपल्या हातांनी विजेला पकडतो आणि त्यास हवे तेथे पडण्याची तिला आज्ञा करतो.
Huujaza mkono wake kwa umeme wa radi, na kuuagiza kulenga shabaha yake.
33 ३३ मेघांच्या गडगडाटामुळे वादळाची सूचना मिळते. जनावरांना सुध्दा वादळाची चाहूल लागते.”
Ngurumo zake hutangaza dhoruba inayokuja; hata mifugo hujulisha kukaribia kwake.