< ईयोब 35 >
1 १ अलीहूने आपले बोलणे चालू ठेवले. तो म्हणाला,
and to answer Elihu and to say
2 २ “तू निष्पाप आहे असा तू विचार करतोस काय? मी देवापेक्षा अधीक नितीमान आहे असा तू विचार करतोस काय?
this to devise: think to/for justice to say righteousness my from God
3 ३ तू देवाला विचारतोस ‘जर मी नितीमान असण्याचा मला काय लाभ मिळेल? मी जर पाप केले नाहीतर त्यामुळे माझे काय चांगले होणार आहे?’
for to say what? be useful to/for you what? to gain from sin my
4 ४ मी तुला उत्तर देतो, तू आणि तुझे मित्र यांना देखील.
I to return: return you speech and [obj] neighbor your with you
5 ५ वरती आकाशाकडे बघ, तुझ्यापेक्षा उंच असणाऱ्या ढगांकडे बघ.
to look heaven and to see: see and to see cloud to exult from you
6 ६ जर तू पाप केलेस तर त्यामुळे देवाला कसली इजा होत नाही? तुझ्याकडे पापांच्या राशी असल्या तरी त्यामुळे देवाला काही होत नाही?
if to sin what? to work in/on/with him and to multiply transgression your what? to make: do to/for him
7 ७ आणि तू खूप नितीमान असलास तरी तू देवाला काही देऊ शकत नाहीस? तुझ्याहातून त्यास काहीच मिळत नाही?
if to justify what? to give: give to/for him or what? from hand your to take: recieve
8 ८ तुझे दुष्टपण कदाचित मनुष्यास ईजा पोहचवेल, जसा तू मनुष्य आहेस, आणि तुझे नितीमत्वाचा कदाचीत एखाद्या मनुष्याच्या पुत्राला लाभ होईल.
to/for man like you wickedness your and to/for son: child man righteousness your
9 ९ पुष्कळशा वाईट कृत्यामुळे लोकांस दु: ख झाले तर ते ओरडतील. ते सामर्थ्यवान लोकांकडे जातात आणि मदतीची याचना करतात.
from abundance oppression to cry out to cry from arm many
10 १० परंतु कोणीही असे म्हणणार नाहीत, मला निर्माण करणारा देव कुठे आहे? जो रात्रीला गीत देतो,
and not to say where? god to make me to give: give song in/on/with night
11 ११ ‘देवाने आम्हास आकाशातील पशुपक्ष्यांपेक्षा शहाणे बनवले आहे तेव्हा तो कुठे आहे?’ पृथ्वीवरील जंगली प्राण्यापेक्षा जो मला अधीक शिकवतो,
to teach/learn us from animal land: soil and from bird [the] heaven be wise us
12 १२ त्यामुळे त्यांनी देवाकडे मदत मागितली तरी देव त्यांना उत्तर देणार नाही कारण ते लोक अतिशय गर्विष्ठ आहेत.
there to cry and not to answer from face: because pride bad: evil
13 १३ देव त्यांच्या तुच्छ याचनेकडे लक्ष देणार नाही सर्वशक्तिमान देव त्यांच्याकडे लक्ष देणार नाही.
surely vanity: vain not to hear: hear God and Almighty not to see her
14 १४ तेव्हा, तू जेव्हा असे म्हणशील की देव तुला दिसत नाही तेव्हा देव तुझ्याकडे लक्ष देणार नाही तर तू त्याची वाट पाहत रहा!
also for to say not to see him judgment to/for face: before his and to twist: anticipate to/for him
15 १५ तो तुला किती थोडक्यात उत्तर देईल जर तू असे म्हणालास तो क्रोधाने कोणालाही शिक्षा करीत नाही, आणि तो लोकांच्या गर्वीष्ठपणाकडे फारसे लक्ष देत नाही.
and now for nothing to reckon: punish face: anger his and not to know in/on/with folly much
16 १६ म्हणून ईयोब मुर्खपणाचे बोलण्यासाठी त्याचे मुख उघडतो. तो ज्ञानाविना त्याचे शब्द बोलत राहतो.”
and Job vanity to open lip his in/on/with without knowledge speech to multiply