< ईयोब 32 >
1 १ नंतर या तीन मनुष्यांनी ईयोबाला उत्तर देण्याचे थांबविले, कारण तो त्याच्या स्वतःच्या नजरेमध्ये नितीमान होता.
於是這三個人,因約伯自以為義就不再回答他。
2 २ नंतर राम घराण्यातील बरखेल बूजी याचा पुत्र अलीहू याचा राग भडकला, देवापेक्षा स्वतःला निर्दोष ठरविल्याबद्दल ईयोबावर त्याचा राग भडकला.
那時有布西人蘭族巴拉迦的兒子以利戶向約伯發怒;因約伯自以為義,不以上帝為義。
3 ३ अलीहूचा राग आणखी त्याच्या तीनही मित्रावर भडकला कारण ईयोबासाठी त्यांना कोणतेही उत्तर सापडले नाही, आणि तरीही ते ईयोबाला दोष देत राहीले होते.
他又向約伯的三個朋友發怒;因為他們想不出回答的話來,仍以約伯為有罪。
4 ४ दुसरे लोक त्याच्यापेक्षा वयाने मोठे असल्या कारणाने अलीहूने ईयोबास बोलण्यास वाट पाहिली.
以利戶要與約伯說話,就等候他們,因為他們比自己年老。
5 ५ तथापि, जेव्हा अलीहूने बघीतले कि, त्या तीन पुरूषांकडे काहीही उत्तर नाही हे पाहून, त्याचा राग भडकला.
以利戶見這三個人口中無話回答,就怒氣發作。
6 ६ मग बरखेल बूजी याचा पुत्र अलीहू याने उत्तर दिले, तो म्हणाला, मी तरूण आहे व तुम्ही वृद्ध आहात. म्हणून मी तुम्हास बोलण्याची हिम्मत केली नाही आणि माझे मत बोलून दाखवले नाही.
布西人巴拉迦的兒子以利戶回答說: 我年輕,你們老邁; 因此我退讓,不敢向你們陳說我的意見。
7 ७ मी म्हणालो, जास्त दिवस पाहिलेल्यांनी बोलले पाहीजे, जास्त वर्ष घातलेल्यांनी ज्ञान शिकवावे.
我說,年老的當先說話; 壽高的當以智慧教訓人。
8 ८ परंतु देवाचा आत्मा मनुष्यात असतो, सर्वसमर्थाचा श्वास त्यास समजबुद्धी देतो.
但在人裏面有靈; 全能者的氣使人有聰明。
9 ९ मनुष्य महान असला म्हणजेच तो ज्ञानी असतो असे नाही, जे वयाने मोठे आहेत त्यांनाच न्यायाची जाण आहे असेही नाही.
尊貴的不都有智慧; 壽高的不都能明白公平。
10 १० त्या कारणामुळे मी तुम्हास म्हणतो, माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या, मी देखील माझे ज्ञान तुम्हास सांगेन.
因此我說:你們要聽我言; 我也要陳說我的意見。
11 ११ पाहा, मी तुमच्या शब्दांची वाट पाहीली, जेव्हा तुम्ही काय बोलावे हे विचार करीत असता, मी तुमचे वादविवाद ऐकले आहेत.
你們查究所要說的話; 那時我等候你們的話, 側耳聽你們的辯論,
12 १२ खरे पाहता, मी तुझ्याकडे लक्ष लावले, परंतू, पाहा, तुमच्यापैकी असा कोणीही नाही का जो ईयोबाला समजावेल किंवा त्याच्या शब्दांना प्रतीसाद देईल.
留心聽你們; 誰知你們中間無一人折服約伯, 駁倒他的話。
13 १३ संभाळा, आम्हास ज्ञान सापडले असे म्हणण्यास धजू नको! देव ईयोबाला हरवील, मर्त्य मनुष्य हे करू शकत नाही.
你們切不可說:我們尋得智慧; 上帝能勝他,人卻不能。
14 १४ ईयोबाने त्याचे शब्द माझ्या विरोधात वापरले नाहीत, म्हणून मी तुमच्या शब्दांनी त्यास उत्तर देणार नाही.
約伯沒有向我爭辯; 我也不用你們的話回答他。
15 १५ हे तीनही माणसे मुके झाले आहेत, आता ते ईयोबाला उत्तर देऊ शकत नाहीत.
他們驚奇不再回答, 一言不發。
16 १६ ते बोलत नाहीत म्हणून मी वाट पाहावी काय? ते शांत उभे आहेत आणि काहीच उत्तर देत नाहीत.
我豈因他們不說話, 站住不再回答,仍舊等候呢?
17 १७ नाही, मी माझ्या बाजूने उत्तर देईल, मी माझे ज्ञान त्यांना शिकवीन.
我也要回答我的一分話, 陳說我的意見。
18 १८ माझ्याजवळ पुष्कळ शब्द आहेत, माझा आत्मा मला स्फुर्ती देत आहे.
因為我的言語滿懷; 我裏面的靈激動我。
19 १९ पाहा, माझे मन बंद करून ठेवलेल्या द्राक्षरसाप्रमाणे झाले आहे, नवीन द्राक्षरसाच्या बूधल्याप्रणाणे ते फुटण्यास आले आहे.
我的胸懷如盛酒之囊沒有出氣之縫, 又如新皮袋快要破裂。
20 २० मी बोललो तर मला बरे वाटेल, मी माझे ओठ उघडेल आणि उत्तर देईल.
我要說話,使我舒暢; 我要開口回答。
21 २१ मी कोणाची बाजू घेणार नाही, किंवा कोणत्याही मनुष्यांनी खुशामत करणार नाही.
我必不看人的情面, 也不奉承人。
22 २२ खुशामत कशी करावी ते मला माहीती नाही, जर मी तसे केले असेल तर, माझा निर्माता मला लवकर घेवून जाईल.
我不曉得奉承; 若奉承,造我的主必快快除滅我。