< ईयोब 31 >

1 “मी माझ्या डोळ्यांशी करार केला आहे, मग मी अभिलाषेने कसे एखाद्या कुमारीकडे बघू?
“मैंने अपनी आँखों से 'अहद किया है। फिर मैं किसी कुँवारी पर क्यूँकर नज़र करूँ।
2 वरून देवाकडून कोणता वाटा मिळणार आहे, कोणता वारसा सर्वशक्तिमान उच्च देवाकडून प्राप्त होणार?
क्यूँकि ऊपर से ख़ुदा की तरफ़ से क्या हिस्सा है और 'आलम — ए — बाला से क़ादिर — ए — मुतलक़ की तरफ़ से क्या मीरास है?
3 मी असा विचार आपत्ती ही अनितीमानांसाठी आहे, आणि अनर्थ हा दृष्टपणा करणाऱ्यांसाठी आहे.
क्या वह नारास्तों के लिए आफ़त और बदकिरदारों के लिए तबाही नहीं है।
4 देव माझे सर्व मार्ग पाहत नाही का? आणि माझे सर्व पाऊल मोजत नाही का?
क्या वह मेरी राहों को नहीं देखता, और मेरे सब क़दमों को नहीं गिनता?
5 जर मी असत्याने चाललो असेल, जर माझ्या पाऊलांनी कपट करण्याची घाई केली असेल,
अगर मैं बतालत से चला हूँ, और मेरे पाँव ने दग़ा के लिए जल्दी की है।
6 मला समपातळीच्या तराजूने तोलून द्या म्हणजे देवाला माझ्या प्रामाणिकपणा कळून येईल.
तो मैं ठीक तराज़ू में तोला जाऊँ, ताकि ख़ुदा मेरी रास्ती को जान ले।
7 मी जर योग्य मार्गापासून दूर गेलो असेन, जर माझे मन माझ्या डोळ्यामागे जात असेल, जर माझ्या हातांस अशुद्धतेचा दाग चिकटला असेल.
अगर मेरा क़दम रास्ते से फिरा हुआ है, और मेरे दिल ने मेरी आँखों की पैरवी की है, और अगर मेरे हाथों पर दाग़ लगा है;
8 तर मी पेरलेले दुसरा खावो, खरोखर माझ्या शेतातील पीक उपटून टाकले जावो.
तो मैं बोऊँ और दूसरा खाए, और मेरे खेत की पैदावार उखाड़ दी जाए।
9 जर माझे मन दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित झाले असेल, जर मी आपल्या शेजाऱ्याच्या दाराकडे त्याच्या पत्नीची वाट बघत थांबलो असेल.
“अगर मेरा दिल किसी 'औरत पर फ़रेफ़्ता हुआ, और मैं अपने पड़ोसी के दरवाज़े पर घात में बैठा;
10 १० तर माझी पत्नी दुसऱ्या मनुष्यासाठी दळण करो, आणि दुसरी माणसे तिच्यावर खाली धुकतो.
तो मेरी बीवी दूसरे के लिए पीसे, और गै़र मर्द उस पर झुकें।
11 ११ कारण ते भयकर दुष्टपणाचे कृत्य होईल; खरोखर या न्यायधिशांनी शिक्षा करावी असे हे दुष्टकृत्य आहे.
क्यूँकि यह बहुत बड़ा जुर्म होता, बल्कि ऐसी बुराई होती जिसकी सज़ा क़ाज़ी देते हैं।
12 १२ लैंगिक पाप माझ्या सर्वस्वाचा नाश करील. सर्वस्वाचा होम करणारी ती आग आहे.
क्यूँकि वह ऐसी आग है जो जलाकर भस्म कर देती है, और मेरे सारे हासिल को जड़ से बर्बाद कर डालती है।
13 १३ माझ्या स्त्री व पुरूष चाकरांनी माझ्या विरुध्द वादविवाद केला असेल, तेव्हा मी न्यायाने वागण्याचे मान्य केले नाही,
“अगर मैंने अपने ख़ादिम या अपनी ख़ादिमा का हक़ मारा हो, जब उन्होंने मुझ से झगड़ा किया;
14 १४ तर मी जेव्हा देवासमोर जाईन तेव्हा मी काय करु? देवाने माझ्या वागण्याचा जाब विचारला तर मी काय उत्तर देऊ?
तो जब ख़ुदा उठेगा, तब मैं क्या करूँगा? और जब वह आएगा, तो मैं उसे क्या जवाब दूँगा?
15 १५ ज्याने मला गर्भात निर्माण केले त्यानेच त्यांना घडवले नाही का? त्यानेच आपल्या सर्वांची गर्भात निर्मिती केली नाही का?
क्या वही उसका बनाने वाला नहीं, जिसने मुझे पेट में बनाया? और क्या एक ही ने हमारी सूरत रहम में नहीं बनाई?
16 १६ मी गरीबांना त्यांच्या ईच्छेपासून रोखले असेल. किंवा मी जर विधवांना रडवण्यास त्यांचे डोळे शिणवले असेल.
अगर मैंने मोहताज से उसकी मुराद रोक रखी, या ऐसा किया कि बेवा की आँखें रह गई
17 १७ आणि जर मी माझ्या अन्नाचे सेवन एकट्याने केले असेल, आणि मी पोरक्यांना नेहमी अन्न दिले नसेल,
या अपना निवाला अकेले ही खाया हो, और यतीम उसमें से खाने न पाया
18 १८ (त्याऐवजी माझ्या तारूण्यापासून माझ्याबरोबर पोरके बापाकडे जसे मुले वाढतात तसे वाढले आहेत) आणि मी विधवांची काळजी लहाणपणापासुन वाहीली आहे.
नहीं, बल्कि मेरे लड़कपन से वह मेरे साथ ऐसे पला जैसे बाप के साथ, और मैं अपनी माँ के बतन ही से बेवा का रहनुमा रहा हूँ।
19 १९ जेव्हा मला कपडे नाहीत म्हणून दु: खी होणारे लोक दिसले किंवा कोट नसलेले गरीब लोक दिसले.
अगर मैंने देखा कि कोई बेकपड़े मरता है, या किसी मोहताज के पास ओढ़ने को नहीं;
20 २० त्यांनी मला अंत: करणापासून कधी आशीर्वाद दिले नाही कारण त्यांना मी माझ्या मेंढ्यांची लोकर त्यांना उबदार ठेवण्यासाठी वापरली नाही.
अगर उसकी कमर ने मुझ को दुआ न दी हो, और अगर वह मेरी भेड़ों की ऊन से गर्म न हुआ हो।
21 २१ माझे समर्थक शहराच्या दरवाजाजवळ जवळ पाहून जर मी पोरक्यावर हात उगारत असेल
अगर मैंने किसी यतीम पर हाथ उठाया हो, क्यूँकि फाटक पर मुझे अपनी मदद दिखाई दी;
22 २२ मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्यांपासून निखळून जावो आणि माझा हात माझ्या खांद्याच्या सांध्यातून तुटून पडो.
तो मेरा कंधा मेरे शाने से उतर जाए, और मेरे बाज़ू की हड्डी टूट जाए।
23 २३ परंतु यापैकी मला देवाच्या शिक्षेची भीती वाटते, म्हणून मी यापैकी कोणतीही गोष्ट करत नाही.
क्यूँकि मुझे ख़ुदा की तरफ़ से आफ़त का ख़ौफ़ था, और उसकी बुजु़र्गी की वजह से मैं कुछ न कर सका।
24 २४ जर मी सोन्याला माझी आशा केले, ‘तू माझी आशा आहेस असे’ मी शुध्द सोन्याला कधीच म्हटले नाही.
“अगर मैंने सोने पर भरोसा किया हो, और ख़ालिस सोने से कहा, मेरा ऐ'तिमाद तुझ पर है।
25 २५ मी श्रीमंत होतो पण मला त्याचा अभिमान नव्हता. मी खूप पैसे कमावले पण मी सुखी झालो नाही.
अगर मैं इसलिए कि मेरी दौलत फ़िरावान थी, और मेरे हाथ ने बहुत कुछ हासिल कर लिया था, नाज़ाँ हुआ।
26 २६ जर मी चमकत्या सूर्याला पहिले, किंवा चंद्र त्याच्या तेजात चालतांना पाहून,
अगर मैंने सूरज पर जब वह चमकता है, नज़र की हो या चाँद पर जब वह आब — ओ — ताब में चलता है,
27 २७ माझे मन गुप्तपणे आकर्षित होऊन त्यांची पूजा करण्या करीता मी माझ्या हाताचे चुंबन घेतले असते तर
और मेरा दिल चुपके से 'आशिक़ हो गया हो, और मेरे मुँह ने मेरे हाथ को चूम लिया हो;
28 २८ ते सुध्दा शिक्षा करण्यासारखेच पाप आहे. कारण ते सर्वशक्तिमान देवाचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते.
तो यह भी ऐसा गुनाह है जिसकी सज़ा क़ाज़ी देते हैं क्यूँकि यूँ मैंने ख़ुदा का जो 'आलम — ए — बाला पर है, इंकार किया होता।
29 २९ माझ्या शत्रूंचा पाडाव झाल्याचा मला कधीच आनंद वाटला नाही. किंवा माझ्या शत्रूंवर संकट कोसळल्यामुळे मी त्यांना कधी हसलो नाही.
'अगर मैं अपने नफ़रत करने वाले की हलाकत से ख़ुश हुआ, या जब उस पर आफ़त आई तो ख़ुश हुआ;
30 ३० (खरोखर, माझ्या शत्रूंना शाप देऊन आणि त्यांच्या मरणाची इच्छा करून मी माझ्या तोंडाला कधी पाप करायला लावले नाही.)
हाँ, मैंने तो अपने मुँह को इतना भी गुनाह न करने दिया के ला'नत दे कर उसकी मौत के लिए दुआ करता;
31 ३१ मी अपरिचितांना अन्न देतो, असा कोण आहे ज्याने ईयोबाचे अन्न खाल्ले नाही?
अगर मेरे ख़ेमे के लोगों ने यह न कहा हो, 'ऐसा कौन है जो उसके यहाँ गोश्त से सेर न हुआ?'
32 ३२ परदेशी लोकांस रात्रीच्या वेळी शहरातील चौकात झोपायला लागू नये म्हणून मी त्यांना माझ्या घरी बोलावतो.
परदेसी को गली कूचों में टिकना न पड़ा, बल्कि मैं मुसाफ़िर के लिए अपने दरवाज़े खोल देता था।
33 ३३ इतर लोक त्यांचे पाप लपविण्याचा प्रयत्न करतात परंतु मी माझा अपराध लपविण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.
अगर आदम की तरह अपने गुनाह अपने सीने में छिपाकर, मैंने अपनी ग़लतियों पर पर्दा डाला हो;
34 ३४ कारण मला लोकांची भीती आहे, मला परिवाराच्या तिरस्काराची भीती वाटते. म्हणून मी शांत आहे आणि घराबाहेर जात नाही.
इस वजह से कि मुझे 'अवाम के लोगों का ख़ौफ़ था, और मैं ख़ान्दानों की हिकारत से डर गया, यहाँ तक कि मैं ख़ामोश हो गया और दरवाज़े से बाहर न निकला
35 ३५ अहो, माझे कुणीतरी ऐकावे असे मला वाटते. पाहा, मला माझी बाजू मांडू द्या, सर्वशक्तिमान देवाने मला उत्तर द्यावे अशी माझी इच्छा आहे. त्याच्या दृष्टीने मी काय चूक केली ती त्याने लिहून काढावी असे मला वाटते.
काश कि कोई मेरी सुनने वाला होता! यह लो मेरा दस्तख़त। क़ादिर — ए — मुतलक़ मुझे जवाब दे। काश कि मेरे मुख़ालिफ़ के दा'वे का सुबूत होता।
36 ३६ खरेच, मी ती खूण माझ्या गळ्याभोवती घालेन. मी ती राजमुकुटाप्रमाणे माझ्या मस्तकावर ठेवेन.
यक़ीनन मैं उसे अपने कंधे पर लिए फिरता; और उसे अपने लिए 'अमामे की तरह बाँध लेता।
37 ३७ त्याने जर असे केले तर मी जे काही केले त्याचे स्पष्टीकरण देऊ शकेन. एखाद्या पुढाऱ्याप्रमाणे माझे मस्तक उंच करून मी त्याकडे येऊ शकेन.
मैं उसे अपने क़दमों की ता'दाद बताता; अमीर की तरह मैं उसके पास जाता।
38 ३८ मी दुसऱ्याकडून त्याची जमीन हिसकावून घेतली नाही. माझी जमीन चोरुन घेतली आहे असा आरोप माझ्यावर कोणीही करु शकणार नाही.
“अगर मेरी ज़मीन मेरे ख़िलाफ़ फ़रियाद करती हों, और उसकी रेघारियाँ मिलकर रोती हों,
39 ३९ जर मी पिकाच्या धन्यास मोबदला न देता ते खाल्ले असेल व त्याच्या मृत्युला कारणीभूत झालो असेल,
अगर मैंने बेदाम उसके फल खाए हों, या ऐसा किया कि उसके मालिकों की जान गई;
40 ४० तर माझ्या शेतात गहू आणि सातू या ऐवजी काटे आणि गवत उगवू दे ईयोबचे शब्द इथे संपले.”
तो गेहूँ के बदले ऊँट कटारे, और जौ के बदले कड़वे दाने उगें।” अय्यूब की बातें तमाम हुई।

< ईयोब 31 >