< ईयोब 31 >
1 १ “मी माझ्या डोळ्यांशी करार केला आहे, मग मी अभिलाषेने कसे एखाद्या कुमारीकडे बघू?
Paipi te ka mik neh ka saii dongah me tlam lae oila te ka yakming eh?
2 २ वरून देवाकडून कोणता वाटा मिळणार आहे, कोणता वारसा सर्वशक्तिमान उच्च देवाकडून प्राप्त होणार?
A so lamkah Pathen khoyo neh hmuensang lamkah Tlungthang rho te menim?
3 ३ मी असा विचार आपत्ती ही अनितीमानांसाठी आहे, आणि अनर्थ हा दृष्टपणा करणाऱ्यांसाठी आहे.
Boethae ham rhainah neh boethae aka saii ham yoethaenah moenih a?
4 ४ देव माझे सर्व मार्ग पाहत नाही का? आणि माझे सर्व पाऊल मोजत नाही का?
Amah loh ka longpuei a hmuh tih ka khokan boeih he a tae moenih a?
5 ५ जर मी असत्याने चाललो असेल, जर माझ्या पाऊलांनी कपट करण्याची घाई केली असेल,
A poeyoek taengah ka pongpa tih ka kho loh a hlangthai palat taengla a tawn uh atah,
6 ६ मला समपातळीच्या तराजूने तोलून द्या म्हणजे देवाला माझ्या प्रामाणिकपणा कळून येईल.
Duengnah cooi dongah kai n'khiing saeh lamtah Pathen loh ka muelhtuetnah ming saeh.
7 ७ मी जर योग्य मार्गापासून दूर गेलो असेन, जर माझे मन माझ्या डोळ्यामागे जात असेल, जर माझ्या हातांस अशुद्धतेचा दाग चिकटला असेल.
Longpuei lamloh ka khokan a buung atah, ka mik hnukah ka lungbuei cet tih ka kut dongah a lolhmaih a kap atah,
8 ८ तर मी पेरलेले दुसरा खावो, खरोखर माझ्या शेतातील पीक उपटून टाकले जावो.
ka soem vaengah a tloe loh ca saeh lamtah ka cadil rhoek te ha uh saeh.
9 ९ जर माझे मन दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित झाले असेल, जर मी आपल्या शेजाऱ्याच्या दाराकडे त्याच्या पत्नीची वाट बघत थांबलो असेल.
Huta loh ka lungbuei a hlae tih ka hui kah thohka ah ka rhongngol atah,
10 १० तर माझी पत्नी दुसऱ्या मनुष्यासाठी दळण करो, आणि दुसरी माणसे तिच्यावर खाली धुकतो.
Ka yuu loh a tloe la kuelh saeh lamtah a taengah hlang tloe bakop mai saeh.
11 ११ कारण ते भयकर दुष्टपणाचे कृत्य होईल; खरोखर या न्यायधिशांनी शिक्षा करावी असे हे दुष्टकृत्य आहे.
Te dongah te khonuen rhamtat neh te te thaesainah rhokhan ni.
12 १२ लैंगिक पाप माझ्या सर्वस्वाचा नाश करील. सर्वस्वाचा होम करणारी ती आग आहे.
Te hmai loh Abaddon duela a hlawp tih ka cangvuei te boeih ha.
13 १३ माझ्या स्त्री व पुरूष चाकरांनी माझ्या विरुध्द वादविवाद केला असेल, तेव्हा मी न्यायाने वागण्याचे मान्य केले नाही,
Ka salpa neh ka salnu loh kai taengah a tuituk vaengah tiktamnah ka hnawt atah,
14 १४ तर मी जेव्हा देवासमोर जाईन तेव्हा मी काय करु? देवाने माझ्या वागण्याचा जाब विचारला तर मी काय उत्तर देऊ?
Pathen a thoh vaengah balae ka saii vetih n'hip vaengah amah te metlam ol ka mael eh?
15 १५ ज्याने मला गर्भात निर्माण केले त्यानेच त्यांना घडवले नाही का? त्यानेच आपल्या सर्वांची गर्भात निर्मिती केली नाही का?
Bungko khuiah kai aka saii loh anih a saii moenih a? Kaimih he bung khuiah pakhat la n'cuen sak.
16 १६ मी गरीबांना त्यांच्या ईच्छेपासून रोखले असेल. किंवा मी जर विधवांना रडवण्यास त्यांचे डोळे शिणवले असेल.
tattloel kah kongaih te ka hloh pah tih nuhmai mik te ka khah sak koinih,
17 १७ आणि जर मी माझ्या अन्नाचे सेवन एकट्याने केले असेल, आणि मी पोरक्यांना नेहमी अन्न दिले नसेल,
Kamah buhkam te kamah bueng loh ka caak tih cadah loh ca pawt koinih,
18 १८ (त्याऐवजी माझ्या तारूण्यापासून माझ्याबरोबर पोरके बापाकडे जसे मुले वाढतात तसे वाढले आहेत) आणि मी विधवांची काळजी लहाणपणापासुन वाहीली आहे.
Ka camoe lamloh napa bangla ka taengah pantai tih nuhmai khaw a nu bung lamloh ka mawt.
19 १९ जेव्हा मला कपडे नाहीत म्हणून दु: खी होणारे लोक दिसले किंवा कोट नसलेले गरीब लोक दिसले.
Pueinak mueh tih himbai tling la aka milh khodaeng te ka hmuh mai tih,
20 २० त्यांनी मला अंत: करणापासून कधी आशीर्वाद दिले नाही कारण त्यांना मी माझ्या मेंढ्यांची लोकर त्यांना उबदार ठेवण्यासाठी वापरली नाही.
A pumpu, a pumpu ah kai n'uem uh vaengah ka tu mul neh ka hlung pawt mai koinih,
21 २१ माझे समर्थक शहराच्या दरवाजाजवळ जवळ पाहून जर मी पोरक्यावर हात उगारत असेल
Vongka ah kai bomkung te ka hmuh vaengah ka kut he cadah soah ka ka thueng atah,
22 २२ मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्यांपासून निखळून जावो आणि माझा हात माझ्या खांद्याच्या सांध्यातून तुटून पडो.
ka laengpang he a hnuk lamloh rhul saeh lamtah ka ban a cung dong lamloh tlawt mai saeh.
23 २३ परंतु यापैकी मला देवाच्या शिक्षेची भीती वाटते, म्हणून मी यापैकी कोणतीही गोष्ट करत नाही.
Pathen taengkah rhainah te kai ham ka birhihnah la a om dongah a boeimangnah te ka noeng moenih.
24 २४ जर मी सोन्याला माझी आशा केले, ‘तू माझी आशा आहेस असे’ मी शुध्द सोन्याला कधीच म्हटले नाही.
Sui te ka uepnah la ka khueh tih sui cilh te ka pangtungnah la ka thui koinih,
25 २५ मी श्रीमंत होतो पण मला त्याचा अभिमान नव्हता. मी खूप पैसे कमावले पण मी सुखी झालो नाही.
Ka thadueng len tih ka kut loh a khuet la a hmuh dongah ka kokhahnah atah,
26 २६ जर मी चमकत्या सूर्याला पहिले, किंवा चंद्र त्याच्या तेजात चालतांना पाहून,
Vangnah dongah a thangthen tih hla vang a thoeih te ka hmuh vaengah,
27 २७ माझे मन गुप्तपणे आकर्षित होऊन त्यांची पूजा करण्या करीता मी माझ्या हाताचे चुंबन घेतले असते तर
ka lungbuei he yinhnuk ah hloih tih ka kut loh ka ka te mok koinih.
28 २८ ते सुध्दा शिक्षा करण्यासारखेच पाप आहे. कारण ते सर्वशक्तिमान देवाचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते.
He khaw a so kah Pathen taengah ka basa la om vetih thaesainah lai la om ni.
29 २९ माझ्या शत्रूंचा पाडाव झाल्याचा मला कधीच आनंद वाटला नाही. किंवा माझ्या शत्रूंवर संकट कोसळल्यामुळे मी त्यांना कधी हसलो नाही.
Ka lunguet kah yoethaenah dongah ka kohoe tih yoethae loh anih taengla a thoeng te ka haenghang puei atah,
30 ३० (खरोखर, माझ्या शत्रूंना शाप देऊन आणि त्यांच्या मरणाची इच्छा करून मी माझ्या तोंडाला कधी पाप करायला लावले नाही.)
A hinglu te thaephoeinah neh hoe hamla ka ka he laihmu la ka khueh aih moenih.
31 ३१ मी अपरिचितांना अन्न देतो, असा कोण आहे ज्याने ईयोबाचे अन्न खाल्ले नाही?
Ka dap kah hlang rhoek loh, “U long nim a maeh te a cung pawt la a paek eh?” a ti uh moenih a?
32 ३२ परदेशी लोकांस रात्रीच्या वेळी शहरातील चौकात झोपायला लागू नये म्हणून मी त्यांना माझ्या घरी बोलावतो.
Ka thohkhaih kah yinlai te caehlong ka ong pah tih vongvoel ah a rhaeh moenih.
33 ३३ इतर लोक त्यांचे पाप लपविण्याचा प्रयत्न करतात परंतु मी माझा अपराध लपविण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.
Hlang bangla ka boekoeknah ka dah tih, kai kathaesainah he ka thindang ah ka det mai akhaw,
34 ३४ कारण मला लोकांची भीती आहे, मला परिवाराच्या तिरस्काराची भीती वाटते. म्हणून मी शांत आहे आणि घराबाहेर जात नाही.
hlangping te yet taengah ka sarhing tih huiko kah nueihbu loh kai n'rhihyawp sak. Te dongah ka kuemsuem tih thohka la ka moe pawh.
35 ३५ अहो, माझे कुणीतरी ऐकावे असे मला वाटते. पाहा, मला माझी बाजू मांडू द्या, सर्वशक्तिमान देवाने मला उत्तर द्यावे अशी माझी इच्छा आहे. त्याच्या दृष्टीने मी काय चूक केली ती त्याने लिहून काढावी असे मला वाटते.
Kai taengkah aka hnatun la kamah taengah u long nim m'paek lah mako? Ka kutha he Tlungthang loh kai n'doo saeh lamtah ka tuituknah he hlang loh cabu la daek saeh.
36 ३६ खरेच, मी ती खूण माझ्या गळ्याभोवती घालेन. मी ती राजमुकुटाप्रमाणे माझ्या मस्तकावर ठेवेन.
Te te ka laengpang ah ka koh vetih te te ka soah rhuisam la ka laikoeinah het mahpawt nim?
37 ३७ त्याने जर असे केले तर मी जे काही केले त्याचे स्पष्टीकरण देऊ शकेन. एखाद्या पुढाऱ्याप्रमाणे माझे मस्तक उंच करून मी त्याकडे येऊ शकेन.
Ka khokan tarhing la a taengah ka puen lah vetih anih te rhaengsang bangla ka paan lah mako.
38 ३८ मी दुसऱ्याकडून त्याची जमीन हिसकावून घेतली नाही. माझी जमीन चोरुन घेतली आहे असा आरोप माझ्यावर कोणीही करु शकणार नाही.
Ka khohmuen loh kai m'pang thil tih a kong te rhenten rhap koinih,
39 ३९ जर मी पिकाच्या धन्यास मोबदला न देता ते खाल्ले असेल व त्याच्या मृत्युला कारणीभूत झालो असेल,
A thadueng te tangka mueh la ka caak tih a kungmah kah hinglu ka yawn sak atah,
40 ४० तर माझ्या शेतात गहू आणि सातू या ऐवजी काटे आणि गवत उगवू दे ईयोबचे शब्द इथे संपले.”
Cang yueng la mutlo hling, cangtun yueng la saeldol khaw poe saeh,” a ti. Job kah ol bawt coeng.