< ईयोब 3 >

1 यानंतर, ईयोबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसास शाप दिला.
Ngemva kwalokho uJobe wavula umlomo wakhe waliqalekisa ilanga azalwa ngalo.
2 तो (ईयोब) म्हणाला,
Wathi:
3 “मी ज्या दिवशी जन्मलो तो दिवस नष्ट होवो, मुलाची गर्भधारणा झाली अशी जी रात्र म्हणाली ती भस्म होवो.
“Sengathi ilanga lokuzalwa kwami lingatshabalala, lalobobusuku okwathiwa, ‘Kuzelwe umfana!’
4 तो दिवस अंधकारमय होवो, देवाला त्याचे विस्मरण होवो, त्यावर सुर्यप्रकाश पडला नसता तर फार बरे झाले असते.
Lolosuku sengathi lungaphenduka ubumnyama; sengathi uNkulunkulu ophezulu angangalunanzi; lokukhanya kucime ngalo.
5 मृत्यूची सावली आणि अंधार त्यास आपल्या स्वतःचा समजो, ढग सदैव त्यावर राहो, जी प्रत्येक गोष्ट दिवसाचा अंधार करते ती त्यास खरेच भयभीत करो,
Sengathi ubumnyama lethunzi elikhulu kungaluginya njalo; sengathi iyezi lingalusibekela; sengathi umnyama ungalugubuzela.
6 ती रात्र काळोख घट्ट पकडून ठेवो, वर्षाच्या दिवसांमध्ये ती आनंद न पावो. महिन्याच्या तिथीत तिची गणती न होवो.
Lobobusuku, sengathi ubumnyama bungabuthi jwamu; sengathi bungayekelwa ukubalwa kanye lezinsuku zomnyaka futhi bungangeniswa lakuyiphi inyanga.
7 पाहा, ती रात्र फलीत न होवो, तिच्यातून आनंदाचा ध्वनी न येवो.
Sengathi lobobusuku bungaba yinyumba; sengathi kungeze kwezwakala umsindo wentokozo ngalo.
8 जे लिव्याथानाला जागविण्यात निपुण आहेत ते त्या दिवसास शाप देवो.
Sengathi labo abaqalekisa insuku bangaluqalekisa lolosuku, labo abazimisele ukuhlokoza uLeviyathani.
9 त्या दिवसाच्या पहाटेचे तारे काळे होत. तो दिवस प्रकाशाची वाट पाहो पण तो कधी न मिळो, त्याच्या पापण्यास उषःकालाचे दर्शन न घडो.
Sengathi izinkanyezi zalo zokusa zingafiphala; lulindele imini kube yize lungayiboni imisebe yokuqala yokusa,
10 १० कारण तिने माझ्या जननीचे ऊदरद्वार बंद केले नाही, आणखी हे दुःख माझ्या डोळ्यापासून लपवीले नाही.
ngoba kaluyivalanga iminyango yesibeletho ngisiza ukufihla uhlupho emehlweni ami.
11 ११ उदरातुन बाहेर आलो तेव्हाच मी का मरण पावलो नाही? माझ्या आईने मला जन्म देताच मी का प्राण त्यागला नाही?
Kungani ngingafanga ngizalwa, ngahle ngacitsha ngisaphuma esiswini na?
12 १२ तिच्या मांडयानी माझा स्विकार का केला? किंवा मी जगावे म्हणून तिच्या स्तनांनी माझा स्विकार का केला?
Kungani kwaba lamadolo okungemukela lamabele okungimunyisa na?
13 १३ तर मी आता निश्चिंत खाली पडून राहीलो असतो, मी झोपलो असतो आणि विश्रांती पावलो असतो.
Ngoba manje ngabe ngilele ekuthuleni; ngabe ngisebuthongweni ekuphumuleni
14 १४ पृथ्वीवरील राजे आणि सल्लागार, ज्यांनी आपल्यासाठी कबरा बांधल्या त्या आता उध्वस्त झाल्या आहेत.
kanye lamakhosi lababusi bomhlaba, ababezakhele izindawo okwamanje sezingamanxiwa,
15 १५ किंवा ज्या राजकुमारांनी आपली घरे सोन्या रुप्यांनी भरली त्यांच्या बरोबरच मलाही मरण आले असते तर बरे झाले असते.
kanye lamakhosana ayelegolide, egcwalise izindlu zawo ngesiliva.
16 १६ कदाचित मी जन्मापासूनच मृत मूल का झालो नाही, किंवा प्रकाश न पाहिलेले अर्भक मी असतो तर बरे झाले असते.
Kumbe kungani ngingathukuzwanga emhlabathini njengomphunzo na, njengosane oluvele lungazange lubone ukukhanya kosuku?
17 १७ तेथे गेल्यानंतरच दुष्ट त्रास देण्याचे थांबवितात. तेथे दमलेल्यांना आराम मिळतो.
Khonale ababi kabasaxokozeli, njalo khonale abakhatheleyo basekuphumuleni.
18 १८ तेथे कैदीही सहज एकत्र राहतात, तेथे त्यांना गुलाम बनविणाऱ्यांचे ओरडणे ऐकू येत नाही.
Abathunjiweyo labo bazuza ukukhululeka; kabasakuzwa ukuhaladwa ngumtshayeli wabathunjiweyo.
19 १९ लहान आणि थोर तेथे आहेत, तेथे गुलाम त्यांच्या मालकापासून मुक्त आहेत.
Abantukazana lezikhulu bakhonale, lesigqili siyakhululwa enkosini yaso.
20 २० दुर्दशेतील लोकांस प्रकाश का दिल्या जातो, जे मनाचे कटू आहेत अशांना जीवन का दिले जाते,
Kungani ukukhanya kuphiwa labo abasosizini na, lokuphila kulabo abalobuhlungu emphefumulweni,
21 २१ ज्याला मरण पाहीजे त्यास मरण येत नाही, दु: खी मनुष्य गुप्त खजिन्यापेक्षा मृत्यूच्या अधिक शोधात असतो?
kulabo abakhalela ukufa okungafikiyo, abakuthungathayo ukwedlula ingcebo efihliweyo,
22 २२ त्यास थडगे प्राप्त झाले म्हणजे ते हर्षीत होतात, त्यास अति आनंद होतो?
abaphuphuma ngenjabulo bathokoza nxa sebefika engcwabeni?
23 २३ ज्या पुरूषाचा मार्ग लपलेला आहे, देवाने ज्या पुरुषाला कुपंणात ठेवले आहे अशाला प्रकाश का मिळतो?
Kungani impilo iphiwa umuntu ondlela yakhe ifihliwe, uNkulunkulu amhonqolozeleyo na?
24 २४ मला जेवणाऐवजी उसासे मिळत आहेत! माझे कण्हने, पाण्यासारखे बाहेर ओतले जात आहे.
Ngoba ukububula sokuphenduke ukudla kwami kwansukuzonke; ukugomela kwami kuthululeka njengamanzi.
25 २५ ज्या गोष्टींना मी घाबरतो त्याच गोष्टी माझ्यावर येतात. मी ज्याला भ्यालो तेच माझ्यावर आले.
Ebengikwesaba sekungehlele, obekungitshayisa ngovalo sekwenzakele kimi.
26 २६ मी निश्चिंत नाही, मी स्वस्थ नाही, आणि मला विसावा नाही. तरी आणखी पीडा येत आहे.”
Kangilakho ukuchelesa, kangilakho ukuthula; kangilakuphumula, kodwa ukuhlupheka kuphela.”

< ईयोब 3 >