< ईयोब 29 >
1 १ ईयोबने बोलणे सुरु ठेवले तो म्हणाला
Job ni a dei lawk hah bout a patawp teh,
2 २ “अहो, काही महिन्यांपूर्वी मी जसा होतो तसा असतो तर, किती बरे झाले असते तेव्हा देव माझी काळजी घेत होता,
Oe ka loum tangcoung e a kum hoi thapa naw dawk bout kaawm haw pawiteh, Cathut ni na kountouknae a hnin patetlah
3 ३ तेव्हा देवाचा प्रकाश माझ्यावर प्रकाशत होता, आणि मला अंधारातून चालताना प्रकाश दाखवत होता.
ka lû dawk hmaiim a ang teh, a angnae dawk hoi hmonae ka tapuet thai navah,
4 ४ अहो, माझ्या चागल्या फलदायी दिवसाची मी आशा करतो. त्या दिवसात माझ्यावर देवाचे मित्रत्वाचे कृपाछत्र होते.
Ka roung takhangnae a tueng, ka im dawk Cathut hoi kâhuikonae tueng, hatnae patetlah bout kaawm haw pawiteh,
5 ५ जेव्हा सर्वशक्तिमान देव माझ्याबरोबर होता आणि माझी मुले माझ्याजवळ होती त्या दिवसाची मी आशा धरतो.
Athakasaipounge, kai koe na okhai e hoi, ka canaw ka teng vah petkâkalup lah ao awh navah,
6 ६ त्या दिवसात माझे आयुष्य अतिशय चांगले होते. मी माझे पाय मलईत धूत असे. माझ्याकडे उत्तम प्रकारची पुष्कळ तेल होते.
Ka ceinae lamthung dawk maito sanutui a lawng, lungsongpui ni kai hanelah satui pou a lawng sak navah,
7 ७ त्या दिवसात मी नगराच्या वेशीपर्यंत जात असे आणि नगरातल्या वृध्दांबरोबर सार्वजनिक ठिकाणी बसत असे.
khopui kâennae longkha koe ouk ka cei navah, thongma dawk ouk ka tahungnae koe ka ceikhai navah,
8 ८ सगळे लोक मला मान देत. मला येताना बघून तरुण माझ्या वाटेतून बाजूला होत आणि वृध्द उठून उभे राहत. मला आदर देण्यासाठी ते उठून उभे राहत असत.
Thoundounnaw ni na hmu awh teh, a kâhro awh. Kacuenaw ni a thaw awh teh a kangdue awh.
9 ९ अधिकारी बोलणे थांबवीत आणि इतरांना शांत राहण्याची सूचना देण्यासाठी तोंडावर बोट ठेवीत.
Bawinaw ni lawk dei hane pahni a cakuep awh. A kut hoi pahni a tabuem awh.
10 १० सरदार मनुष्य सुध्दा बोलताना त्यांचा आवाज लहान करीत. होय, तेव्हा त्यांची जीभ टाळूला चिकटण्यासारखी वाटे.
Bawinaw hai lawkkamuem lah duem ao awh teh, a lai teh adangka dawk rapkâbet pouh.
11 ११ लोक माझ्या बोलण्याकडे लक्ष देत. आणि माझ्याबद्दल चांगले बोलत असत. मला भेटणारा प्रत्येकजण माझी स्तुती करी.
A hnâ ni a thai torei teh, yawhawi na poe awh. A mit hoi a hmu awh torei teh na panuikhai awh.
12 १२ का? कारण जेव्हा एखादा गरीब मदतीची याचना करायचा तेव्हा मी त्यास मदत करीत असे आणि पोरक्या मुलाकडे लक्ष द्यायला कोणी नसले तर मी त्यास मदत करीत असे.
Bangkongtetpawiteh, karoedengnaw hah ka rungngang teh na pa hoi kabawmkung ka tawn hoeh e naw hah ouk ka kabawp.
13 १३ मृत्युपंथाला लागलेला मनुष्य मला आशीर्वाद देत असे. मी गरजू विधवांना मदत करीत असे.
Kahmatkatanaw e yawhawinaw hah, ka lathueng vah a pha. Lahmainaw e lungthin hah lunghawinae la ka sak sak.
14 १४ सत्याने जगणे म्हणजे जणू माझे वस्त्र होते. माझे योग्य वागणे म्हणजे माझा अंगरखा आणि डोक्यावरची पगडी होती.
Lannae hah ka khohna teh, ka lannae teh angkidung hoi bawilakhung patetlah ao.
15 १५ मी आंधळ्यांची दृष्टी होतो. त्यांना जिथे जायचे असेल तिथे मी घेऊन जात असे. मी अपंगांचे पाय होतो त्यांना हवे तिथे मी उचलून घेऊन जात असे.
Mitdawnnaw hanelah mit lah ka o teh, khokkhemnaw hanelah khok lah ka o.
16 १६ गरीब लोकांस मी वडिलांसारखा वाटत असे. मला माहीत नसलेल्या लोकांसदेखील मी मदत करीत असे. मी कोर्टात न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करीत असे.
Karoedengnaw, hanelah na pa lah ka o teh, ka panue hoeh e naw e lawk hai ka ngai pouh.
17 १७ मी दुष्ट लोकांचे सामर्थ्य नष्ट केले. मी निरपराध लोकांचा त्यांच्यापासून बचाव केला.
Tamikathoutnaw e a no hah ka khoe pouh teh, a hâ hoi a kei e hah ka rasa pouh.
18 १८ मला नेहमी वाटायचे मी खूप वर्षे जगेन, मला स्वत: च्या घरातच मृत्यू येईल.
Hottelah ka tabu thung ka due vaiteh, ka hninnaw teh sadi patetlah ka pung sak han.
19 १९ मी खूप पाणी शोषून घेऊ शकणारी मुळे असलेल्या व ज्याच्या फांद्या दवाने ओल्या झालेल्या आहेत अशा झाडासारखा असेन, असे मला वाटत असे.
Tui aonae koe vah ka tangphanaw ka payang vaiteh, ka kangnaw dawk karum khodai tadamtui ao han.
20 २० माझ्याठायी असलेला माझा सन्मान नेहमी टवटवीत आहे, आणि माझ्या शक्तीचे धनुष्य माझ्या हातात नवे केले जात आहे.
Ka bawilennae teh ka thung vah bout a katha teh, ka pala teh ka kut dawk a tha hoi a kawi han.
21 २१ पूर्वी लोक माझे ऐकत असत माझ्या उपदेशाची वाट पाहत ते शांत बसत.
Taminaw ni na ring teh na rabui awh. Ka khokhangnae dawk duem ao awh.
22 २२ मी माझे बोलणे संपवल्यानंतर ऐकणाऱ्यांना आणखी काही बोलायचे नसे. माझे शब्द त्यांच्या कानावर हळूवारपणे पडत.
Ka dei hnukkhu hoi banghai dei awh hoeh toe. Ka dei e teh ahnimouh koe tadamtui patetlah a bo.
23 २३ पावसाची वाट पाहिल्यासारखी ते माझ्या बोलण्याची वाट पाहात. वसंतातल्या पावसासारखे ते माझे शब्द पिऊन टाकत.
Khotui patetlah na ring awh teh, a hnukteng e kho ka rak e patetlah kakawpoung lah pahni a ang awh.
24 २४ काही लोकांनी आशा सोडून दिली होती. परंतु मी त्यांच्याबरोबर हसलो. माझ्या हास्याने त्याना बरे वाटले.
Ka panuikhai pawiteh yuem awh mahoeh. Ka minhmai a angnae teh, hmonae lah awm sak awh hoeh.
25 २५ मी त्यांचा प्रमुख असूनही त्यांच्याबरोबर राहण्याचे ठरवले. आपल्या सैन्याबरोबर तळ ठोकून बसलेल्या राजासारखा दु: खी असलेल्यांचे सांत्वन करणाऱ्या राजासारखा मी होतो.”
Ahnimouh hane lamthung ka rawi teh, kahrawikung patetlah ka tahung. Hottelah ransanaw thung vah siangpahrang patetlah kho ka sak. A lung ka mathoutnaw lungpahawi e patetlah ka o.