< ईयोब 28 >
1 १ “खरोखर चांदी मिळते अशा खाणी आहेत, सोने शुद्ध करण्याची जागा असते.
Truly there is a mine for silver, and a place where gold is washed out.
2 २ जमिनीतून लोखंड काढतात, पाषाणामधून तांबे वितळवले जाते.
Iron is taken out of the earth, and stone is changed into brass by the fire.
3 ३ मनुष्य अंधाराचे निवारण करतो, अगदी खोलवर जाऊन, गडद अंधारातील व मृत्यूछायेतील पाषाणाचा तो शोध करीतो.
Man puts an end to the dark, searching out to the farthest limit the stones of the deep places of the dark.
4 ४ लोकांच्या राहण्याच्या जागेपासून तो दूर खाण खणतो, जिथे आजपर्यंत कोणाचेही पाऊल गेले नसेल तिथे तो जातो, तो दोरीला लोंबकळतो इतरांपेक्षा खूप खोल जातो.
He makes a deep mine far away from those living in the light of day; when they go about on the earth, they have no knowledge of those who are under them, who are hanging far from men, twisting from side to side on a cord.
5 ५ जसे जमिनीकडे पाहा, तिच्यातून आपणास अन्न मिळते, जसे अग्नीने तिला उलटवले जाते.
As for the earth, bread comes out of it; but under its face it is turned up as if by fire.
6 ६ जमिनीच्या खालचे पाषाण म्हणजे जेथे नीलमणी मिळतात, आणि त्या मातीमध्ये सोने असते.
Its stones are the place of sapphires, and it has dust of gold.
7 ७ पक्ष्यांना त्या वाटांविषयी काही माहिती नसते, कोणत्याही बहिरी ससाण्याच्या डोळ्यांनी त्या वाटा पाहिलेल्या नसतात.
No bird has knowledge of it, and the hawk's eye has never seen it.
8 ८ रानटी जनावरे त्या वाटांवरुन गेलेली नसतात, सिंहही त्या वाटेने गेलेला नसतो.
The great beasts have not gone over it, and the cruel lion has not taken that way.
9 ९ मनुष्य कठीण खडकावर हात टाकतो, तो ते डोंगर पूर्ण मुळापासून उलटवून टाकतो.
Man puts out his hand on the hard rock, overturning mountains by the roots.
10 १० ते खडकातून बोगदा खणतात, आणि त्यांचे डोळे खडकातला खजिना बघतात.
He makes deep ways, cut through the rock, and his eye sees everything of value.
11 ११ ते पाण्याचे प्रवाह बंद करतात म्हणजे त्यातून पाणि बाहेर पडत नाही, ते दडलेल्या वस्तू बाहेर प्रकाशात आणतात.
He keeps back the streams from flowing, and makes the secret things come out into the light.
12 १२ पण मनुष्यास शहाणपण कुठे मिळेल? समजूतदारपणा शोधण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल?
But where may wisdom be seen? and where is the resting-place of knowledge?
13 १३ शहाणपण किती मोलाचे आहे हे मनुष्याला कळत नाही, पृथ्वीवरचे लोक जमीन खणून शहाणपण शोधू शकत नाहीत.
Man has not seen the way to it, and it is not in the land of the living.
14 १४ पृथ्वीवरील मोठे खोल जलाशय असे म्हणते, ‘माझ्यामध्ये ते नाही.’ सागर म्हणतो, ‘माझ्याजवळीही ते नाही.’
The deep waters say, It is not in me: and the sea says, It is not with me.
15 १५ तुम्ही सोने देऊन ते विकत घेऊ शकत नाही, ते विकत घेण्यासाठी जगात तेवढी चांदी नाही.
Gold may not be given for it, or a weight of silver in payment for it.
16 १६ तुम्ही ओफीरच्या सोन्याने किंवा मौल्यवान गोमेद किंवा नीलमण्याने शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
It may not be valued with the gold of Ophir, with the onyx of great price, or the sapphire.
17 १७ शहाणपण सोन्यापेक्षा किंवा स्फटिकापेक्षा मौल्यवान असते, सोन्यात जडवलेले मौल्यवान खडेही शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
Gold and glass are not equal to it in price, and it may not be exchanged for jewels of the best gold.
18 १८ शहाणपण पोवळ्यापेक्षा व स्फटिकापेक्षाही मौल्यवान आहे, माणकापेक्षा ही त्याचे मोल अधिक आहे.
There is no need to say anything about coral or crystal; and the value of wisdom is greater than that of pearls.
19 १९ इथिओपियातील (कूश) पीतमणी त्याच्या बरोबरीचा नाही, शुध्द सोन्याने तुम्ही तो विकत घेऊ शकत नाही.
The topaz of Ethiopia is not equal to it, and it may not be valued with the best gold.
20 २० मग शहाणपणा कुठून येते? समजूतदारपणा आपल्याला कुठे मिळेल?
From where then does wisdom come, and where is the resting-place of knowledge?
21 २१ पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्यापासून शहाणपण लपवून ठेवले आहे, आकाशातले पक्षीसुध्दा ते बघू शकत नाहीत.
For it is kept secret from the eyes of all living, unseen by the birds of the air.
22 २२ मृत्यू आणि विनाश म्हणतात, ‘आम्हास शहाणपण सापडले नाही, आम्ही त्याबद्दलच्या फक्त अफवाच ऐकल्या आहेत.’
Destruction and Death say, We have only had word of it with our ears.
23 २३ फक्त देवालाच शहाणपणाकडे नेणारा मार्ग माहीत आहे, फक्त देवालाच तो कुठे आहे हे माहीत आहे.
God has knowledge of the way to it, and of its resting-place;
24 २४ देवाला पृथ्वीचे अगदी शेवटचे टोकसुध्दा दिसू शकते, त्यास आकाशाखालचे सर्वकाही दिसते.
For his eyes go to the ends of the earth, and he sees everything under heaven.
25 २५ देवाने वाऱ्याला त्यांची शक्ती दिली, सागराला किती मोठे करायचे ते त्यानेच ठरवले.
When he made a weight for the wind, measuring out the waters;
26 २६ पावसास कोठे पाठवायचे ते त्यानेच ठरवले आणि वादळाने कुठे जायचे तेही त्यानेच ठरवले.
When he made a law for the rain, and a way for the thunder-flames;
27 २७ तेव्हा देवाला शहाणपण दिसले आणि त्याने त्याचा विचार केला, शहाणपणाचे मूल्य किती आहे ते त्याने पारखले आणि त्या शहाणपणाला संमती दिली.
Then he saw it, and put it on record; he gave it its fixed form, searching it out completely.
28 २८ आणि देव लोकांस म्हणाला, परमेश्वराची भीती बाळगा व त्यास मान द्या हेच शहाणपण आहे, वाईट गोष्टी करु नका तोच समजूतदारपणा आहे.”
And he said to man, Truly the fear of the Lord is wisdom, and to keep from evil is the way to knowledge.