< ईयोब 24 >

1 “त्या सर्वशक्तिमानाने न्यायवेळ का नेमून ठेवली नाही? त्यास ओळखणाऱ्यांना त्या न्याय दिवसाची का प्रतिती येत नाही?
なにゆゑに全能者時期を定めおきたまはざるや 何故に彼を知る者その日を見ざるや
2 आणि काही जण हद्द दर्शविणाऱ्या खुणा सरकवतात. लोक पशूंचे कळप चोरुन स्वच: च्या रानात चरायला नेतात.
人ありて地界を侵し群畜を奪ひて牧ひ
3 ते अनाथ मुलांची गाढवे चोरतात. ते विधवेचा बैल गहाण म्हणून ठेवतात.
孤子の驢馬を驅去り 寡婦の牛を取て質となし
4 ते गरजंवताना त्यांच्या मार्गापासून बहकवतात. सगळ्या पृथ्वीवरील गरीबांना या दुष्टांपासून लपून रहावे लागते.
貧しき者を路より推退け 世の受難者をして盡く身を匿さしむ
5 गरीब लोक वाळवंटात हिंडून अन्न शोधणाऱ्या मोकाट गाढवाप्रमाणे आहेत ते काळजीपूर्वक अन्नाचा शोध घेतात. त्यांच्या मुलाबाळांना जंगल अन्न पुरवते.
視よ彼らは荒野にをる野驢馬のごとく出て業を爲て食を求め 野原よりその子等のために食物を得
6 गरीब लोक रात्रीपर्यंत इतरांच्या शेतात कापणी करतात, आणि ते दुष्टांच्या पिकातील द्राक्षे वेचतात.
圃にて惡き者の麥を刈り またその葡萄の遺餘を摘む
7 त्यांना रात्री कपड्यांशिवाय झोपावे लागते. थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ पांघरुण नसते.
かれらは衣服なく裸にして夜を明し 覆ふて寒氣を禦ぐべき物なし
8 ते डोंगरावरील पावसाने भिजतात, आश्रय नसल्याकारणाने ते खडकांना कवटाळून बसतात.
山の暴風に濡れ 庇はるるところ無して岩を抱く
9 दुष्ट लोक स्तनपान करणारे बाळ आई जवळून घेतात. ते गरीबाच्या त्याने काढलेल्या कर्जाबद्दल तारण म्हणून त्यांची मुले ठेवून घेतात.
孤子を母の懷より奪ふ者あり 貧しき者の身につける物を取て質となす者あり
10 १० ते कपडे नसल्यामुळे उघडेच असतात, ते दुसऱ्यांच्या धान्यांच्या पेंढ्या वाहतात पण स्वत: मात्र उपाशीच राहतात.
貧き者衣服なく裸にて歩き 饑つつ麥束を擔ふ
11 ११ ते आवाराच्या आत तेल काढतात, ते दुष्टांच्या द्राक्षकुंडात द्राक्ष तुडवतात तरी ते तान्हाले राहतात.
人の垣の内にて油を搾め また渇きつつ酒醡を踐む
12 १२ शहरात मरणास टेकलेल्या मनुष्यांचे दु: खद रडणे ऐकू येते, घायाळाचा आत्मा आरोळी मारतो, परंतु देव त्यांच्या प्रारर्थनेकडे लक्ष देत नाही.
邑の中より人々の呻吟たちのぼり 傷けられたる者の叫喚おこる 然れども神はその怪事を省みたまはず
13 १३ काही लोक प्रकाशा विरूद्ध बंड करतात. देवाला काय हवे आहे हे जाणून घ्यायची त्यांची इच्छा नसते. देवाच्या इच्छेप्रमाणे जगणे त्यांना आवडत नाही.
また光明に背く者あり 光の道を知ず 光の路に止らず
14 १४ खुनी सकाळी लवकर उठतो आणि गरीब व असहाय्य लोकांस ठार मारतो तो रात्रीच्या वेळी चोरासारखा असतो.
人を殺す者昧爽に興いで 受難者や貧しき者を殺し 夜は盜賊のごとくす
15 १५ ज्या मनुष्यास व्यभिचार करायचा आहे तो रात्रीची वाट बघतो. तो म्हणतो, ‘मला कोणीही बघणार नाही’ पण तरीही तो त्याचा चेहरा झाकतो.
姦淫する者は我を見る目はなからんと言てその目に昏暮をうかがひ待ち而してその面に覆ふ物を當つ
16 १६ रात्रीच्या वेळी अंधार असतो तेव्हा दुष्ट लोक दुसऱ्यांची घरे फोडतात. पण दिवसा ते स्वत: ला त्यांच्या घरांत कोंडून घेतात. ते प्रकाशाला टाळतात.
また夜分家を穿つ者あり 彼等は晝は閉こもり居て光明を知らず
17 १७ त्या दुष्टांना काळीकुटृ रात्र सकाळसारखी वाटते. त्या भयंकर काळोखाची भयानकता त्यांना चांगलीच माहीत असते.
彼らには晨は死の蔭のごとし 是死の蔭の怖ろしきを知ばなり
18 १८ पुरात जशा वस्तू वाहून जातात तशी दुष्ट माणसे वाहून नेली जातात, त्यांच्या जमिनीला शाप दिला जातो, त्यांच्या शेतात काम करण्यास कोणीही जात नाहीत.
彼は水の面に疾ながるる物の如し その產業は世の中に詛はる その身重ねて葡萄圃の路に向はず
19 १९ हिवाळ्यातल्या बर्फापासून मिळालेले त्यांचे पाणी उष्ण आणि कोरडी हवा शोषून घेते. त्याप्रमाणे त्या पापी लोकांस थडग्यात नेले जाते. (Sheol h7585)
亢旱および炎熱は雪水を直に乾涸す 陰府が罪を犯せし者におけるも亦かくのごとし (Sheol h7585)
20 २० ज्या उदराने त्यास जन्म दिला ती विसरून जाईल, त्याची आठवण राहणार नाही, त्याप्रमाणे दुष्टपणा झाडासारखा मोडून पडेल.
これを宿せし腹これを忘れ 蛆これを好みて食ふ 彼は最早世におぼえらるること無く その惡は樹を折るが如くに折る
21 २१ दुष्ट माणसे वांझ बायकांना त्रास देतात ज्यांना मुले झालेली नाहीत, ते विधवांसाठी काही चांगले करीत नाहीत.
是すなはち孕まず產ざりし婦人をなやまし 寡婦を憐れまざる者なり
22 २२ तरी देव आपल्या सामर्थ्याने बलवानास राखतो, ज्याला जगण्याचा भरवसा नाही तो उठतो,
神はその權能をもて強き人々を保存へさせたまふ 彼らは生命あらじと思ふ時にも復興る
23 २३ देव दुष्टांना आपण सुरक्षित आहेत असा विचार करण्यास भाग पाडतो आणि त्याविषयी ते आनंदी होतात.
神かれらに安泰を賜へば彼らは安らかなり 而してその目をもて彼らの道を見そなはしたまふ
24 २४ ते उंचावले जातात परंतू थोड्या काळापुरते नंतर ते जातात. खरोखर, ते खचून जातात, ते इतर सर्वांप्रमाणे काढून टाकले जातात. आणि ते कणसाच्या शेड्यांप्रमाणे कापून टाकले जातात.
かれらは旺盛になり暫時が間に無なり卑くなりて一切の人のごとくに沒し麥の穗のごとくに斷る
25 २५ या गोष्टी खऱ्या नाहीत असे कोण म्हणतो, मी खोटे बोललो हे कोण सिध्द करेल? माझे बोलने निरर्थक आहे हे कोण दाखवून देईल?”
すでに是のごとくなれば誰か我の謬まれるを示してわが言語を空しくすることを得ん

< ईयोब 24 >