< ईयोब 23 >

1 नंतर ईयोबने उत्तर दिले व तो म्हणाला,
约伯回答说:
2 “तरीही मी आज कडवटपणे तक्रार करीन? कारण माझा त्रास माझ्या विलापाहून भारी आहे.
如今我的哀告还算为悖逆; 我的责罚比我的唉哼还重。
3 देवाला कुठे शोधावे ते मला माहीत असते तर मी त्याच्या ठिकाणापर्यंत जाऊन पोहचलो असतो
惟愿我能知道在哪里可以寻见 神, 能到他的台前,
4 मी देवाला माझी फिर्याद सांगितली असती. माझ्या मुखाने सतत वाद घातला असता.
我就在他面前将我的案件陈明, 满口辩白。
5 त्याने माझ्या युक्तिवादाला कसे प्रत्युतर दिले असते ते मला कळले असते. तो मला काय म्हणाला ते मी लक्षात घेतले असते.
我必知道他回答我的言语, 明白他向我所说的话。
6 त्याच्या महान सामर्थ्याने त्याने माझ्याविरुध्द वाद केला असता का? नाही; तर त्याने माझ्याकडे लक्ष दिले असते.
他岂用大能与我争辩吗? 必不这样!他必理会我。
7 तेथे सरळ मनुष्यांनी त्याच्याशी वाद केला असता. म्हणजे मी माझ्या न्यायाधीशापासुन सुटलो असतो.
在他那里正直人可以与他辩论; 这样,我必永远脱离那审判我的。
8 पाहा, मी पूर्वेकडे गेलो, पण तो तीथे नव्हता, मी पश्चिमेकडे गेलो, पण मी त्यास पाहीले नाही.
只是,我往前行,他不在那里, 往后退,也不能见他。
9 उत्तरेकडे तो कार्य करीत असला, तरी मला तो दिसू शकत नाही. आणि दक्षिणेकडेही, जेथे तो स्वतःस लपवितो त्यामुळे तेथेही तो मला दिसत नाही.
他在左边行事,我却不能看见, 在右边隐藏,我也不能见他。
10 १० परंतु माझा मार्ग त्यास कळाला आहे, जेव्हा तो माझी परीक्षा घेतो, तेव्हा मी सोन्यासारखा असेन.
然而他知道我所行的路; 他试炼我之后,我必如精金。
11 ११ त्याच्या पावलावर माझी पावले पडत आहेत, मी त्याचा मार्ग धरला आहे व त्यापासून वळालो नाही.
我脚追随他的步履; 我谨守他的道,并不偏离。
12 १२ मी त्याच्या ओठांच्या आज्ञेचे पालन करण्यापासुन मागे वळालो नाही, मी संपत्ती प्रमाणे माझ्या हृदयात देवाच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द ठेवले आहेत.
他嘴唇的命令,我未曾背弃; 我看重他口中的言语,过于我需用的饮食。
13 १३ परंतु देव कधी बदलत नाही, त्यास कोण बदलेल. त्याच्या मनाच्या ईच्छेप्रमाणे तो करतो.
只是他心志已定,谁能使他转意呢? 他心里所愿的,就行出来。
14 १४ कारण तो माझ्यासाठी त्याचा हूकुम चालवितो, माझ्यासाठी त्याच्या बऱ्याच योजना आहेत.
他向我所定的,就必做成; 这类的事他还有许多。
15 १५ यास्तव, मी त्याच्या उपस्थीतीला घाबरतो, जेव्हा मी त्याच्याबद्दल विचार करतो, मला त्याची भीती वाटते.
所以我在他面前惊惶; 我思念这事便惧怕他。
16 १६ त्यामुळे देवाने माझे हृदय कमजोर केले आहे, आणि सर्वशक्तिमानाने मला भयभीत केले आहे.
神使我丧胆; 全能者使我惊惶。
17 १७ काय मी अंधकाराने काढून टाकला गेलो नाही काय? आणि गडद अंधकाराने माझे मुख झाकले गेले नाही काय.”
我的恐惧不是因为黑暗, 也不是因为幽暗蒙蔽我的脸。

< ईयोब 23 >