< ईयोब 22 >

1 मग अलीफज तेमानीने उत्तर दिले व तो म्हणाला,
ὑπολαβὼν δὲ Ελιφας ὁ Θαιμανίτης λέγει
2 “देवासाठी मनुष्य उपयुक्त होऊ शकेल काय? ज्ञानी मनुष्य देवाला उपयोगी होऊ शकतो काय?
πότερον οὐχὶ ὁ κύριός ἐστιν ὁ διδάσκων σύνεσιν καὶ ἐπιστήμην
3 तुमच्या धार्मिक जगण्याने सर्वसमर्थाला काही आनंद होतो काय? तू चांगला राहीलास तर त्यास काही लाभ होईल काय?
τί γὰρ μέλει τῷ κυρίῳ ἐὰν σὺ ἦσθα τοῖς ἔργοις ἄμεμπτος ἢ ὠφέλεια ὅτι ἁπλώσῃς τὴν ὁδόν σου
4 तो तुझा भक्तीभाव पाहून तुझा निषेध करतो आणि तुला न्यायाकडे नेतो का?
ἦ λόγον σου ποιούμενος ἐλέγξει σε καὶ συνεισελεύσεταί σοι εἰς κρίσιν
5 तुझे पाप मोठे नाही काय? तुझ्या दुष्टाईला अंत नाही ना?
πότερον οὐχ ἡ κακία σού ἐστιν πολλή ἀναρίθμητοι δέ σού εἰσιν αἱ ἁμαρτίαι
6 तू विनाकारण आपल्या भावाचे गहाण अडकवून ठेवले, उघड्यांची वस्त्रे तू हिरावून घेतली.
ἠνεχύραζες δὲ τοὺς ἀδελφούς σου διὰ κενῆς ἀμφίασιν δὲ γυμνῶν ἀφείλου
7 तू थकलेल्यास पाणी दिले नाही आणि भुकेल्या लोकांस अन्न दिले नाही.
οὐδὲ ὕδωρ διψῶντας ἐπότισας ἀλλὰ πεινώντων ἐστέρησας ψωμόν
8 जरी तू, शक्तीमान मनुष्य असशील, सर्व भूमी तुझी असेल, जरी तू एक सन्मानीत मनुष्य असशील.
ἐθαύμασας δέ τινων πρόσωπον ᾤκισας δὲ τοὺς ἐπὶ τῆς γῆς
9 तू विधवांना काहीही न देता घालवून दिले असशील, पोरक्याचे बाहू मोडले असशील.
χήρας δὲ ἐξαπέστειλας κενάς ὀρφανοὺς δὲ ἐκάκωσας
10 १० म्हणूनच तुझ्या भोवती सापळे आहेत आणि अचानक आलेल्या संकटानी तू घाबरुन जात आहेस.
τοιγαροῦν ἐκύκλωσάν σε παγίδες καὶ ἐσπούδασέν σε πόλεμος ἐξαίσιος
11 ११ म्हणूनच सर्वत्र इतका अंधार आहे की तुला काही दिसत नाही आणि तू पुराच्या पाण्याने चोहोबाजूंनी वेढला आहेस.
τὸ φῶς σοι σκότος ἀπέβη κοιμηθέντα δὲ ὕδωρ σε ἐκάλυψεν
12 १२ देव उंच स्वर्गात नाही काय? तारे किती उंचावर आहेत ते बघ, ते कीती उंच आहेत.
μὴ οὐχὶ ὁ τὰ ὑψηλὰ ναίων ἐφορᾷ τοὺς δὲ ὕβρει φερομένους ἐταπείνωσεν
13 १३ आणि तू म्हणतो देवाला काय माहीती आहे? दाट अंधाराच्या आडून तो कसा न्याय करतो.
καὶ εἶπας τί ἔγνω ὁ ἰσχυρός ἦ κατὰ τοῦ γνόφου κρινεῖ
14 १४ दाट ढग त्यास झाकत आहेत, म्हणजे त्याने आपल्याला बघू नये.
νέφη ἀποκρυφὴ αὐτοῦ καὶ οὐχ ὁραθήσεται καὶ γῦρον οὐρανοῦ διαπορεύσεται
15 १५ तू जूनाच मार्ग धरणार आहेस काय, ज्यावर दुष्टजण चालले.
μὴ τρίβον αἰώνιον φυλάξεις ἣν ἐπάτησαν ἄνδρες ἄδικοι
16 १६ त्यांची वेळ येण्यापूर्वीच त्यांचा नाश करण्यात आला, त्यांचा पाया नदीसारखा वाहून गेला.
οἳ συνελήμφθησαν ἄωροι ποταμὸς ἐπιρρέων οἱ θεμέλιοι αὐτῶν
17 १७ जे देवाला म्हटले, ‘आमच्या पासून निघून जा तो सर्वशक्तिमान देव आम्हास काय करु शकतो?’
οἱ λέγοντες κύριος τί ποιήσει ἡμῖν ἢ τί ἐπάξεται ἡμῖν ὁ παντοκράτωρ
18 १८ आणि त्यानेच त्यांची घरे चांगल्या वस्तूंनी भरली होती. परंतू दुष्टाची योजना माझ्यापासुन दूर आहे.
ὃς δὲ ἐνέπλησεν τοὺς οἴκους αὐτῶν ἀγαθῶν βουλὴ δὲ ἀσεβῶν πόρρω ἀπ’ αὐτοῦ
19 १९ धार्मिक त्यांचा नाश पाहून संतोष पावतील. निर्दोष त्यांचा उपहास करतात.
ἰδόντες δίκαιοι ἐγέλασαν ἄμεμπτος δὲ ἐμυκτήρισεν
20 २० आणि म्हणतात खरोखरच आमच्या विरूद्ध जे उठले त्यांचा नाश झाला आहे. त्यांची संपत्ती आगीत नष्ट होत आहे.
εἰ μὴ ἠφανίσθη ἡ ὑπόστασις αὐτῶν καὶ τὸ κατάλειμμα αὐτῶν καταφάγεται πῦρ
21 २१ तू आता देवाला शरण जा. त्याच्याशी सलोखा कर. तू हे केलेस तर तुला खूप चांगल्या गोष्टी मिळतील.
γενοῦ δὴ σκληρός ἐὰν ὑπομείνῃς εἶτ’ ὁ καρπός σου ἔσται ἐν ἀγαθοῖς
22 २२ मी तुला विनंती करतो त्याच्या तोंडच्या सूचनांचा स्विकार कर. त्याचे शब्द आपल्या हृदयात ठेव.
ἔκλαβε δὲ ἐκ στόματος αὐτοῦ ἐξηγορίαν καὶ ἀνάλαβε τὰ ῥήματα αὐτοῦ ἐν καρδίᾳ σου
23 २३ तू सर्वशक्तिमान देवाकडे परत येशील, तर तुझी बांधणी होईल. जर तू अधार्मीकता आपल्या तंबूपासून दूर ठेवशील.
ἐὰν δὲ ἐπιστραφῇς καὶ ταπεινώσῃς σεαυτὸν ἔναντι κυρίου πόρρω ἐποίησας ἀπὸ διαίτης σου τὸ ἄδικον
24 २४ तुझ्याजवळ असलेल्या संपत्तीला मातीमोल मानशील, तू तुझ्या सर्वात चांगल्या ओफीरच्या सोन्याला दरीतल्या दगडाएवढी किंमत देशील.
θήσῃ ἐπὶ χώματι ἐν πέτρᾳ καὶ ὡς πέτρᾳ χειμάρρους Ωφιρ
25 २५ म्हणजे सर्वशक्तिमान देवच तुझे धन असा होईल आणि तो तुला मोलवान रूपे असा होईल.
ἔσται οὖν σου ὁ παντοκράτωρ βοηθὸς ἀπὸ ἐχθρῶν καθαρὸν δὲ ἀποδώσει σε ὥσπερ ἀργύριον πεπυρωμένον
26 २६ तेव्हा तू सर्वशक्तिमानच्या ठायी आनंद पावशील, तू तुझे मुख देवाकडे वर करशील.
εἶτα παρρησιασθήσῃ ἔναντι κυρίου ἀναβλέψας εἰς τὸν οὐρανὸν ἱλαρῶς
27 २७ तू त्याची प्रार्थना करशील आणि तो तुझे ऐकेल आणि तू आपले नवस फेडशील.
εὐξαμένου δέ σου πρὸς αὐτὸν εἰσακούσεταί σου δώσει δέ σοι ἀποδοῦναι τὰς εὐχάς
28 २८ जी गोष्ट तू मनात आणशील तेव्हा ती सिध्दीस जाईल. प्रकाश तुझ्या मार्गात चमकेल.
ἀποκαταστήσει δέ σοι δίαιταν δικαιοσύνης ἐπὶ δὲ ὁδοῖς σου ἔσται φέγγος
29 २९ देव गर्वीष्ठांना नम्र करील, आणि तो नम्र लोंकाची सुटका करील.
ὅτι ἐταπείνωσεν αὐτόν καὶ ἐρεῖς ὑπερηφανεύσατο καὶ κύφοντα ὀφθαλμοῖς σώσει
30 ३० जो निर्दोष नाही त्यालाही तो वाचवतो, तुझ्या हाताच्या निर्मळतेमुळे ते बचावले जातील.”
ῥύσεται ἀθῷον καὶ διασώθητι ἐν καθαραῖς χερσίν σου

< ईयोब 22 >