< ईयोब 22 >
1 १ मग अलीफज तेमानीने उत्तर दिले व तो म्हणाला,
特曼人厄里法次接著說:
2 २ “देवासाठी मनुष्य उपयुक्त होऊ शकेल काय? ज्ञानी मनुष्य देवाला उपयोगी होऊ शकतो काय?
人為天主能有什麼益處﹖明智人只能於一己有益。
3 ३ तुमच्या धार्मिक जगण्याने सर्वसमर्थाला काही आनंद होतो काय? तू चांगला राहीलास तर त्यास काही लाभ होईल काय?
縱然你公正,對全能者有什麼好處﹖縱然你品行齊全,對天主有什麼利益﹖
4 ४ तो तुझा भक्तीभाव पाहून तुझा निषेध करतो आणि तुला न्यायाकडे नेतो का?
他豈能因你敬畏之心而責斥你,拉你來聽審﹖
5 ५ तुझे पाप मोठे नाही काय? तुझ्या दुष्टाईला अंत नाही ना?
豈不是因為你罪惡多端,罪過無窮﹖
6 ६ तू विनाकारण आपल्या भावाचे गहाण अडकवून ठेवले, उघड्यांची वस्त्रे तू हिरावून घेतली.
因為你無理地強取了你兄弟的抵押,剝去了人的衣服,使之赤裸;
7 ७ तू थकलेल्यास पाणी दिले नाही आणि भुकेल्या लोकांस अन्न दिले नाही.
口渴的人,你沒有給他水喝;饑餓的人,你沒有給他飯吃;
8 ८ जरी तू, शक्तीमान मनुष्य असशील, सर्व भूमी तुझी असेल, जरी तू एक सन्मानीत मनुष्य असशील.
讓強有力的人佔有土地,讓尊貴體面的人住在其中;
9 ९ तू विधवांना काहीही न देता घालवून दिले असशील, पोरक्याचे बाहू मोडले असशील.
卻使寡婦空手而歸,折斷孤兒的手臂;
10 १० म्हणूनच तुझ्या भोवती सापळे आहेत आणि अचानक आलेल्या संकटानी तू घाबरुन जात आहेस.
因此羅網要四面圍困你,恐嚇突降,使你驚惶。
11 ११ म्हणूनच सर्वत्र इतका अंधार आहे की तुला काही दिसत नाही आणि तू पुराच्या पाण्याने चोहोबाजूंनी वेढला आहेस.
光明變成黑暗,使你毫無所見;洪水漫漫,將你淹沒。
12 १२ देव उंच स्वर्गात नाही काय? तारे किती उंचावर आहेत ते बघ, ते कीती उंच आहेत.
天主豈不是居於高天﹖看,最高的星辰何其高遠﹖
13 १३ आणि तू म्हणतो देवाला काय माहीती आहे? दाट अंधाराच्या आडून तो कसा न्याय करतो.
你曾說過:「天主知道什麼﹖他豈能透過黑雲施行審判﹖
14 १४ दाट ढग त्यास झाकत आहेत, म्हणजे त्याने आपल्याला बघू नये.
雲彩遮蔽著他,使他看不到什麼,而他只在天邊周圍遊行。」
15 १५ तू जूनाच मार्ग धरणार आहेस काय, ज्यावर दुष्टजण चालले.
你豈要固守惡人所蹈的故轍﹖
16 १६ त्यांची वेळ येण्यापूर्वीच त्यांचा नाश करण्यात आला, त्यांचा पाया नदीसारखा वाहून गेला.
尚未到時,他們已被攫去,大水沖去了他們的基礎。
17 १७ जे देवाला म्हटले, ‘आमच्या पासून निघून जा तो सर्वशक्तिमान देव आम्हास काय करु शकतो?’
他們曾向天主說:「離開我們! 全能者能為我們作什麼﹖」
18 १८ आणि त्यानेच त्यांची घरे चांगल्या वस्तूंनी भरली होती. परंतू दुष्टाची योजना माझ्यापासुन दूर आहे.
他原來是以福利充滿了他們的家,可是惡人的思想離他很遠。
19 १९ धार्मिक त्यांचा नाश पाहून संतोष पावतील. निर्दोष त्यांचा उपहास करतात.
義人見了就歡樂,無罪者也譏笑他們說:「
20 २० आणि म्हणतात खरोखरच आमच्या विरूद्ध जे उठले त्यांचा नाश झाला आहे. त्यांची संपत्ती आगीत नष्ट होत आहे.
的確,他們的財富已被消滅,他門所剩餘的皆被火焚毀。」
21 २१ तू आता देवाला शरण जा. त्याच्याशी सलोखा कर. तू हे केलेस तर तुला खूप चांगल्या गोष्टी मिळतील.
請你與他親善和好,藉此你的幸福必的恢復。
22 २२ मी तुला विनंती करतो त्याच्या तोंडच्या सूचनांचा स्विकार कर. त्याचे शब्द आपल्या हृदयात ठेव.
請你領受他口中的教訓,將他的話存在心中。
23 २३ तू सर्वशक्तिमान देवाकडे परत येशील, तर तुझी बांधणी होईल. जर तू अधार्मीकता आपल्या तंबूपासून दूर ठेवशील.
如果你歸向全能者,你必興起;你若使邪惡離開你的帳幕,
24 २४ तुझ्याजवळ असलेल्या संपत्तीला मातीमोल मानशील, तू तुझ्या सर्वात चांगल्या ओफीरच्या सोन्याला दरीतल्या दगडाएवढी किंमत देशील.
視金子如塵埃,視敖非爾金如溪石,
25 २५ म्हणजे सर्वशक्तिमान देवच तुझे धन असा होईल आणि तो तुला मोलवान रूपे असा होईल.
全能者必作為你的精金,作為你的銀堆。
26 २६ तेव्हा तू सर्वशक्तिमानच्या ठायी आनंद पावशील, तू तुझे मुख देवाकडे वर करशील.
那時你必以全能者為喜樂,向天主仰起你的頭來。
27 २७ तू त्याची प्रार्थना करशील आणि तो तुझे ऐकेल आणि तू आपले नवस फेडशील.
那時你祈求他,他必應允你;你可向他還你的誓願。
28 २८ जी गोष्ट तू मनात आणशील तेव्हा ती सिध्दीस जाईल. प्रकाश तुझ्या मार्गात चमकेल.
你決定的事,事必成就;光明要照耀你的道路,
29 २९ देव गर्वीष्ठांना नम्र करील, आणि तो नम्र लोंकाची सुटका करील.
因為他壓伏驕傲的人,拯救低首下心的人。
30 ३० जो निर्दोष नाही त्यालाही तो वाचवतो, तुझ्या हाताच्या निर्मळतेमुळे ते बचावले जातील.”
他必解救無罪的人;你若手中清廉,你必獲救。