< ईयोब 21 >
1 १ नंतर ईयोबाने उत्तर दिले.
そこでヨブは答えて言った、
2 २ “मी काय म्हणतो ते निट ऐक म्हणजे माझे सांत्वन होईल.
「あなたがたはとくと、わたしの言葉を聞き、これをもって、あなたがたの慰めとするがよい。
3 ३ मी बोलेन तेव्हा तू थोडा धीर धर, माझे बोलणे संपल्यावर तू माझी थट्टा करु शकतोस.
まずわたしをゆるして語らせなさい。わたしが語ったのち、あざけるのもよかろう。
4 ४ माझी लोकांविरुध्द तक्रार काय आहे? मी अधीर का होऊ नये?
わたしのつぶやきは人に対してであろうか。わたしはどうして、いらだたないでいられようか。
5 ५ माझ्याकडे बघ व आश्चर्यचकित हो, व तुझे हात तू आपल्या तोंडावर ठेव.
あなたがたはわたしを見て、驚き、手を口にあてるがよい。
6 ६ माझ्यावर आलेल्या त्रांसाचा विचार करायला लागलो म्हणजे मला भीती वाटते आणि माझ्या शरीराचा थरकाप होतो.
わたしはこれを思うと恐ろしくなって、からだがしきりに震えわななく。
7 ७ दुष्ट मनुष्यांना जास्त आयुष्य का असते? ते वृध्द आणि यशस्वी का होतात?
なにゆえ悪しき人が生きながらえ、老齢に達し、かつ力強くなるのか。
8 ८ आणि त्याचे वंशज त्याच्या डोळ्यासमोर स्थापीत होतात, आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याची मुलेबाळे नांदतात.
その子らは彼らの前に堅く立ち、その子孫もその目の前に堅く立つ。
9 ९ त्यांची घरे भितीपासून सुरक्षित असतात, देवाची काठी त्याच्यांवर पडत नाही.
その家は安らかで、恐れがなく、神のつえは彼らの上に臨むことがない。
10 १० त्यांच्या बैलाचे प्रजोत्पादन असफल होत नाही. त्यांच्या गायींना वासरे होतात आणि त्यांची वासरे अकाली मृत्युमुखी पडत नाहीत.
その雄牛は種を与えて、誤ることなく、その雌牛は子を産んで、そこなうことがない。
11 ११ ते आपल्या मुलांना वासराप्रमाणे बाहेर खेळायला पाठवतात. त्यांची मुले सभोवती नाचत असतात.
彼らはその小さい者どもを群れのように連れ出し、その子らは舞い踊る。
12 १२ ते डफ आणि वीणेच्या आवाजावर गातात आणि ते पावांचा नाद ऐकुण आनंदी होतात.
彼らは手鼓と琴に合わせて歌い、笛の音によって楽しみ、
13 १३ ते त्यांचे दिवस भरभराटीत घालवतात, नंतर ते शांतपणे खाली अधोलोकात जातात. (Sheol )
その日をさいわいに過ごし、安らかに陰府にくだる。 (Sheol )
14 १४ ते देवाला म्हणाले, आम्हास एकटे सोड आम्हास तुझ्या ज्ञानाच्या मार्गाची इच्छा नाही.
彼らは神に言う、『われわれを離れよ、われわれはあなたの道を知ることを好まない。
15 १५ सर्वशक्तिमान कोण आहे, की त्याची उपासना आम्ही करावी? त्याची प्रार्थना करून आम्हास काय लाभ?
全能者は何者なので、われわれはこれに仕えねばならないのか。われわれはこれに祈っても、なんの益があるか』と。
16 १६ पाहा, त्याची भरभराट त्याच्या स्वतःच्या हाती नाही? दुष्ट मनुष्याचा सल्ला माझ्यापासुन दूर असो.
見よ、彼らの繁栄は彼らの手にあるではないか。悪人の計りごとは、わたしの遠く及ぶ所でない。
17 १७ वांरवार दुष्टाचा दिप विझवला जातो, त्याची विपत्ती त्यांच्यावर येते? आणि असे कीतीतरी वेळ घडते की, देव त्याच्या क्रोधाने त्यांची पीडा त्यांना वाटून देतो.
悪人のともしびの消されること、幾たびあるか。その災の彼らの上に臨むこと、神がその怒りをもって苦しみを与えられること、幾たびあるか。
18 १८ ते कितीदा वाऱ्यापुढे धसकटासारखे होतात, किंवा ते वादळाने उडालेल्या भूशासारखे होतात.
彼らが風の前のわらのようになること、あらしに吹き去られるもみがらのようになること、幾たびあるか。
19 १९ पण तू म्हणतोस देव वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा करतो. तर त्याने त्यालाच प्रतिफळ द्यावे म्हणजेच त्यास त्याचा दोष कळेल.
あなたがたは言う、『神は彼らの罪を積みたくわえて、その子らに報いられるのだ』と。どうかそれを彼ら自身に報いて、彼らにその罪を知らせられるように。
20 २० त्याच्या डोळ्यांनीच तो आपला नाश पाहो, तो सर्वशक्तिमान देवाच्या रागाचे प्राशन करो.
すなわち彼ら自身の目にその滅びを見させ、全能者の怒りを彼らに飲ませられるように。
21 २१ जेव्हा त्याच्या आयुष्याची मद्दत कमी करण्यास येईल, तेव्हा त्याच्या मरणानंतर तो त्याच्या परीवाराची काळजी कशी करील?
その月の数のつきるとき、彼らはその後の家になんのかかわる所があろうか。
22 २२ देवाला कोणी ज्ञान शिकवू शकते का? तो तर उच्च पदावर असलेल्या लोकांचाही न्यायनिवाडा करतो.
神は天にある者たちをさえ、さばかれるのに、だれが神に知識を教えることができようか。
23 २३ एखादा मनुष्य त्याच्या पूर्ण शक्तीतच मरतो, पुर्णपणे शांतीत आणि सहजतेने.
ある者は繁栄をきわめ、全く安らかに、かつおだやかに死に、
24 २४ त्याची भांडी दुधाने आणि त्याची हाडे मज्जारसाने ओलसर आहेत.
そのからだには脂肪が満ち、その骨の髄は潤っている。
25 २५ दुसरा मनुष्य मनाच्या कटूपणात मरतो, त्याने कधीच चांगले अनुभवलेले नसते.
ある者は心を苦しめて死に、なんの幸をも味わうことがない。
26 २६ शेवटी हे दोघेही बरोबरच मातीत जातील. किडे त्यांना झाकून टाकतील.
彼らはひとしくちりに伏し、うじにおおわれる。
27 २७ पाहा, मला तुमचे विचार माहीती आहेत, कोणत्या चुकांनी मला दु: ख द्यायची तुझी इच्छा आहे हे मला माहीत आहे.
見よ、わたしはあなたがたの思いを知り、わたしを害しようとするたくらみを知る。
28 २८ तू कदाचित् म्हणशील ‘आता राजाचे घर कोठे आहे? दुष्ट ज्या तंबूत राहतो तो कोठे आहे.
あなたがたは言う、『王侯の家はどこにあるか、悪人の住む天幕はどこにあるか』と。
29 २९ तू कधीच प्रवास करणाऱ्या लोकांस विचारले नाहीस काय? ते काय चिन्ह देतील हे तुला ठावूक नाही काय,
あなたがたは道行く人々に問わなかったか、彼らの証言を受け入れないのか。
30 ३० दुष्ट मनुष्य नाशाच्या दिवसासाठी ठेवलेला आहे, आणि त्यास क्रोधाच्या दिवशी बाहेर आणतील.
すなわち、災の日に悪人は免れ、激しい怒りの日に彼は救い出される。
31 ३१ त्याच्या तोंडावर त्याचा मार्ग कोण प्रकट करील? त्याने जे केले त्याची परत फेड कोण करील?
だれが彼に向かって、その道を告げ知らせる者があるか、だれが彼のした事を彼に報いる者があるか。
32 ३२ नंतर त्यास कबरेकडे नेतील, त्याच्या थडग्यावर पहारा ठेवतील.
彼はかかれて墓に行き、塚の上で見張りされ、
33 ३३ खोऱ्यातील ढेकळे त्यास गोड लागतील, सर्व लोक त्याच्या पाठीमागे जातील जसे असंख्य लोक होऊन गेले तसे ते सर्व त्याच्या मागे जातील
谷の土くれも彼には快く、すべての人はそのあとに従う。彼の前に行った者も数えきれない。
34 ३४ मग तुमच्या मुर्खपणाने तुम्ही माझे सांत्वन कसे करु शकता, म्हणून तुमची उत्तरे काहीच नाही ती मुर्खपणाची आहेत.”
それで、あなたがたはどうしてむなしい事をもって、わたしを慰めようとするのか。あなたがたの答は偽り以外の何ものでもない」。