< ईयोब 20 >

1 नंतर सोफर नामाथी उत्तर देऊन म्हणाला,
拿玛人琐法回答说:
2 “माझे विचार मला उत्तर द्यायला भाग पाडत आहेत. कारण त्याबद्दलची काळजी माझ्या मनात आहे.
我心中急躁, 所以我的思念叫我回答。
3 तुझ्या उत्तरांनी तू आमचा अपमान केला आहेस, परंतु उत्तर कसे द्यायचे ते माझे मन मला शिकवते जी माझ्या समजण्यापलीकडे आहे.
我已听见那羞辱我,责备我的话; 我的悟性叫我回答。
4 तुला हे सत्य प्राचीन काळापासुन माहीती आहे, जेव्हा देवाने मनुष्याची स्थापना पृथ्वीवर केली, तेव्हा पासून,
你岂不知亘古以来, 自从人生在地,
5 दुष्टांचा जयजयकार फार कमी काळासाठी असतो, अधर्म्याचा आनंद केवळ क्षणिक असतो.
恶人夸胜是暂时的, 不敬虔人的喜乐不过转眼之间吗?
6 त्याचा माहातम्य गगनाला जाऊन भिडेल, आणि त्याचे मस्तक ढगांपर्यंत पोहोचू शकेल.
他的尊荣虽达到天上, 头虽顶到云中,
7 परंतु त्याच्या विष्ठेप्रमाणे त्याचा नाश होईल. जे लोक त्यास ओळखतात ते विचारतील, ‘तो कुठे गेला?’
他终必灭亡,像自己的粪一样; 素来见他的人要说:他在哪里呢?
8 तो एखाद्या स्वप्नासारखाउडून जाईल व तो कोणालाही सापडणार नाही. त्यास घालवून देण्यात येईल आणि एखाद्या रात्रीच्या स्वप्नासारखा तो विसरलाही जाईल.
他必飞去如梦,不再寻见, 速被赶去,如夜间的异象。
9 ज्या लोकांनी त्यास पाहिले होते, त्यांना तो पुन्हा दिसणार नाही. त्याचे कुटुंब पुन्हा कधी त्याच्याकडे बघणार नाही,
亲眼见过他的,必不再见他; 他的本处也再见不着他。
10 १० दुष्ट मनुष्याने गरीब लोकांकडून जे काही घेतले होते ते त्याची मुले परत करतील. दुष्ट मनुष्याचे स्वत: चे हातच त्याची संपत्ती परत करतील.
他的儿女要求穷人的恩; 他的手要赔还不义之财。
11 ११ तो तरुण होता तेव्हा त्याची हाडे मजबूत होती. परंतु आता इतर अवयवांप्रमाणे त्यांची सुध्दा माती होईल.
他的骨头虽然有青年之力, 却要和他一同躺卧在尘土中。
12 १२ दुष्टाला वाईट गोष्टी चांगल्या वाटतात. तो त्यांची चव नीट कळावी म्हणून त्या आपल्या जिभेखाली ठेवतो.
他口内虽以恶为甘甜, 藏在舌头底下,
13 १३ दुष्ट मनुष्यास वाईट गोष्टी आवडतात म्हणून तो त्यांना सोडीत नाही. तो त्या आपल्या तोंडात ठेवतो.
爱恋不舍,含在口中;
14 १४ परंतु त्या वाईट गोष्टीच त्याच्या पोटात विष होतील. त्याच्या आत त्याचे सर्पाच्या विषासारखे जहर होईल.
他的食物在肚里却要化为酸, 在他里面成为虺蛇的恶毒。
15 १५ त्याने धन गिळले तरी तो ती ओकून टाकील, देव त्यास ती पोटातून ओकायला भाग पाडेल.
他吞了财宝,还要吐出; 神要从他腹中掏出来。
16 १६ तो फुरशाचे विष चोखील, सर्पाचा दंशच त्यास मारुन टाकील.
他必吸饮虺蛇的毒气; 蝮蛇的舌头也必杀他。
17 १७ नंतर मधाने आणि दुधाने भरुन वाहाणाऱ्या नद्या बघण्याचे सौख्य तो अनुभवू शकणार नाही.
流奶与蜜之河, 他不得再见。
18 १८ त्याचा नफा परत करणे भाग पडेल. त्याने जे सुख मिळवण्यासाठी कष्ट केले ते सुख भोगण्याची परवानगी त्यास मिळणार नाही.
他劳碌得来的要赔还,不得享用; 不能照所得的财货欢乐。
19 १९ कारण त्याने गरीबांना कष्ट दिले. त्यांना वाईट वागवले. त्याने त्यांची काळजी घेतली नाही. त्यांच्या वस्तू हिसकावून घेतल्या. दुसऱ्यांनी बांधलेली घरे त्यांनी बळकावली.
他欺压穷人,且又离弃; 强取非自己所盖的房屋 。
20 २० कारण त्यास माहीती आहे त्यास कोणतेच समाधान नसते. म्हणून त्यास आपल्या कोणत्याही गोष्टीविषयी निभावून जाता येणार नाही.
他因贪而无厌, 所喜悦的连一样也不能保守。
21 २१ तो खातो तेव्हा काहीही शिल्लक ठेवीत नाही. त्याचे यश टिकणार नाही.
其余的没有一样他不吞灭, 所以他的福乐不能长久。
22 २२ जेव्हा भरपूर असेल तेव्हा तो संकटानी दबून जाईल. गरीबीमध्ये असणाऱ्यांचे हात त्याच्यावर येतील.
他在满足有余的时候,必到狭窄的地步; 凡受苦楚的人都必加手在他身上。
23 २३ दुष्ट मनुष्याने त्यास हवे तितके खाल्ल्यानंतर देव त्याचा क्रोधाग्नी त्याच्यावर फेकेल. देव दुष्टावर त्याच्या शिक्षेचा पाऊस पाडेल.
他正要充满肚腹的时候, 神必将猛烈的忿怒降在他身上; 正在他吃饭的时候, 要将这忿怒像雨降在他身上。
24 २४ दुष्ट मनुष्य तलवारीला भिऊन पळून जाण्याचा प्रयत्न करेल. परंतु पितळी बाण त्याचा बळी घेईन.
他要躲避铁器; 铜弓的箭要将他射透。
25 २५ पितळी बाण त्याच्या शरीरातून आरपार जाईल. त्याचे चकाकणारे टोक त्याचे पित्ताशय भेदील आणि तो भयभीत होईल.
他把箭一抽,就从他身上出来; 发光的箭头从他胆中出来, 有惊惶临在他身上。
26 २६ त्याच्या खजिन्यावर पूर्ण कोळोख येईल. मानवाने उत्पन्न केला नाही असा अग्नी त्याचा नाश करेल. त्याच्या घरातल्या सर्व वस्तूंचा नाश करेल.
他的财宝归于黑暗; 人所不吹的火要把他烧灭, 要把他帐棚中所剩下的烧毁。
27 २७ आकाश त्याचा अधर्म प्रकट करील, पृथ्वी त्याच्याविरुध्द साक्ष देईल.
天要显明他的罪孽; 地要兴起攻击他。
28 २८ पुराने त्याच्या घरातील संपत्ती नष्ट होईल, देवाच्या क्रोधाच्या दिवशी त्याची संपत्ती वाहून जाईल.
他的家产必然过去; 神发怒的日子,他的货物都要消灭。
29 २९ देवाकडून नेमलेला हा दुष्टमनुष्याचा वाटा आहे, देवाने ठेवलेले हे त्याचे वतन आहे.”
这是恶人从 神所得的分, 是 神为他所定的产业。

< ईयोब 20 >