< ईयोब 2 >
1 १ पुन्हा एके दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहीले, त्यांच्यामध्ये सैतानही परमेश्वरासमोर हजर झाला होता.
2 २ परमेश्वर सैतानाला म्हणाला, “तू कोठून येत आहेस?” सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले आणि म्हणाला, “पृथ्वीवर हिंडून फिरून आणि येथून तेथून चालत जाऊन परत आलो आहे.”
3 ३ नंतर परमेश्वर सैतानाला म्हणाला, “माझा सेवक ईयोब याच्याकडे तूझे लक्ष गेले का? पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणीही नाही, तो सात्विक आणि सरळ मनुष्य आहे, तो देवाचे भय धरीतो आणि दुष्ट गोष्टींपासून दूर राहतो. जरी त्याच्याविरुध्द कोणतेही कारण नसतांना त्याचा नाश करण्यास तू मला तयार केले, तरीही त्याने आपली सात्विक्ता अंखड धरून ठेवली आहे.”
4 ४ सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, आणि म्हटले, “कातडीसाठी कातडी, खरोखर मनुष्य स्वतःच्या जीवासाठी आपले सर्वकाही देईल.
5 ५ परंतु जर तू तुझा हात लांब करून त्याच्या हाडांना आणि शरीराला स्पर्श केलास, तर तो तुझ्या तोंडावर तुझा नकार करील.”
6 ६ परमेश्वर सैतानाला म्हणाला, “पाहा, तो आता तुझ्या हाती आहे, मात्र त्याचा जीव राखून ठेव.”
7 ७ मग सैतान परमेश्वराच्या उपस्थितीतून निघून गेला आणि त्याने ईयोबाला तळपायांपासुन डोक्यापर्यंत वेदनांनी भरलेल्या फोडांनी पीडिले.
8 ८ ईयोबाने स्वतःचे अंग खाजविण्यासाठी खापराचा तुकडा घेतला आणि तो राखेत जाऊन बसला.
9 ९ नंतर त्याची पत्नी त्यास म्हणाली, “तुम्ही अजूनही तुमची सात्विक्ता धरून ठेवली आहे का? तुम्ही देवाचा त्याग करा आणि मरा,”
10 १० परंतू तो तिला म्हणाला, “तू मूर्ख स्त्रीसारखी बोलत आहेस. देवाच्या हातातून आपण चांगलेच घेतले पाहीजे वाईट नाही काय?” तू असाच विचार करतेस ना? या सर्व बाबतीत ईयोबाने त्याच्या बोलण्याद्बारे पाप केले नाही.
11 ११ ईयोबाचे तीन मित्र म्हणजे अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि सोफर नामाथी या तिन्ही मित्रांनी त्याच्यावर आलेल्या संकटाविषयी ऐकले होते, ईयोबाला भेटून त्याच्यासोबत शोक करण्यास आणि त्याचे सांत्वन करावे याबद्दल त्यांचे एकमत झाले, तेव्हा ते आपआपल्या ठिकाणाहून आले.
12 १२ जेव्हा त्यांनी दुरून आपले डोळे वर करून पाहिले तेव्हा त्यांनी त्यास आळखले नाही, ते मोठ्याने रडले, प्रत्येकाने आपआपला स्वतःचा झगा फाडला आणि हवेत धूळ उडवली आणि स्वतःच्या डोक्यावरही घेतली.
13 १३ मग ते त्याच्याबरोबर सात दिवस आणि सात रात्री जमीनीवर बसून राहिले, आणि त्याच्याशी एक शब्दही कोणी बोलले नाही कारण त्याचा शोक अतिशय तीव्र होता असे त्यांनी पाहीले.