< ईयोब 19 >

1 नंतर ईयोबने उत्तर दिले आणि म्हणाला,
Then Job answered:
2 “तुम्ही मला किती वेळ माझ्या जीवाला त्रास देणार आहात? आणि शब्दांनी मला मोडणार आहात?
“How long will you torment me and crush me with your words?
3 तुम्ही आतापर्यंत दहा वेळा माझा अपमान केला आहे. तुम्ही कठोरतेने माझ्याबरोबर वागता त्याची लाजही बाळगत नाही
Ten times now you have reproached me; you shamelessly mistreat me.
4 जर खरच मी काही चुक केली असेल तर, ती चुक माझी मला आहे.
Even if I have truly gone astray, my error concerns me alone.
5 तुम्ही माझ्यापेक्षा चांगले आहात एवढेच तुम्हास दाखवायचे आहे, माझी संकटे माझ्या चुकीमुळेच निर्माण झाली आहेत असे तुम्ही (उगीचच) म्हणता.
If indeed you would exalt yourselves above me and use my disgrace against me,
6 मग तुम्हास हे माहीती पाहिजे कि, देवानेच मला पकडण्यासाठी जाळे टाकले आहे.
then understand that it is God who has wronged me and drawn His net around me.
7 ‘पाहा, असे मी ओरडतो कि मी चुकीचे केले आहे, पण कोणी ऐकले नाही. मी मदतीसाठी जोरात ओरडलो तरी न्याय मिळत नाही.
Though I cry out, ‘Violence!’ I get no response; though I call for help, there is no justice.
8 मी पुढे जाऊ नये म्हणून देवाने माझ्या मार्गात अडथळा आणला. त्याने माझ्या मार्गावर अंधकार पाडला आहे.
He has blocked my way so I cannot pass; He has veiled my paths with darkness.
9 देवाने माझी प्रतिष्ठा धुळीला मिळवली. आणि त्याने माझ्या डोक्यावरचा मुकुट काढून घेतला.
He has stripped me of my honor and removed the crown from my head.
10 १० माझा सर्वनाश होईपर्यंत देव मला चाऱ्ही बाजूंनी झोडपतो. एखादे झाड मुळासकट उपटून काढावे त्याप्रमाणे त्याने माझ्या आशा उपटून टाकल्या आहेत.
He tears me down on every side until I am gone; He uproots my hope like a tree.
11 ११ त्याचा क्रोध मला जाळीत आहे, तो मला त्याचा एक शत्रू असे संबोधतो.
His anger burns against me, and He counts me among His enemies.
12 १२ त्याचे सैन्य माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवतो ते माझ्याभोवती मोर्चा उभारतात, आणि ते माझ्या डेऱ्याभोवती छावणी टाकतात.
His troops advance together; they construct a ramp against me and encamp around my tent.
13 १३ त्याने माझ्या भावांना माझ्यापासुन फार दूर केले आहे, माझ्या सर्वांना दूर ठेवण्याचा अनुभव त्याने मला दिला आहे.
He has removed my brothers from me; my acquaintances have abandoned me.
14 १४ माझे नातलग मला सोडून गेले आहेत, माझ्या जवळचे मित्र मला विसरले आहेत.
My kinsmen have failed me, and my friends have forgotten me.
15 १५ माझ्या घरी येणारे पाहुणे आणि माझ्या दासी मला परका आणि परदेशातला समजतात, मी त्यांच्या दृष्टीने उपरा झालो आहे.
My guests and maidservants count me as a stranger; I am a foreigner in their sight.
16 १६ जरी मी माझ्या मुखाने याचना केली, माझ्या नोकराला बोलावले, तरी तो मला उत्तर देत नाही,
I call for my servant, but he does not answer, though I implore him with my own mouth.
17 १७ माझी पत्नी माझ्या श्वासाचा तिरस्कार करते, माझे स्वतःचे भाऊ आणि बहिणी माझा तिरस्कार करतात.
My breath is repulsive to my wife, and I am loathsome to my own family.
18 १८ लहान मुलेदेखील मला चिडवतात, जेव्हा मी बोलायला जातो तेव्हा ते माझ्या विरूद्ध बोलतात.
Even little boys scorn me; when I appear, they deride me.
19 १९ माझे जवळचे मित्रदेखील माझा तिरस्कार करतात. माझे ज्यांच्यावर प्रेम आहे ते लोक देखील माझ्याविरुध्द गेले आहेत.
All my best friends despise me, and those I love have turned against me.
20 २० मी इतका कृश झालो आहे की माझी कातडी हाडांवर लोबंते, मी केवळ दाताच्या कातडीने बचावलो आहे.
My skin and flesh cling to my bones; I have escaped by the skin of my teeth.
21 २१ माझी दया येऊ द्या, मित्रांनो, तुम्हास माझी दया येऊ द्या! कारण देवाचा हात मजवर पडला आहे.
Have pity on me, my friends, have pity, for the hand of God has struck me.
22 २२ तुम्ही माझा छळ असा करीत आहात जसे तुम्ही देव आहात. माझ्या देहाला सतत त्रास देण्याचा तुम्हास कंटाळा येत नाही का?
Why do you persecute me as God does? Will you never get enough of my flesh?
23 २३ अहो, मी जे बोलतो ते कुणीतरी लिहून ठेवावे! अहो, ते पुस्तकात नमुद करून ठेवायला हवेत.
I wish that my words were recorded and inscribed in a book,
24 २४ अहो, मी जे बोलतो ते लोखंडी कलमाने शिश्यावर किंवा पाषाणावर कोरुन कायम करायला हवे.
by an iron stylus on lead, or chiseled in stone forever.
25 २५ माझा तारण करणारा जिवंत आहे याची मला खात्री आहे. आणि शेवटी तो या पृथ्वीतलावर येऊन उभा राहील.
But I know that my Redeemer lives, and in the end He will stand upon the earth.
26 २६ मी जेव्हा माझे शरीर सोडून जाईन तेव्हा आणि माझी कातडी नष्ट होईल तेव्हा सुध्दा मी देवाला पाहू शकेन.
Even after my skin has been destroyed, yet in my flesh I will see God.
27 २७ मी देवाला बघेन, तर मी स्वत: च त्यास पाहीन, माझे डोळे त्यास पाहतील, आणि ते परक्यासारखे राहणार नाही. माझा अतंरात्मा झुरत आहे.
I will see Him for myself; my eyes will behold Him, and not as a stranger. How my heart yearns within me!
28 २८ या सगळ्याचे मूळ माझ्याकडेच आढळून आले आहे, म्हणून याचा छळ कोणत्या प्रकारे करावा असे तुम्ही म्हणाल.
If you say, ‘Let us persecute him, since the root of the matter lies with him,’
29 २९ तर तुम्हास तलवारीची भीती वाटायला हवी, कारण रागामुळे तलवारीने शासन होते, यावरुन तुम्हास कळेल की न्याय आहे.”
then you should fear the sword yourselves, because wrath brings punishment by the sword, so that you may know there is a judgment.”

< ईयोब 19 >