< ईयोब 18 >
1 १ नंतर शूहीच्या बिल्ददने उत्तर दिले आणि म्हणाला,
Odpovídaje pak Bildad Suchský, řekl:
2 २ तू तुझे बोलणे बंद कर! शांत राहा आणि लक्ष दे. आम्हास काही बोलू दे.
Dokudž neučiníte konce řečem? Pomyslte na to, a potom mluviti budeme.
3 ३ आम्ही पशूसारखे आहोत असे तू का समजतोस, आम्ही का तुझ्या दृष्टीने अशुद्ध झालोत?
Proč jsme počteni za hovada? Oškliví jsme jemu, jakž sami vidíte.
4 ४ रागाने स्वत: स फाडून टाकणाऱ्या, तुझ्यामुळे पृथ्वी ओस पडेल काय, किंवा खडक त्याची जागा सोडेल का?
Ó ty, jenž hubíš život svůj zůřením svým, zdaliž pro tebe opuštěna bude země, a odsedne skála z místa svého?
5 ५ खरोखर, “दुष्ट मनुष्याचा प्रकाश नाहीसा होईल. त्याचा अग्नी पेटणे बंद होईल.
Anobrž světlo bezbožných uhašeno bude, aniž se blyštěti bude jiskra ohně jejich.
6 ६ त्यांच्या घरातला प्रकाश अंधकारमय होईल. त्यांच्या जवळचा दिवा विझेल.
Světlo se zatmí v stánku jeho, a lucerna jeho v něm zhasne.
7 ७ त्याची पाऊले पुन्हा दमदारपणे व भरभर पडणार नाहीत. तो हळुहळु चालेल आणि अशक्त बनेल. त्याच्या दुष्ट मसलती त्याचा अध: पात करतील.
Ssouženi budou krokové síly jeho, a porazí jej rada jeho.
8 ८ त्याचेच पाय त्यास सापळ्यात अडकवतील. तो खडकाळ मार्गाने चालला आहे.
Nebo zapleten jest do síti nohami svými, a v zamotání chodí.
9 ९ सापळा त्याची टाच पकडेल. त्यास घटृ पकडून ठेवेल.
Chytí ho za patu osídlo, a zmocní se ho násilník.
10 १० जमिनीवरची दोरी त्यास जाळ्यात अडकवेल. सापळा त्याची त्याच्या मार्गातच वाट बघत असेल.
Skrytať jest při zemi smečka jeho, a léčka jeho na stezce.
11 ११ दहशत चोहोबाजूंनी त्याची वाट पाहत आहे. भीती त्याच्या प्रत्येक पावलावर पाठलाग करीत आहे.
Odevšad hrůzy jej děsiti budou a dotírati na nohy jeho.
12 १२ वाईट संकटे त्याच्यासाठी भुकेली आहेत. विध्वंस आणि अरिष्ट तो पडण्याचीच वाट पाहत आहेत.
Hladovitá bude síla jeho, a bída pohotově při boku jeho.
13 १३ भयानक रोग त्याचे अवयव तोडून खाईल. खरोखर, मृत्यूचा जेष्ठ पुत्र त्याचा नाश करील.
Zžíře žily kůže jeho, zžíře oudy jeho kníže smrti.
14 १४ त्याच्या घराच्या सुरक्षिततेपासून दूर नेला जाईल. त्यास भयाच्या राजापुढे हजर करण्यासाठी दूर नेले जाईल.
Uchváceno bude z stánku jeho doufání jeho, a to jej přivede k králi strachů.
15 १५ जे त्याचे नव्हते ते त्याच्या डेऱ्यात वास करतील त्याच्या घरात सर्वत्र जळते गंधक विखरतील.
V stánku jeho hrůza bydleti bude, ač nebyl jeho; posypáno bude obydlí jeho sirou.
16 १६ त्याची खालची मुळे सुकून जातील आणि वरच्या फांद्या मरतील.
Od zpodku kořenové jeho uschnou, a svrchu osekány budou ratolesti jeho.
17 १७ पृथ्वीवरील लोकांस त्याची आठवण राहणार नाही. आता त्याचे नाव रसत्यावर पण कोणी घेत नाही.
Památka jeho zahyne z země, aniž jméno jeho slýcháno bude na ulicích.
18 १८ लोक त्यास प्रकाशापासून दूर अंधारात ढकलतील. आणि त्याना या जगातून पळवून लावतील.
Vyženou ho z světla do tmy, anobrž z okršlku zemského vypudí jej.
19 १९ त्यास मुले आणि नातवंडे असणार नाहीत. तो जेथे राहतो तिथे कोणी उरणार नाही.
Ne pozůstaví ani syna ani vnuka v lidu svém, ani jakého ostatku v příbytcích svých.
20 २० पश्चिमेकडचे लोक जेव्हा या दुष्ट मनुष्याचे काय झाले ते ऐकतील तेव्हा त्यांना धक्का बसेल. आणि पूर्वेकडचे लोक भयाने कंपित होतील.
Nade dnem jeho zděsí se potomci, a přítomní strachem podjati budou.
21 २१ दुष्ट मनुष्याच्या घराचे खरोखरच असे होईल. जो देवाला ओळखत नाही त्याच्याबाबतीत असेच घडेल.”
Takovýť jest zajisté způsob nešlechetného, a takový cíl toho, kterýž nezná Boha silného.