< ईयोब 16 >
1 १ नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला,
そこでヨブは答えて言った、
2 २ “या सर्व गोष्टी मी पूर्वी ऐकल्या आहेत, तुम्ही सर्व वायफळ सांत्वनकर्ते आहात.
「わたしはこのような事を数多く聞いた。あなたがたは皆人を慰めようとして、かえって人を煩わす者だ。
3 ३ तुमची वायफळ शब्द कधीही संपत नाहीत. तुम्हास काय झाले आहे कि, तुम्ही याप्रमाणे उत्तर देता?
むなしき言葉に、はてしがあろうか。あなたは何に激して答をするのか。
4 ४ जर तुमच्यासारखे मलाही बोलता आले असते, तर जे आता तुम्ही म्हणत आहात तेच मीही म्हणू शकलो असतो. मी तुमच्याविरुध्द शहाणपणाच्या गोष्टी सांगू शकलो असतो आणि माझे डोके तुमच्यासमोर हलवू शकलो असतो.
わたしもあなたがたのように語ることができる。もしあなたがたがわたしと代ったならば、わたしは言葉を練って、あなたがたを攻め、あなたがたに向かって頭を振ることができる。
5 ५ अहो मी तुम्हास माझ्या मुखाने मी धीर दिला असता. आणि माझ्या ओठाने तुमचे सांत्वन केले असते.
また口をもって、あなたがたを強くし、くちびるの慰めをもって、あなたがたの苦しみを和らげることができる。
6 ६ परंतु मी काहीही बोललो तरी माझ्या यातना कमी होत नाहीत. पण मी बोललो नाहीतर माझ्या यातना कमी कशा होणार?
たといわたしは語っても、わたしの苦しみは和らげられない。たといわたしは忍んでも、どれほどそれがわたしを去るであろうか。
7 ७ खरोखरच तू माझी शक्ती हिरावून घेतली आहेस. तू माझ्या सर्व कुटुंबाचा नाश केला आहेस.
まことに神は今わたしを疲れさせた。彼はわたしのやからをことごとく荒した。
8 ८ तू मला खूप बारीक व अशक्त केले आहे म्हणून मी अपराधी आहे असे लोकांस वाटते.
彼はわたしを、しわ寄らせた。これがわたしに対する証拠である。またわたしのやせ衰えた姿が立って、わたしを攻め、わたしの顔にむかって証明する。
9 ९ देव माझ्यावर हल्ला करतो. तो माझ्यावर रागावला आहे आणि तो माझे शरीर छिन्न विछिन्न करतो. तो माझ्याविरुध्द दात खातो, माझ्या शत्रूचे डोळे माझ्याकडे तिरस्काराने बघतात.
彼は怒ってわたしをかき裂き、わたしを憎み、わたしに向かって歯をかみ鳴らした。わたしの敵は目を鋭くして、わたしを攻める。
10 १० लोक माझ्या भोवती जमले आहेत. ते माझी थट्टा करतात व तोंडावर मारतात.
人々はわたしに向かって口を張り、侮ってわたしのほおを打ち、ともに集まってわたしを攻める。
11 ११ देवाने मला दुष्ट लोकांच्या स्वाधीन केले आहे. त्याने क्रूर मनुष्यांना मला त्रास द्यायची परवानगी दिली आहे.
神はわたしをよこしまな者に渡し、悪人の手に投げいれられる。
12 १२ मी अगदी मजेत होतो, पण देवाने मला चिरडून टाकले. हो त्याने माझी मान पकडली आणि माझे तुकडे तुकडे केले त्याने माझा निशाण्यासारखा उपयोग केला.
わたしは安らかであったのに、彼はわたしを切り裂き、首を捕えて、わたしを打ち砕き、わたしを立てて的とされた。
13 १३ त्याचे धनुर्धारी मला घेरतात. तो माझ्या कंबरेत बाण सोडतो तो दया दाखवीत नाही. तो माझे पित्ताशय धरतीवर रिकामे करतो.
その射手はわたしを囲む。彼は無慈悲にもわたしの腰を射通し、わたしの肝を地に流れ出させられる。
14 १४ देव माझ्यावर पुन्हा पुन्हा हल्ला करतो. सैनिकाप्रमाणे तो माझ्यावर चाल करून येतो.
彼はわたしを打ち破って、破れに破れを加え、勇士のようにわたしに、はせかかられる。
15 १५ मी फार दु: खी आहे म्हणून मी दु: खाचे कपडे घालतो. मी इथे धुळीत आणि राखेत बसतो आणि मला पराभूत झाल्यासारखे वाटते.
わたしは荒布を膚に縫いつけ、わたしの角をちりに伏せた。
16 १६ रडल्यामुळे माझा चेहरा लाल झाला आहे. माझ्या पापण्यांवर मरणाची छाया आहे.
わたしの顔は泣いて赤くなり、わたしのまぶたには深いやみがある。
17 १७ तरीही माझ्या हातून कोणात्याही प्रकारची हिंसा झाली नाही, आणि माझ्या प्रार्थना शुध्द आहेत. तरी असे झाले.
しかし、わたしの手には暴虐がなく、わたしの祈は清い。
18 १८ हे धरती, माझे रक्त लपवू नकोस. माझ्या रडण्याला विश्रांतीस्थान देऊ नकोस.
地よ、わたしの血をおおってくれるな。わたしの叫びに、休む所を得させるな。
19 १९ स्वर्गात कदाचित् माझ्या बाजूचा कुणीतरी असेल. जो माझी त्या सर्वसमर्थासमोर हमी घेईल.
見よ、今でもわたしの証人は天にある。わたしのために保証してくれる者は高い所にある。
20 २० माझे मित्र माझा उपहास करतात, पण माझे डोळे देवासमोर अश्रू ढाळतात.
わたしの友はわたしをあざける、しかしわたしの目は神に向かって涙を注ぐ。
21 २१ जशी एखादी व्यक्ती आपल्या मित्रासाठी वादविवाद करते तसा तो माझ्याविषयी देवाबरोबर बोलतो.
どうか彼が人のために神と弁論し、人とその友との間をさばいてくれるように。
22 २२ जेव्हा काही वर्ष जातील, तेव्हा मी पुन्हा कधीही परतून न येणाऱ्या जागी जाणार आहे.”
数年過ぎ去れば、わたしは帰らぬ旅路に行くであろう。