< ईयोब 15 >

1 नंतर अलीफज तेमानीने उत्तर दिले आणि म्हणाला,
Elifaz il Temanita prese a dire:
2 “शहाणा मनुष्य, वायफळ शहाणपणाचे उत्तर देणार काय, आणि पूर्वे कडील वाऱ्याने स्वतःला भरेल का?
Potrebbe il saggio rispondere con ragioni campate in aria e riempirsi il ventre di vento d'oriente?
3 तो ज्यात काही लाभ नाही अशा निरुपयोगी कारणास्तव बोलेल काय किंवा जे सांगण्यास योग्य नाही असा उपदेश करेल काय?
Si difende egli con parole senza costrutto e con discorsi inutili?
4 खरोखर, तू देवाचा आदर करणे सोडले आहेस, त्याच्या भक्तीत तू खीळ घालत आहेस.
Tu anzi distruggi la religione e abolisci la preghiera innanzi a Dio.
5 तुझे पाप तुझ्या मुखाला बोलण्यास शिकविते, तू तुझ्यासाठी अधर्माची जीभ निवडली आहे.
Sì, la tua malizia suggerisce alla tua bocca e scegli il linguaggio degli astuti.
6 मी नव्हे, तुझेच स्वमुख तुला दोषी मानत आहे. खरोखर, तुझे स्वत: चेच ओठ तुझ्याविरुध्द साक्ष देतात
Non io, ma la tua bocca ti condanna e le tue labbra attestano contro di te.
7 तूच प्रथम मनुष्य असा जन्माला आलास काय? टेकड्या निर्माण व्हायच्या आधीच तू जन्मलास का?
Sei forse tu il primo uomo che è nato, o, prima dei monti, sei venuto al mondo?
8 तू देवाच्या गुप्त मसलती ऐकल्यास का? केवळ तूच एक शहाणा मनुष्य आहेस असे तुला वाटते का?
Hai avuto accesso ai segreti consigli di Dio e ti sei appropriata tu solo la sapienza?
9 आम्हास समजत नाही असे तुला काय माहीती आहे? आम्हास अवगत नाही असे काय तुला माहीत आहे?
Che cosa sai tu che noi non sappiamo? Che cosa capisci che da noi non si comprenda?
10 १० केस पांढरे झालेले लोक आणि वृध्द आमच्याशी सहमत आहेत. होय, तुझ्या वडिलांपेक्षा वृध्द असलेले लोक आमच्यात आहेत.
Anche fra di noi c'è il vecchio e c'è il canuto più di tuo padre, carico d'anni.
11 ११ देवाने केलेले सांत्वन आणि तुजशी केलेली सौम्य भाषण तुला तुच्छ वाटतात काय?
Poca cosa sono per te le consolazioni di Dio e una parola moderata a te rivolta?
12 १२ तुझे मन तुला का मार्ग भ्रष्ट करीत आहे? तू डोळे का फिरवितोस,
Perché il tuo cuore ti trasporta e perché fanno cenni i tuoi occhi,
13 १३ तू असा तुझा आत्त्मा देवाच्या विरुध्द का फिरवतोस आणि तुझ्या तोंडा वाटे असे शब्द का येतात.
quando volgi contro Dio il tuo animo e fai uscire tali parole dalla tua bocca?
14 १४ मनुष्य तो काय, जो निष्कलंक असेल? स्त्री पासून जन्मलेला मनुष्य तो निष्पाप कसा असणार?
Che cos'è l'uomo perché si ritenga puro, perché si dica giusto un nato di donna?
15 १५ पहा, देवाच्या नजरेत आकाशही स्वच्छ नाही, खरोखर, देव त्याच्या पवित्र जनांचाही विश्वास करत नाही.
Ecco, neppure dei suoi santi egli ha fiducia e i cieli non sono puri ai suoi occhi;
16 १६ असा मनुष्य जो अधर्म पाण्यासारख्या पितो, अशुद्ध आणि अप्रामाणिक असा मनुष्य तो काय?
quanto meno un essere abominevole e corrotto, l'uomo, che beve l'iniquità come acqua.
17 १७ माझे ऐक, मी तुला समजावून सांगतो, मी पाहिलेल्या गोष्टी तुम्हास सांगतो.
Voglio spiegartelo, ascoltami, ti racconterò quel che ho visto,
18 १८ विद्वानांनी ज्या गोष्टी मला सांगितल्या, त्या मी तुला सांगतो. विद्वानाच्या पूर्वजांनी त्यांना या गोष्टी सांगितल्या. त्यांनी माझ्यापासून कुठलीही गुप्त गोष्ट लपवून ठेवली नाही.
quello che i saggi riferiscono, non celato ad essi dai loro padri;
19 १९ ती भूमी त्याच्या पूर्वजांना दिलेली होती, ज्यात एकटेच राहत होते, आणि त्या मधून कोणी परदेशी कधीही जाऊ शकत नव्हते.
a essi soli fu concessa questa terra, né straniero alcuno era passato in mezzo a loro.
20 २० दुष्ट मनुष्याचे सर्व दिवस वेदनात फिरवले जातात, जुलम्याचे जीवनाची वर्ष यातना भोगण्यासाठीच असतात.
Per tutti i giorni della vita il malvagio si tormenta; sono contati gli anni riservati al violento.
21 २१ भीतीचा आवाज त्याच्या कानात आहे, जेव्हा तो समृद्धीत असेल, नाश करणारा त्याच्यावर येईल.
Voci di spavento gli risuonano agli orecchi e in piena pace si vede assalito dal predone.
22 २२ अंधारातून बाहेर येण्याची तो खात्री करत नाही, त्याच्याकरिता तलवार वाट पाहत आहे.
Non crede di potersi sottrarre alle tenebre, egli si sente destinato alla spada.
23 २३ ते कुठे आहे? असे म्हणत तो भाकरीसाठी इकडे तिकडे भटकतो, अंधकाराचा दिवस हाताशी आहे हे तो जाणतो.
Destinato in pasto agli avvoltoi, sa che gli è preparata la rovina.
24 २४ संकटे आणि दु: ख त्यास भित्रा बनवतात, हाल करण्यासाठी तयार असलेल्या राजा प्रमाणे ते त्याच्या विरूद्ध यश पावतात.
Un giorno tenebroso lo spaventa, la miseria e l'angoscia l'assalgono come un re pronto all'attacco,
25 २५ कारण त्याने देवाच्या विरूद्ध त्याचा हात उगारला आहे, आणि सर्वशक्तिमान देवाच्या विरूद्ध तो गर्वाने वागत आहे.
perché ha steso contro Dio la sua mano, ha osato farsi forte contro l'Onnipotente;
26 २६ हा दुष्ट मनुष्य ताठ मानेन, जड उंच वाटे असलेली ढाल घेऊन देवाकडे धावतो,
correva contro di lui a testa alta, al riparo del curvo spessore del suo scudo;
27 २७ त्याचा चेहरा त्याने आपल्या चारबीने जरी झाकून घेतला आणि आपली चरबी त्याने कंबरेत साठवली,
poiché aveva la faccia coperta di grasso e pinguedine intorno ai suoi fianchi.
28 २८ आणि उद्वस्त शहरात राहतो, ज्या घरात माणसे राहतात, आणि आत्ता ते मातीचे ढीग होण्यास तयार आहे.
Avrà dimora in città diroccate, in case dove non si abita più, destinate a diventare macerie.
29 २९ तरी तो श्रीमंत होणार नाही, त्याची संपती पण टिकणार नाही, त्याची सावली पण त्यास सोडून जाईल.
Non arricchirà, non durerà la sua fortuna, non metterà radici sulla terra.
30 ३० त्याची काळोखापासून सुटका नाही, आग्नीने त्याच्या फांद्या सुकतील, देवाच्या मुख श्वासाने तो दूर जाईल.
Alle tenebre non sfuggirà, la vampa seccherà i suoi germogli e dal vento sarà involato il suo frutto.
31 ३१ निरुपयोगी गोष्टींवर त्याने विश्वास ठेवून स्वत: चीच फसवणूक करून घेऊ नये. निरउपयोगीता त्याचे बक्षीस होईल.
Non confidi in una vanità fallace, perché sarà una rovina.
32 ३२ आयुष्य संपण्याच्या आधीच दुष्ट मनुष्य म्हातारा आणि शुष्क झालेला असेल. तो पुन्हा कधीही हिरव्या न होणाऱ्या फांदीसारखा असेल.
La sua fronda sarà tagliata prima del tempo e i suoi rami non rinverdiranno più.
33 ३३ न पिकलेले द्राक्ष जसे अकाली गळून पडतात त्या वेलीसारखा तो होईल, जैतून झाडाच्या फुला प्रमाणे त्याची फुले गळतील.
Sarà spogliato come vigna della sua uva ancor acerba e getterà via come ulivo i suoi fiori,
34 ३४ अधर्म्याचे घराणे फळ द्रूप होणार नाही लाचलुचूपताचे तंबू आगीत भस्मसात होतात.
poiché la stirpe dell'empio è sterile e il fuoco divora le tende dell'uomo venale.
35 ३५ ते अपकाराची गर्भधारणा करतात आणि अधर्मास जन्म देतात, त्यांच्या उदरात लबाडीचा गर्भ आहे.”
Concepisce malizia e genera sventura e nel suo seno alleva delusione.

< ईयोब 15 >