< ईयोब 13 >

1 पाहा, “हे सर्व मी पूर्वी पाहिले आहे, माझ्या कानांनी हे ऐकले आहे व त्या सर्व गोष्टी मला समजतात.
"Katso, kaikkea tätä on silmäni nähnyt, korvani kuullut ja sitä tarkannut.
2 तुला जेवढे माहीत आहे तेवढेच मलाही माहीत आहे, मी तुमच्याहून काही कमी नाही.
Mitä te tiedätte, sen tiedän minäkin; en ole minä teitä huonompi.
3 मला सर्वशक्तिमानाशी बोलायचे आहे, मला देवाबरोबर माझ्या कारणाविषयी बोलायचे आहे.
Mutta minä mielin puhua Kaikkivaltiaalle, minä tahdon tuoda todistukseni Jumalaa vastaan.
4 तुम्ही तिघेजण खोटे बोलून तुमचे अज्ञान लपवीत आहात. ज्या वैद्याला कुणालाही बरे करता येत नाही अशा निरुपयोगी वैद्यासारखे तुम्ही आहात.
Sillä te laastaroitte valheella, olette puoskareita kaikki tyynni.
5 अहो, तुम्ही गप्प बसावे अशी माझी इच्छा आहे. ती तुम्हास करता येण्याजोगी सर्वात शहाणपणाची गोष्ट असेल.
Jospa edes osaisitte visusti vaieta, niin se olisi teille viisaudeksi luettava!
6 आता माझ्या युक्तिवादाकडे लक्ष द्या, माझ्या ओठाची फिर्याद ऐका.
Kuulkaa siis, mitä minä todistan, ja tarkatkaa, mitä huuleni väittävät vastaan.
7 तुम्ही देवासाठी खोटे बोलाल का? त्याच्या करीता तुम्ही कपटाचे भाषण करणार काय?
Tahdotteko puolustaa Jumalaa väärällä puheella ja puhua vilppiä hänen puolestaan;
8 तुम्ही माझ्याविरुध्द देवाचा बचाव करीत आहात का? तुम्ही मुळीच न्यायाने वागत नाहीत तो देव आहे म्हणून तुम्ही त्याची बाजू घेत आहात.
tahdotteko olla puolueellisia hänen hyväksensä tahi ajaa Jumalan asiaa?
9 जर देवाने अगदी जवळून तुमची तपासणी केली तर, त्यास काहीतरी चांगले आढळेल का? तुम्ही लोकांस जसे मूर्ख बनवू शकता तसेच देवालाही बनवू शकाल असे तुम्हास वाटते का?
Koituuko siitä silloin hyvää, kun hän käy teitä tutkimaan; tahi voitteko pettää hänet, niinkuin ihminen petetään?
10 १० तुम्ही जर एखादा मनुष्य महत्वाचा आहे म्हणून न्यायालयात त्याची बाजू घेतलीत तर देव तुमच्यावर टीका करेल हे तुम्हास माहीत आहे का?
Hän teitä ankarasti rankaisee, jos salassa olette puolueellisia.
11 ११ देवाचे मोठेपण तुम्हास घाबरवत नाही काय? त्याचा धाक तुम्हास वाटणार नाही काय?
Eikö hänen korkeutensa peljästytä teitä ja hänen kauhunsa teitä valtaa?
12 १२ तुमचे युक्तिवाद कुचकामाचे आहेत. तुमची उत्तरे कवडीमोलाची आहेत, तुमची तटबंदी ही मातीपासून बनलेली आहे.
Tuhkalauselmia ovat teidän mietelauseenne, savivarustuksia silloin teidän varustuksenne.
13 १३ आता जरा गप्प बसा आणि मला बोलू द्या! माझे जे काही होईल ते मला मान्य आहे.
Vaietkaa, antakaa minun olla, niin minä puhun, käyköön minun miten tahansa.
14 १४ मी माझे मांस माझाच दातात धरेन मी माझ्याच हातात माझेच जीवन धरीन?
Miksi minä otan lihani hampaisiini ja panen henkeni kämmenelleni?
15 १५ पहा, जरी त्याने मला मारुन टाकले, तरी मी त्याच्यावरच विश्वास ठेवीन. असे असले तरी, मी त्याच्यासमोर माझा मार्गांची मांडणी करीन.
Katso, hän surmaa minut, en minä enää mitään toivo; tahdon vain vaellustani puolustaa häntä vastaan.
16 १६ कारण ढोंगी त्याच्या पुढे येणार नाही हे माझे तारण होईल.
Jo sekin on minulle voitoksi; sillä jumalaton ei voi käydä hänen kasvojensa eteen.
17 १७ देवा, तू माझे सांगणे काळजी पूर्वक ऐक, माझी घोषणा तुझा कानी येऊदे.
Kuulkaa tarkasti minun puhettani, ja mitä minä lausun korvienne kuullen.
18 १८ आता पहा, मी माझ्या बचावाला सिध्द झालो आहे. मी माझे मुद्दे काळजीपूर्वक मांडीन. मला माहीत आहे की मी निष्पाप आहे हे मी दाखवून देईन.
Katso, olen ryhtynyt käymään oikeutta; minä tiedän, että olen oikeassa.
19 १९ न्यायालयात माझ्या विरुध वादविवाद करेल असा कोण आहे? आणि माझी चुक आहे हे तू येऊन सिद्ध केलेस म्हणून मी गप्प बसेन व प्राण त्यागेन.
Kuka saattaa käräjöidä minua vastaan? Silloin minä vaikenen ja kuolen.
20 २० देवा, तू माझासाठी फक्त दोन गोष्टी कर, आणि त्यानतर तुझ्या मुखापासून मी स्वत: ला लपवणार नाही.
Kahta vain älä minulle tee, niin en lymyä sinun kasvojesi edestä:
21 २१ माझ्या विरुध असलेला तुझा हात कडून घे, आणि तुझ्या भयानक गोष्टींनी मला भयभीत करण्याचे थांबव.
ota pois kätesi minun päältäni, ja älköön kauhusi minua peljättäkö;
22 २२ नंतर मला हाक मार. मी तुला ओ देईन किंवा मला बोलू दे आणि तू मला उत्तर दे.
sitten haasta, niin minä vastaan, tahi minä puhun, ja vastaa sinä minulle.
23 २३ मी किती पापे केली आहेत? मी काय चुका केल्या आहेत? तू मला माझी पापे आणि माझ्या चुका दाखव.
Mikä on minun pahain tekojeni ja syntieni luku? Ilmaise minulle rikkomukseni ja syntini.
24 २४ तू आपले मुख माझ्या पासून का लपवत आहेस? आणि मला तुझ्या शत्रूसारखे का वागवीत आहेस?
Miksi peität kasvosi ja pidät minua vihollisenasi?
25 २५ मी वाऱ्यावर उडणारे एक पान मात्र आहे. तू गवताच्या एका काडीचा पिच्छा पुरवितोस का?
Lentävää lehteäkö peljätät, kuivunutta korttako vainoat,
26 २६ तू माझ्याविरुध्द फार कटू गोष्टी लिहिल्या. मी तरुणपणात जी पापे केली त्याबद्दल तू मला कष्ट भोगायला लावतो आहेस.
koskapa määräät katkeruuden minun osakseni ja perinnökseni nuoruuteni pahat teot,
27 २७ तू माझ्या पायात बेड्या घातल्या आहेस. माझ्या प्रत्येक पावलावर तू पाळत ठेवतोस, माझी प्रत्येक हालचाल तू टिपतोस.
koska panet jalkani jalkapuuhun, vartioitset kaikkia minun polkujani ja piirrät rajan jalkapohjieni ääreen?" -
28 २८ म्हणून मी कुजलेल्या लाकडासारखा, कसरीने खाल्लेल्या कापडासारखा क्षीण होत चाललो आहे.”
"Hän hajoaa kuin lahopuu, kuin koinsyömä vaate."

< ईयोब 13 >